कुबेराचे चौर्यकर्म

Submitted by अग्निपंख on 21 May, 2020 - 00:59

लोकसत्तात एक लेख आला होता, कोविडोस्कोप ह्या सदरात.
नंतर समोर आलं की जो लेख स्वतः च्या नावावर खपवला होता तो तर शब्दशः फक्त भाषांतर करुन टाकला होता. (परवानगी न घेता)
बराच गाजावाजा होउन पण कुबेरने चकार शब्दही काढला नाही की माफी मागितली नाही, बहुतेक तो लेख गुप्चुप काढुन टाकला आहे.

EYDWUevU0AAbLvb.jpg

ह्या काही लिंक्स,

https://www.opindia.com/2020/05/loksatta-editor-girish-kuber-plagiarism-...

आणि हे andrew lilicoचं ट्वीट,
andrew_1.JPG
andrew ने हे प्रकरण बरच स्पोर्‍टिली घेतलेलं दिसतय.
andrew_2.JPGandrew_3.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताळेबंदी सुरु झाल्यापासून शेखर गुप्ता यांचे कट द कल्टर आणि कुबेर यांचे कोव्हीडोस्कोप मला कोरोना आणि त्यासंबंधित महत्वपूर्ण घडामोडींसाठी बेस्ट सोर्स वाटतायेत. कुबेर यांनी थोडा धक्काच दिलाय ज्याची आता सवय झालीय पण निदान माफी मागून यावर पडदा तरी टाकायला हवा.

लेख काढून टाकला पण चौर्यकर्म थांबवलेले दिसत नाही.
आजचा कोव्हिडोस्कोप मधला लेख
https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-on-michael-lev...

या LA Times च्या लेखावरून (https://www.google.com/amp/s/www.latimes.com/science/story/2020-03-22/co...)
उचललेला वाटतो. मात्र त्याहून गंभीर बाब म्हणजे LA times मधली स्टोरी अर्धवट कॉपी करून त्यावरून भलतेच निष्कर्ष काढले आहेत कुबेरांनी.
जगभरातल्या घडामोडी मराठीतून सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात हा उद्देश मला मान्य आहे पण त्या साठी जर केवळ हाच मार्ग उरला असेल तर किमान मूळ पत्रकाराला आणि स्रोताला श्रेय तरी द्या. अशा चोऱ्या कशाला?

जिज्ञासा यांनी लिंक दिलेल्या लेखातला बहुतेक भाग दुहेरी अवतरण चिन्हात आहे.
लेखाच्या शेवटी लॉकडाउन टीव्हीवरच्या मुलाखतीचा उल्लेख आहे.

मजकूर कुठून घेतला हे सांगायची अप्रत्यक्ष पद्धत म्हणायची का?
सरळ का सांगवत नाही?
की वृत्तपत्रांना काही वेगळे निकष असतात?

अंतरसोवळ्याने प्रसार कमी होतो हा गैरसमज आहे >> हे कुबेरांनी कोव्हिडोस्कोप मधे मायकेल लेवीट यांच्या तोंडी घातलेलं वाक्य.
पण LA times च्या लेखात मायकेल लेवीट म्हणतात -
Levitt said he’s in sync with those calling for strong measures to fight the outbreak. The social-distancing mandates are critical — particularly the ban on large gatherings — because the virus is so new that the population has no immunity to it, and a vaccine is still many months away. “This is not the time to go out drinking with your buddies,” he said.

कुबेरांनी लेवीट यांच्या म्हणण्याचा किती चुकीचा अर्थ लावला आहे हे स्पष्ट आहे. असं का करावं? लॉक डाऊन टिव्ही वरच्या मुलाखतीत लेवीट काही खूप वेगळं म्हणाले असतील असं मला वाटत नाही.

