आनंदछंद ऐसा- जुई

Submitted by jui.k on 29 February, 2020 - 03:06

छंद!
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला काही न काही जिव्हाळ्याचा छंद असतोच. मला वाचन आणि विविध हस्तकला जोपासण्याचे छंद आहेत पण इथे मी फक्त माझ्या हस्तकलांबद्दलच लिहिते..
लहानपणापासूनच अगदी काहीही शिक्षण न घेता माझी चित्रकला खूप चांगली होती. शाळेत विविध उपक्रम करताना हस्तकलेच्या वस्तू बनवताना मजा यायला लागली. मग स्वतःच्या प्रोजेक्ट सोबत लहान भावाचे प्रोजेक्ट सजवायचे काम ही माझ्याकडेच आले. इथून माझ्या छंदाची सुरुवात झाली. मोठेपणी अभ्यासामुळे या सर्वांना पुरेसा वेळ नाही देत आला पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र संपूर्ण वेळ मी यासाठीच देऊ लागले.
4-5 वर्षांपूर्वी youtube वर पेपर क्विलिंग चा एक सुंदर विडिओ दिसला आणि मनातून हे ट्राय करण्याचे ठरवले. मनातून भीती होतीच हे आपल्याला जमेल की नाही आणि अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला नाहीच जमले. 2-4 प्रयत्नानंतर एक वस्तू बनवली पण त्यात सफाई नव्हती. थोडी हिरमुसलेच पण नंतर आणखी जोमाने youtube आणि google च्या मदतीने हळूहळू शिकू लागले. सुरुवातीच्या बनवलेल्या बेसिक शेप्स, कॉइल्स पासून ते आत्ताच्या गुंतागुंतीच्या 3D क्विलिंग बाहुल्यांपर्यंतच्या प्रवासात खूप काही शिकले. भरपूर पेशन्स आणि आवड असली की सर्व शक्य असते.
सुरुवातीला फक्त छंद म्हणून या वस्तू बनवताना बऱ्याच जणांना या आवडायला लागल्या, काही जणांनी बनवून देशील का याची विचारणा केली. माझ्यासाठी तर हे पूर्णपणे अनपेक्षित होते. त्यातून या छंदाचे रूपांतर आज छोट्याशा व्यवसायात झाले. आज क्विलिंग च्या विविध स्पर्धांमध्ये मी भाग घेते. खूप कौतुकही होते पण अजूनही मला खूप काही शिकायचंय. अजून खूप पुढचा पल्ला गाठण्याची इच्छा आहे.
मायबोली वर मी फक्त वाचनासाठी यायचे. नंतर मायबोलीकर टीना चे क्विलिंग चे झुमके बघून आपण ही आपल्या वस्तू इथे टाकाव्या अशी इच्छा झाली. माझ्या पहिल्या वहिल्या पोस्ट ला खूप छान प्रतिसाद ही मिळाले. त्यानंतर नियमितपणे माझ्या कलाकृती इथे शेअर करायला लागले. मायबोलीवर पेपर क्विलिंग वरची एक छोटी लेखमालिका ही लिहिली.
पेपर क्विलिंग व्यतिरिक्त रांगोळ्या, चित्रकला हे ही सुरूच असते पण याबद्दल नंतर कधीतरी. माझ्या या छंदांनी मला पेशन्स, मेहनत आणि खूप काही शिकवले.
माझ्या कलाकृती इथे पाहायला मिळतील- https://www.instagram.com/crafting_around28/
https://www.facebook.com/Paper-Quilling-310476869379581/
(माझा आणि लेखनाचा जास्त संबंध येत नाही पण या विषयावर लिहायची इच्छा झाली. लेखनात थोड्याफार चूका असतील त्या कृपया दुर्लक्ष कराव्या Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहीलंत जुई Happy

पेपर क्विलिंग सुरेखच. बैलगाडी, झोका फार आवडले

मनीमोहोर थॅंक्यु Happy
मला पण तुमचे कोकणावरचे लेख खूप खूप आवडतात. वाचून अगदी कोकणात स्वतःच्या गावी पोहचल्यासारखे वाटते.