घरगुती काल्पनिक साहित्यप्रकार - १

Submitted by ॲमी on 12 February, 2020 - 04:30

स्त्रियांनी, स्त्रियांसाठी, स्त्रियांबद्दल लिहलेल्या कथा-कादंबरींना घरगुती काल्पनिक (Domestic Fiction) या साहित्यप्रकारात गणले जाते.
यालाच घरगुती वास्तववादी किंवा भावनातिरेकी काल्पनिक किंवा स्त्रियांचे काल्पनिक असेदेखील म्हणतात.

१८२० ते १८७० या काळात मध्यमवर्गातील गोऱ्या स्त्रियांमधे हा साहित्यप्रकार फार लोकप्रिय झाला होता. इतका की द स्कार्लेट लेटरच्या सुप्रसिद्ध लेखकाने त्याच्या प्रकाशकाला पत्र लिहले होते "a damned mob of scribbling women मुळे माझी पुस्तकं कमी खपतायत". Lol Lol

कॅथरीन सेज्विकच्या New-England Tale (1822) या कादंबरीने या प्रकाराची सुरवात झाली असे समजले जाते. अठराव्या शतकात ज्या भावनातिरेकी काल्पनिक कथा लिहल्या जायच्या उदा The Man of Feeling (1771), The Vicar of Wakefield (1766), The Power of Sympathy (1789), त्यांचीच पुढील आवृत्ती म्हणजे या स्त्रीकथा म्हणता येईल. मनुष्यस्वभाव हा मूलतः चांगलाच असतो; भावना जर सच्च्या असतील तर त्यातून मिळणारे बळ तुम्हाला योग्य आचरण करायला भाग पाडते या विश्वासावर या कादंबर्याचे कथानक बेतलेले असायचे. कॅल्व्हनिस्ट सिद्धांताच्या विरोधी प्रतिक्रिया म्हणून या कथा लिहल्या गेल्या असेदेखील काहीजण मानतात.

दिवसभरातल्या घरगुती कामकाजातून किंवा त्या पार्श्वभूमीवर घडू शकतील अशा घटनांमधून, पौगंडवय-मध्यमवर्ग-गौरवर्ण असलेल्या नायिकेचा 'परिपूर्ण स्त्री' बनण्याकडे होणारा प्रवास दाखवणे हा या साहित्याचा मूळ ढाचा असायचा. स्वतःला सांस्कृतिकदृष्ट्या वरचढ समजणाऱ्या समाजाच्या, आपल्या स्त्रियांनी कुठे कसे वागावे याबद्दल ज्या अपेक्षा त्याकाळी असायच्या, त्या कोवळ्या मुलींवर बिंबवण्यासाठी या साहित्यप्रकाराचा वापर केला गेला. एकोणीसाव्या शतकातील सांस्कृतिक आदर्श जपणारी, प्रोटेस्टन्ट ख्रिश्चन मूल्यं असलेली, विशुद्ध-धार्मिक-घरेलु-लीनता वगैरे गुण असलेली, खरी आदर्श स्त्री (Cult of True Womanhood) घडवण्यासाठी हे साहित्य लिहले गेले.
===

