वैयक्तिक माहिती कशी बदलावी?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:00

मायबोलीवर प्रवेश केल्यावर "माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत "संपादन" मधे असलेल्या "वैयक्तिक" या उपविभागात तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती बदलता येईल.

तसं म्हटलं तर काही नाही. हा एक उपक्रम आहे. सद्स्य नावे न दिसता प्रोफाईल मधली नावे दिसतात. आताही अक्षरवार्ता वरती 'विशेष' मध्ये आहे, पण मुद्दाम जाऊन फारसे कोणी बघत नसावे म्हणून सदस्यत्वाच्या इथे दिला असेल दुवा.

किंवा विस्तृत चित्राचा विचार करुन पुढे मागे आपल्या सदस्यत्वामध्ये कोणते दुवे राहू शकतील हे सदस्य ठरवू शकणार असतील. त्या दृष्टीने काम चालू असू शकते.

माझ्या कल्पनाशक्तीला फार जास्त धुमारे फुटताहेत बहुधा Happy

माफ करा...
पण सभासद नोंदणी करताना चुकून अनावधानाने पुरूष ऐवजी स्री अशी नोंद झालेय तर बदलायचे कसे सांगाल का ?

संपादन वर टिचकी मारल्यावर सुरवातीलाच
चार टँब दिसतील

सदस्य खाते
वैयक्तीक
शैक्षणिक
व्यावसायिक

त्यात हव्या त्या बटनावर टिचकी मारुन तुम्ही बदल करु शकता.

' माझे सदस्यत्व ' उघडल्यावर काही बॉक्सेस दिसतात. निवडक १०, आवडते इत्यादि. यात बदल करता येत नाही काय? डिलिशन?

निवडक १० मधे बदल करण्यासाठी त्या लेख/कवितेवर टिचकी मारायची.
लेख/कवितेच्या शेवटी author profile नंतर 2 options आहेत.
नवीन प्रतिसाद लिहा.
निवडक 10तुन काढुन टाका.
यातील
निवडक 10 तुन काढुन टाका. यावर टिचकी मारा.
तो धागा तुमच्या निवडक 10तुन डिलीट होईल.

आवडते मधे तुम्ही फॉलो करत असणाऱ्या आयडींची यादी असते.
तुम्हाला ज्या आयडीला अनफॉलो करायचे असेल तर. त्याच्या profile page वर जाऊन तुम्ही____ यांचे चाहते आहात. यावर टिचकी मारा.

Pages