सनकी भाग १३

Submitted by Swamini Chougule on 26 February, 2020 - 05:16

पहा मला काय सापडलं "मायबोली" app वर: https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

काया बेडरूममध्ये गेली. एक व्हिस्कीची बाटली व दोन ग्लास घेऊन आली. तिने दोन ग्लास भरले एक सुधीरला दिला व एक स्वतः घेतला शांताबाईने पाणी,सोडा व बर्फ आधीच टीपॉयवर आणून ठेवले होते. सुधीरने थोडा सोडा मिक्स करून घेतला.आज त्याने आढे-वेढे न घेता ग्लास घेतला होता कारण कायाचे मनसूबे ऐकून त्याच्या डोक्याला मुंग्या येत होत्या.पण काया मात्र रिल्याक्स होती.कायाने व्हिस्कीचा एक घोट घेतला व ती बोलू लागली.

काया,“तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला आता देते तर ऐक शिवीन फॅशन इव्हेंट झाल्यावर त्या रिचाला घेऊन रोमॅंटीक डेटवर जाणार आहे तो तिला प्रपोज करणार आहे लग्नासाठी आणि हे मला होवू द्यायचे नाही.” ती ठामपणे म्हणाली.

सुधीर,“ मग तिला किडण्याप करून काय होणार? त्या दिवशी नाही जमलं शिवीनला तिला प्रपोज करायला तर आपण तिला जेंव्हा सोडू तेंव्हा तो तिला प्रपोज करेल ना आपण तिला कायमच नाही किडण्याप करून ठेवू शकत ना?” सुधीर व्हिस्की पित बोलला.

काया,“मी तिला सोडणारच ना...”असं ती पुटपुटली पण नंतर सावध झाली.

सुधीर,“काय म्हणालीस?”तिच्याकडे संशयाने पाहत म्हणाला.

काया,“अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण तिला सोडणारच आहोत पण मला शिवीनला धडा शिकवायचा आहे. त्याला ही कळू दे की जरा; ज्याच्या वर आपण प्रेम करतो ती व्यक्ती लांब गेल्यावर कसे वाटते ते आणि हे पण कळेल की रिचावर खरेच त्याचे प्रेम आहे की तिच्या पैशासाठी सगळं चालले आहे. म्हणजे रिचाच माझ्या सारखं व्हायचं.” तिने व्हिस्की घेत खुलासा केला.

सुधीरला कायाचे स्पष्टीकरण पटले नाही. पण तो काही बोलला नाही. आता त्याच्या मनात असो वा नसो त्याला कायाची साथ देणे भाग होत.त्याने ग्लास रिकामा केला व तो घरी गेला.

मधले दोन दिवस असेच कामात गेले आणि वीस मार्चचा दिवस उजाडला. आज सकाळ पासूनच शिवीन, रिचा,काया आणि सुधीर इव्हेंटच्या तयारी मध्ये व्यग्र होते. सगळे काम ऑडिटोरीअम मध्येच होते. काल मिस्टर माने आणि मस्टर स्मिथ सगळी तयारी पाहून गेले होते. त्यांना तयारी खूप आवडली होती.त्यांनी चौघांचे ही खूप कौतुक केले. सहा वाजे पर्यंत सर्व कामे आटोपली व बाकीच्या टीमला जुजबी सूचना देऊन. ते सगळे घरी तयार व्हायला गेले.

