मराठी भाषा दिवस २०२० - समारोप

Submitted by मभा दिन संयोजक on 1 March, 2020 - 23:44

नमस्कार मायबोलीकर!

मराठी भाषा दिवस २०२०च्या समारोपाची वेळ येऊन ठेपली आहे. गेले दहाबारा दिवस चालू असलेले विविध उपक्रम आणि तीन दिवस सुरु असलेले शब्दखेळ यांमुळे मराठी भाषेचा हा उत्सव खरंच खूप रंगतदार झाला.

IMG-20200219-WA0035.jpgआनंदछंद ऐसा या उपक्रमाला मायबोलीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अर्थात, विविध कलाकौशल्यांमध्ये निपुण असलेल्या मायबोलीकरांना आपल्या छंदांबद्दल लिहायला आवडेल याची आम्हाला खात्री होतीच आणि ती खात्री सार्थ ठरवल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या विनंतीवरून डॉ. अनिल अवचटांवर उत्कृष्ट असा विशेष लेख लिहून देऊन मभादि २०२० ची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही डॉ. अतुल ठाकूर यांचे अत्यंत आभारी आहोत.

स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा आणि अक्षरचित्रे या उपक्रमांना मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. विशेषतः लहान मुलांना हमखास आवडेलसा चित्रं रंगवण्याचा उपक्रम असूनही अक्षरचित्रांना प्रतिसाद न मिळाल्याबद्दल आम्हाला सखेद आश्चर्य वाटत आहे. अत्यल्प प्रतिसादामागे नेमकी काय कारणं होती हे कळलं तर त्यातून यापुढच्या उपक्रमांच्या संयोजकांना शिकायला मिळेल.

स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा हा उपक्रम इथेच बंद न करता यापुढेही चालू ठेवूया असं आम्हाला वाटतं. मायबोलीवरच्या कुशल सुगरणी आणि बल्लवाचार्यांच्या, विज्ञानावर आधारलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या वाचायला आपल्या सर्वांनाच आवडतील याची खात्री आहे. तो धागा आता पाककृती आणि आहारशास्त्र या ग्रुपमध्ये हलवत आहोत.

संयोजक म्हणून काम करताना आम्हाला नक्कीच खूप आनंद मिळाला आणि अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या. मभादि २०२० वरच्या मायबोलीकरांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचे मनोधैर्य वाढवत होत्या. त्याबरोबरच मराठी भाषा दिवस अधिकाधिक चांगला होण्याच्या दृष्टीने तुमच्या काही विधायक सूचना असतील तर त्याही आवर्जून येथे लिहा.

असाच लोभ राहू द्यावा ही विनंती.

मराठी भाषा दिवस २०२० संयोजन मंडळ
( वावे, विनिता.झक्कास, अज्ञानी, यतीन, कुंतल, किल्ली)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मभादि संयोजना करता पुढे आलेल्या माबोकरांमुळे ह्या ही वर्षीचा मभादि उत्तम रितीने पार पडला ह्या बद्दल कौतुक आणि अभिनंदन. सगळे उपक्रम, खेळ छानच होते, त्यात भाग घेणाऱ्यांचेही कौतुक!

संयोजक ,
खूप कमी वेळात तुम्ही छान उपक्रम पार पाडलात. संयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आणि हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल अनेक धन्यवाद. उपक्रमात भाग घेणार्‍या सगळ्या मायबोलीकरांचे आभार.

मस्त झाला ह्या वर्षीचा मराठी भाषा दिन साजरा. मजा आली.
नोकरी , घर आणि इतर व्यवधान सांभाळून हे ही अतिशय उत्तम रीतीने साजरं करणाऱ्या संयोजकांचे खरंच मनापासून कौतुक आणि आभार.

मुलांच्या उपक्रमांना कमी प्रतिसादामागे त्यांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर आल्यात हे कारण असू शकत का ?

छान झाला उपक्रम. संयोजकांनी नेमके आटोपशीर उपक्रम घेतले आणि त्यातील काही उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा धागा योग्य त्या गृपमधे हलवून सुरू ठेवण्याची कल्पना आवडली. प्रत्येक उपक्रमामागे खूप कष्ट असतात त्यामुळे संयोजकांचे कौतुक.

