Dogfight, करोना अणि Conspiracy !

Submitted by Silent Banker on 14 May, 2020 - 11:02

Dogfight, करोना अणि Conspiracy !

"२००७ च्या जानेवारी मध्ये स्टीव जॉब्सने जेव्हा सांगितले की तो एक नवीन सेलफोन बनविणार आहे। तेव्हा लोकांच्या अपेक्षा मर्यादित होत्या। स्टीव जॉब्सने ipod अणि itunes काढून सांगीतिक उद्योग विश्व हादरवून सोडले होते। तरी पण इथे गाठ होती दूरसंचार क्षेत्रातील तगड्या "Wireless Cellular players" शी। ......

...... स्टीव जॉब्सने त्या दिवशी जर काही केले असेल तर त्या फोनची अंमळ जरा कमीच जाहिरात केली ( If anything .... Jobs undersold the iphone that day...)"

फ्रेड वोगेल्सस्टेइन या लेखकाच्या "Dogfight:How Apple and Google went to war & started a Revolution" या पुस्तकाची ही अशी उत्कंठावर्धक सुरुवात।

कारण त्या नंतर गेल्या १२ वर्षात जे झाले ते कुठल्याही क्रांतीपेक्षा कमी नव्हते। माहिती ,संवादाची नवी कवाडेच आपल्यासमोर खुली झाली। आज ज्याला आपण समाज माध्यमे (Social Media) म्हणतो ती याच क्रांतीची अपत्ये। आपण कुठला फ़ोन वापरणार , काय पाहणार , किती मंचावर (Screens) वर पाहणार यासाठी चालू झालेली जीवघेणी स्पर्धा म्हणजेच ही Dogfight , ज्यातील विजेता राज्य करणार होता जगातील लोक काय पाहणार त्या माहितीवर ( Content ) & कुठे पाहणार त्या मंचावर ( Screens ) अणि यात पणाला लागले होते ते माहिती अणि संवाद विश्वाचे भविष्य। यातून उदयाला आल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपन्या Apple & Google .( त्या महाकाय यासाठी कारण त्या कंपन्यांचा पसारा जगातील कित्येक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे )

हे सगळे आज आठविण्याचे कारण म्हणजे याच संवाद क्रांतीने उपलब्ध करून दिलेली माहिती व समाज माध्यमे याचा "जियो जी भरके " आस्वाद हाच काय तो या करोनामुळे सध्या चालू असलेल्या lock down मधील विरंगुळा। कुठे नित्यनवीन पाककलेचे प्रयोग चालू आहेत तर कुठे गाण्याच्या मैफिली रंगत आहेत। ऑफिस कॉल साठी वापरला जाणारा वीडियो कॉल आता मित्रांसाठी virtual गप्पांचा कट्टा बनला आहे। सकाळच्या चहाची तल्लफ वाढविणारे वृत्तपत्र आता लोक मोबाइल वर वाचू लागले आहेत। "मला त्यातले फार कळत नाही ग" म्हणणारे आजी -आजोबा OTT मंचावर त्यांच्या आवडीचे चित्रपट , नाटके , मुलाखती अणि दिवसभराच्या घडामोडी सांगणाऱ्या बातम्या अगदी आरामात पाहत आहेत। थोडक्यात काय "करलो दुनिया मुठ्ठी में " म्हणत या सर्वव्यापी माहिती अणि संवादाच्या जाळ्यात स्व:तला गुंफून घेत आहेत।

आपण जगताना आपल्याला प्रत्यक्ष पाहून , कुणाकडून तरी ऐकून किंवा पुस्तक वाचून जे जे काही अनुभव येत असतात ते ते अनुभव दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची आपल्याला ओढ़ असते।या सगळ्याच्या मुळाशी असलेली एक मूलभूत मानवी गरज ती म्हणजे संवादाची जी "मला काहीतरी सांगायचे आहे " किंवा " माझेही कुणीतरी ऐका। " म्हणत " Facebook अपडेट " किंवा "Instagram पोस्ट " किंवा " Whatsapp स्टेटस ", "Twits " अशा रुपात व्यक्त होते।आपले अंगभूत कौशल्य सादर करण्याची संधी किंवा हौस मग Tiktok , Youtube या मंचावर मांडली जाते।त्याला मिळणारे अंगठे (Likes) , प्रतिसाद (Comments ) त्या प्रक्रियेला सुंदर बनवितात।