शिवीनने रिचाला तिच्या घरी सोडले व तो घरी गेला. जाताना ही तो तिला घेऊन जाणार होता. इकडे काया व सुधीर ही आप- आपल्या घरी गेले.शिवीन तयार होऊन रिचाला पिकअप करायला गेला त्याने ग्रे कलरचा सूट घातला होता व त्यावर फॉर्मल शूज घातला होता. त्याच्या गोऱ्या रंगला तो ग्रे कलर अगदी उठून दिसत होता. त्याचे व्यक्तिमत्व मुळातच आकर्षक असल्याने तो खूपच हँडसम दिसत होता. तो रिचाची वाट पाहत तिच्या बंगल्याच्या बाहेरच रोडवर कार मधून उतरून तिची वाट पाहू लागला.तर येणार्‍या जाण्याऱ्या मुली त्याला वळून-वळून पाहत होत्या. ते पाहून रिचा हसतच त्याच्या कडे येत होती. तिने ग्रे कलरचा सुंदर असा सिल्कचा फिश कट वनपीस घातला होता.त्याला साईडने कट असल्याने हाय हिल घातलेला तिचा एक पाय गुडघ्यापर्यंत डोकावत होता. कर्ली केलेले मोकळे केस तिच्या गोऱ्या गालांवर रूळत होते. ओठांना डार्क जेरी रेड लिप्सटिक,गोऱ्यापान रंगावर छान असा केलेला मेकअप,गळ्यात नाजूक हिऱ्यांचा नेकलेस, एका हातात तसेच नाजूक ब्रेसलेट, दुसऱ्या हातात शिवीननेच गिफ्ट दिलेले नाजूक घड्याळ जे ती कायम वापर असे, तिचे सौंदर्य अजून खुलवत होता.ती एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती. शिवीन भान हरपून तिला पाहत होता. रिचा जवळ आली व त्याला चिमटा घेऊन हसू लागली. शिवीन भानावर आला. गाडीचे दार उघडून तिला आत बसवले.तो ही ड्रीव्हिंग सीटवर बसला व रिचाला म्हणाला.

शिवीन, “आज क़त्ल करने का इरादा हैं। आज माझा जीव जाणार बहुतेक!” असे म्हणून तो हसू लागला.

पण रिचाला हे ऐकून कसेसेच झाले. तिचे डोळे भरले. शिवीनने सहज तिची स्तुति करत हे म्हणाले होते पण तिज्या मात्र काळजात धस्स झाले. असे का झाले तिला नाही कळले पण ती शिवीनकडे रागाने पाहत म्हणाली.

रिचा,“ मूर्खा अस काही अभद्र बोलत जाऊ नकोस.देव करो आणि तुझ्यावर कोणतंही संकट न येवो!” ती डोळे पुसत बोलली.

शिवीन,“ये रिल्याक्स एवढं रडायला काय झालं? मेकअप खराब होईल तुझा आणि मी तुझी स्तुति केली वेडे. मी काय लगेच वर नाही चाललो!” अस म्हणून तो हसू लागला.

रिचा मात्र अजूनच चिडली. त्याला एक फटका देत म्हणाली.

रिचा,“परत तेच आधीच मला आज खूप भीती वाटतेय आणि त्यात तुझे हे अस बोलणे.”ती टुशूने डोळे पुसत बोलली.

शिवीनला रिचाच्या अशा वागण्याचे खरं तर अजब वाटत होते कारण ती अशी कधीच वागत नव्हती.तरी ही तो तिच्या समाधानासाठी म्हणाला.

शिवीन,“बरं बाई नाही बोलत असे मग तर झाले तर निघूया मग.” असे म्हणून त्याने गाडी सुरू केली.व तिच्या आवडीचे ‘लगज्या गेले...’ हे गाणे लावले.

रिचा आता जरा सावरली व ती बोलू लागली.

रिचा,“by the way ; एक माणूस आज खूपच हँडसम दिसतोय!मुलींच्या तर नजरा हटत नाहीत बाबा! पण एक कमी आहे.”ती हसत म्हणाली.

शिवीन गालातल्या गालात हसत म्हणाला.

शिवीन,“तर बाई साहेबांचे लक्ष गेले वाटत आमच्या कडे पण काय कमी आहे आता?

रिचा,“ आमचं सगळं लक्ष तुमच्यावरच असते म्हणा! आणि काय कमी आहे ते सांगण्या पेक्षा ती भरून काढण्यात मजा असते ती ऑडिटोरीअम मध्ये गेल्यावर कळेल ही आणि भरून काढली जाईल.”असे म्हणून तिने डोळे मिचकवले.

