जेवल्यानन्तर काय गोड खावे?

Submitted by अथेना on 25 February, 2020 - 15:33

मी प्रचन्ड गोडखाऊ आहे. रोजच्या जेवणानन्तर काहितरी गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. आज मटण करीचे जेवण झाल्यावर काय खावे असा प्रश्न पडला.. आईसस्क्रिम होते, पण मटणासोबत कॉम्बो जमत नव्हता..तुमचे आहेत का असे काही ठराविक कॉम्बो? आवडणारे आणि नावडणारे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तिरमीसुच्या बेसवर गुलाबजाम ठेउन त्यावर कलुआची धार चांगला एक थर येइस्तोवर सोडा. फिनिश विथ स्विट कार्डमम वर्मिचेलि टॉपिंग... Happy

चिकन मटणाबाबत मुसलमान लोक्स काय गोड खातात हे बघावे. शेवयाची खीर वा शेवया घातलेला केशर फालूदा हे माझे फेव्हरेट. नाहीतर सरळ एखादे अफलातून खावे. जास्त गोडाची आवड न्सल्यास खजूर चघळावे.

प्रॉब्लेम होतो ते मासे खाल्यावर काय गोड खावे. मी माझ्यस्पुरता हा प्रश्न सोडवला आहे. कोलंबीचेच गोड लोणचे खावे चमचाभर. आत्मा तृप्त !

बाकी शाकाहारावर गोड नसले तरी चालते. वाटीभर गोडे वरण प्यावे. आठवडाभर गोड खायची ईच्छा मरून जाते.

मला माहित नाही पण अश्याच सवयी कायम लागल्या व मी कायम असेच खाते,

शाकाहारी जेवणानंतर:
कधीही डार्क चॉकलेटचे एक पाकिट, गरम गुजा, गरम गा.ह. बरोबर आईसक्रीम. गरम जलीबी-मठठा असे काहितरी गरम लागते.
मटणः गारेगार रसमलाई, शेवयाची भरपूर सुका मेवा , केवडा पाणी घातलेली आटीव घट्ट खीर थंड , सर्वच बंगाली मिठाई पण खास करून चमचम मला खुपच आवडते मटण खाल्य्यावर..

चिकन खाल्ल्यावरः पिस्ता कुल्फी फक्त नेहमीच.
मासे खाल्ल्य्यवर प्रश्ण पडतो खरा काय खावे? दुधाचे पदार्थ नाही खाउ शकत ना मग चॉकलेट केक विथ चॉकलेट गरम सीरप.

वैज्ञानिक नजरेने , माझ्या जेवणानंतरच्या अश्या सवयी तश्या बर्‍याच पोषणमुल्य कमतरता दाखवतात... Wink Proud

आम्ही कोकणची माणसं साधी भोळी
जेवल्यावर खातो आंबा पोळी Happy

एकदा आंब्याचा सीजन सुरु झाला की जेवणात गोड काय हा प्रश्न दोन तीन महिन्यांसाठी सुटतो. आंबे कापायचे रोजच. वाटल्यास आठवड्यातून एखादा दिवस काहीतरी वेगळे. पण आंब्याची गोडी अवीट असते. रोज पोटभर जेवल्यावरही पोटभर आंबे खाल्ले जातात आणि कधी बोअर होत नाही. उगाच राजा म्हणत नाहीत.

रात्रीच्या जेवणात शेवटची चतकोर पोळी , तूप + गूळ किन्वा केळ्याचा छोटा तुकडा + तूप असा खाण्याची सवय होउन गेली आहे आता.
आणि जेवणात गोड पक्वान्न असेल तर छोटी वाटी अगदी शेवटी , हात धून झाल्यावर हळू हळू गप्पा मारत खावी अशी लकब आहे माझी !

खरं म्हणजे पोटभर जेवण झाल्यावर शिवाय आणखी गोड खाऊ नये. जेवतानाच काय ते खायचं. एखादवेळेस ठीक आहे अर्थात. उदा. दक्षिण भारतीय नाश्त्यानंतर फिल्टर कॉफी Happy

यु प्लीज चेक युअ शुग फस्ट. सॉरी टू बी पार्टी पूपर. पण कृपया साखर चेक करून घ्या रक्तातली. भल्यासाठीच सांगते आहे. लाइ क इट युज्ड टु बी इन ओल्ड मायबोली. चिडू नका प्लीज.