दूसरी मूलभूत गरज असते माहितीची & त्यातून येणाऱ्या स्थैर्याची। माहितीच्या आधारावरच अंदाज अणि आराखडे बांधून सुखी , शांत , आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न आपण सर्व करतो। भीती , अनिश्चितता , अनोळखी गोष्टी अशावर मात करून "अवघाची संसार सुखाचा होवो " म्हणून जपली जाणारी माळ म्हणजे "माहिती " अणि मिळणारा प्रसाद म्हणजे "स्थैर्य" व " शाश्वती ".

अशातच एकदम करोना नावाचा विषाणू येतो अणि सगळे होत्याचे नव्हते करून टाकतो। शाश्वत जीवनाची हमी घेऊन जगणारे आपण सर्व भीती ,अनिश्चितता यांच्या गर्तेत अडकून चिंतातुर होतो। अशा गोंधळाच्या परिस्थितीत मनातील भीती अणि अनिश्चितता यांना शमविण्यासाठी षडयंत्र किंवा त्याविषयीच्या कथा (Conspiracy Theories) यांच्यावर आपण विश्वास ठेवतो। त्यातील सत्य , असत्य याची पडताळणा करण्याची गरज भासतेच असे नसते कारण त्या षडयंत्र किंवा त्याविषयीच्या कथेने (Conspiracy Theories) अनाकलनीय घटनेला कार्यकारणभाव पुरवलेला असतो। भीतीने मनात दाटलेला एक अविश्वास सरकारी किंवा विश्वासपात्र पुराव्यापेक्षा अशा षडयंत्र कथांवर (Conspiracy Theories) विसंबून राहणे भाग पडतो।

साधारण प्रत्येक महामारी ( Pandemic ) च्या वेळी तयार होणाऱ्या षडयंत्र कथा (Conspiracy Theories) व त्याचा इतिहास मोठा रंजक आहे। १५०० साली आलेल्या प्लेग साठी जू लोकांना , १९१८ साली आलेल्या "स्पॅनिश फ्लू " साठी जर्मन लोकांना , तर २०१५ साली आलेल्या zika विषाणू साठी मॉन्सैंटो कंपनीला जबाबदार ठरविले होते। समाज माध्यमांच्या जगातील पहिली महामारी ( Pandemic ) म्हणून गणल्या गेलेल्या "कोविद-१९ " बद्दल अशा रंजक धोकादायक षडयंत्र कथा निर्माण झाल्या नसत्या तर नवलच।

Zignal Labs या समाज माध्यमात नोंदविल्या जाणाऱ्या मतांचा सर्वे करून निष्कर्ष नोंदविणाऱ्या कंपनीच्या मते "करोना किंवा कोविद-१९ " बद्दल रंजक धोकादायक षडयंत्र कथा/सिद्धांत खालील प्रमाणे

Conspiracy Theory

% Respondent

5G Tech causes Virus

35%

Bill gates Created Virus

20%

George Soros Created Virus

5%

Virus is Man Made Virus ( Bio-Weapon)

40%

चीनमध्ये सुरुवात होऊन जगभर थैमान घालणारा हा विषाणू खरंच वुहानच्या WET मार्केटमध्ये प्राण्यातून माणसात आला की वुहान च्या "Virology Lab " मध्ये बनवून " रासायनिक जैविक अस्त्र "म्हणून वापरला गेला असा दबक्या आवाजात चर्चिला जाणारा विषय षडयंत्र कथा/सिद्धांत यात देखील आघाडीवर आहे। चीन -अमेरिका व्यापार युद्धाची पाश्वर्भूमी असल्यामुळे ते तसे नसेल असे ठाम सांगणे अवघडच। पण ते तसेच आहे यासाठीचा सज्जड पुरावा अजून तरी उपलब्ध नाही। समाजमाध्यमांनी व्यापलेल्या जगात त्यामुळे प्रचारकी बाण्याने याचे " China Virus " किंवा " Wuhan Virus " असे नामकरण केले गेले। आता येऊ घातलेल्या अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे तो मुद्दा गाजत राहणार हे निश्चित।
"बिल गेट्स/जॉर्ज सोरोस यांनी करोना पसरविला" या षडयंत्र कथेकड़े मौज म्हणून पाहणेच उत्तम काऱण बिल गेट्स किंवा जॉर्ज सोरोस ( कमोडिटी ट्रेडर ) यांच्याबद्दलचे पूर्वग्रह किंवा जागतिक लसीकरण मोहिम विरोधात असणारी काही मंडळी यापाठीमागे असतील असा लोकांचा अंदाज आहे।