या साहित्यप्रकाराचा सखोल अभ्यास समिक्षक नीना बायम हिने सर्वप्रथम केला. तिच्या मते या कथानकांचा ढाचा साधारण असा असतो
• नायिका तरुण मुलगी असते.
• आपल्या जीवनावश्यक गरजा आयुष्यभर पुरवणारे काहीतरी/कोणीतरी आहे या भरवशावर ती असते; तिने हे असे अध्याहृत धरणे बरोबर असते की चूक हा वेगळा मुद्दा. पण अचानक तो पुरवठा बंद होतो.
• त्यामुळे तिला या गरजा भागवण्याचा मार्ग स्वतःच शोधावा लागतो.
• आतापर्यंतचे आयुष्य घरात, सुरक्षित वातावरणातच घालवले असल्याने, बाहेरजगाचे टक्केटोपणे कधीच खाल्ले नसल्याने, सुरवातीला ती फारशी गंभीर नसते. एकतर 'स्व' नसतोच किंवा जागा झालेला, दुखावलेला नसतो. हे अक्खे जग आपले लाड करायला, आपल्याला सुरक्षित ठेवायलाच निर्माण झाले आहे किंवा अस्तित्वात आहे असा काहीतरी तिचा भ्रम असतो.
• तिच्या अपेक्षा अगदीच अवास्तव असतात असेदेखील म्हणता येत नाही, पण त्या गृहीत धरलेल्या असतात.
• पण तिथे अपेक्षाभंग झाल्यावर तिचा स्व जागृत होतो. आपला मार्ग आपणच शोधावा लागणार आहे हे तिला कळतं.
• कथेच्या शेवटी ती एक स्व-मूल्य जाणणारी परिपूर्ण स्त्री बनलेली असते. त्यामुळे ती स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा सतत उंचावत नेते, त्या पूर्णदेखील करते. तिच्यातील हा बदल पाहून जगाचा तिच्याविषयीचा दृष्टिकोनदेखील बदलतो. आधी जे तिला नाकारले गेले होते ते आता तिला न मागता मिळते.

बायमच्या मते कथा दोन वेगवेगळ्या प्रकारची असू शकते.
• एका प्रकारात नायिका गरीब, मैत्र नसलेली असते. ती शक्यतो अनाथ असते, किंवा आपण अनाथ आहे अशा समजुतीत असते, किंवा पालकांपासून बराच काळ दूर झालेली असते.
• दुसर्यात नायिका आधी लाडकोडाची श्रीमंत असते पण पौगंड वयाची झाल्यावर पालकांच्या मृत्यूमुळे किंवा त्यांच्या आर्थिक डबघाईमुळे हीदेखील गरीब, मैत्र नसलेली होते.
===

या साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये साधारण अशी होती:
१. नायिका एकतर देवदूत असेल नाहीतर व्यवहारचतुर स्त्री असेल किंवा दोन्ही असेल.
२. तिच्या अगदी विरुद्ध गुणांची दुसरी एक स्त्री असेल (शक्यतो नायिकेची आई किंवा एखादी गावंढळ अशिक्षीत स्त्री). आळशी, अक्षम, भेकड, अज्ञानी.
३. नायिका स्वतःच्या तारुण्यसुलभ आवेशांवर (passions) विजय मिळवते आणि प्रगल्भ स्त्री बनते. हा प्रवास वेदनेच्या मार्गे होतो.
४. स्वतःची स्वातंत्र्याची मूलभूत इच्छा आणि समाजाच्या 'आदर्श स्त्री'कडून असणार्या अपेक्षा यांचा सुवर्णमध्य नायिका साधते, शक्यतो धर्माचा वापर करून.
५. बळाचा किंवा सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांकडून नायिकेचा छळ होतो. मग ती समदुःखी लोकांना एकत्रित आणते.
६. आपल्या खऱ्या भावना व्यक्त करणे किंवा भावनातिरेकात वाहून जाणे ही स्त्रीसाठी सगळ्यात मोठी धोकादायक गोष्ट आहे हे वारंवार सांगितले जाते. स्त्रीने कशा स्वतःच्या भावना ताब्यात ठेवल्या पाहिजेत, ते तिचे कर्तव्य आहे, हीच खरी आदर्श स्त्री!
७. कथेचा शेवट खालीलपैकी एक प्रकारच्या लग्नाने होतो.
• वाईट किंवा जंगली पुरुष नायिकेला अपेक्षीत असा सुधारतो
• नायिकेला अपेक्षीत सगळे गुण आधीपासूनच असलेला खरा पुरुष मिळतो
८. वाचकांकडून सहानुभूती मिळावी म्हणून अश्रूंची भाषा वापरली जाते.
९. आर्थिकवर्ग आणि त्याचे चित्रण हादेखील एक महत्वाचा मुद्दा असतो. गरिबी, (आणि त्यामुळे असलेली) तितरबीतर परिस्थिती हा एक वर्ग आणि श्रीमंत, (आणि त्यामुळे) काही कामधाम नसलेला, उथळ हा एक वर्ग. नायिका किंवा आदर्श कुटुंब बरोबर या दोहोंच्या मधे असते.

