टीआरपी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“ सॉरी मॅडम ” ...
शरदिनी त्या असिस्टंट डायरेक्टरकडे आश्चर्याने पाहतच राहिली . तिला काही कळलंच नाही.
तो पुढे बिचकत म्हणाला , " तुमचा रोल आपण थांबवतोय ."
“काय ?” ती चमकली .भडकलीच !
तो गप्प खाली मान घालून, निघून गेला. ती धप्पदिशी त्राण गेल्यासारखी खुर्चीत बसली.
रामप्यारे तिच्याकडे पाहत राहिला. नुसताच. पण मनातून तर त्याला बरंच वाटत होतं. तिचे नखरे फार असत. अन मेकअपवरून ती त्याला बोलायची . सगळ्यांनाच वाट्टेल तशी फडाफडा बोलायची .
---
के टीव्ही एक लोकप्रिय चॅनेल होतं. त्याच्यावरच्या मालिकांनी स्त्री वर्गाला वेड लावलं होतं. त्यातही ‘ दिल ढुंढता है ‘ सिरीयल सध्या टॉपला होती. आणि त्यातली शरत- शरदिनीची जोडी लोकांची आवडती होती. बायका तिच्या फॅशन्सच्या दिवान्या होत्या .
त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री भन्नाट होतीच पण …पडद्यामागेही !
पब्लिक त्यांच्या प्रेमाची चवीने चर्चा करायचं . फिल्मी मासिकांतसुद्धा त्यांच्या खऱ्या रोमान्सच्या बातम्या छापून यायच्या. त्यांना अमुक हॉटेलमधून हातात हात घालून बाहेर पडताना पाहिलं वगैरे .
बरेच महिने त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती . लोक म्हणत , हे सगळं मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी चाललंय.
मग तर मालिकेत त्यांचं धूमधडाक्यात, आलिशान लग्न लागलं. लोकांनी पार कामंधामं सोडून ते लग्न टीव्हीच्या पडद्यापुढे अटेंड केलं. जसं काही घरचंच लग्न आहे आणि स्वतःच्या आयुष्यात दुसरे काही प्रॉब्लेम्सच नाहीयेत.
मग - त्यांचं खरं लग्न झालं.
अन बोंब झाली . टीआरपीची बोंब झाली .
त्यांचं लग्न झाल्यावर लोकांना सीरिअल बघण्याची मजा येईना. निर्मात्यांचं धाबं दणाणलं. लेखकमंडळींना फर्मान सुटलं - कहानीमें ट्विस्ट चाहिये !
म्हणून - तिलाच हटवण्याचा निर्णय घेण्यात आला .
---
मग शरतच्या धाकट्या भावाचं लग्न काढण्यात आलं .लग्नाची धामधूम, वऱ्हाडी मंडळींची गडबड आणि त्यात शरदिनी गायब झाली . कसं काय? ते कळलंच नाही .मोठं खानदान, एकत्र कुटुंब, त्यांचे ताणेबाणे… त्यावर बरेच एपिसोडस खर्च झाले . तिचं काय झालं ? ... ते तसंच राहिलं . का ? तर सीरिअलवाल्यांची मर्जी !
ते लग्न पुढे ढकलण्यात आलं . आणि जेव्हा ते लग्न लागलं , तेव्हा एका नवीन पात्राची एंट्री झाली – कोमलची . ती नव्या नवरीची लांबची बहीण होती.
मग शरत आणि कोमलचा रोमान्स सुरु झाला. लोकांना तो जाम आवडला . टीआरपी पुन्हा वर.
तिचं पात्र बोल्ड दाखवण्यात आलं होतं- फटाका टाईपचं.
तिचं वागणं - बोलणं बिनधास्त होतं. तिचे कपडे म्हणजे रोज नवनवीन प्रकार असत .अंगप्रदर्शन घडवणारे .
तिच्या भूमिकेवर, संवादांवर, फॅशन्सवर जास्त काम केलं जाऊ लागलं आणि मेकअपवरसुद्धा . ती सुंदरच दिसेल, याची पुरेपूर काळजी घेतली जात होती .
पब्लिकला ती जशी आवडत होती ,तशीच सेटवरदेखील सगळ्यांना .ती उत्साहाने फसफसलेली असायची .ती हसायची - हसवायची .दिसायला तर ती गोडच होती - शरदिनीपेक्षा !
रामप्यारे तिचा मेकअप अगदी मन लावून करायचा .मग ती त्याला थँक्स म्हणायची . त्याला तिचा स्वभाव आवडायचा . तो इण्डस्ट्रीतला जुना अन अनुभवी मेकअपमन होता. वेगवेगळे प्रयोग करून पाहणारा.
“मॅडम, आपके साथ काम करनेमें मजा आता है ! “
“सच? वो क्यूँ ? “
“त्या आधीच्या बाईचे लई नखरे .वागणं चांगलं नव्हतं. सिरीयल टॉपला होती .शरतशी रोमान्स चालू होता. तर बाई हवेतच होती. स्क्रीनवर वेगळी आणि स्क्रीनमागे वेगळीच . ती कोणालाच आवडत नव्हती इथं. “
अन…कोमल शरतलाही आवडू लागली होती ! शरतचा आणि तिचा ऑनस्क्रीन रोमान्स रंगायला लागला होता आणि ऑफस्क्रीनही. जोरात !