आता राहते एक रंजक पण धोकादायक षडयंत्र कथा ती म्हणजे " कोविद १९ किंवा करोना विषाणूच्या प्रसाराला 5G तंत्रज्ञान" कारणीभूत आहे। 5G म्हणजे फिफ्थ जनरेशन दूरसंचार तंत्रज्ञान। संवाद क्रांतीने उपलब्ध करून दिलेल्या माहितीचा "जियो जी भरके आस्वाद " घेण्याची आणि "करलो दुनिया मुठ्ठी में " म्हणत या सर्वव्यापी माहिती अणि संवादाच्या जाळ्यात स्व:तला गुंफून घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान अणि सुंदर बनविणारी पाचव्या पिढीमधील दूरसंचार क्रांतीच।

साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल इंटरनेचा वेग वाढविणारी आणि वीडियो / पिक्चर पाहताना गतिमानता कायम राखणारी ( more speed & less latency ) ही नवी पद्धत करोनाला कारण आहे असा प्रचार कोण का करेल।

त्याच्या उत्तरासाठी आपल्याला थोडे इतिहासात डोकावावे लागेल।

गेल्या १५० वर्षात जगात पसरणारी रोगराई किंवा महामारी याला पृथ्वीवर होणारे " विद्द्युतीकरण (Electrification )" अणि " वायरलेस तंत्रज्ञानाचा विकास व वाढता वापर (Electromagnetic Waves) " कारणीभूत आहे. या सिद्धांताच्या पुराव्यादाखल या षडयंत्र कथेचे समर्थक खालील घटनाक्रमच आपल्यासमोर मांडतात

१९१६ :Radio Waves चा उगम
१९१८ : स्पॅनिश फ्लूची साथ
२००३ : 3 G ची सुरुवात
२००३ -०४ :सार्स (SARS ) ची साथ
२००९ : 4 G चे आगमन
२००९ : स्वाइन फ्लूची साथ
२०१९ /२०२० : ५ G ची सुरुवात
२०१९ /२०२०: करोना महामारी

थोडक्यात ५ G तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणाऱ्या 24gHz च्या लहरी ( ज्याला मिलीमीटर waves असेही म्हणतात ) या लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत अणि त्याच्या होणाऱ्या परिणामातून माणसे मरत असून ते लपविण्यासाठी करोना किंवा कोविद -१९ विषाणूचे कुभांड रचण्यात आलेले आहे।

याची सत्यासत्यता जाणून घ्यायची असेल तर प्रथम त्याच्या उगमाचा विचार करावा लागेल।

सुरवात

मार्च 2020 मध्ये डॉक्टर थॉमस कोवेन नावाच्या एका स्वयंघोषित तज्ञाने 10 मिनिटाचा एक यूट्यूब विडियो बनविला ज्याचे नाव होते "Dr. Thomas Cowen M.D discussing Corona virus".

पृथ्वीवर होणारे " विद्द्युतीकरण (Electrification )" अणि " वायरलेस तंत्रज्ञानाचा विकास व वाढता वापर" यामुळे होणारे शरीरावरील घातक परिणाम यांचा उहापोह या वीडियो मध्ये केला गेला। वर सांगितलेला घटनाक्रम पुन्हा पुराव्यादाखल सादर केला गेला।
सततचा मोबाइल वापर अणि ५ G तंत्रज्ञानात वापरलेले जाणारे मिलीमीटर वेव्स ( 24gHz च्या लहरी )चा संपर्क यामुळे शरीरातील पेशींवर परिणाम होतो। अशा बाधित पेशी मलमूत्रावाटे शरीरातून बाहेर टाकल्या जातात । ती घाण म्हणजेच करोना विषाणू असे तर्कट या विद्वान महाशयांनी मांडले .
त्या पाठोपाठ बेल्जियम मधील एका डॉक्टरची मुलाखत प्रसिद्ध झाली त्यामध्ये करोना विषाणूचा प्रभाव अणि 5G तंत्रज्ञानाचा प्रसार यांचा संबंध असण्याची शक्यता वर्तविण्यात आली। ज्यामध्ये या सर्व इलेक्ट्रोमैग्नेटिक लहरींचा मानवी शरीरावर परिणाम होतो। माणसाची प्रतिकार शक्ती कमी होते। हवामानातील बदलामुळे आजार पसरण्याचे प्रमाण वाढते। हे सर्व लपविण्यासाठी करोनाचे नाटक वठविण्यात आले अशी आवई उठवली गेली