मटना नंतर ना. हैद्राबाद कडे बिर्या णी नंतर व्हॅनिला आइसक्रीम खातात. करी रोटी नंतर खुबानी का मीठा/ डबल का मीठा. मस्त लागेल.
पण नॉनव्हेज नंतर गोड जमत नाही मीठा पान फिट होइल बहुतेक.

आमच्या इथे गुज्जु मस्त हलवाई आहे. त्याचे तिखट पदार्थ पण साखर घालून असतात. तर त्याकडेचे माझे फेवरिट लिहीते.

एक तुकडा खोबरा बर्फी
अर्धी पुपो भाजुन तुपावर
पेढा केसर पेढा पाच प्रकारचे पेढे विकतो तो.
तिरामिसू मला कधी पण चालते. केक के लिये हम कुच्च भी करेंगे टाइप्स.
साधा केक. वर क्रीम
बेस्ट म्हणजे दही साखर व साय साखर.
अमूलची साय डब्बा एक बिग बास्के ट वर मिळतो त्यातून हवी तेव्ढी घ्यायची. साखर घालून फेटायची व खायची.
हौस असेल तर एक थेंब व्हेनिला एक्स्ट्रॅक्ट, किंवा हर्शीज चॉको लेट स्प्रेड एक लपका
साधे ब्रिटानिआ क्रॅकरस घेउन त्यावर हेच.
वरून कॉफी पेरायची थोडी. ( गरीबाचे घरगुती तिरामिसू)

बिग बास्केट वर एक ममान ब्रँडचा इंपोर्टेड फ्रेंच मार्मलेड मिळतो. तो एक चमचा लै भारी.

अमा... काढा ना धागा!
अ‍ॅक्च्युअली पोटभर जेवण झाल्यावरही माणसाला गोड खाण्याची इच्छा का होत असेल बरे ? सिरीयसलीविचारतेय.
मी जे घरात असेल ते खाते.

मला गोड खाणे अलाउडच नाही. पण गोळ्या घेउन गोड खात असते चमचा भर. एक म्हणजे हपिसात. कोणाला मुलगा झाला कोणी बाळ दहावी पास झाले तर कंपनी भर गोड वाटायची प्रथा आहे. तर कधी डब्यात उलीसे गोड नसे ल आणले तरी कोणीतरी मिठाई डब्बा घेउन येते त्यातले मस्त बर्फी नायतर पेढे दोन उचलायचे. एक आत्ता खायला एक लंच नंतर.

तसेच फुलपाखरी ज्युनीअर पब्लिक उत्साही असते ते वाढदिवसाला छोटी चॉकोलेटे घेउन येतात. त्यांना भर घोस आशिर्वाद देउन ते चॉकोलेट खणात टाकते टेबलाच्या. आज असेच एक पर्क सापडले बारके दोन घासाचे. म्हणून इथे पोस्टले. कधी कधी जेवायला वेळ होत नाही तेव्हा असे चॉको ले ट उपयोगी ठरते.

काय नाय तर सुका मेवा!!!

गोड मुळात प्रमाणात खावे, न खाल्ल्यास उत्तम. जेवताना खायचे असेलच तर जेवणाच्या सुरवातीला खावे असे आयुर्वेद सांगतो.

गोड खाल्ल्यावर पोट भरल्याची भावना होते. आधी पोट भरून जेवल्यानंतर वर गोड खाल्ले तर पोटाला तडस लागल्यासारखे वाटू शकते. जेवणाच्या सुरवातीस गोड खाल्ले तर पुढचे जेवण कमी खाल्ले जाऊन नंतर होणारा त्रास आपण टाळू शकतो.

बाकी वर जे वेगवेगळे गोड पदार्थ लोकांनी वर्णन केलेय ते रोज थोडे थोडे खायला मला प्रचंड आवडेल.

मी शुगर अ‍ॅडिक्ष्न कमी कसे करावे असा धागा काढणार होते पिडायला तर हाच आला नेमका>>>

मला चॉकलेटचे प्रचंड अडिक्शन आहे. ते कमी करणे/टाळणे यासाठी घरात/पर्समध्ये चॉकलेट न ठेवणे हा उपाय मी करते. नाहीतर फक्त चॉकलेट खाते इतर काही खात नाही. पर्वा गावाहून येताना अमूलचे डार्क चॉकलेट घेऊन फक्त तेच मटकावले Happy Happy ट्रेनमधले जेवण टाळले.

मी तर चहादेखिल बिनसाखरेचा पीते. कोणी ईतके गोड पदार्थ रोज कसे काय खाऊ शकतात असे वाटते अन त्याहुन तर जेवणानंतर रोज गोड खाऊन देखिल कोणाचे वजन आटोक्यात कसे राहील असा ही प्रश्न पडतो.