जेन ऑस्टीन आणि एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग या साहित्यप्रकारच्या संस्थापक म्हणता येतील.
===

एन्सायक्लोपीडिया आणि वोशिंग्टन स्टेट युनिवर्सिटी वरील लेखांचा स्वैर अनुवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगळा विषय मांडला आहे तुम्ही.
काळ आत्ता लगेच सांगता येणार नाही मला पण मराठीत १९ व्या शतकातील साहित्यातदेखील स्त्री लेखिकांची साधारण हीच वैशिष्ट्ये आढळतात. काही अपवाद सोडले तर.

छान लिहिलं आहे..

विसाव्या शतकाच्या शेवटी गाजलेला चिक लिट हा genre याचीच पुढची आवृत्ती मानता येईल का?

मला साधारण कळलं काय म्हणायचंय ते.पण थोडी गोंधळले.नीट रिलेट नाही करता येत आहे.
काही प्रसिद्ध नोव्हेल्स ची उदाहरणे देता येतील का?
उदा.लिटल वूमेन यात बसेल का?
किंवा बेफी यांची गुड मॉर्निंग मॅडम यात बसेल का?(ख्रिश्चन वगैरे बाजूला ठेवल्यास)
कुमुदिनी रांगणेकर पुस्तकं मला खूप आवडायची.आता विचार केल्यास त्या मिल्स बुन्स वरून प्रेरित असतील असं वाटतं.नयनाची निरांजनं आणि अजून एक कादंबरी होती ती मी खूप वाचली होती.नायिका गरीब असायच्या पण अबोली रंगाच्या किंवा गुलाबी साड्या नेसायच्या जश्या आणि कोणाकडेच नसायच्या.नायक श्रीमंतच असायचा.एक श्रीमंत त्याच्यावर लाईन मारणारी बाई पण मध्ये यायची.ती पुस्तकं या स्केल मध्ये बसतील का?
(हे खोचक वगैरे नाहीत, माझ्या लिमिटेड ललित वाचनावर आलेले खरे प्रश्न आहेत.)

कुमुदिनी रांगणेकर, सुमती क्षेत्रमाडे, स्नेहलता दसनुरकर, आशा कर्दळे, योगिनी जोगळेकर ई ई च्या कादंबऱ्या

Lol वाचून खूप हसायला आलं. हे थोडं साचेबद्ध उपमा आणि ठोकळेबाजपणा या धाग्यासारखं झालंय!
१९ वं शतक कशाला? आत्ताच्या बहुतेक सर्व मराठी टीव्ही मालिका यात बसतील.

> काळ आत्ता लगेच सांगता येणार नाही मला पण मराठीत १९ व्या शतकातील साहित्यातदेखील स्त्री लेखिकांची साधारण हीच वैशिष्ट्ये आढळतात. काही अपवाद सोडले तर. > १९ व्या शतकात मराठी स्त्रिया फारकाही लिहीत किंवा वाचत असतील असं वाटत नाही. २०व्या शतकातील (आणि आताचेदेखील Wink ) मराठी स्त्रीसाहित्य हे असेच आहे!
===

> विसाव्या शतकाच्या शेवटी गाजलेला चिक लिट हा genre याचीच पुढची आवृत्ती मानता येईल का? > हो. पण चिकलिटखेरीज इतरही लिहणाऱ्या आणि प्रसिद्धी-पैसा मिळवणाऱ्या स्त्रिया तिकडे आहेत. गॉन गर्ल नंतर तर तो मिस्टरीथ्रिलर जॉन्र स्त्रियांनी जवळपास पूर्ण काबीज केलाय.
===