काही देशातील नागरिकांनी २०११ साली प्रसिद्ध झालेल्या एका वैज्ञानिक मासिकातील प्रबंधाचा (Thesis ) दाखला दिला ज्यामध्ये असा निष्कर्ष काढला गेला होता की जीवाणू (bacteria ) हे इलेक्ट्रोमैग्नेटिक सिग्नल तयार करून एकमेकांशी संपर्क साधू शकतात। अर्थात इथे करोना हा विषाणू (Virus ) आहे याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला। थोडक्यात इलेक्ट्रोमैग्नेटिक लहरीतून विषाणू प्रवास करत आपल्याला हानी पोचवत आहेत असा एकंदर सूर होता।

परिणाम

समाज माध्यमात तो यूट्यूब वीडियो आल्यानंतर जर तुम्ही ब्रिटेन किंवा बाकीच्या यूरोपियन देशातील घडामोडी पहिल्या असतील तर ७०+ पेक्षा जास्त जागी 5G टॉवर्सची तोड़फोड़ करण्यात आली , काही ठिकाणी त्यांना आग लावण्यात आली। 5G सेवेसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान करण्यात आले।
करोना , lock down अणि त्यात वाढलेला इंटनरेट अणि दूरसंचार सेवांचा वापर , यामुळे या 5G सेवा देणाऱ्या कंपनीने सेवेत खंड पडू नये म्हणून जे टेक्निसियन , साइट इंजिनियर अशा ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाठविले त्यांचावर हल्ल्याच्या १८०+ पेक्षा जास्त घटना घडल्या।
करोना हा 5G मुळे पसरत आहे अणि lockdown / सोशल डिस्टन्सिंग हे सर्व वरवरची सावरासावर आहे यामुळे करोना सारखा साथीचा आजार रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजनेचा फज्जा उडाला।
समाज माध्यमांमध्ये आपला सिद्धांत कसा बरोबर आहे ते पटवून देण्यासाठी मग करोना ज्या शहरापासून सुरु झाला त्या चीनमधील Wuhan चा दाखला देखील दिला गेला। ५ G ची सेवा सर्वात प्रथम चीनमध्ये Wuhan मध्ये सुरु झाली। तोच धागा पकडून सुरवातीच्या काळात इटली किंवा स्पेन मध्ये जो करोना फैलावाला त्याचे खापर त्या देशांमध्ये मागच्या १ ते १. ५ वर्षात चालू झालेल्या ५ G सेवेवर फोडण्यात आले।
जगातील करोनाने बाधित रुग्ण अणि त्यांचे राहण्याचे ठिकाण Vs 5G सेवाक्षेत्र अशी तुलना करून जास्त रुग्ण आढळलेल्या भागात (Hotspots ) मध्ये बरोबर कशी 5G सेवा कार्यरत आहे याचे दाखले दिले गेले।
याच बरोबर गेल्या काही महिन्यात घडलेल्या पक्ष्यांचे मृत्यु याचा 5 G शी संबंध जोडून हे सर्व फक्त माणूस नाही तर पूर्ण निसर्गासाठी कसे घातक आहे ते पटविण्याचा प्रयत्न केला गेला।
थोडक्यात या आभासी षडयंत्र कथेचा विस्तार अणि प्रभाव इतका होता किंवा आहे ज्यामुळे "5G Kills " ही प्रचारकी थ्रेड चालू झाली
वास्तव व विज्ञान