चहा बिन साखरेचा पिण्याचा तोच फयदा ना.. म्हणजे मग इतर थोडं गोड खाल्लेलं चालतं. >>. जर जेवणात भात किंवा भाकरी असेल तर शरीराला पुरेसी साखर त्यातुन मिळते, शिवाय फळेही असतात म्हणुन असे प्रश्न पडतात मला

मला तर चहातली साखर कमी / बंद केल्यानंतर चहाचा खरा स्वाद सापडला ! कित्येक पक्वान्नांचा खरा स्वाद अती गोडीमुळे आपल्याला कळतच नाही !

प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. एकाला गोडाचा त्रास होतो म्हणून सरसकट सगळ्यांनीच जास्त गोड खाऊ नये म्हणण्याला अर्थ नाही. शर्करा म्हणजे काही अल्कोहोल नाही जे सरसकट त्याला वाह्यात ठरवावे.

लोकं रोज एकाच चवीचा आणि पोषणमूल्यांचा भात आणि चपाती जेवणात रोजच्या रोज खातात तर रोज गोड खाण्यासही हरकत नाही.

तरुणांनी तर रोज जेवल्यावर तोंड गोड करावे !

ऋन्मेऽऽष - कोणी काय खावे अन काय नाही हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझ्या मनातले लिहीले, कोणाला काही सुचना दिल्या नाहीत.

रोजच्या जेवणानंतर गोड खाण्याची ईच्छा का होत असेल . हा मला प्रश्न पडलाय. कधी मधी ईच्छा होणे ठीक आहे . पण रोज ? तुमच्या घरी अशीच पद्धत आहे का ? रोजच्या जेवणानंतर काही गोड पाहिजेच अशी ?

घरात काही गोड केले/ आणले तर ते उरतच नाही इतके गोड खायला आवडते.त्यामुळे बर्फी/ पेढा/कॅडबरी यांचा एकच तुकडा रोज खाणार्‍या लोकांप्रती आदर आहे.ट्रेनमधेही डबी काढून एकच खजूर किंवा एकच जर्दाळू खाणारी जमातही त्यातलीच होय.
चहा बिनासाखरेचा असतो.पण बाकी कसर मिठाया,अगदीच नाही तर गूळचणे खाऊन भरली जाते.आज हा धागा वाचताना घरात काय गोड आहे ते आठवून पाहिले.शेवटी द्राक्षे खाल्ली.अरे हो!श्रीखंड आहे की फ्रीजमधे.आता रात्री खाईन.

कोणे एकेकाळी अजिबात गोड आवडायचे नाही.आता मात्र बकासूर होतो.

ज्यांना खरोखर 'आता गोड

ज्यांना खरोखर 'आता गोड पाहिजेच' अशी तल्लफ रोज किंवा वारंवार येते त्यांनी आपल्या स्लीप क्वालिटीवर लक्ष ठेऊन राहिल्यास काही ऊत्तरे सापडून मदत होऊ शकेल. (अर्थात गोडाचे ईतर दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत आणि ते टाळण्यासाठी मदत हवी असली तरच हे लागू आहे. ईन्जॉयमेंट म्हणून खात असल्यास कृपया प्रतिसाद ईग्नोर करा.)

बदललेला स्लीप पॅटर्न, जागरणे, जास्त टीवी ई. मुळे झोप अ‍ॅफेक्ट झाली असल्यास त्याचे एक पर्यावसान गोडाचे क्रेविंग्ज होण्यात होते आणि जेवढे जास्त गोड आहारात (खासकरून झोपेच्या आधी) तेवढी झोप अजून निगेटिवली अ‍ॅफेक्ट होते.. ही विशिअस सायकल आहे.

सगळेच ऑपशन्स मस्त आहेत! मटणानन्तर मीठा पान चा पर्याय चान्गला वाटतोय..

बाकी वर जे वेगवेगळे गोड पदार्थ लोकांनी वर्णन केलेय ते रोज थोडे थोडे खायला मला प्रचंड आवडेल. -> ++१

@ मी अश्विनी - तुमचे म्हणणे पटतेय..स्लीप क्वालिटी नक्कीच बिघडलीये सध्या..

हे मासे खाल्ल्यानंतर खीर / दूध नको का म्हणतायत सगळे... आमच्या इथे तर सर्रास खातो आम्ही... -> मासे आणि दूध विरोधान्न समजले जाते. मी सुद्धा टाळते.