> काही प्रसिद्ध नोव्हेल्स ची उदाहरणे देता येतील का?
उदा.लिटल वूमेन यात बसेल का?
किंवा बेफी यांची गुड मॉर्निंग मॅडम यात बसेल का?(ख्रिश्चन वगैरे बाजूला ठेवल्यास) >
गुड मॉर्निंग मॅडम वाचली नाही. (ख्रिश्चनला इकडच्या सांस्कृतिक वरचढ समाजाने रिप्लेस करायचं)
लिटल वूमेन बसते यात. मी वाचली नसल्याने साम्यस्थळं सांगू शकत नाही. पण प्राइड अँड प्रिजुडाईस बघ
१. देवदूत = जेन, व्यवहार चतुर = लिझी किंवा चॅरलेट
२. आई आणि इतर तिन्ही बहिणी
३. लिझी पॅशनेटली विकहमकडे आकर्षित होते. पण ती त्यात वहावत जात नाही. लिडिया वहावत जाते.
४. न आवडलेल्या कोलीन ला लिझी नकार देऊ शकते. तेवढं स्वातंत्र्य तिला आहे. चॅरलेटइतकी वाईट परिस्थिती नाही.
५. विकहम आपल्या चार्मने लिडियाला फशी पडतो. ज्यामुळे त्यांच्या आख्या कुटुंबाचे नुकसान होऊ शकले असते.
६. लिझीने आपल्या पॅशनना बांध घातला म्हणून तिला बेटर प्रोस्पेक्टिव्ह नवरा मिळू शकला. लिडियाच्या आयुष्याच वाटोळ होऊ शकलं असतं.
७. जेन आणि लिझी श्रीमंत (प्रायमरी), गुणी (सेकंडरी) पुरुषांशी लग्न करतात.
९. बेनेट कुटुंब उच्चवर्गाच्या किंचितच खाली असते. त्याकाळच्या 'एंटेलमेंट' कायद्यामुळे आणि सगळ्या मुलीच असल्याने थोडीफार चिंता.
===

> १९ वं शतक कशाला? आत्ताच्या बहुतेक सर्व मराठी टीव्ही मालिका यात बसतील. > २००० सालच्या आधी वाचलेली माहेर, मेनका, गृहशोभिका, आवाज, जत्रा वगैरे मासिक, तेव्हाच दूरदर्शनवर येणारे सिनेमे-मालिका आणि पुण्यात आल्यावर बघितलेली दोन नाटकं एवढाच माझा मराठी साहित्य-नाटक-चित्रपटशी संबंध.
पण गेली १० वर्ष मिपा, ऐसी, माबो वाचतेय. इथलं स्त्रियांचं लेखन बघुन २०० वर्षात परिस्थिती फारकाही बदलली नाहीय हे जाणवतं Lol

> कुमुदिनी रांगणेकर, सुमती क्षेत्रमाडे, स्नेहलता दसनुरकर, आशा कर्दळे, योगिनी जोगळेकर ई ई च्या कादंबऱ्या > ही नावं मी पहिल्यांदाच ऐकतेय.
मराठी स्त्रीसाहित्याचा सुरवतीपासून आतापर्यंतचा प्रवास, लेखन साचेग्रस्तच राहिलं आहे का <- असा कोणी अभ्यास केला आहे का? नीना बायम सारखा.

१९ वे शतक = १८०१-१९००.
शैलजा राजे आणि ज्योत्स्ना देवधर ही दोन नावं आठवली.

थोरली बहीण वाचत असलेली पुस्तके माझ्याही हाती पडायची त्यामुळे शैलजा राजे लहानपणी वाचल्यात.
ज्योत्स्ना देवधर यांचं निधन झाल्यावर त्यांचं एक पुस्तक वाचलं.

वरचा लेख स्वैर अनुवाद वाटण्यापेक्षा शब्दशः भाषांतर वाटतोय. खूपच कृत्रिम आणि प्रयास पूर्वक लिहिल्यासारखा.

मस्त लिहायच्या या सर्व मराठी लेडी लेखिका.
कुमुदिनी रांगणेकर नोव्हेल्स मध्ये शेवटी अबोली रंगाची साडी आणि पिळाचा आंबाडा नेसणार्या गरीब स्वाभिमानी हिरॉईन ला देखणा श्रीमंत उद्योगपती मुलगा मिळाला की चेहऱ्यावर एक स्वप्नाळू हास्य यायचं असं आठवतंय.
जेन ऑस्टिन अजून वाचली नाही.वाचते.

