धागा कुठल्या विभागात काढायचाय समजत नाहीये. सांभाळून घ्या. त्यावर वाद नको. ॲडमिन बघतील.
तर आज आमच्या ऑफिसमध्येही वर्क फ्रॉम होमची चाचपणी सुरू झाली. आमच्या फिल्डमध्ये हे फार अवघड आहे. एकाही कंपनीत हे होत नाही. त्यामुळे कधी याचा सामना करावा लागेल अशी मनाची तयारीही नव्हती. आणि घराची तयारी तर आजही नाहीये. उद्याही नसणारेय.
जसे बॅचलर लाईफ जगणारे विवाहीत लोकांकडे बघून उसासे टाकतात तसे आम्ही एकेकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ऑफिसात पडीक असताना वर्क फ्रॉम होमवाल्यांवर जळायचो.
पण आता स्वत:वर ती वेळ येतेय तर काही सुचेनासे झालेय. सुट्टीच्या दिवशी मुले घरात असताना मी एखादा ऑफिसचा कॉल करायचे म्हटले तरी माझी तारांबळ उडते. दिवसभर ती डोक्यावर असताना वा त्यांना दुर्लक्षून घरात काम करायचे हे परमेश्वराचा शोध घेण्याईतकेच अवघड आहे.
जास्त डिट्टेलवार नाही लिहीत आता. भावना आणि समस्या समजून घ्या.
माबोवर समदुखी असतीलच. तर ही सिच्युएशन कशी हॅण्डल करायची यावर एकत्रित चर्चा करायला हा धागा !
आमचं पण कॅन्सल होणार असं
आमचं पण कॅन्सल होणार असं दिसतंय.
आज उद्यात कळेल.
सगळ्यांचे वर्क फ्रॉम होम
सगळ्यांचे वर्क फ्रॉम होम कॅन्सल का होताहेत. करोनावर उपाय सापडला की आटोक्यात आला?
ऑफिसेस बंद उद्धव ठाकरे लाईव्ह
ऑफिसेस बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह
सगळ्याच कंपन्यांना WFH
सगळ्याच कंपन्यांना WFH परवडणार नाही कारण त्यासाठी त्यांच्या व्यवसायाची तशी तयारी असावी लागते. पण आधी ट्राय केले असे दाखवून मग काही कारणे दाखवून बंद करणं सोपं आहे. तेच केलं जातंय असं दिसतं.
घराच्या बाहेर सीसीटीव्ही
घराच्या बाहेर सीसीटीव्ही लावणार आहेत असे पण ऐकलंय .
आणि त्याचे रेकॉर्डिंग पगाराच्या वेळेस पाठवावे लागणार आहे.
घराच्या बाहेर जाताना दिसला तर नो salary.
आमचा सेटप होत नाहीये लॅपटॉप
आमचा सेटप होत नाहीये लॅपटॉप वर.
आमचेही वर्क फ्रॉम होम शक्य
आमचेही वर्क फ्रॉम होम शक्य नव्हतेच. म्हणून एकदिव्साआड केले.
पण आता बंदच होतील ना खाजगी ऑफिसेस ३१ मार्चपर्यंत...
ठाकरे सांगो नायतर मोदी सांगो.
ठाकरे सांगो नायतर मोदी सांगो. आमचं ऑफिस फक्त सायबाच्या मर्जीनेच बंद होणार.
आमचं आम्हाला स्वतः ठरवा सांगितलंय.
सेटप झाला तर वफ्रॉहो. नाहीतर जर बंद ठेवावं लागलं ऑफिस नो पे, लीव कापणे वैगेरे होईलच.
परीक्षांचं काय सांगतात?
डेटा शेअरिंग आणि
डेटा शेअरिंग आणि कॉन्फिडेनशैलीटी च्या कारणाने होम वर्क आळवू करत नाहीत
वर्क फ्रॉम होमची तयारी केली
वर्क फ्रॉम होमची तयारी केली नसेल तर मॅनेजमेंट ढ आहे असे चार चौघात म्हणा.
