माझा मॉडपणा!

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

इथे खरं तर 'माझी मॉडरेटर पदावरील कारकीर्द' असे म्हटले असते तर छान भारदस्त वाटले असते नाही का?
पण ते म्हणजे 'सशाने आपल्या कपाळाला गंडस्थळ म्हणण्यासारखे(ढापलेली उपमा) किन्वा कुत्र्याच्य पिलाने आपल्या केकाटण्याला डरकाळी म्हणणयासारखे(ही ढापलेली नाही) झाले असते!
बरं ते असो!
तशी मी लहानपणापासून कायम वर्गात ' सेगरेटरी ' असयाची! मी स्वत:वर खूष होण्याला आणि इतर मुली जरा माझ्यावर खार खाऊन असण्याला (अजून एक) निमित्त होते ते!
चौथी मधे GS होण्यापर्यन्त माझी मजल गेली तेवा मी अगदीच खुष झाले होते. पण मग प्राथमिक शाळेच्या निरोप समारंभाला आमच्या एका बाईंनी मला अचानक माझ्या या यशा(?)चे रहस्य सांगितले," अग तू वर्गात इतकी अखंड बडबड कराय्चीस आणि इतरांना पण 'बोलते' करून वर्गाला कायम disturb करायचीस ना, मग आम्ही तुला सेक्रेटरी च करून टाकलं! आता स्वत: सेक्रेटरी असताना दंगा करता येत नाही ना!"( नशीब एवढा तरी विश्वास वाटला त्यांना!)
अशा रितीने माझा तोवर हवेत उडणारा सेक्रेटरी पदाचा फ़ुगा फ़ुटला!

नन्तर मग हायस्कूल मधे सेक्रेटरीपदाला माझ्याहून अधिक लायक(!) उमेदवार मिळाले असावेत कारण नन्तर मग मी पुन्हा सेक्रेटरी झाले नाही.

तर जेव्हा काही वर्षापूर्वी इथे US मधे आले तेव्हा मायबोलीवर TP करत पडीक रहाण्याला सुरुवात झाली. नन्तर २ वर्षापूर्वी मला मॉड होणार का असे विचारण्यात आले तेव्हा मला हा सेक्रेटरी होण्याचा एपिसोड आणि त्यामागचे खरे कारण आठवल्यावाचून राहिले नाही!
तर अशी झाली माझ्या मॉडपणाची सुरुवात!

पूर्वी इतर कुणी मॉड जेव्हा एका फ़टकार्‍यात कुणा कुणाचे काय काय त्यांच्या मते वादग्रस्त आणि माझ्या मते खमंग पोस्ट्स उडवून द्यायचे तेव्हा मला मॉड ही जमात ' शिष्ट, खडूस ' वाटायची! आणि जरा त्यांच्या 'पावर' चे कौतुक पण वाटायचे!
मग रितसर admin नी आम्हाला मायबोलीवरच्या मॉड ना करावी लागणारी कामे, त्याची पद्धत, त्यासाठीचे software तसेच moD's code of conduct याची कल्पना दिली. या सर्वामुळे एकदम जाणीव झाली की मॉड म्हणजे कुणापण यूजर च्या पोस्ट्स ' तलवारीने ' उडवण्याचे स्वातन्त्र्य नसून मायबोलीवरच्या सभ्यतेला सांभाळण्याची जबाबदारी आहे!

आता मुख्य म्हणजे वात्रटपणा, कुठल्याही BB वर TP करणे, एकंदर च पोस्ट मधील भाषा सगळेच नाही म्हटले तरी जरा सांभाळावे लागणार होते!(इथे बर्‍याच कुत्सित हसण्यांचा आवाज मला आत्ताच येत आहे! )
तेव्हा कुठे नुकत्याच या जबाबदारीतून मोकळे झालेल्या असाम्याच्या उत्साहाचे रहस्य पण समजले(असाम्या ~D~D )

सुरुवातीला आम्ही एकूण दहा नवीन मॉड होतो. सर्वांना काही जबाबदार्‍या वाटून दिल्या होत्या.
मॉडना करायची नेहमीची कामे म्हणजे BBs ची वरचेवर सफ़ाई, गरजे प्रमाणे नवे bbs बनवणे, BBs ची वर्गवारी, आवश्यक वाटल्यास असलेले BB बन्द करणे, एकत्र करणे, पोस्ट्स हलवणे वगैरे. ही कामे बहुतांशी विभागवार वेगवेगळ्या मॉड्स ना दिली जातात तर काही कामे(जसे अयोग्य पोस्ट्स delete करणे, कुठे users चे अनुचित वर्तन व्यक्तिगत आरोप किन्वा अनावश्यक वाद विवाद असे दिसल्यास ते सांभाळून घेणे) ही ज्याला प्रथम दिसेल तो / ती मॉड ती कामे करतो.
काही तारीखवार करायची कामे, जसे गुलमोहोर मधे नविन महिना चालू करणे, गणेशोत्सव, दिवाळी अंकाची कामे, MODs choice अशी कामे असतात.त्यांची जबाबदारी बहुधा एखाद दुसर महिना आधी कुणी ना कुणी मॉड स्वेच्छेने उचलतात. मग गरज असेल तेव्हा इतर काही मॉड त्यांना join होतात आणि ते काम कसे पार पाडायचे ते ठरवून पुढची action घेतात. अशा प्रकारे आपसात understanding वर ही कामे होतात.