जिज्ञासा, तुम्हांला विरोध करावा म्हणून मी हे लिहीत नाहीए. कुबेरांनी सरळ क्रेडिट न देता हे लिहावं याचा राग आलाय.
आधीचा कोणता लेख उडवल्याचं म्हटलं जातंय तो वाचायला आवडला असता.

लॉक्डाउ न टीव्हीच्या मुलाखतीची ट्रा न्स्क्रि प्ट मला इथे मिळाली.
कुबेरांनी मुलाखत पाहून ते छापलंय असं वाटतंय. (नीट लक्ष देऊन दोन्ही लेख वाचता आलेले नाहीत )

The explanation for this flattening that we are used to is that social distancing and lockdowns have slowed the curve, but he is unconvinced.

ब्रिटनचा आणि चार देशांचा उल्लेख इथे आहेत.

लॉस एंजल्स टाइम्समधला लेख मार्चमधला तर हा वरचा मे मधला आहे.

भरत, दुव्यासाठी धन्यवाद!
I am not sure if Dr. Levitt really means that social distancing is not essential. He just thinks that other countries who have not been super stringent with social distancing as China seem to have lost similar fraction of population due to Covid19. This is no way same as "अंतरसोवळ्याने प्रसार कमी होतो हा गैरसमज आहे." All these countries have followed some kind of social distancing guidelines and they have certainly benefitted from it.
भारतासारख्या देशात लोकसंख्या बघता चायनाचेच मॉडेल वापरावे लागेल हा साधा विचार आहे.
कुबेरांनी श्रेय दिले नाही याचा राग आला आहेच पण त्याच बरोबरीने किमान भाषांतर करताना स्वतःच्या पदरचे काही घालू नये हा साधा नियम पाळला नाही याचाही राग आला आहे.

कुबेरांचा आधीचा लेख दिसतोय की. काढलेला नाहीये.
https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-switzerland-go...

जिज्ञासा, LA times मधला आणि कुबेरांचा असे दोन्ही लेख वाचले. चौर्यकर्म असं नाही म्हणता येणार असं मला वाटलं. लेवीट यांचं नाव घेऊनच लिहिलंय.
निष्कर्ष चुकीचा आहे का ते ठरवायला मुलाखत बघितली पाहिजे. कारण , LA times मधला लेख मार्चमधला आहे. मुलाखत नवीन असेल.

जिज्ञासा, हेही वाचून पहा.
https://www.stanforddaily.com/2020/05/04/qa-nobel-laureate-says-covid-19...

सोशल डिस्टन्सिंग आंणि लॉकडाउन लादण्यामागे गंभीर आजारी रुग्णांची संख्या उपलब्ध वैद्यकीय सुविधांच्या अवाक्या बाहेर जाऊ नये , परि स्थितीशी सामना कराय ची तयारी करायला वेळ मिळावा हा हेतू असायला हवा . या गोष्टीं करून आम्ही रोगाचा प्रसार थांबवू असा विचार चुकीचा वाटतो.

चीनच्या आकड्यांवर कुबेरांचा भलताच विश्वास दिसतो.

पण सर्वात मोठा कहर म्हणजे खालील वाक्य..

-----------------
लहान मुलांकडून या आजाराचा कधीही प्रसार झालेला नाही. हे विज्ञान आहे. आणि तरीही अनेकांनी लहान मुलांच्या शाळा बंद केल्या.
--------------

असलं काही लेविट यांनी म्हटलं असेल असं मला वाटत नाही, एकदा मुलाखत बघायला हवी.

ओके. अंतरसोवळ्याने प्रसार कमी होतो ह्यापेक्षा physical distancing मुळे प्रसाराचा वेग कमी होतो असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. पण मग सगळे जण तेच तर म्हणत आहेत ना? Flattening the curve साठी लॉक डाऊन आवश्यक आहे ना? आता त्यातल्या नियोजन आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाच्या अभावापायी जे नुकसान झाले ते बाजूला ठेवू.
पण जी फ्रॅक्शन अॉफ सोसायटी संख्या डॉ. लेवीट म्हणतात ती भारताच्या बाबतीत किती भयंकर मोठी असेल? आहे का त्याची तयारी आपली?