आता करावेच लागेल. (फॅक्ट्र्या चालू रहातील)
झालं ढ / बेक्कर/ बनियेकी
झालं ढ / बेक्कर/ बनियेकी दुकान बोलुन

आता सेटप होतोय
उद्यापसून बंद हे पाहता नवीन
उद्यापसून बंद हे पाहता नवीन ट्विस्ट
अल्टरनेट वर्किंग बाद झाले.
आणि आता पुन्हा वर्क फ्रॉम होम
मी सुट्टी घेऊन घरी होतो. आता मलाही संध्याकाळपर्यंत ऑफिसला बोलावलेय. सिस्टीम चेक करून घरी न्यायची आहे.
परीक्षांचं काय सांगतात?>>>>>
परीक्षांचं काय सांगतात?>>>>> पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर
घरून काम करताना येताजाता
घरून काम करताना येताजाता अरबट चरबट खाणे टाळायला काय करता ?
स्टँडिंग डेस्क कुणी वापरतो का ?
अशा टिप्स शेयर करा !
आम्ही दोघेही wfh असल्यामुळे,
आम्ही दोघेही wfh असल्यामुळे, मुलाला नॅनीकडे सोडतोय..तिलाही पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरायला नको आणि आम्हालाही काम करता येते. तिचा गॉडसन आलाय सो दोघेही मजा करताएत. amazon वरून अजून एक सेट ऑर्डर केलाय ऑफिस सेट अप साठी..इकडे परिस्थिती अजून १-२ महिने अशीच राहिल असे वाटतेय.
amazon वरून अजून एक सेट ऑर्डर
amazon वरून अजून एक सेट ऑर्डर केलाय ऑफिस सेट
>>>
हे काय असते प्लीज सांगा
मी आताच ऑफिस सिस्टीम घेऊन घरी पोहोचलोय. आमच्याकडे डेस्क्टॉपच चालते. कशी करावी अरेंजमेंट?
ऑफिस चेअर्,टेबल,मॉनिटर्
ऑफिस चेअर्,टेबल,मॉनिटर्,किबोर्ड्,माऊस, hdmi केबल (आम्हाला २ मॉनिटर्स लागतात कामासाठी). बेसिकली घरून काम करताना बेड किन्वा सोफ्यावर लोळत काम करावे लागू नये म्हणून सगळी तयारी..
आमच्याकडे सगळा गाढवाचा कारभार
आमच्याकडे सगळा गाढवाचा कारभार.
आधी ज्यांच्याकडे ऑलरेडी आहेत त्यांना wfh करायला सांगितलं..
80 लोकांच्या टीममध्ये फक्त 2 laptop दिले गेले.. बाकीच्यांच काहीच ठरवलं नव्हतं . आज सडनली सांगितलं की, डेस्कटाॅप घरी घेऊन जा..
पॅकींग केलेले डेस्कटाॅप, माऊस,आणि सी.पी.यु घेऊन सगळ्यांची पळापळ. हा फाॅर्म भरा तो फाॅर्म भरा. अॅडमिन अप्रोव्हलं.. security checking.. ह्या सगळ्यानंतर ड्राॅपसाठी मारामारी...
त्यातही मला नेट काय दिलचं नाही..स्वतःच्या पैशाने घ्या म्हणे..नंतर क्लेम करा बोलले....आता काय सांगणार...असा राग आलाय ना.. मी डेस्कटाॅपच फोडून टाकणार आहे....
पॅकींग केलेले डेस्कटाॅप, माऊस
पॅकींग केलेले डेस्कटाॅप, माऊस,आणि सी.पी.यु घेऊन सगळ्यांची पळापळ. हा फाॅर्म भरा तो फाॅर्म भरा. अॅडमिन अप्रोव्हलं.. security checking.. ह्या सगळ्यानंतर ड्राॅपसाठी मारामारी...
