Hantavirus - हा काय प्रकार आहे आता??

Submitted by शैलपुत्री on 24 March, 2020 - 08:41

आता Hantavirus बद्दल whatsapp वर नवीन नवीन पोस्ट यायला लागल्या आहेत. हे काय प्रकरण आहे? की उगाच टाईमपास सुरु आहे रिकामटेकड्यांचा?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Man dies from hantavirus in China: All you need to know about the virus, and how it spreads - Firstpost - https://www.firstpost.com/health/man-dies-from-hantavirus-in-china-all-y...

Not an airborne disease. There should be direct contact with the infected person. So, not as dangerous as Covid-19.

It is when you come in contact with urine, faeces, or saliva of rodents..

There should be direct contact with the infected person. So, not as dangerous as Covid-19. >> okk.. Got it. Thank u Happy

न्यूज खरी आहे पण घाबरण्याचे कारण नाही. तो कोरोनासारखा हात मिळवल्यावर पसरत नाही. ऊंदीर खाल्ला तरच होतो.

न्यूजवाले तर मेले उगाच आता हंता वायरसचा धुमाकूळ असे मोठमोठ्याने गळा फाडून याला ब्रेकिंग न्यूज बनव्ण्याच्या चक्करमध्ये होते.. त्यांचाच एक रिपोर्टर जेव्हा बोलला की हा कोरोनासारखा वेगाने पसरणारा नाही तर त्याचे म्हणने मुद्दाम अर्धवट तोडत पुन्हा धुमाकूळ धुमाकूळ ओरडू लागले. या मिडीयामुळेच लोकांना कोरोनाचेही गांभीर्य् येत नाहीये. लांडगा आला रे आला असे झालेय..

हन्ताविषाणू हा एकदम नवीन नाही.

तो १९८०मध्ये उंदरांमध्ये सापडला होता.
१९९३मध्ये अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागांत त्याचा उद्रेक झाला होता.

>> न्यूजवाले तर मेले उगाच आता हंता वायरसचा धुमाकूळ असे मोठमोठ्याने गळा फाडून याला ब्रेकिंग न्यूज बनव्ण्याच्या चक्करमध्ये होते..

अपरिपक्व आणि अत्यंत उथळ माध्यमे. काही वर्षांपूर्वी एका ओस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मानेला चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या माध्यमांनी त्याची नेहमीप्रमाणे ब्रेकिंग न्यूज केली आणि त्यानंतर आठ दिवस शोधून शोधून गल्लीबोळात क्रिकेट खेळताना जरी कुणाच्या डोक्याला चेंडू लागलेला दिसला तरी त्याची बातमी करत होते.

या रोगाची बाधा हा विषाणू धारण करणारा उंदीर किंवा खारोटी चावल्यास, किंवा त्यांचे मूत्र / विष्ठा तोंडात / नाकात गेल्यास होते. किंवा उंदीर खाल्ल्यास.
हवेतून किंवा सामान्य व्यक्तीला केलेल्या स्पर्शातून बाधा होत नाही. रोगाची बाधा झालेल्या व्यक्तिमार्फतच बाधा होऊ शकते आणि आपल्याकडे ती शक्यता कमी आहे.
हा जुनाच व्हायरस आहे आणि असे व्हायरस अधूनमधून येत असतातच.
घाबरून जायचं कारण नाही. वृत्तवाहिन्यांना काहीतरी खाद्य रोज लागतं.

Godzilla किंवा जायंट रोबोट मध्ये जसे नवनवीन चित्रविचित्र व्हीलन प्राणी एकाच एपिसोडमध्ये यायचे, तसं काहीतरी होत असल्या सारखं वाटतंय...

धन्यवाद चिनूक्स.

लोकांचं घाबरुन जाणे साहजिक आहे कारण करोनाच्या बाबतीत पण म्हटलं जात होतं की हा जुनाच व्हायरस आहे.world health organization ने तर जानेवारीत ट्विट केलं होतं की ह्यूमन टू ह्यूमन ट्रान्समिशन होत नाही.
WHO सारखी संस्थाच आता विश्वासार्ह राहिलेली नाही.