परदेशातले आकडे भारताला कसे लागू होतील? डॉ. लेवीट म्हणतात पहिल्या दिवशी जर क्ष लोकांना माझ्यामुळे कोरोनाची लागण झाली तर दुसऱ्या दिवशी ती संख्या क्ष पेक्षा कमी असेल. हे विधान भारतात कसं काय लागू पडतं? जिथे रोज लोकलने सार्वजनिक वाहनाने प्रवास करणारे लाखो लोक आहेत अशा ठिकाणी दररोज किमान दहा दिवस क्ष नवीन लोकांना कोरोनाचा प्रसाद मिळेल आणि जर या वेगाने हा रोग पसरला तर आपली यंत्रणा कशी काय टिकाव धरेल?
कुबेरांनी लिहिताना यातले काय भारताला लागू पडते किमान याचा विचार करून लिहावे अशी अपेक्षा आहे.

वावे, हो LA times नाही लॉक डाऊन टिव्हीवरच्या मुलाखतीवरून लेख लिहिला आहे.

खुले आम चोरुन (स्रेय न देता छापने चोरीच) सापडाल्यावर माफी मागणे दुरच पण त्याबद्दल अवाअक्षरही न काढने ह्याचा अर्थ 'तुमची लायकी नाहीये माझं लिखाण वाचन्याची, उलट मी उपकारच करतो आहे तुम्हाला जगभरातील माहिती देउन" असा आहे का?

जिज्ञासा +१
भारताला काय लागू असेल याचं तारतम्य दिसत नाही.
आणि हे हे विज्ञान आहे हे अत्यंत भंपक विधान आहे. आपल्याकडे शास्त्रात सांगितलंयच्या तोडीचं.
विज्ञान बदलत असतं, आणि हा नोव्हेल करोना व्हायरस आहे. सो विज्ञान रोज, तासातासाला बदलतंय. पॉलिसी डीसिजन सेफ्टी मार्जिन ठेवुन आणि जे पूर्ण माहित नाही त्याबद्द्ल सेफ दॅन सॉरी साईडला घेतले जातात आणि जावेतही. शाळा ह्या फक्त शिकवणे करत नाहीत, तो अनेकांचा न्युट्रिशन ऑप्शन असतो. आणि त्यासाठी अमेरिकेत शाळा बंद पण हॉट ब्रेकफास्ट ड्राईव्ह थ्रू चालू असं केलेलं आहे.
आपल्याकडे सुधारणा नक्कीच करता येतील, पण लेखातील वेड्यात काढण्याचा अ‍ॅटिट्युड ही खटकला.

मी दिलेल्या दुसऱ्या मुलाखतीखाली ही टीप जोडली गेली आहे
This article has been updated to include a note that while Levitt suggests that social distancing is not necessary to flatten the curve, many experts believe social distancing is critical to achieving this.

कुबेरांचं चोरीकाम हा वेगळा मुद्दा.
पण जिज्ञासा यांनी दिलेल्या लिंकवरून विषय वेगळी कडे वळलाच आहे तर,
कुबेरही जाऊ दे,
पण लॉकडाउन नको, त्याच्या फायद्यापेक्षा नुकसान जास्त हा ही एक स्कूल ऑफ थॉट आहे. अगदी भारतातही असा विचार मांडणारे लोक आहेत.

(माझं सध्याचं मत लॉकडाउनला व अन्य उपायांना आपल्याकडे उशीरच झाला. असंच आहे. पण दुसरी बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.)

भरत, मला ही हे पटतच की लॉक डाऊन हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. जिथे रूग्णसंख्या आणि प्रसाराचा वेग कमी आहे अशा ठिकाणी हळूहळू शक्य असेल तितके व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेच आहेत. पण पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी जिथे रूग्णालयाच्या जागा आणि रूग्णसंख्या याचे गुणोत्तर चांगले नाही तिथे हे इतक्यात शक्य होईल असे मला वाटत नाही.

