दोन मिनिटांचा खेळ .
११ - दोन ओळींच्या दहा भयकथा
१) रात्री बारालाच कोणीतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला . सकाळी आई म्हणाली " तुझा मित्र मोबाईल देउन गेला , राहिला होता म्हणे त्याचा घरी ."
२) आलेला नवा शेजारी तक्रार करत होता , "तुमच्या मिसेस दिवसभर विचित्र आवाजात ओरडतात ". मी माझ्या बायकोचा खून करून एक वर्ष उलटलंय .
३) त्याने माझ्या झाडाखाली ते छोटसं बाळ पुरलं . त्याला वाटलं होतं मी त्याला गुप्तधन शोधून देईन .
४) मी त्या देवऋष्याकडे एकाचे वशीकरण करण्यासाठी गेलो होतो . आता तो देवऋषी जे काही सांगेल ते मी करतो .
५) तो म्हातारा गावात आल्यापासून सहा मुले बेपत्ता झाली , त्यामुळे लोकांनी त्याला फासावर लटकवले .
आता दुसरा कोणीतरी नवीन माणूस गावात येईपर्यंत माझी उपासमार होणार .
६) मला तो आवाज फारच आवडतो . म्हणूनच मी वेळ मिळेल तसा माणूस जाळतो .
७) मी आता फक्त रात्रीच खेळायला जातो . माझ्या मित्राला पुरल्यापासून तो फक्त रात्रीच खेळायला येतो .
८) ती चेटकीण म्हणाली होती कि नुकत्याच यौवनात आलेल्या मुलीचा बळी दिल्यास मेलेला कुणीही जिवंत होईल . आता माझी मुलगी आणि नवरा दोघेही मेले आहेत .
९) माझ्या घरापुढे दररोज कोणी ना कोणी लिंबू-मिरची आणून टाकतात . आता मी स्मशानभूमी सोडून , दुसरीकडे राहायला जायचा निर्णय घेतलाय .
१० ) आई मला त्या निळ्या रंगाने भरलेल्या डब्याकडे जाऊ देत नाही , हा आहे म्हणते . त्या दिवशी तिने त्या रंगाने आंघोळ केली आणि नंतर तिचा हा झाला .
प्रयत्न केलाय , भीती वाटते का बघा ....? प्रतिक्रिया मध्ये बिनधास्त सांगा ह्या कथा नक्की कोणत्या प्रकारच्या वाटतायेत .
धन्यवाद...
Short horror वाचून प्रेरित झालो , कथा मात्र मीच लिहिल्या आहेत...
धक्कातंत्राची पद्धत मात्र तीच आहे ..
वा ! छान नवीन काहीतरी. माझ्या
वा ! छान नवीन काहीतरी. माझ्या शुभेच्छा.
छान जमल्यात
छान जमल्यात
फक्त
' रात्री बारालाच कोणीतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला . सकाळी आई म्हणाली " तुझा मित्र मोबाईल देउन गेला , राहिला होता म्हणे त्याचा घरी ." >> ही मला कळली नाही.
म्हणजे याचा फोन तर मित्राकडे
म्हणजे याचा फोन तर मित्राकडे होता मग याला रात्री बाराला फोन आलाच कसा? दोन ओळींची अमानवीय कथा आहे ही.
म्हणजे याचा फोन तर मित्राकडे
म्हणजे याचा फोन तर मित्राकडे होता >> मग फोन आला कशावर?
काहीतरी चुकलेय
राहिला होता म्हणे त्याचा घरी
राहिला होता म्हणे त्याचा घरी >>> ईथे त्याचा च्या जागी कदाचित त्याच्या असावे
आता वाचुन बघा
' रात्री बारालाच कोणीतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला . सकाळी आई म्हणाली " तुझा मित्र मोबाईल देउन गेला , राहिला होता म्हणे त्याच्या घरी ."
फोन कुठे / कसा घेतला? ते मला
फोन कुठे / कसा घेतला? ते मला कळले नाहीये. मित्र येवून गेला, ....तो गेलेला होता. म्हटले तर ठिक होते.
किंवा लेखकाने फोन केला, तो
किंवा लेखकाने फोन केला, तो रिसिव्ह झाला. पण मित्राकडे मोबाईलच नव्हता...असे पण चालेल
६) मला तो आवाज फारच आवडतो .
६) मला तो आवाज फारच आवडतो . म्हणूनच मी वेळ मिळेल तसा माणूस जाळतो ..... थोडक्यात यासारखीच कथा असलेला महेश बाबु अभिनीत " स्पायडर" चिञपट येऊन गेला. (चित्रपटातील खलनायकाला माणुस मेल्या नंतर मृतदेहा भोवती आक्रोश केलेला आवाज आवडतो त्या साठी खुन करतो)
जो निवेदक आहे त्याचा फोन
जो निवेदक आहे त्याचा फोन त्याच्या मित्राच्या घरी राहिला होता . त्याला सकाळी कळले की त्याचा फोन मित्राच्या घरी होता व तो मित्र येऊन सकाळी देउन गेला ....
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
क्रमांक 10 नाही कळली
क्रमांक 10 नाही कळली
प्लीज उकल करा कोणीतरी
हा म्हणजे अपघात, वेदना...
"हा" म्हणजे अपघात, वेदना...आणि निळ्या रंगाचा डबा म्हणजे रॉकेल असावं
आईने स्वतःला जाळून घेतले आहे.
आईने स्वतःला जाळून घेतले आहे. आईचा आत्मा लहान मुलाला/मुलीला सांगतोय जाऊ नको हा आहे.