शिवीनने हसून नुसती मान हलवली. ते ऑडिटोरीअम मध्ये पोहचले. तर काया व सुधीर तेथे आधीच आले होते. व्यवस्था पाहत होते.

काया ने ही छान गुलाबी रंगाची जॉर्जजेट ची साडी नेसली होती. छानसा मेकअप केला होता. ती ही सुंदरच दिसत होती. पण तिची नजर शिवीनवर खिळली होती व शिवीनची नजर रिचावरून हटत नव्हती. कायाच्या जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा ती मनातच म्हणाली ; घे पाहून रिचाला शेवटचं किती पाहायचे तेवढे नंतर ती तुला कधीच नाही दिसणार. म्हणजे कायाचा रिचाला किडण्याप करून जिवे मारण्याचा मनसुबा होता हे मात्र ना सुधीरला माहीत होते ना पक्याला.

रिचाने शिवीनला बोलावले व तिच्या क्लच मधून एक सोनेरी रंगाचा ब्रूच काढला व शिवीनच्या कोटला लावला.शिवीनने डोळ्यानेच तिला ही कमी होती तर असे म्हणाले व तो हसला. रिचा ही गोड हसली. रिचाला शिवीनच्या एवढे जवळ पाहून काया मात्र चिडली होती पण तिने तसं दाखवले नाही.

आता हळूहळू लोक येऊ लागले. Mr माने व स्मिथ आले. कायाने व शिवीनने त्यांचे स्वागत केले.शिवीन व रिचाचे कुटुंबीय ही आले. फॅशन जगातील व फिल्म इंडस्ट्रीतील मोठ- मोठे दिग्गज या इव्हेंटसाठी हजर होते.मीडिया ही इव्हेंट कव्हर करायला हजर होती पक्या वेटर्सचा वेश घेऊन त्याच्या माणसां सह तेथे आला होता. कायाचा प्लॅन आता वर्क होणे सुरू झाले.

इकडे ब्रँडचे लॉंजिंग Mr स्मिथने केले. त्या वेळे पर्यंत शिवीन व रिचा बरोबरच होते. त्या नंतर रिचा बॅक स्टेज गेली कारण आता रॅम्प वॉक सुरू होणार होते व त्याची सर्व बॅक स्टेज व्यवस्था रिचा व तिच्या टीमकडे होती. म्हणून ती बॅक स्टेज गेली. सुरवात चिल्ड्रिंन वेअरने होणार होती. लहान मुलांना बॅक स्टेज तयार करण्यात येत होतो व चिल्ड्रिंन वेअरची डिजाईनर हेड रिचा होती.म्युझिक सुरू झाले.स्पॉट लाईटी फिरू लागल्या आणि छोटी-छोटी मुल नटून रॅम्पवर येऊ लागली व टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी रिचा एका छोट्या मुलाला घेऊन आली.सुधीर मात्र रिचावर लक्ष ठेवून होता व पक्या त्याच्या पंटर बरोबर बॅक स्टेज च्या आसपासच्या भागात घुटमळत होते.पण सुधीरने ठरवले होते की कार्यक्रम संपत आल्यावर रिचाला उचलायचे कारण इव्हेंट सक्सेस होणं त्याच्यासाठी आवश्यक होतं. काया मात्र इकडे बेचैन होती कारण दोन तास होत आले तरी काही घडत नव्हते.आता उमेन्स वेअरचे सेशन सुरू झाले. मॉडेल्स मुली रॅम्प वॉक करत होत्या. काया उमेन्स वेअरची डिझाईनर हेड होती. ती ही शेवटी एका मॉडेल बरोबर स्टेजवर आली.