कुबेरांचा तो लेख वाचला. "त्या" तीन पॅराच्या आधी कुबेरांनी हे लिहिलंय - "यानिमित्ताने आरोग्य, आनंद आणि आदेश यांच्यातला तरतमभाव तपासून पाहणारी आकडेवारी प्रकाशित झाली आहे, ती विचारात घेण्यासारखी आहे."

कुबेरांकडुन काहि हि प्रतिक्रिया न येण्याचं हे कारण असु शकतं... Wink

साहित्यचोरी हा काही फार मोठा गुन्हा वा अक्षम्य अपराध नाही.
चित्रपट आणि संगीतक्षेत्रात सर्रास चोर्या चालतात.
पण मायबोलीवर किंवा एकूणच मराठी संकेतस्थळांवर साहित्यचोतीचा बाऊ केला जातो.

हो अमितव तुम्ही याला आपल्या सोयीने इग्नोर करू शकतत. तसेच मी यावर वेगळा धागाही काढू शकतो
मुळात कुबेरांशी कुठल्याही प्रकारचा राजकीय ॲंगल निगडीत नसता तर त्यांच्या या सो कॉलड चौर्यकर्माबद्दल कोणाला पडलेही नसते.

कुबेर साहेबांच्या वय, अनुभव, भाषा-प्रभुत्व (!?) ह्या सगळ्याचा आदर ठेवुन माझ्या मताची एक पिंक टाकाविशी वाटते आहे.. Wink
कुबेर संपादक आणि संपादकिय किंवा वृत्तपत्रिय लेखन टुकार च करतात... एकांगी असतं त्यांचं लेखन असं माझं ठाम मत आहे. त्या मानाने ते इतर लेखन (अ-राजकिय/ अ-वृत्तपत्रिय) फार चांगलं करतात. टाटायन सारखं पुस्तक तर निव्वळ वाचनीय, संग्रहणीय आहे.

इंडियन एक्स्प्रेस आणि त्याची सख्खी ,चुलत भावंडं बिनडोक पने लिहीत असतात.
त्यांच्या कडे बिलकुल लक्ष देण्याची गरज नाही.
ती वृत्तपत्र खरेदी करणे थांबवलं की मालकच कुबेराच्या पार्श्व भागावर लाथ मारून त्यांना हाकलून देतील.

प्रसन्न - तुमच्या मताशी १००% सहमत
लोकसत्ता भयंकर एकांगी होत चालला आहे , अग्रलेख कोणता मागे घ्यावा लागला ? आणि दोष देत आहेत बहुसंख्य जनतेला इंटॉलरन्स म्हणून !!
वाचकांची पत्रे सुद्धा संपादकांची री ओढणारीच छापतात फक्त !
मागे राष्ट्रगीत चालू असताना बसून राहणे चूक नाही अशीही भूमिका घेतली होती
मी स्वतः लोकसत्ता बंद केला , त्यांची अराजकीय पुस्तके चांगली आहेत ह्या मताशी सहमत , tatayan मात्र थोडे जास्त भक्ती भावाने लिहिलेले वाटले , म्हणजे दोष / चुका ह्या फारश्या कुठेच आल्या नाहीत

शोधक, लोकसत्तेत शेषराव मोरे, चाणक्य अकादमीवाले आणि राजीव साने यांची सदरे असतात. लोकमानसमध्ये तुम्हांला आवडतील अशी उमेश मुंडले आणि अ‍ॅड सुरेश पटवर्धन यांची पत्रे सातत्याने छापली जातात.

