परदेशातील आपला भारत देश

Submitted by प्रिया़ on 22 May, 2020 - 08:58

2017-04-19-1 (1).jpgनमस्कार,

सध्याच्या जगभरात व्यापलेल्या करुणा ग्रस्त स्थितीमध्ये खूप काळ घरी घालवता आला. २०१७ साली काढलेल्या काही फोटोंमुळे आठवणींना उजाळा देण्याची चांगली संधी या लेखाच्या रुपात मिळाली आणि वेळेचा योग्य असा सदुपयोग झाला. तर मग वाचूया का हा लेख……..

'परदेशातील आपला भारत देश'
लेखिका आणि छायाचित्रकार : प्रिया जोशी
________________________________

भारतीय वंशाचे अमेरिकन हे असे अमेरिकन आहेत की ज्यांचे पूर्वज प्रजासत्ताक भारताच्या सांस्कृतिक समुदायाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टया यशस्वी ह्या अल्पसंख्य समुदायाची अमेरिकेत लोकसंख्या जुन २०१५ प्रमाणे ४० लाख (१.२५%) एवढी आहे. हे मुळ भारतीय भारतातल्या बऱ्याचशा राज्यातून आणि प्रांतातून आले आहेत.

भारत देश हा अनेक धर्म, भाषा, प्रदेश, आणि संस्कृती असलेला, ऐतिहासिक वारसा जपणारा मोठा देश आहे. भारतातील पारंपरिक वेशभूषा पण वेगळेपण दर्शवते. धर्म, प्रांत, आणि समुदायाप्रमाणे ती बदलते. प्रत्येक राज्याची स्वतःची परंपरा, संस्कृती आणि जीवनपद्धती आहे. भारतीय वेषभूषा त्याच्या सुंदरतेमुळे आणि विविधतेमुळे जगभर प्रसिद्ध आहे .

पारंपारिक वेशभूषा पुरुषांनी घातल्यास ती एक प्रचलित फॅशन समजली जाते. आजच्या काळात स्रियांनी शर्ट आणि पॅन्ट परीक्षण करणे हे आधुनिक विचारसरणी आणि मुक्त स्वातंत्र्याचे द्योतक समजले जाते. असं म्हणतात, परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री आहे. स्त्री म्हणजे सौंदर्य, मोहकता, सहनशीलता, सक्षमता, आदिशक्तीचे रूप मानले जाते. संस्काराचा आणि सृजनाचा अविष्कार तिच्या ठायी आहे. नाविन्यता, बचतवृत्ती, संघप्रेरणा आणि समरणशक्ती हे गुण तिच्यात निसर्गतःच दिसून येतात. भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंबव्यवस्थेला खूप महत्व आहे. स्त्री ही त्या रचनेचे महत्याचे खांब आहे जी कुटुंब एकत्र ठेवण्याचे कार्य करते. नम्र आणि हळुवार बोलणे, दुसऱ्यांना सामावून मदत करणे ह्या वृत्तीपण त्यात दिसून येतात.

2017-04-192-1 (1).jpg
जेव्हा केव्हा एखादा समुदाय एकत्रित सांघिक विचाराने जवळ येतो, तेव्हा जादू नक्की होते.... एक भारतीय वंशाची छायाचित्रकार म्हणून मी 'परदेशातील आपला भारत देश' ह्या विषयावर आधारित फोटोसेशन करायचे ठरवले. मला ह्या उपक्रमाबद्दल पूर्ण पाठिंबा दहा सुंदर भारतीय आयांनी दिला. नवीन युगातील परदेशात राहणाऱ्या इथल्या भारतीय स्रियांनी आधुनिक रहाणीमान आणि अमेरिकेला संस्कृतीशी व्यवस्थित जुळवून घेतले असले तरी भारतीय प्रथा आणि परंपरा सांभाळून!

अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी भागात वसंतऋतू त्याच्या 'चेरी ब्लॉसम' मुळे विश्वविख्यात आहे. त्या ऋतूच्या पार्श्वभूमीवर 'ब्रूकसाईड गार्डन ' येथे हे फोटोसेशन आयोजित करण्यात आले. प्रविणा अनिखिंडी, दिव्या चूली, दीपा परशुराम, अश्विनी ताटेकर , सिंधुजा रेड्डी, कमल ओबेरॉय, तृप्ती ठाकूर, जिग्ना पारीख, मोनाली शेणोलीकर आणि संपदा शहाणे ह्यांनी भारतातल्या दहा राज्यांचे प्रतिनिधित्व केले. त्यात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल,पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि गुजरात ह्यांचा उल्लेख होईल. त्यात या स्त्रिया पारंपरिक पोषाख साडी, सलवार कमीझ आणि चुडीदार आणि त्या पोशाखाला साजेशी आभूषणे परिधान करताना दिसतील. नुकत्याच झालेल्या मातृदिनानिम्मित्त मी आपणासमोर हा लेख काही फोटोंसोबत प्रदर्शित करत आहे. आशा आहे हे काम तुम्हाला आवडेल!

आपली स्नेहांकित,
प्रिया जोशी.
कलार्क्सबर्ग, मेरीलँड २०८७१
फ़ोन: +१-९१९-३२१-१२६५
ईमेल : priyapramod@gmail.com
2017-04-193-1 (1).jpg

Group content visibility: 
Use group defaults

छान Happy