क्षेत्रमाडेंची फक्त युगंधरा वाचली आहे. माझं वाचताना eyerolling च सुरू होतं पण त्या काळाशी कदाचित सुसंगत असेल. योगिनी जोगळेंकरांच्या मी वाचलेल्या कथा टिपिकल डोमेस्टिक फिक्शन नव्हतं. चांगली लेखिका.

सानिया आशा बगे गौरी देशपांडे यांनी चाकोरीबाहेरचं लिहिलं आहे. विवाह संस्था ग्लोरीफाय न करता objective चिरफाड केली आहे. (उदरनिर्वाहाचे साधन म्हणून लग्न करायचं आणि वेळ घालवायचं साधन म्हणून मूल जन्माला घालायचं- हे कोणी- बहुधा गौरींनी लिहिलंय ना?)

मांग महाराच्या दुःखाविषयी - मुक्ताबाई
स्त्री पुरुष तुलना - ताराबाई शिंदे
-- वरचे दोन्ही 19 व्या शतकात सत्यशोधक समाजाच्या पत्रिकेत छापून आलेले

खालचे सगळे 20व्या शतकात --
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
कळ्यांचे निःश्वास, बळी - विभावरी शिरूरकर
जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परुळेकर
कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
काळा सूर्य, हॅट घातलेली बाई - कमल देसाई
आहे मनोहर तरी - सुनीताबाई देशपांडे
नाच ग घुमा - माधवी देसाई
माझ्या जलमाची चित्तरकथा - शांताबाई कांबळे
जिणं आमचं - बेबीताई कांबळे
मरणकळा - जनाबाई गिर्हे
तीन दगडाची चूल - विमल मोरे
मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख
आयदान - उर्मिला पवार
धादांत खैरलांजी (नाटक) - प्रज्ञा दया पवार
अंतस्फोट - कुमुद पावडे

गौरी देशपांडे, सानिया, नीरजा, आशा बगे (भूमी), कविता महाजन ई ई चे कथाकादंबरी लेखन

झालंच तर दुर्गा भागवत, इरावती कर्वे, तारा भवाळकर, सरोजिनी बाबर, सरोजिनी वैद्य, शरदिनी डहाणूकर, मंगला सामंत वगैरे संशोधिकांचे "फुटकळ" लेखन

कवितांचे लिहत नाही कारण महदंबा, जनाबाई इथंपासून सुरू करावे लागेल (आणि ते तुम्ही वाचत असाल असे वाटत नाही)

वरच्या पैकी कुठलही लेखन domestic fiction नाही

>>लिटल वूमेन बसते यात. मी वाचली नसल्याने साम्यस्थळं सांगू शकत नाही. >>> जर लिटील वुमेन वाचल नसेल तर वरील तुम्ही लिहिलेल्या कुठल्या बुलेट पाँईंट्स मध्ये ते बसते ?

लेखाची भाषा थोडी कृत्रिम आहे पण मुद्दा कळला. मात्र आता काळानुरूप बराच बदल घडला आहे. सुदैवाने घरगुती काल्पनिक या साच्यात मराठी स्री लेखिकांनी स्वतःला बांधून ठेवल्याचे दिसत नाही. किंबहुना अनेक स्री लेखिका या अशा साहित्याविरूद्ध बंडखोरी म्हणून लिहीत्या झाल्या असाव्यात!
प्रतिसादातले -
पण गेली १० वर्ष मिपा, ऐसी, माबो वाचतेय. इथलं स्त्रियांचं लेखन बघुन २०० वर्षात परिस्थिती फारकाही बदलली नाहीय हे जाणवतं लोळ - हे वाक्य मायबोली पुरते आजिबात पटले नाही. मिपा, ऐसी बद्दल माहिती नाही. नंदिनी, सीमंतीनी, नीधप, मोहना यांच्या कथा घरगुती काल्पनिक साच्यातल्या नसाव्यात. तुमच्या कडून उदाहरणं वाचायला आवडतील.

जिज्ञासा +१
यात दाद आणि मी_ अनु याही आल्या.
नाबुआबुनमा, प्रतिसाद आवडला.