---
के टीव्हीचं ऍन्युअल फेअर होतं. त्याला चॅनेलचे सगळेच कलाकार जमणार होते. परफॉर्म करणार होते. रंगारंग कार्यक्रम होता आणि अवॉर्ड्स !
वेगवेगळे पुरस्कार होते. त्यातलाच एक - बेस्ट सीरिअल कपल . अर्थात, चर्चेत होते - शरत आणि कोमल.
रात्री ग्रँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रम होता .
कोमलने त्यासाठी खास रामप्यारेला घरी यायला सांगितलं होतं . मेकअपसाठी . तिथून कार्यक्रमाचं ठिकाण जवळ होतं .
संध्याकाळी रामप्यारे आला . त्याने बेल वाजवली . तिने दार उघडलं .
“ रामप्यारे, हे काय ? “ ती आश्चर्याने म्हणाली , “ मस्त दिसताय तुम्ही ! आज तुम्हालाही अवॉर्ड दिसतंय ! “
त्यावर तो मनापासून हसला .
त्याच्या टकलावर आज एक चपट्या केसांचा विग होता . थोडे केस कानावर , कपाळावर आणि डोळ्यांवर बटा असलेला असा.
“लवकर आटपू या “, ती म्हणाली.
त्याने त्याचं साहित्य मांडलं. तिने डोळे मिटले व चेहरा पुढे केला.
आणि दुसऱ्या क्षणाला त्याने तिचं तोंड दाबलं. अन त्याचा एक बारीक पण धारदार चाकू तिच्या मानेवरून अलगद फिरला . रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या .
त्याने सगळं साफ केलं. तो आवरून निघाला .त्याने दार ओढलं. फट्टकन लॅच लागलं.
तो बाहेर आला . ती एक साधी कॉलनी होती . खूप वर्दळ असलेली . कोण येतंय- जातंय हे पहायला कोणाला वेळ नसलेली . ना तिथे सीसीटीव्ही होते ना वॉचमन. ट्रॅव्हलिंग बरं पडतं म्हणून ती तिथे रहात होती. एकटीच .
खूप पुढे गेल्यावर, आजूबाजूला पाहून त्याने डोक्यावरचा विग काढला . बॅगमध्ये ठेवला व स्वतःच्या टकलावरून हात फिरवला.
आता त्याला शरदिनीकडे जायचं होतं.तिचा मेकअप करायला. शरत आणि तिला , नवरा - बायको म्हणून कार्यक्रमाचं खास आमंत्रण होतं .
काम झाल्याचं सांगितल्यावर ती त्याला डबोलं देणार होती .त्याच्या कर्जाचा मोठा भार मिटणार होता .
पुढे सिरीयलमध्ये तिची नव्याने एंट्री होणार होती .
कहानीमें ट्विस्ट ! अन टीआरपी पुन्हा वर !
अरे बापरे...
अरे बापरे...
अरे बापरे!>>>> खरंच हेच शब्द
अरे बापरे!>>>> खरंच हेच शब्द बाहेर पडले तोंडातून शेवट वाचल्यावर.
जमलीय.
माबोवर क्राईम स्टोरीजची लाट येतेय वाटतं.
भारीये.
भारीये.
छान आहे कथा.
छान आहे कथा.
आणखी ट्विस्ट देऊन वाढवायची होती
किंवा आधी खून दाखवून मग कोणी केला हे उघड करायचे होते. स्स्पेन्स राखायला
अवांतर - के टीव्ही - फिर भी दिल है हिंदुस्तानी
एकदम सॉल्लिड...
एकदम सॉल्लिड...
जबरदस्त!
जबरदस्त!
ज-ब-र-द-स्त!
ख-त-र-ना-क!
मस्तय .. शेवट एकदम अनपेक्षित
मस्तय .. शेवट एकदम अनपेक्षित !!
जबरदस्त जमलीये!!
जबरदस्त जमलीये!!
अनपेक्षित शेवट !
अनपेक्षित शेवट !
भयानक वास्तव
भयानक वास्तव
छान. ओघवती आणि मनोरंजक.
छान. ओघवती आणि मनोरंजक.
बापरे, आवडली !
बापरे, आवडली !
छानच लिहिली आहे कथा.
छानच लिहिली आहे कथा. अनपेक्षित वळण.
अनपेक्षित वळण. मस्त
अनपेक्षित वळण. मस्त
सर्व वाचकांचे
सर्व वाचकांचे
खूप खूप मनापासून आभार
माबोवर क्राईम स्टोरीजची लाट
माबोवर क्राईम स्टोरीजची लाट येतेय वाटतं.
Submitted by किट्टु२१ on 9 May, 2020 - 09:45
असे आहे का ?
अन तसे असेल तर का ?
वाचकांनी यावर प्रकाश टाकावा
हि कथा आपण ऑडिओ माध्यमातून ,
हि कथा आपण ऑडिओ माध्यमातून , माझ्या आवाजात ऐकू शकता .
लिंक
https://marathi.pratilipi.com/audio-series/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%...
वेगळी आणि वास्तवदर्शी.. पुढील
वेगळी आणि वास्तवदर्शी.. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
लेख वाचला आणि ऐकलाही...मस्तच
लेख वाचला आणि ऐकलाही...मस्तच
सांज आभारी आहे . आपल्यालाही
सांज आभारी आहे . आपल्यालाही खूप शुभेच्छा .
लावण्या
लावण्या
कथा ऐकली यासाठी विशेष आभार .