5G तंत्रज्ञान म्हणजे दूरसंचार क्षेत्रातील आपण सध्या वापरत असलेल्या 4 G तंत्रज्ञानाची पुढील आवृत्ती। यामध्ये इंटरनेट किंवा डाटा ट्रांसफर स्पीड हा सध्याच्या आपल्या वापरातील तंत्रज्ञानापेक्षा १०-१०० पट जास्त असतो। हा वेग अणि कायमची गतिमानता ( High Speed & Low Latency ) शक्य होते 24gHz क्षमतेच्या लहरीं मुळे। सध्याचे 4 G तंत्रज्ञान 6gHz क्षमतेच्या लहरींवर चालते। जास्त क्षमतेच्या लहरी असल्यामुळे त्या प्रभावीपणे वाहून नेता याव्यात यासाठी जास्त संख्येने मोबाइल टॉवर्स ची गरज असते। या लहरींच्या क्षमतेमुळे त्याला मिलीमीटर waves असेही म्हणतात।

सेलुलर तंत्रज्ञान वापर चालू झाल्यापासूनच त्यातील लहरींचा मानवी शरीरावर होणारा परिणाम यावर खूप लिहले अणि बोलले गेले। वैज्ञनिकांच्या मते या कमी क्षमतेच्या लहरींमुळे त्यापासून होणारा परिणाम हा "non -ionizing radiation " या विभागात येतो। ज्यामध्ये त्या लहरींच्या सहवासाचा शरीर / त्वचा तसेच DNA यावर परिणाम होत नाही किंवा यापासून कॅन्सर / मेंदूचे आजार , मानसिक अस्वास्थ असे गंभीर आजार संभवत नाहीत। असे आजार ज्या UV लाइट मुळे होउ शकतात त्यांची क्षमता १००g Hz पेक्षा जास्त असते ज्याला आपण "ionizing radiation" म्हणतो। 24gHz क्षमतेच्या ५ G लहरी त्यामुळे जीवघेण्या ठरत नाहीत हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे।

वरील षडयंत्र कथेत उल्लेख केल्याप्रमाणे , wuhan मध्ये चीनमधील पाहिले ५ G नेटवर्क चालू झाले नव्हते किंवा करोनाचा प्रभाव ५ G सेवा चालू न झालेल्या भारत , साउथ अफ्रीका किंवा इतर आशियाई देश यामध्ये पण जोराने झाला आहे।

तसेच ज्या विद्द्युतीकरण (Electrification )" अणि " वायरलेस तंत्रज्ञानाचा वाढता वापर" याच्याशी महामारी किंवा रोगराईचा संदर्भ जोडला जातो त्यामध्ये सोयीस्कर पणे दुसऱ्या महायुद्धात विकसित झालेल्या अणि वापरलेल्या गेलेल्या रडार टेक्नोलॉजीचा संदर्भ दिला जात नाही। रेडियो चा वापर १९२० पासून चालू झाला तो स्पॅनिश प्लूशी जोडण्यासाठी १९१६ मध्येच दाखविला गेला।

Dogfight

थोडक्यात आपल्याला अनुकूल असे संदर्भ घेऊन , त्यामध्ये खऱ्या जगात घडणाऱ्या घटनांचा बेमालूम वापर करून रचलेली ही फक्त भाबडी आभासी षडयंत्र कथा नसून त्याचा हेतू हा "कही पे निगाहे कही पे निशाना " या पद्धतीचा आहे। त्यामागे असलेले व्यापार युद्ध , बाजार पेठीय गणिते , भूराजकीय संदर्भ समजावून घेणे उदबोधक ठरेल।

गोविंदाग्रजांची "अल्लड प्रेमास " नावाची एक कविता आहे त्यामध्ये ते म्हणतात " जग सगळे हे देखाव्याचे /गुलाम केवळ रे स्वार्थाचे /" त्यामध्ये थोडा बदल करून म्हणता येईल