> १९ वे शतक = १८०१-१९००.
शैलजा राजे आणि ज्योत्स्ना देवधर ही दोन नावं आठवली. > ही दोन वाक्य एकपाठोपाठएक आल्याने गैरसमज होऊ शकतो म्हणून
शैलजा राजे (१२ एप्रिल १९२० - इ.स. २००९ )
ज्योत्स्ना देवधर (२८ फेब्रुवारी १९२६ - १७ जानेवारी २०१३)
दोघीही विसाव्या शतकातील लेखिका आहेत.

> वरचा लेख स्वैर अनुवाद वाटण्यापेक्षा शब्दशः भाषांतर वाटतोय. खूपच कृत्रिम आणि प्रयास पूर्वक लिहिल्यासारखा. > हो अनुवाद फारसा ओघावत नाहीय. पण फक्त लिंक डकवल्या असत्या तर कितीजणांनी वाचलं असतं माहित नाही. म्हणून मग जसा जमला तसा केला. आता पुढे तर अजून खूप प्रयास करावे लागणार आहेत. तो एन्सायक्लोपीडिया लेख बऱ्याच कॉम्प्लेक्स वाक्यांनी भरलेला आहे. तारांबळ उडणारे अनुवाद करताना....
===

> जर लिटील वुमेन वाचल नसेल तर वरील तुम्ही लिहिलेल्या कुठल्या बुलेट पाँईंट्स मध्ये ते बसते ? > वरील बुलेट पॉइंट्समधेच बसायला हवं असं काही नाही. जर गोष्ट मुख्यत्वे स्त्रियांभोवती गुंफली असेल आणि घटना घरगुती सेटवर घडणाऱ्या असतील तर ते डोमेस्टिक फिक्शन.
===

जिज्ञासा, वावे,
या वरच्या वाक्यात तुमचं उत्तर सापडतय का?

एन्सायक्लोपीडिया

"Domestic fiction" is a term used to describe a body of popular narrative literature written by, for, and about women that flourished during the mid-nineteenth century. Also called "woman's fiction" by the critic Nina Baym, who was one of the first scholars to study the genre in great detail, this literature focuses on the daily domestic lives of young, mostly middle-class white girls as they grow into womanhood. The plots of domestic fiction deliver didactic life lessons that members of the dominant culture considered useful in preparing nineteenth-century female readers for their lives as adult women. The life lessons conveyed in this fiction mirror the Protestant Christian values of the time and usually subscribe to what Barbara Welter has termed "the cult of True Womanhood," a nineteenth-century cultural ideal of femininity that upheld the four virtues of purity, piety, domesticity, and submission.

विकीपान

Domestic realism normally refers to the genre of 19th-century novels popular with women readers. This body of writing is also known as " sentimental fiction " or "woman's fiction". The genre is mainly reflected in the novel though short-stories and non-fiction works such as Harriet Beecher Stowe 's "Our Country Neighbors" and
The New Housekeeper's Manual written by Stowe and her sister-in-law
Catharine Beecher are works of domestic realism. The style's particular characteristics are:
"1. Plot focuses on a heroine who embodies one of two types of exemplar: the angel and the practical woman (Reynolds) who sometimes exist in the same work. Baym says that this heroine is contrasted with the passive woman (incompetent, cowardly, ignorant; often the heroine's mother is this type) and the "belle," who is deprived of a proper education.
2. The heroine struggles for self-mastery, learning the pain of conquering her own passions (Tompkins, Sensational Designs, 172).
3. The heroine learns to balance society's demands for self-denial with her own desire for autonomy, a struggle often addressed in terms of religion.
4. She suffers at the hands of abusers of power before establishing a network of surrogate kin.
5. The plots "repeatedly identify immersion in feeling as one of the great temptations and dangers for a developing woman. They show that feeling must be controlled. . . " (Baym 25). Frances Cogan notes that the heroines thus undergo a full education within which to realize feminine obligations (The All-American Girl).
6. The tales generally end with marriage, usually one of two possible kinds:
A. Reforming the bad or "wild" male, as in Augusta Evans's St. Elmo (1867)
B. Marrying the solid male who already meets her qualifications. Examples:
Maria Cummins, The Lamplighter (1854) and Susan Warner , The Wide, Wide World (1850)
7. The novels may use a "language of tears" that evokes sympathy from the readers.
8. Richard Brodhead (Cultures of Letters) sees class as an important issue, as the ideal family or heroine is poised between a lower-class family exemplifying poverty and domestic disorganization and upper-class characters exemplifying an idle, frivolous existence (94)." [1]
An example of this style of novel is
Jane Smiley 's A Thousand Acres in which the main character's confinement is emphasized in such a way.
Some early exponents of the genre of domestic realism were Jane Austen and Elizabeth Barrett Browning .