मागे घेतलेल्या अग्रलेखाबद्दल इथे चर्चा झाली आहे. त्या अग्रलेखातल्या ज्या मजकुरा मुळे तो मागे घ्यावा लागला असं तुम्हांला वाटतंय तो मजकूर त्या पूर्वीही लोकसत्तेत छापला गेला होता . अग्रलेख मागे घेण्याची कारण त्यातल्या शेवटच्या परिच्छेदात आहेत असं मला वाटतं.

मला हल्लीचं लोकसत्तेचं वृत्तांकन आवडत नाही. मजकुराची पुनरावृत्ती , लोकांना वाटतं म्हणून वार्ताहराची किंवा वृत्तसंपादकाची मतं छापणं हे प्रकार वाढलेत.
ओप एड पेजेस , शनिवार-रविवारच्या पुरवण्या आणि लोकमानस वाचायला अधिक आवडतं. बरेचदा अग्रलेख आधीच्या संपादकांच्या तुलनेत आणि तसेही तितकेसे रुचत नाहीत.

कुबेर वाटलं होतं त्यापेक्षाही कितीतरी जास्त हुशार निघाले. त्यांनी ना कुठेही माफी मागितली, ना तो चोरलेला लेख मागे घेतला, ना चोरी करून लिखाण करणं थांबवलं.
आपल्या चोरीबद्दल unanimous negative reaction येणार नाही, एक विशिष्ट वर्ग आपलं समर्थन करेल किंवा निषेध न करता मौन पाळून छुपा सपोर्ट देईल आणि त्या जोरावर आपण चोरी करत उजळ माथ्याने लिहितच राहू
हे त्यांनी बरोबर ओळखलं आहे. त्यासाठी मात्र त्यांना सलाम!

कुबेराचे सदर वाचलेले नाही.व्हिडीओ आज पाहिला.
अगदी 'अमका म्हणतो' म्हणून लिहिले असेल तरी त्यालाही मूळ मजकुराच्या फक्त 10% क्वॉट म्हणून एखाद्या ठिकाणी दुसऱ्याने छापणे असे नियम आहेत.हे पाळले होते का त्या सदरात?

(फेसबुक/इतर सोशल मीडियावर माहितीपूर्ण लेख यायला/वाचायला मला वावडे नाही.पण एकंदरीतच प्रिंट मीडिया मध्ये 'फेसबुकवर असे मत आहे की' असं लिहून पूर्ण लेख उतरवलेला असतो त्याची गंमत वाटते.जर तुमच्या 80% बातम्या 'फेसबुकवर आज असं म्हटलं' 'बीबीसीवर आज असं म्हटलं' 'सी एन एन वरच्या बातमीचा मराठी गोषवारा' अश्या असतील तर तुम्ही लेखनिक(कारकून) झालात.बातमीलेखक नव्हे.त्यात भयंकर टायपो.'बसचे चाक बाईंच्या अंगावरून गेले' ऐवजी 'बसचे चालक अंगावरून गेले' लिहिणे,'दोघे सज्ञान आहेत' ऐवजी तरुण जोडप्याने पळून जाऊन केलेल्या लग्नाच्या बातमीत शेवटी 'दोघे वयस्कर आहेत' लिहिणे हे बघून प्रिंट मीडिया वाचणे बंद करावे असे वाटते.
विदेश च्या 2-3 बातम्या सगळ्या पेपरमध्ये मजकुरासहित सारख्या असतात(एकाचकडून सगळी पंजाबी हॉटेल ग्रेव्ही घेतात तसं एकाकडून विदेश बातम्या विकत घेतात का?)

'वयस्क' तरुण तरुणी
https://www.loksatta.com/trending-news/man-walked-1300-km-to-meet-his-gi...

मुलांऐवजी 'आईबापांनी' वाऱ्यावर टाकलेले वृद्ध
IMG_20200415_232353.jpg

टायपोंच प्रमाण प्रचंड झालं आहे, सकाळ आणि लोकसत्ता मध्ये, ओन्लाइन झाल्यापासुन, बहुतेक कमी वेळात बातमी ढकलायची घाइ असवी.

Pages