जग सगळे हे देखाव्याचे /गुलाम केवळ रे प्रोपगेंड़याचे(प्रचाराचे ) /

करोनाचा प्रसार चालू झाल्यानंतर जागतिकीकरण , ग्लोबल सिटीजन च्या गप्पा करणारे देश विश्वबंधुत्वाची ( solidarity ) ची कास सोडून आम्हाला मदत केली नाही तर बघून घेईन अशी गल्लीतील गुंडाची भाषा बोलू लागले। मास्क किंवा PPE सारख्या गोष्टी आधी आपली गरज भागविण्यासाठी खरेदी केल्या जाऊ लागल्या। विश्वबंधुत्व हा दिखावा होता हे कृतीतून सिद्ध करण्यासाठी देशोदेशी स्पर्धा चालू झाली।

ते कमी म्हणून की काय प्रचारकी बाण्यात (Propaganda) अग्रेसर असणाऱ्या रशियाने त्यांच्या RT America या वृत्तवाहिनीवर " 5G : dangerous Experiment on Humanity" हा कार्यक्रम प्रसारित करून ब्रेन ट्यूमर , कॅन्सर , पासून ते मानसिक आजार , व्यंधत्व असे किती घातक परिणाम होत असल्यामुळे 5 G चालू करणे अमेरिकन लोकांसाठी कसे घातक याच्यासाठी आटापिटा केला । बर हे करत असताना दस्तुरखुर्द पुतिन महाशयांनी रशियात 5G सेवा चालू करण्यासाठी चीनी कंपन्यांना आमंत्रित केले आहे।

5 G तंत्रज्ञानाने बहाल केलेले वेगवान नेट हे केवळ सध्या व्यक्ती म्हणून आपण करत असलेल्या गोष्टीपर्यंत मर्यादित न राहता ज्याला आपण "Internet of thing (IOT)" म्हणतो त्यासाठी वापरले जाणार आहे । सध्या समाज माध्यमे म्हणजे आपले डिजिटल जग असते जे आपल्या खऱ्या आयुष्याचा एक भाग असते। समजा आपण ठरविले की खरे आयुष्य अणि आभासी दुनिया एकमेकात मिसळायची तर ते करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे IOT.

म्हणजे बघा :

फ्रिज मध्ये एखादा सेंसर लावून तो आपण जर मोबाइल ला कनेक्ट केला तर "मधुमेह असलेले आपले वडील हळूच आईची नजर चुकवून जेव्हा फ्रिज मध्ये ठेवलेली बर्फी फस्त करतात " तेव्हा आपल्याला अलर्ट येऊ शकतो
नवरा बायको दोघेही कामाला जातात। रोजच्या प्रवासातून सुखरूप घरी पोचले का नाही याची माहिती घरच्या दरवाज्यावर कनेक्टर किंवा सेंसर लाऊन ऑफिस मध्ये बसल्या बसल्या आपल्याला मोबाइल वर कळू शकते
हेरगिरी करणारे कैमेरे ,AI चा वापर करून त्याच्याशी जोडलेले "face recognition feature" कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते
उद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी किंवा मशीन एकमेकांशी बोलू शकतील। Process automation च्या दुनियेत क्रांतिकारी ठरू शकतील असे बदल IOT मध्ये शक्य आहेत।
स्मार्ट सिटी ची घोषणा आपण सतत ऐकतो ती पूर्णपणे IOT वर अवलंबून आहे। रस्त्यावरील दिवे लावणे अणि बंद करणे ( ऊर्जा बचत ), उद्याना मध्ये पाणी देताना ज्या भागात जरुरी आहे तिथेच पाणी घालणे (पाण्याचा अपव्यव टाळणे ), विनाचालक कार , त्यातील महितीवरून शहरातील पार्किंग विभागाची क्षमता लक्षात घेऊन पार्किंग स्लॉट भाड़े तत्वावर देऊन उत्पन्न वाढविणे हे सर्व शक्य आहे।
थोडक्यात आता माणसी सरासरी दोन डिवाइस आपण वापरत असू तर ती संख्या किमान ५-६ वर जाईल। त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील उपयुक्तता बघितली तर लक्षात येईल की 5 G लहरी ( Spectrum ) असणाऱ्या सेलुलर कंपनीकडे मुख्य निर्णय क्षमता येईल। 4G मध्ये जी निर्णय क्षमता Google किंवा Apple कडे ( Handset &Software मेकर )हस्तांतरित झाली होती ती पुन्हा मोबाइल लहरींचे कंत्राट ( Spectrum License ) असणाऱ्या कंपनीकडे येईल।