घरगुती हा शब्द domesticity च्या सर्व छटा दाखवत नाही.
Domesticity was a social construct which was imposed in the Victorian era.
Domestic fictiom does not necessarily mean fiction written by women for women.

ॲमी, थोडक्यात domestic fiction या परिभाषेत बसणारी जी काही थोडी बहुत पुस्तकं आहेत ती कोणती आणि ती या परिभाषेत कशी बसतात असं या उताऱ्यात म्हटलं आहे. ओके. जसा परिकथांचा एक साहित्य प्रकार असतो तसा domestic fiction हा fiction चा एक उपप्रकार आहे. ठीक आहे! उद्या एखाद्याने पुरुषांनी युद्धातील घटनांवर आधारित लिहिलेल्या fiction चा अभ्यास केला तर जशी आणि जितकी साम्यस्थळे आढळतील तशीच साम्यस्थळे domestic fiction मध्ये आढळत असणार. It's a niche category of literature so not much scope for variation. मला या लेखाचा उद्देश कळला नाही पण एका नवीन संज्ञेची ओळख झाली एवढे माझ्यासाठी पुरे आहे!
Domestic fiction exists and has a readership and I don't really have anything against it! I thoroughly enjoy reading Jane Austin or books like Little Women.

अ‍ॅमी,
विकी आणि एन्सायक्लोपेडीयाचे हे भाषांतर अगदीच ठोकळेवाज झालेय. त्यापेक्षा तुमचे स्वतःचे अभ्यासकरुन मांडलेले मत वाचायला आवडले असते.
इंग्रजी कथाविश्वापेक्षा भारतीय कथाविश्व खूप वेगळे आहे. अगदी इंग्रजी धरले तरी ब्रिटिश आणि अमेरीकन यातही फरक आहे. मात्र स्त्रीया लिहित्या झाल्यावर त्या स्वतःच्या परीघातल्या अनुभवांवर साहित्य निर्मिती करणार हेही ओघाने आले. प्राईड अ‍ॅन्ड प्रेजुडाईस आणि लिटिल वुमेन या दोन्ही कथा खूप वेगळ्या आहेत. कथा बहिणींच्या आहेत पण वेगळ्या आहेत. एक तळ्यापलीकडली विक्टोरीअन कथा, खरेतर परीकथा तर लिटिल विमेन ही अमेरीकन मुलींची बर्‍याच प्रमाणात वास्तववादी कथा. इंग्रजी साहित्याचे विश्व बघितले तर त्यात डोमेस्टिक फिक्शन प्रकारात - विमेन्स फिक्शन आजही लिहिल्या जातात. मात्र कुटुंब बदलली तशा या कथाही बदलल्या आणि त्यात अजून जॉनर आले.

इथे जर का मराठी स्त्री लेखीका विचारात घेतल्या तरी त्यातही खूप मोठा आलेख येइल. माझ्यामते मराठी साहित्य अगदी कौंटुबिक वगैरे धरले तरी त्यातही विधवा, वय वाढलेल्या कुमारिकांचे प्रश्न, अगदी समलैगिकताही हाताळलेली बघायला मिळेल. हे माझ्या १६-१७ वर्षी केलेले वाचन म्हणजे ८० च्या दशकाची सुरुवात. आणि तेव्हा ही पुस्तके नवी अजिबातच नव्हती. इतर भारतीय भाषेतही बरेच उत्तम साहित्य वाचायला मिळेल. तेव्हा अनुवादित पुस्तकांचे संग्रह सरकार काढायचे अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या उत्तम कथा वाचायला मिळायच्या. अगदी कौटुंबिक कथा म्हटल्या तरी त्यात तेव्हाच्या सामाजिक, राजकीय स्थित्यंतराचेही चित्रण असे, त्याचे वास्तववादी परीणाम असत.