>>>>
सेम आज हेच घडले
घरी आलो आणि बाजार मांडला. वाईरी व्यवस्थित जोडल्या. पण ईंटरनेट सर्व्हर काय कसे कनेक्ट करायचे याचा जरा पत्ता नाही. जे उडते उडते कोणी सांगितले त्याचा अर्थबोध होत नाहीये. सगळं आवरलं आणि दिलं ठेऊन.. उगाच का विकेंड खराब करा.. सोमवारी ऑफिसटाईममध्येच करू खटपट..
दहा वाजता सगळं बबल रॅप करून
दहा वाजता सगळं बबल रॅप करून तयार होतं. साडे दहाची नेहेमीची कॅब मिळेल असे वाटले होते. बॉक्स कमी पडत होते. थोडे बॉक्स यायचे आणि दरवाजा जवळ बसलेले लोक धावत जाऊन घेऊन टाकायचे. परत बॉक्सची वाट बघा असं करत सव्वा बारा वाजता ओलाने निघाले आणि एक वाजता दोन डेस्कटॉप आणि बाकी सगळा जामानिमा घेऊन घरी पोचले. काही लीडर्स त्यांच्या टीमसाठी बॉक्स घेऊन ठेवत होते जरी त्यांना उशिरा निघायचं असेल तरी. दुसरी गोष्ट म्हणजे बॉक्स आल्यावर सगळे धावत सुटायचे मॅनेजर सकट. हे बघून मला इतकं निराश वाटलं, वाटलं आज फक्त बॉक्स साठी एवढं तर उद्या अन्न धान्य कमी पडलं तर लोक एकमेकांना जीवे मारणार का.
काल रात्रीपासून मला प्रचंड टेन्शन आलंय, एकतर घरात काम करायला बसायचं कुठे वगैरे पण खरंतर आतून खूप खचायला झालंय की हे सगळं कधी पर्यंत चालणार, हे थोडक्यात निभावेल की न भूतो न भविष्यती असं काही होईल. त्यात आज ऑफिस मधला कारभार बघून तर मी रिसेप्शन मधल्या खुर्चीवर बसूनच घेतलं. अजिबात धावपळ नाही केली. कोणाला असं माझ्यासारखं उदास वाटतंय की सगळे पॉसिटीव्ह आहेत आणि सगळं चांगलंच होणार असा विचार करताहेत.
आयटी टिम्स वर प्रचंड प्रेशर
आयटी टिम्स वर प्रचंड प्रेशर आहे.मुळात सगळ्यांसाठी वर्क फ्रॉम होम हा अतिशय खर्चिक प्रकार असल्याने सर्व कंपन्यांनी 'वेळ येईल तेव्हाचं तेव्हा बघू' म्हणून आधीपासून पूर्ण तयारी ठेवली नाहीय.
या आशेने की हे सर्व व्याप न करता परिस्थिती सुधारेल.दुर्दैवाने यावेळी हे सर्व व्याप करावे लागलेच.त्यामुळे सगळीकडे आयटी टिम्स खूप कामात आहेत.सर्वाना योग्य स्थितीत लॅपटॉप चेक करून देणं, गेट पास,फॉर्म्स,ऍक्सेसरिज. ऍडमीन वालेही खूप ताणात आहेत.व फ्रॉ हो हळूहळू नीट सेट होईलच.
हा क्रायसिस पूर्ण उलटून गेल्यानंतर या सर्व टिम्स ना चांगल्या प्रकारे कौतुकाने वागवणे,काही अवार्डस देणे अपेक्षित आहे.असा काही प्रसंग सगळेच पहिल्यांदा पाहतायत.त्रास होणार.