शिवीन मॅन्स वेअरचा डिजाईनर हेड होता. तो काही वेळ अगोदरच बॅक स्टेज गेला कारण त्याला रिचाला काही सांगायचे होते. पण रिचाला त्याच्याशी बोलायला वेळ नव्हता. तो तास भर थांबला. त्याची स्टेजवर जायची वेळ आली तेंव्हा रिचा त्याचे कपडे व्यवस्थित करायला त्याच्या जवळ आली तेंव्हा शिवीन रिचाला हळूच कानात म्हणाला.

शिवीन,“तुझ्यासाठी आज मी सरप्राईज प्लॅन केलाय.”

तिने डोळ्यानेच विचारले कसले? तो काही बोलणार तो पर्यंत त्याची स्टेजवर जाण्याची बारी आली तो स्टेजवर गेला.इकडे आता रिचा बॅक स्टेज एकटीच होती कारण हा इव्हेंटचा शेवटचा टप्पा होता व जवळजवळ सगळे लोक समोर जाऊन बसले होते.

हाच चान्स आहे म्हणून सुधीर जो रिचावर लक्ष ठेवून होता त्याने पक्याला मिस्स कॉल दिला. पक्या जो त्याच्या माणसां सह बॅक स्टेजच्या आसपास होता.त्याला सिग्नल मिळताच तो बॅक स्टेज गेला व रिचा जी स्टँड वरील कपडे व्यवस्थित करण्यात मग्न होती तिला मागून क्लोरोफॉर्मचा रूमाल तिच्या नाकाला लावला.रिचा तिला काही कळायच्या आतच बेशुद्ध झाली. पण तिच्या धक्क्याने कपड्याचे स्टँड पडले.

पक्याने व त्याच्या माणसांनी रिचाला एका गादीत गुंडाळले व पक्या बाहेर कोण नाही ना हे पाहायला गेला तर मागच्या गेटवर एक सुक्युरिटी गार्ड व दोन पोलीस कॉन्स्टेबल होते. सुक्युरिटी खरं तर सुधीरकडे होती.त्याने मुद्दामहून मागे सुक्युरिटी ठेवली नव्हती पण शिवीनच्या जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा त्याने मागच्या गेटवर सुक्युरिटीला माणसे पाठवली. पक्याने तिथे पोलीस आणि सिक्युरिटी गार्ड पाहिले. तो आत आला व त्याच्या चार माणसांना मेन गेट समोर भांडणाचे नाटक करायला सांगितले. त्या प्रमाणे ते मेन गेटवर गोंधळ करू लागले. तो गोंधळ ऐकून मागच्या गेटवरील पोलीस व गार्ड ही तिकडे गेले. त्याचाच फायदा घेऊन पक्याने रिचाला समोर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीत ठेवले व ते निघले.पक्याने सुधीर व कायाला done असा मेसेज पाठवला.

इकडे शिवीन रिचा बराच वेळ दिसली नाही म्हणून तिला शोधत होता. कार्यक्रम तसा पूर्ण झाला होता व लोक हळूहळू जात होते.तेवढ्यातच Mr माने व Mr स्मिथ ही निघले तेंव्हा शिवीनला रिचाला शोधायचे सोडून त्यांना निरोप देणे भाग पाडले त्यात आणखीन वेळ गेला.कायाने व शिवीनने त्यांना निरोप दिला.

शिवीन परत आला व त्याने रिचाला फोन केला पण ती फोन उचलत नव्हती. म्हणून तो तिला शोधायला बॅक स्टेज गेला. तर रिचाचा मोबाईल त्याला खाली पडलेला दिसला व कपड्याचे स्टँड ही अस्ताव्यस्त पडलेले आढळले. रिचा तर पत्ताच नव्हता. त्याच्या मनात ना ना शंका येऊ लागल्या तेव्हढ्यात रिचाचे आई-वडील व शिवीनचे आई-वडील रिचाला शोधत तेथे आले. तिथली स्थिती पाहून त्यांना ही धक्का बसला.रिचा किडण्याप झाली हे त्यांना कळले. शिवीनचे डॅड त्यालाच ओरडू लागले की तुला रिचाची काळजी घेता नाही आली पण रिचाच्या वडिलांनी त्यांना समजावले. तिथे सिक्युरिटी साठी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस इंस्पेक्टरला बोलावण्यात आले. त्याने पंचनामा केला व रिचाचा शोध घ्यायला सुरुवात केली.इंस्पेक्टरने रिचाच्या वडिलांना ही जर खंडणी साठी फोन आला तर फोन करणाऱ्याला बोलण्यात गुंतवून ठेवा म्हणजे त्यांचे लोकेशन आपल्याला स्कॅन करता येईल अशी सूचना दिली. इथून निघलेल्या सगळ्या गाड्या चेक करा अशा सूचना केल्या. रिचाची आई रडू लागली.