आनंदछंद ऐसा ह्यातले सगळेच लेख वाचनीय होते.
अवचटांवरचे लेखही छान होते.
छान झाला मराठी भाषा दिवस.
संयोनजकांचे खूप आभार..

छान झाला मभादि. धन्यवाद संयोजक.

खेळ मस्त होते. पण भाग घ्यायला फारसा वेळ मिळाला नाही.

आनंदछंद ऐसा >> लेख अजुन वाचुन व्हायचेत.

अत्यल्प प्रतिसादामागे नेमकी काय कारणं होती हे कळलं तर त्यातून यापुढच्या उपक्रमांच्या संयोजकांना शिकायला मिळेल.>>
मला ह्यात 2 मुख्य करणे ही वाटली.
पाहिलं म्हणजे ह्या उपक्रमात काही नावीन्य नव्हते.
गणपती मध्येही असाच उपक्रम असतो.
बाप्पाच्या चित्रांना कलर करा वगैरे.
दुसरं म्हणजे
दिलेल्या चित्रांना कलर करणं हे फक्त kinder garten किंवा फारफार तर पहिलीतली मुलं करतात. मोठया मुलांना आणखी चॅलेंजिंग, काहीतरी वेगळं हवं होतं.
माझा मुलगा 9 वर्षांचा आहे त्याला फक्त चित्र कलर करायला आवडत नाही. तो स्वतः चित्र काढून
वॉटर कलर, पोस्टर कलर इ नी पेस्ट करतो.

ही दोन्ही कारण मला तशी वाटली म्हणून लिहिलीयेत ती बरोबर असतीलच असं नाही.
असो.
इतर उपक्रम छानच होते..

म मो, मामी सहमत. यानिमित्ताने मायबोलीकरांचे दडलेले गुण दिसले, केवढी मल्टीटॅलेंटेड लोकं आहेत ही. मस्त वाटलं वाचायला. संयोजकांचे विशेष कौतुक

छान झाला उपक्रम. संयोजकांनी नेमके आटोपशीर उपक्रम घेतले आणि त्यातील काही उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा धागा योग्य त्या गृपमधे हलवून सुरू ठेवण्याची कल्पना आवडली. प्रत्येक उपक्रमामागे खूप कष्ट असतात त्यामुळे संयोजकांचे कौतुक.>> +1

मनःपूर्वक धन्यवाद मायबोलीकरांनो __/\__
आता निरोप घेतो.

ह्या उपक्रमात काही नावीन्य नव्हते. >> बरोबर आहे. नोटेड
तो स्वतः चित्र काढून वॉटर कलर, पोस्टर कलर इ नी पेस्ट करतो. >> ओके
चित्रातील अक्षरे सापडली नाहीत, म्हणून माझ्या मुलाने ( ८ वर्षे वय) चित्रे रंगविली नाहीत. >> अरेरे

कारणे लक्षात आलीत. अक्षरांवरुन चित्रे काढून रंगवा म्हटले असते तर कदाचित चांगला प्रतिसाद मिळाला असता असे वाटतेय Happy

बोकलत +१.

आणि सुचवणी - पुढच्या वर्षी दहाबारा दिवसाचा प्लॅन असेल तर २७ फेब ते ८ मार्च असा मराठीभाषा+महिला दिन एकत्र कार्यक्रम ठेवा.

>>छान झाला उपक्रम. संयोजकांनी नेमके आटोपशीर उपक्रम घेतले आणि त्यातील काही उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा धागा योग्य त्या गृपमधे हलवून सुरू ठेवण्याची कल्पना आवडली. प्रत्येक उपक्रमामागे खूप कष्ट असतात त्यामुळे संयोजकांचे कौतुक.>> +1

ह्या वेळचे मभादि उपक्रम आवडले. अजून सगळे लेख वाचून झाले नाहीयेत, वाचते आहे वेळ मिळेल तसे. अक्षरचित्रे उपक्रमाला प्रतिसाद मिळेल असे वाटले होते, मस्त होता तो उपक्रम.

मभादि संयोजकांचे अभिनंदन!

संयोजक तसेच सहभागी सर्व माबोकरांचे आभार.
रुचा म्हणतात तेच म्हणते -
>>>>> आनंदछंद ऐसा ह्यातले सगळेच लेख वाचनीय होते.
अवचटांवरचे लेखही छान होते.
छान झाला मराठी भाषा दिवस.
संयोजकांचे खूप आभार..>>>>>

Pages