करो ना!! - २

Submitted by सामो on 19 May, 2020 - 21:17

तर दर आठवड्याला, लाइव्ह योगा क्लास व १५ दिवसातुन एकदा डाएट सल्ला सेशन सुरु झाले. जर १५ दिवसात कोण्या मेंबरचे वजन कमी झाले नाही तर ब्लेमगेम खेळला जाउ लागला. दिनूच्या डाएट प्लॅनमध्ये कमतरता राहीली की सरोजने नीट व्यायाम करवुन नाही घेतला याबद्दल व्हॉट्सॲपवरती , ग्रुप-डिस्कशन होउ लागले. कल्प्रिट अर्थात चूकी होती - संचारबंदीची. घरी बसून कंटाळलेले मेंबर नवेनवे , मेदयुक्त, कर्बोदकयुक्त मस्त रुचकर पदार्थ करत होते आणि त्यांच्या वजनाची लागत होती वाट. ठपका मात्र बिच्चाऱ्या दिनू-सरोजवरती. यावर त्या दोघांनी ठरवुनच टाकले की हा ब्लेमगेम एकदाचा थांबवायचा आणि मेंबर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन द्यायची. पण हे लढाईचे आडाखे रचायचे कसे/कुठे. संचारबंदीमुळे भेटता तर येत नाही. अरे मग झुक्या कशाला आहे. फेसबुकवरती तर आरामात प्रायव्हेट चॅट करता येतेच की. दोघांचे असे रोजचे चॅट सेशन सुरु झाले. वाह!! सुंदर सुंदर फोटो, पोस्टस आणि आता कामच्या मिषाने, मस्त गप्पा सुरु झाल्या.मग गप्पागप्पातुन मस्त मस्त गाण्यांच्या लिंका जाऊयेऊ लागल्या. ती इंदिरा संतांची ओळ आहे ना -
असेच काही द्यावे-घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा
देता-घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा!

तसे काहीसे होउ लागले. गोड, मधुर हिंदी गाणी, देताघेता, गप्प अधिक गहीऱ्या होउ लागल्या. मैत्रीचा वसंत बहरु लागला. एकमेकांच्या आवडी-निवडी एकमेकांना कळू लागल्या. आपापले लहान सहान लकबी, मूडस दुसऱ्यावर काय परीणाम करतात त्याचा अदमासा येउ लागला. कोव्हीड १९ ने भले दुनियेचे नुकसान झाले पण आपल्या प्रेमी युगलाकरता मात्र कोव्हीड क्युपिड ठरला. अर्थात, मेंबर्सनाही फायदा होतच होता की. दोन्ही इन्स्ट्रक्टर्सचा, व्यायामाबद्दल, डायेटबद्दल, पेप-टॉक अतिशय परीणामकारक होउ लागला होता. आनंदी मूड, उत्साह कंटेजिअस असतो म्हणजे त्याची लागण होते. तसा दिनू व सरोजचा उत्साह, मेंबर्स करता अत्यंत उत्तम ,परीणामकारक ठरत होता. हे म्हणजे आम के आम और गुठलीके दाम झाले होते म्हणजे प्रेमात पड्ण्याचा फायदा तर झालाच परत उत्तम परफॉर्मन्स्मुळे, क्लायंटही खूष व वेळेवर पगारही बँकेत जमा. दोघेही तरुण होते, दोघांचेही रक्त् सळसळणारे होते व दोघेही एकमेकांना आवडू लागले होते ते काय आपल्या म्हाताऱ्यांसारखे 'गोंदवलेकर महाराज आणि दत्ताच्या पोस्टस' पाठवत बसणारेत का? की 'उद्धव ठाकरे आणि मोदींच्या' बद्दल तासन तास वाद घालत बसणारेत? की प्रायव्हेट चॅटमधुन, पाककृती टाकत बसणारेत? अर्थात या चॅट सेशन्स्ची परीणीती मैत्रीतून, प्रेमात व प्रेमातून चावटपणात बदलली हे दोघांना कळलेही नाही. दिनूने, सरोजला प्रपोझ केले. Happy

एव्हाना ५ महीने संपून, कोव्हीडची लसही आलेली होतीच. आता थिअरी पुरे प्रॅक्टीकल परीक्षा देण्याची वेळ येउन ठेपली होती. तेव्हा लवकरच दिनू-सरोज विवाहबंधनात बद्ध झाले. करोनाची करामत म्हणुन, मुलगी झाली तर करोना आपलं करीना नाव ठेवायचे व मुलगा झाला तर करण नाव ठेवायचे दोघांनी निश्चित केले. Wink

- समाप्त -

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>कुठे तरी घडतही असेल हे सध्या Lol>>> खरच गं. तरुण लोकांना सोशलाइझ करण्याची संधीच उरलेली नाहीये Sad