सनव,
विश्वासार्हतेचा प्रश्न नाही. नवी माहिती उपलब्ध होते, परिस्थिती बदलते. व्हायरस म्यूटेशन करतो.
उदा, कालपर्यंत नवा कोरोनव्हायरस एखाद्या सरफेसवर जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस राहू शकतो, अशी माहिती UCLA च्या अभ्यासातून मिळाली होती, ती ग्राह्य धरली जात होती. आज मिळालेला नवा आकडा 17 दिवसांचा आहे.
विषाणूंची बाधा झाल्यावर वास घेण्याची क्षमता नष्ट होणं हेही आता हळूहळू जास्त दिसायला लागलं आहे.

@चिनूक्स
आपल्याला विपु केला आहे
कृपया पहावा_/\_

WHO ही एक लागेबांधे असलेली संस्था दिसते आजवर जितक्या साथी आल्या सगळ्यांना त्या सगळ्या साथी त्या त्या ठिकाणच्या नावांनी ओळखल्या गेल्या आहेत. आत्ताच सरळ सरळ वूहान / china virus म्हणायचं सोडून काहीतरी तिसरच नावं दिलंय.

आतापर्यंत आलेल्या आणि त्या त्या ठिकाणाच्या नावाने ओळखल्या गेलेल्या साथी कोणत्या?
सार्स, बर्ड फ्लू, इबोला, मॅड काउ, अशी नावं आठवताहेत.

<जानेवारीत ट्विट केलं होतं की ह्यूमन टू ह्यूमन ट्रान्समिशन होत नाही.>
मी WHO ची अशी काही ट्वीट आहे का शोधलं. नाही मिळाली.
त्यांनी साधारण २० जानेवारीपासून याबद्दल बोलायला सुरुवात केली. पहिली मीटिंग २३ जानेवारीला घेतली होती .
हे एक ट्वीट मिळालं
https://twitter.com/WHO/status/1220078257275654145
There is evidence of person-to-person transmission among close contacts such as in families or in health care settings. This is not unexpected with a respiratory disease. We have not seen any evidence of onward transmission such as 3rd, 4th generation transmission

पण ३० जानेवारीपर्यंत त्यांनी ट्रॅव्हल बॅन , ट्रेड बॅन सुचवले नव्हते.

<जानेवारीत ट्विट केलं होतं की ह्यूमन टू ह्यूमन ट्रान्समिशन होत नाही.>
मी WHO ची अशी काही ट्वीट आहे का शोधलं. नाही मिळाली.
>>
Preliminary investigations conducted by the Chinese authorities have found no clear evidence of human-to-human transmission of the novel #coronavirus (2019-nCoV) identified in #Wuhan, #China

https://twitter.com/who/status/1217043229427761152

"चीनी अधिकारी म्हणतात की पुरावा मिळालेला नाही," याचा अर्थ who म्हणतेय की human to human transmission होत नाही?
जशी जशी माहिती समोर येतेय, संशोधन केलं जातंय तसं तसं त्यांनी सांगितलेलं दिसतंय. अणि बर्‍यापैकी त्वरेने पावलं उचललेली दिसताहेत.

आजार नवा, रोज उठून येणारी माहिती नवी, WHO सारखी संस्था प्राप्त परिस्थितीत जेवढी खरी आणि जितक्या लवकर सांगता येईल अशी माहिती देत राहतं. स्वतः अपडेट व्हायचं नाही आणि फाजील शहाणपणा दाखवायचा ही रीत आहे बऱ्याच अर्धवट रावांची.