सध्या जगातील 5 G तंत्रज्ञान अणि त्यासाठीचे मोबाइल पुरविणारी कंपनी आहे " Huawei".या बलाढ्य चीनी कंपनीने चीन , रशिया , यूरोप इथे 5 G सेवा सुरु करण्यात आघाडी घेतली आहे। त्याची व्याप्ती बघता हे एक प्रकारचे "Tech Warfare" आहे। जो जिंकेल किंवा जास्त बाजारपेठ काबीज करेल तो AI , Robotic , Data analytics या आयुधांचा वापर करून IOT च्या माध्यमातून जगाला आपल्या इशाऱ्यावर नाचवू शकेल। अमेरिकेचे हे खरे दुखणे आहे। व्यापार युद्धाकड़े केवळ "Tariif war" म्हणून पाहिले जाते पण त्यामागे चीनने गेल्या काही दशकात केलेली , प्रत्यक्ष अमेरिकेलाही भांबवून सोडणारी प्रगती आहे। माओ जे डांग नंतर दें शा पिंग या कम्युनिस्ट नेत्याने चीनला खऱ्या अर्थाने प्रगतिपथावर नेले त्याचे ब्रीद वाक्य होते "I do not care whether cat is black or white, i am ok as long as it catches mice".

त्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा "dogfight " चालू झाली आहे ज्यामध्ये "साम दाम दंड भेद " याचा वापर करून नवीन तंत्रज्ञानातून जगावर राज्य करण्यास उत्सुक चीन आहे अणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानातील आपल्या स्वामित्वाला आव्हान मिळाल्यामुळे शड्डू ठोकून रणांगणात उतरलेली अमेरिका आहे।

यात कोण जिंकणार अणि कोण हरणार हाच कदाचित पुढील रंजक षडयंत्र कथेचा ( Conspiracy Theory ) चा विषय होउ शकेल।

Stay होम Stay सेफ !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इतका सुंदर माहितीपूर्ण लेख पण कुणाचे लक्ष नाही. तीन दिवस वाट पहिली कि कुणीतरी प्रतिसाद देईल .पण नाहीच. शेवटी मीच प्रतिसाद देतो. मला माहिती आहे कि असा अभ्यासपूर्ण लेख लिहिताना किती कष्ट घ्यावे लागतात. पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार. लिहित रहा.

लेख वाचला
सुरुवातीला 2 परिच्छेद थोडा विस्कळीत वाटला,
5जी वाली सगळीच माहिती नवीन आहे.
एकंदर रोचक लेख आहे.

मस्त रोचक लेख आहे
प्रभूदेसाई धन्यवाद वर काढला. नजरेस पडला नव्हता

खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख धन्यवाद.
**********
ह्या पैकी कोणती conspiracy theory खरी आहे ते कसे कळणार. चीनची अधिकाधिक बाजारपेठ काबीज करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि करोना माझ्या मनात तिसऱ्या महायुद्धाची दहशत निर्माण करत आहे. आधी कोणी वुहान व्हायरस असे करोनाला म्हणाले की ती रेसीस्ट कमेंट वाटायची आणि राग यायचा. पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जी लोकांची व अर्थव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे, ती बघून हे जाणून बुजून केले असेल तर असे वाटून जीवाचा थरकाप उडतो Sad .
इतके दिवस मी चीनला सकारात्मक बेनीफिट of doubt देत होते पण lab hack केल्यापासून विश्वास राहीला नाही. निरनिराळ्या conspiracy theories मुळे सारासार नष्ट झालाय. नुसता गोंधळ उडाला आहे. Bunch of गुंड आणि राक्षसी लोक यांच्या नेतृत्वाखाली आपले भवितव्य घडणार आहे का ? की नेहमीच असे होते.
धन्यवाद.

"Correlation = Causation हा पाया ठिसूळ आहे ". या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पण RT america या वृत्त वाहिनीच्या लेखात सांगितलेल्या कार्यक्रमानंतर ही सुरस षडयंत्र कथा न राहता त्यामागे असलेली जगावर वर्चस्व गाजविण्याची इच्छा अणि त्यासाठीचा propaganda डोळे उघडणारा ठरतो।