मोबाईल मधील अगोदरच स्थापित केलेले अॅप...

Submitted by आर्यन वाळुंज on 15 February, 2020 - 11:37

नमस्कार मंडळी!
माझ्या गरिबाचा बारा हजार रुपयांना घेतलेला स्मार्ट फोन आहे. तर झालंय असं की मी बऱ्याच वर्षांपासून युसी ब्राऊझर वापरतो. युसी ब्राऊझर गुगल क्रोम पेक्षा कमी डाटा खर्च करतं असं मला वाटतं. तरीही गुगल क्रोम मी वापरत होतो. पण ते व्यवस्थित चालत नव्हते. अपडेट करुन देखील व्यवस्थित चालत नव्हतं, म्हणून मी ते सेटिंग मध्ये जाऊन डिसेबल केले आहे.
तरीही दर काही मिनिटांनी ते आपोआप उघडतं आणि एनेबल करा असा संदेश येतो. चालू काम बंद पडते. पुन्हा बॅक की दाबून क्रोम हटवावे लागते.
हं आठवलं क्रोममधील की बोर्ड आपोआपच गायब होत होता. कुठेही सेटिंग न बदलता. म्हणून कंटाळून मी ते डिसेबल केले होते.
माझा फोन अगदी छान आहे व नवीन घ्यायला काही कारण नाही. तेव्हा क्रोम करत असलेल्या हटवादी पणाला लगाम कसा घालायचा?
अशी फॅक्टरी इन्स्टॉल्ड अॅपस् कायमची अन् इनस्टॉल करता येतात का? कृपया मार्गदर्शन करा ही विनंती.
धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

ॲपच्या सेटिंग ला जाऊन फोर्स स्टाॅप करा. त्या ॲप चे सगळे अपडेट अनइन्स्टाॅल करा.
मी असेच करतो.
दुसरा उपाय, फोन मधे App Zip चे सेटिंग असते. तसे केल्यास ते ॲप zip होउन त्रास देत नाही.

Screenshot_20200215-222244_Storage booster.jpgScreenshot_20200215-222105_One UI Home.jpg

UC browser फाईल डाउनलोडसाठी चांगला आहे. ज्या गूगलच्या अन्ड्राइड ओएसवर फोन चालतो त्यांचाच क्रोम ब्राउजर आहे। त्याला डावलून कसे चालेल?

बाकी तुमचा प्रश्न आणि पाफांचे उत्तर आवडले. Apps च्या एपीके फाईल बनवून बाहेर काढण्याचा पर्याय वाचला होता पण पुन्हा इन्सटॉल करताना सिक्युरटीशी खेळ होतो.( ओफ करावे लागते.)
कुठे लॉगिन करायचे तर माइक्रोसॉफ्ट एज ब्राउजर किंवा फायरफॉक्स वापरतो.

फोर्स स्टॉप व अपडेट अन् इन्स्टॉल करुन उपयोग होत नाही, कलर ओएस मध्ये झीपचा पर्यायच नाही.

गुगल क्रोम सारखं सारखं अॉन होतंय आणि सेटिंग बदलून अॅप सुरू करा असा संदेश देत आहे. फोर्स स्टॉप व अपडेट काढून देखील फरक पडत नाही.
हॅक वगैरे तर झाले नसेल ना अशी शंका येते.
प्लीज कुणाला माहिती असेल तर सांगण्याची कृपा करा. धन्यवाद.

सेटिंग्जमध्ये * sync across devices - off करा
नोटिफिकेशन्स - off करा.
-----
क्रोम जाणार नाही हे नक्की झालंय तर त्याला तुम्ही टाळताय हे जाणवून न देणे एवढेच करता येईल.
एखादा न्यूजपेपर बुकमार्क करून ( app नको) अधूनमधून उघडा. यातून प्रॉब्लेम सुटेल बहुतेक.
-------------
शिवाय कुठेतरी " set chrome ( किंवा UC ब्राउजर ) as default browser असं दिसलं तर तेही काढा.

धन्यवाद एस आर डी जी.
माबोवर कुठलाही पुर्वग्रह/ आकस मनात न ठेवता जे मदतीला धावून जातात त्यांत तुमचा नंबर पहिला आहे.

कोणतीही गोष्ट माहीत नसली तर आपण गूगल सर्चवर पोहोचतो. ढिगाने how to समोर येतात इंग्रजीत. हिंदीतही थोडे येतात. इंग्रजीवाले स्वतःच्या वेबसाईट काढूनही काम करतात. मराठीसाठी आपली मायबोली . आहे त्याच वेबसाईटचा उपयोग करून प्रत्येकाने त्याच्याकडचे इथे देऊन काम साधता येईल. काही चुकले तर कुणी रिपेर करेलही.