कधीतरी काही निर्णय सर्व मॉड्स नी मिळून घ्यायची वेळ येते. कधी तो निरणय एखादा नवा विभाग, नवा नियम, नवा उपक्रम सुरू करण्याबद्दल असतो, तर कधी एखाद्या वादग्रस्त परिस्थितीत मॉड्स ची भूमिका यावर पण असतो
आम्ही सर्व मॉड वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या टाईमझोन मधे असल्यामुळे हे सगळे संभाषण 'याहूकृपेने'च होते. मॉडरेटर्स चा एक याहू ग्रुप आहे त्यावर ईमेल्स आणि क्वचित चॅट द्वारे आम्ही एकमेकांशी संपर्क साधतो.
हे सगळे इतके डीटेल मधे(काय रटाळ पोस्ट आहे असं वाचणारे म्हणतायत याची मला कल्पना आहे!) सांगायचेही एक कारण आहे.

काय होतं की काही वेळा आमच्या हातून पण काही चुका होतात, जसे की अनावश्यक पोस्ट्स उडवताना नजरचुकीने चांगले पोस्ट डिलीट होणे, कधी कुठे अयोग्य पोस्ट कुणीच मॉडने न उडवता तशीच राहणे, तर कधी एखाद्या user च्या प्रश्नाला उत्तर द्यायचे राहून जाते!
असे व्हायचा अवकाश की लग्गेच आपले जागरुक मायबोलीकर प्रश्नांचे सरबत्ती सुरूच करतात "माझे पोस्ट आक्षेपार्ह होते का? का उडवले?" " माझ्य प्रश्नाला उत्तर का दिले जात नाहिये? नव्या लोकांना इथे असे ignore करतात का?" " आम्हाला अमूक ठिकाणी warning दिली आणि त्या तमक्याला का दिली नाही?" " त्या अमूक गावच्या तमूक हायस्कूल च्या बीबी वर लोक personal attack करत आहेत मॉड्स तुम्ही काय करताय?"
मधे तर एक दोन users नी मॉड्स आणि मायबोली administration विरुद्ध आघाडीच उघडली होती! त्यांनी तर मायबोलीकरांच्या अयुष्यात घडणार्‍या काही भल्या बुर्‍या घटनांनादेखिल मायबोली administration लाच जबाबदार धरले होते!
असो. असे काही प्रसंग आमच्या साठी अगदी संस्मरणीय म्हणतात तसे होतात!
हे असे घडते तेव्हा अर्थात मॉड्स बद्दल यथेच्छ टीका होते! कधी लोक मॉड्स नी बारीक सारीक वादात पोलिसासारखी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा करतात, म्हणतात मॉड काहीच action घेत नाहीत! कधी म्हणतात नको तिथे जास्त कडक धोरण दाखवलेय! अर्थात हे सर्व चालायचेच!

खरं अशा चुका बहुधा 'चुकून' च झालेल्या असतात आणि दुर्दैवाने नन्तर सुधारता येत नाहीत. कधी अनेक मॉड्स च्या मधे समज - गैरसमजाअमुळे, कधी communication gap मुळेही अशा चुका घडतात.

आता जसे अशा टीकेला सामोरे जावे लागते तसेच कदाचित जास्तच प्रमाणात मायबोलीकर मॉड्स च्या कामा(?!)चे कौतुक पण करतात!
अगदी"तुम्ही हे अद्भुत कार्य करत आहात" "तुम्ही लोक आहात म्हणून माझ्या अयुष्यातला मायबोलीचा विरंगुळा सुरळित चालत आहे" अशा प्रकारचे अगदी लाजवणारे कौतुक पण ऐकायला मिळालेय आम्हाला
या सगळ्यामुळे मला तरी 'मॉडपणा' हे काम नाही तर विरंगुळाच वाटत आला आहे!
अशा रितीने मी अमचे मॉड्स चे कौतुक करून घेतले, आता आपले ऍडमिन राहिले की!
तर त्यांच्या सारखा सहनशील, दयाळू माणूस दुसरा नसेल!
आम्ही करत असलेल्या लहान(!) मोठ्या चुका, नको तेव्हा केली जाणारी, राहून गेलेली, उशीरा केलेली कामे सग्गळे सांभाळून घेतात! तेही कधी एकही कठोर शब्द न बोलता.. कधीतरी कानपिचक्याही देतात पण त्या(शालजोडीतल्या?) गोड शब्दात
असो. तर आता बस करते हे पुराण
एरव्ही कधी ही (आमची बाजू!) सांगायची संधी मिळत नाही, पण admin नी हा bb उपलब्ध करून दिला तेव्हा म्हटले चला इथे बोलून घ्यावे
चला मग भेटत राहूच!

कळावे, लोभ असावा..

-- मैत्रेयी

विषय: 
प्रकार: 

मैत्रेयी,
ग्रेट वर्क!

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

पगार विचारू नये! Happy स्टॉक ऑप्शन्स काय?? ते विचारावेत Happy

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

मैत्रेयी ... मस्त लिहिलंयस ग... मॉडपणा म्हणजे थँकलेस जॉबच .. क्रिकेटच्या अंपायरसारखा Happy

मॉडपणा म्हणजे थँकलेस जॉबच .. क्रिकेटच्या अंपायरसारखा >>>>>

अम्पायरासारखा? अहो, तो का थॅंकलेस जॉब आहे का? चांगले वाजवून घेतात डॉलर्स, येन, पौन्ड्स, दिनार, काय असेल ते! शिवाय सगळे पंचतारांकित!!

मॉड्चा मात्र खराखुरा थँकलेस. मैत्रेयीने उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखविले.:)
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....