गंध

Submitted by Rohan_Gawande on 3 April, 2020 - 22:09

"अरे बाहेर आभाळ आलं आहे दाटून, shoes का घालतो आहेस?" मुकेश नी पेपर चाळत विचारलं
"weather अँप वर बघितलं मी , फक्त ३०% चांसेस आहेत पाऊस पडायचे, हे काही आपल्या कडच्या सारखा हवामान खातं नाही , परफेक्ट असतो अंदाज इथला, अमेरिका आहे मित्रा " राहूल नी शु लेस बांधत शेरा मारला.
"आता परत तुझ कंपॅरिसन सुरु करू नकोस , तू काहीही म्हणाला तरी माझा निर्णय पक्का आहे. " मुकेश नी पेपर बाजूला ठेवून सांगितलं.
"जाना परत इंडिया ला , मी नाही अडवत तुला फक्त जाऊन रडू नको काय ही ट्रॅफिक, काय हे पोल्यूशन" राहूल वैतागून म्हणाला.
"मी रडत पण नाही राहूल , तूच रडतो , आणि तसं पण तुझं हे वॉलमार्ट अन costco तुलाच मुबारक , मी चाल्लो. मला 6 वर्ष झाली रे इथे, बस झाला आता, परत जाऊन मस्त निघेल bike वर मनसोक्त, ही अशी चहाची टपरी दिसली की लावली bike बाजूला आणि मस्त चहा अन क्रीम रोल हाणला, ती सकाळची मिसळ पाव, टपरी वरचा वडा सांबार, वाह " मुकेश मिस्क्लील हसत म्हणाला.
"मुकेश खरं सांग ना, लग्न करायचा आहे तुला, म्हणून चाल्ला. नाही तर कोण कशाला US सोडून जाईल " राहूल हातात fitbit बेल्ट घालत म्हणाला.

"राहूल खरंच सांग इतकं आवडतं का तुला US, परत नाही जावं वाटत, नाही ठीक आहे रे, पैसे कमवायला येतो आपण, आणी ते काही चुकीचही नाही, पण इथेच स्थायीक कसा होऊ यार. उद्या आई बाबा आले सुद्धा, तरी माझे सगळे मित्र, नातेवाईक, गणगोत तिकडे आहे रे, सगळं सोडून देऊ. आणि ते बालगंधर्व, नाटक, वाडा पाव , आपल्या गावची सांबारवडी , सगळं नाही रे इकडे. वर्ष भरात एखादा कार्यक्रम होतो मराठी गाण्यांचा ते पण २ तास ड्राईव्ह करून १०० डॉलर द्या. ६ महिने बर्फ असतो, उरलेल्या ६ महिन्यातही, ३ महिने पाऊस"
"तुला जायचा तर जा, मला नको सांगूस, इथल्या सोयी आणि lifestyle खूप बेटर आहे हे तुलाही माहीत आहे, मी जॉगिंग ला चाललोय" दार उघडत राहूल म्हणाला.
"अरे कमीत कमी जॅकेट तरी घालून जा " मुकेश नी भुवया उंचावत सूचना दिली
"मुकेश ३०%, मी काय बोललो होतो, विसरला का, येतो मी तासाभरात" राहूल दार लावून निघून गेला.

हिरव्या गर्द झाडांमधून जाणाऱ्या रस्त्यानी राहूल चालू लागला, शेजारी तलावाच पाणी स्थीर होत, त्याच्या आयुष्यासारख. मूर्ख आहे मुकेश, का चालला आहे? मी नाही जाणार, खूप काय बिघडलं या ७ वर्षात, घरची काही functions मिस झाली, भेटी गाठी नाही झाल्या इतकंच. आता सवय झाली आहे मला. आई बाबा पण येतील इकडे , थोडं बोर होईल त्यांना सुरवातीला पण इथेच छान आहे, राहूल कुठला तरी आवाज दाबून मनाला समजावत होता. का कुणास ठाऊक आज त्याला अस्वस्थ वाटत होतं. ७ वर्ष होऊन गेली होती अमेरिकेत, घरचे आता लग्न करून घे सांगून थकून गेले होते.
कोवळ उन्ह जाऊन अंधार होऊ लागला, वातावरणाने अचानक रंग बदलला आणि धो धो पाऊस पाऊस सुरु झाला, विजांचा जोरदार कडकडाट होऊ लागला, राहूल चिंब होऊन भिजून गेला. आज कुठेतरी अंदाज चुकल्यासारख त्याला वाटलं. जॉगिंग करत असतांना, हेवा वाटणाऱ्या त्या डौलदार अमेरिकेन घरांचे दरवाजे बंद होते, कुठेही आडोसा घ्यायला जागा नव्हती. हलकाच हसत गूढ विचार करत राहूल त्याच्या अपार्टमेंट कडे परत जाऊ लागला. आज ७ वर्षात पहिल्यांदाच तो पावसात भिजला होता, सहजच या आधी पावसात भिजलेल्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गावाकडे पहिल्या पावसात भिजायचं त्यानी कधीच चुकवलं नव्हतं. आज पाऊस तसाच होता, विजा तश्याच होत्या फक्त मातीला गंध नव्हता इतकंच..

.. रोहण गावंडे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

मस्त.
कोणताही पर्याय निवडला तरी काहीतरी त्यागावच लागतं. यु कॅनॉट इट अ केक & हॅव्ह इट टू.

धन्यवाद सामो जयश्री.. इथे अमेरिकत काही वर्ष झालेला प्रत्येक जण कधी तरी हे सगळे विषय ऐकतो.. आणि खरंच आपल्या मातीचा गंध नाही इथे