कालच्या घोषणेत बँका चालूच
कालच्या घोषणेत बँका चालूच राहणार सांगितले आहे म्हणजे आम्हला जावेच लागणार. किमान मला तरी WFH नाही, कारण माझे प्रोफाइल असे आहे की WFH शक्यच नाही. टीममधील काही मुला मुलींना दिलेय त्यांचे सेटप चालुये. लॅपटॉप दिले , बघू काय होतंय. जोवर लोकल चालुयेत आम्हाला ऑफिस ला जावेच लागेल असे दिसतंय
चांगल्या प्रकारे कौतुकाने
तेही पुढच्या वेळी आयटी
तेही पुढच्या वेळी आयटी टिकेट्स सोडवण्या ऐवजी चांगले तिकीट बनवल्याबद्दल ताटं चमचे माउस पॅड वाजवून गौरव करतील ☺️☺️☺️
कोरोना संबंधित सगळी माहिती,
कोरोना संबंधित सगळी माहिती, उपाय आणि काळजी.
https://youtu.be/zrpnQkGqA-Y
(No subject)
जाऊद्या आता.
<< हा क्रायसिस पूर्ण उलटून
<< हा क्रायसिस पूर्ण उलटून गेल्यानंतर या सर्व टिम्स ना चांगल्या प्रकारे कौतुकाने वागवणे,काही अवार्डस देणे अपेक्षित आहे. >>
आता लवकरच जागतिक मंदी सुरू होणार आहे. त्यामुळे चुकूनमाकून नोकरी टिकली तर आयटीवाल्यांनी तेच अवॉर्ड समजावे.
सगळ्यांसाठी वर्क फ्रॉम होम हा
सगळ्यांसाठी वर्क फ्रॉम होम हा अतिशय खर्चिक प्रकार असल्याने सर्व कंपन्यांनी 'वेळ येईल तेव्हाचं तेव्हा बघू' म्हणून आधीपासून पूर्ण तयारी ठेवली नाहीय. >> मी_अनु, हे थोडं उलगडून सांगशील का? Upfront cost जास्त असते की running cost पण जास्त असते? Work from home असेल तर resources कमी लागतात असं होत नाही का? Just out of curiosity विचारते आहे.
चंपा, तुमची भीती रास्त असली तरी अजून तितकी कठीण परिस्थिती (अन्नासाठी मारामारी) येणार नाही असं वाटतं. पण सो कॉल्ड सुशिक्षितांना परिस्थितीचं गांभीर्य नाही हे पाहून निराश वाटणं स्वाभाविक आहे. Hang in there! This too shall pass!
<< खरंतर आतून खूप खचायला
<< खरंतर आतून खूप खचायला झालंय की हे सगळं कधी पर्यंत चालणार, हे थोडक्यात निभावेल की न भूतो न भविष्यती असं काही होईल. >>
खचून जाऊ नका. या रोगावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत, त्याला आज ना उद्या नक्कीच यश मिळेल. मात्र या अनुभवानंतर आणि नंतर येणाऱ्या जागतिक मंदीमुळे आयुष्य बदलून जाणार आहे, याची पण मानसिक तयारी करून ठेवा.
<< सो कॉल्ड सुशिक्षितांना परिस्थितीचं गांभीर्य नाही हे पाहून निराश वाटणं स्वाभाविक आहे >> सहमत.
Upfront cost जास्त असते.
Upfront cost जास्त असते. सगळीच्या सगळी कंपनी व्हीपीएन वरून लॉगिन करून काम करू लागली आणि प्रत्येकाच्या घरचं कनेक्शन अगदी उत्तम जरी असलं तरी व्हीपीएन सर्वर साईड हार्डवेअर १००% लोकं एकाचवेळी घरून काम करतील यासाठी डिझाईन बहुतेक वेळा केलेलं नसतं. (अगदी टीअर वन कंपन्यांतही)
प्रोडक्ट कंपनीत हरतरहेची प्रोडक्ट प्रत्येकाने घरी घेऊन जाणे फिजिकली शक्य नसते, मग रिमोट पॉवर ब्रिकला जोडून, मग रासबेरी पाय...किंवा तत्सम काही तरी करून निभावता येतं, पण त्यातही ४ लोकांसाठी सेटअप करणे आणि अख्ख्या क्यू ए टीम साठी रिलायबल फेल सेफ सेटअप करणे ह्यात वेळ आणि पैसा जातो.
आर एफ चेंबर मध्ये काम असेल तर आणखी कठीण होऊन बसतं.
Pages