काया व सुधीर ही त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे असे वागत होते. त्यांनी सगळ्यांना धीर द्यायचे नाटक केले. शिवीन मात्र वेगळ्याच विचारात होता. तो त्याच्या डॅडला व रिचाच्या वडिलांना म्हणाला की आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. असे म्हणून त्यांना गाडीत बसवले. काया आणि सुधीर आता आश्वस्थ झाले व ते ही निघून गेले. इकडे शिवीनने पोलीस स्टेशनकडे गाडी न नेता पोलीस कमिशनर च्या घरी गाडी नेली.

K.t,“ शिवीन आपण इथे का आलोय? मी कमिशनर साहेबांना सगळी माहिती दिलीय मग इथे परत कशाला आलो?” ते म्हणाले.

शिवीन,“डॅड चला तर सांगतो का आलोय आपण इथे ते!” असं म्हणून ते सगळे घरात गेले.

कमिशनर त्यांचीच वाट पाहत होते. शिवीनने त्यांना मेसेज पाठवला होता. कमिशनरच्या मुलीच्या लग्नाचे सगळे कपडे शिवीन आणि रिचाचे डिजाईन केले होते. त्यामुळे कमिशनर त्याला चांगलं ओळखत होते.कमिशनर त्यांना पाहून म्हणाले.

कमिशनर, “ please come and site”असं म्हणून त्यांनी सोप्याकडे बोट केले.

शिवीन,“sorry sir for bothering you but its very important”शिवीन नम्रतेने म्हणाला.

कमिशनर,“no shivin , don’t be sorry. its my duty. ते म्हणाले.

शिवीन, “सर मला माहित आहे की रिचा कुठे असणार आहे मी ते सांगू शकतो पण तिच्या पर्यंत पोहचण्यासाठी मला तुमची मदत हवी. काही दिवसा पूर्वी मी रिचाला एक घड्याळ गिफ्ट केले होते त्यात G. P. S. ट्रॅकर आहे आणि ते घड्याळ रिचाच्या कायम वापरात होते. आज ही तिने ते घड्याळ घातले आहे. मी तिला ते तिच्या सुरक्षिततेसाठीच दिले होते. ते घड्याळ माझ्या मोबाईल मधील अँपशी कनेक्टेड आहे. मी हे सगळं ऑडिटोरीअममध्ये किंवा पोलीस स्टेशन मध्ये ही बोलू शतक नव्हतो कारण किडण्यापर्सची माणसे पाळातीवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी डायरेक्ट तुमच्या कडे आलो आहे. ट्रॅकर नुसार ते आता मुंबईच्या बाहेर पडले आहेत. आपण किडण्यापर्सना पकडून रिचाला सोडवू शकतो.” तो हे सगळं एका दमात बोलला.

कमिशनर साहेबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतले व ते म्हणाले

कमिशनर,“ oh! That’s brilliant.मी आताच एक तुकडी बोलावतो आपण रिचाला शोधून काढू.”असे म्हणून ते फोन करायला गेले.

रिचाची आई इकडे नुसती रडत होती.शिवीन तिच्या जवळ बसला व तिला पाण्याचा ग्लास देत म्हणाला.