कित्येक पक्वान्नांचा खरा स्वाद अती गोडीमुळे आपल्याला कळतच नाही ! -> +१ मलाही मिठ्ठ गोड पदार्थ आवडत नाहीत रसगुल्ला, काला जामुन किन्वा मिल्क चॉकलेट वगैरे...

यु प्लीज चेक युअ शुग फस्ट. -> @अमा अजिबात चिडण्यासारखे नाही. घरात डायबेटीस वाले भरपूर आहेत. सो वॉच नेहेमीच ठेवावा लागतो. पण तोन्डात गोड टाकल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही..पण नक्कीच कन्ट्रोल करेन.

एकदम गोग्गोड धागा, मला गोड खाण्याची विशेष आवड नाही, कधीतरी खातो. पण मी रोज चिक्की खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. चिक्की नाही तर गजक पण चालते Happy

बिग बास्केट वर एक ममान ब्रँडचा इंपोर्टेड फ्रेंच मार्मलेड मिळतो>> बॉन मामान चे जॅम एक नंबर असतात. 100 ग्रामला 50 ग्राम रिअल फ्रुट असे काहीतरी प्रमाण असते त्यांचे. वाईल्ड ब्लुबेरी तर अफलातून आहे. एकदा ओपन केले की 15 दिवसात संपवा अशी सूचना असते नंतर ते आंबते. इथे पुण्यात दोराबजी कडे बक्कळ व्हरायटी आहे बॉनची जॅम सेक्शनला. रु. 450 ला 370 ग्राम. अशीच Mackay's preserve ची पण भारी व्हरायटी आहे त्यांच्याकडे.

खरं तर डार्क चॉकलेट हे स्वीट मध्ये गणले जाऊ नये (जर कोको ७५% च्या वर असेल तर आणि खाली असेल तर ते डार्क चॉकलेट नाही असे माझे प्रांजळ मत) कारण त्यात स्वीटनेस फार कमीच असतो.

पण चॉकलेट मध्ये डार्क चॉकलेट खाण्याची मजा काही औरच. कधी कधी स्वीट कॅडबरी खाण्यात तेवढी मजा नाही येत जेवढी डार्क चॉकलेट खाण्यात येते.

ऋन्मेऽऽष - कोणी काय खावे अन काय नाही हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझ्या मनातले लिहीले, कोणाला काही सुचना दिल्या नाहीत.
Submitted by VB on 26 February, 2020 - 16:57

>>>>

व्हीबी या धाग्यावर ज्यांनी गोड खाण्याचे दुष्परीणाम दाखवले त्यांना मी काहीच बोलत नाहीये. मला खरे तर मौज वाटली. याच मायबोलीबर एक धागा होता. दारू कशी प्याबी. तिथे मी दारूचे दुष्परीणाम दाखवताच माझ्यावर धागा भरकटवतो म्हणून सडकून टिका झाली. मी त्या टिकेला दाद दिली नाही ही गोष्ट वेगळी. पण आज हा धागा निघाला. गोड काय खावे? आणि यावर गोड खाण्याचे दुष्परीणाम दाखवणारया पोस्ट मात्र धागा भरकटवणारया नसून काळजीवाहू होत्या. वाह खुदा ए मायबोली, अजब गजब तेरा ईन्साफ का तराजू ..
येनी वेज, लेट्स ईनफ धिस अवांतर पोस्टस ..
आजचा गोड मेनू - आईसक्रीम ईन डिफर्ंट फ्लेवर्स.. फोटो लवकरच खालच्या पोस्टमध्ये Happy

तुमच्या घरी अशीच पद्धत आहे का ? रोजच्या जेवणानंतर काही गोड पाहिजेच अशी ? -> @सुजा, नाही हो, पद्धत अशी काही नाही.. आवड म्हणून खाते मी..

पान खाल्ल्याशिवाय माझे सामिष भोजन पूर्ण होत नाही, पण मी साधे चटणी पान खातो.. कलकत्ता पान+चुना+काथ+काश्मिरी सुगंध+ मिनाक्षी किंवा बाबा चटणी+ हरी पत्ती (ज्येष्ठमधासारख्या चवीची बारीक पाने, दिसायला चिंचेच्या पानासारखी)+ वेलची (असल्यास फोडून, नसल्यास बाबा इलायची)+ अस्मान तारा (menthol)+ थोडीशी बडीशेप+ चिकणी सुपारी (नसल्यास भाजकी सुपारी). हे पान हलकेसे गोड लागते (चटणी व बडीशेपेमुळे), मसाला किंवा मिठा पान हे अस्सल पान नव्हेच..

Pages