Submitted by मनोजकुमार देशमुख on 1 May, 2020 - 09:25
तू असे पाहिले जाताना आस हकेची होती
निशब्द न बोललो काही ती वेळ चुकीची होती
हातात घेतले हात ओठांची भेट ती बाकी
माघार तिने का घ्यावी ती वेळ चुकीची होती
यंदाही चुकला त्याचा तो अंदाज पावसाचा
करपून पीक ते गेले ती वेळ चुकीची होती
का वांझ जमीन जहाली गळफास लावला त्याने
मिळाला विमा सरकारी ती वेळ चुकीची होती
सरणात प्रेत ते माझे कोणीच भोवती नाही
का मेघ असे बरसावे ती वेळ चुकीची होती
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम
वाह।
वाह।
दाहक वास्तव.
दाहक वास्तव.
बाप रे!!!
बाप रे!!!
अज्ञातवासी , मन्या , वीरु आणि
अज्ञातवासी , मन्या , वीरु आणि सामो धन्यवाद !
छान
छान
वाह - अप्रतिम
वाह - अप्रतिम
खरे तर आपली जन्माला वेळ चुकीची होती
धन्यवाद अजिंक्यराव पाटील ,
धन्यवाद अजिंक्यराव पाटील , यतीन