शिवीन,“ आंटी तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना(रिचाच्या आईने होकारार्थी मान हलवली) मग मी रिचाला सुखरूप घेऊन येणार I promise you that.”

असं म्हणून तो कमिशनर साहेबां बरोबर गेला.

शिवीन रिचाला सोडवू शकेल? काया आणि सुधीर कुठे गायब झाले?पक्याने रिचाला कोठे नेले असेल?

क्रमशः

(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किडण्याप , लागजा गले, ... आणि हाईट म्हणजे.. I am promise you that !

प्लीजच...ह्या चुका सुधारता आल्या तर पाहा!
Mr माने व Mr स्मिथ.. हे कोण महत्त्वाचे एव्हढे ? Lol

@नौटंकी
@नानबा
@ cuty
धन्यवाद,पुढील भाग लवकरच

@आंबट गोड
का काय ते! जर तुम्हाला Mr माने आणि Mr स्मिथ कोण आहेत हेच माहीत नाही तर तुम्हाला माझ्या कथेवर प्रतिसाद देण्याचा काहीच अधिकार नाही. उगाच आपलं टाईम जात नाही म्हणून दुसरीच्या चुका काढून हसायचे ;दात दाखवाचे !उगीच स्वतःचे नसलेले ज्ञान पाजळायचे जर माझ्या (अशुद्ध)लेखनाचा त्रास होत असेल तर कशाला वाचता? वाचू नका.
Wink

@सस्मित
किती हुशार नां तुम्ही !तरी विचार करते ज्ञानी,महा- ज्ञानी तुम्ही कोठे होतात आता कसं छान वाटले!
Happy

Lol I knew it

@सस्मित
काळजी करू नका हो!मी जर पुस्तक पब्लिश करायचे ठरवले ना तर एडिटिंगसाठी तुमच्या सारख्या ज्ञानी लोकांकडेच येईन हो!
Wink

Uhoh
@ स्वामिनी, मागच्या भागातही मी तुम्हाला शुद्धलेखनाकडे लक्ष द्याल का? विचारले किंवा द्या असे सांगितले असेल.

आज कमेंट देणार नव्हते कारण आंगो यांनी तुम्हाला सांगितले होते. तुम्ही दिलेली उत्तरे पाहता तुम्हाला इथुनपुढे कोणतीही सुचना न करणेच उत्तम राहील असे वाटते. असो.

पुलेशु Happy

@ मन्या ss
तुमच्या सूचना मी पाहून माझ्या पोस्ट इडीट केल्या होत्या आणि मला सांगा माझ्या कथेतील पात्रच ज्याला माहीत नाहीत त्याने मला सूचना का कराव्यात! आणि अंगोच म्हणाल तर त्यांचे माझ्यावर मी मा. बो. वर दाखल झाल्या पासून खूप प्रेम आहे ते असे सतत दिसत असते

तुम्ही दिलेली उत्तरे पाहता तुम्हाला इथुनपुढे कोणतीही सुचना न करणेच उत्तम राहील असे वाटते.>>>>>>>>>>आणी लेखन न वाचणे पण उत्तम राहिल असं मला वाटतंय.

अशा खोचक वाटणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन त्यांनी दिलेल्या सुचनांकडे फक्त लक्ष द्या. वाद टाळा. छान लिहिताय फक्त शुद्धलेखनाकडे थोडस लक्ष द्या. Happy

@मन्या s s
धन्यवाद, तुमच्या सारखे खूप कमी वाचक आहेत. बाकी काय कधी कोण चुकतोय आणि कधी त्याची फजिती करता येईल हेच पाहणारे जास्त तुमच्या सूचना लक्षात ठेवेन आणि मी इथे पोस्ट करते कारण मी माझ्या लिखाना विषयी सजग रहावी म्हणून तसेच इतर ठिकाणी मिळणाऱ्या प्रतिसादाचे वारे डोक्यात जाऊ नये. मी इथे पोस्ट केले की हवेतून जमिनीवर येते
Happy
__/\__