या virus चा death rate (शक्यता?की क्षमता??) 30% ते 38% आहे असे काहीतरी कानावर पडले

WHO ने करोनाबद्दल जगाची फसवणूक केली. चीनने सांगितलेलंच जर ते कॉपी पेस्ट करत असतील तर काय उपयोग?
जर रोग नवा, त्याचे दुष्परिणाम माहीत नाहीत तर ते खूप टोकाचे वाईट असतील ही शक्यता गृहीत धरून उपाय योजना करायला हवी होती. त्याऐवजी WHO ने चिनी लोकांना जगात फिरायला अटकाव करू नका अशी मागणी केली. अनेक ट्विट फक्त चीनचं कौतुक करणारी होती. Pandemic आहे हेच मुळी WHO ला कळलं नाही आणि म्हणून तशी घोषणा खूप उशिरा झाली. थोडक्यात, WHO चा जगाला उपयोग शून्य, नुकसानच जास्त झालं. तो कोण त्यांचा आफ्रिकन चीफ आहे त्याची असे साथीचे रोग लपवण्याची हिस्ट्री आहे म्हणे.

who आणि त्यांच्या प्रमुखाविरुद्ध राइट विंगर्स पद्धतशीर प्रचार करताहेत की काय?
https://twitter.com/ANI/status/1242913758877339648
इथल्या प्रतिक्रिया तेच सांगताहेत. नाहीतर सामान्य लोकांना इतक्या सगळ्या गोष्टी कुठल्या कळायला?

स्वतः अपडेट व्हायचं नाही आणि फाजील शहाणपणा दाखवायचा ही रीत आहे बऱ्याच अर्धवट रावांची.

आपल्याला कळतं किती आपण बोलतो किती, काही पायपोसच नाही हल्ली.

हे खालच्या धाग्यावर दिसलेच आहे

https://www.maayboli.com/node/69058

हा धागा वाचा हसून घ्या पोटभर

आणि मग बालाकोट हल्ला झाल्यावर यांची तोंडं गप्प का होती हे त्यांना विचारा

who आणि त्यांच्या प्रमुखाविरुद्ध राइट विंगर्स पद्धतशीर प्रचार करताहेत की काय?

नाही. त्या प्रमुखाची जुनी ट्विट व पेपरातील जुनी स्टेटमेंट आता जगासमोर आहेत. अशा प्रकारच्या साथीमध्ये अचूक भाकीत करणं, योग्य सल्ले देणं हे त्यांचं काम होतं ज्यात हा इसम सपशेल अपयशी ठरलाय. सतत चायनाची बाजू घेणं , कौतुक करणं हेही संशय निर्माण करतं.
यापुढे अशी साथ आल्यास राष्ट्र प्रमुख आपल्याला हवं ते करतील, who ला सिरियसली घेणार नाहीत. निदान तो आफ्रिकन चीफ असेपर्यंत तरी.

It is when you come in contact with urine, faeces, or saliva of rodents..>>.
चिन्यांवर आणि हु वर विश्वास ठेवु नका..

भारतात ट्विटरवर 1
·
Politics · Trending
#ChineseVirus19
23K Tweets

ट्वीट्स वाचल्या तर दिसतंय की हा ट्रेंड चालवला जातोय.

जे ट्रेंड केलं जातं ते खरं की खोटं हे करणं मला शक्य नाही, तसं केल्याने माझ्यासाठी काही फरकही पडणार नाही.

फक्त हा असा प्रचार होताना दिसतोय. तिथे ओप इंडियाचंही नाव दिसलं.
तोच माल इथेही ओतला जातोय.
असो.

कोरोनाला चीनी व्हायरस म्हणण्याचा जो आग्रह होतोय त्याचा एक परिणाम म्हणजे ईशान्य भारतातल्या लोकांना त्रास दिला जातोय. किरण रिजिजूंनी याबद्दल वक्तव्य केलंय .

अमेरिकेतील निवडणुका या धाग्यावरही याबद्दल वाचलं.

Indian Leftist- चायनीजव्हायरस असं म्हणू नका रे, निष्पाप चिनी लोकांना त्रास होईल. ज्यांचा या सगळ्यात काही दोष नाही त्यांना- अगदी लहान मुलांनाही या प्रचाराचा त्रास होईल.

Also Indian leftist- पुरोगामी आहे पुरोगामीच राहणार , सर्व प्रकारच्या जातीयवादाला ब्राहमणवादच म्हणणार.