>>२००० सालच्या आधी वाचलेली माहेर, मेनका, गृहशोभिका, आवाज, जत्रा वगैरे मासिक, तेव्हाच दूरदर्शनवर येणारे सिनेमे-मालिका आणि पुण्यात आल्यावर बघितलेली दोन नाटकं एवढाच माझा मराठी साहित्य-नाटक-चित्रपटशी संबंध.
पण गेली १० वर्ष मिपा, ऐसी, माबो वाचतेय. इथलं स्त्रियांचं लेखन बघुन २०० वर्षात परिस्थिती फारकाही बदलली नाहीय हे जाणवतं>>
तुम्ही खूप कमी मराठी साहित्य वाचलेय. एवढ्या कमी वाचनावर इतके सरसकटीकरण ? मायबोलीवर नी, नंदिनी आणि इतर बर्‍याचजणी फार सशक्त लिहितात. बाहेर सध्या मराठी साहित्य कसे आहे मला माहीत नाही. पण अधिक सशक्त झाले असावे ही आशा आहे.

> प्राईड अॅन्ड प्रेजुडाईस आणि लिटिल वुमेन या दोन्ही कथा खूप वेगळ्या आहेत. > असणारच. एक १७९६ इंग्लंडमधे लिहली आहे. दुसरी १८६८ अमेरिकामधे. पण कथा वेगळ्या असल्या तरी साहित्यप्रकार डोफिच आहे.

> तुम्ही खूप कमी मराठी साहित्य वाचलेय. एवढ्या कमी वाचनावर इतके सरसकटीकरण ? > वावेने एकूणेक मराठी मालिका बघून मगच "१९ वं शतक कशाला? आत्ताच्या बहुतेक सर्व मराठी टीव्ही मालिका यात बसतील." हे मत बनवलं असेल असे वाटत नाही Proud

एनिवे पुढील भाषांतरचा भाग यापेक्षा बरा लिहायचा प्रयत्न करेन.

लिटल वुमेन नक्की वाच.
आवडेल असा माझा दावा नाही.पण त्यातल्या काही गोष्टी आताही लागू होतात.त्यातल्या नायिका देवदूत नाहीत.त्या प्रचंड(त्यांच्या चुकीने कोणाचा तरी जीव जाऊ शकेल इतक्या) चुकतात.झेपत नसताना श्रीमंत संगतीच्या नादि लागून परवडणार नाही इतके खर्च करतात.

Domestic fictiom does not necessarily mean fiction written by women for women.

याची काही उदाहरणं असू शकतील का?
आय मीन- लिटल विमेन टाईप काहीतरी पण पुरुषाने लिहिलेलं- मेजर पुरुष कॅरेक्टर असलेलं- पण तरी या जॉनरमध्ये मोडणारं?

Wiki matter seems to be copied from
https://public.wsu.edu/~campbelld/amlit/domestic.htm
domestic fiction" refers to a type of novel popular with women readers
यातलं पॉप्युलर विथ वीमेन रीडर्स हे लक्षात घ्यायला हवं.

सुरुवातीच्या प्रतिसादांना आलेली मराठी लेखिकांची नावं त्यात बसतात.

इथे डोमेस्टिक नॉव्हेल्स बद्दल आणि एका इंडियन डोमेस्टिक नॉव्हेल बद्दल सविस्तर लिहिलेलें मिळालं.
https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/135640/7/07_chapter%2...

गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात गाजलेल्या अनेक बांग्ला कादंबर्‍या या गटात मोडतील का?

सुरवात चांगली वाटली. पण पुढे एकाच मराठी लेखिकेची इंग्रजी कादंबरी डिटेलमधे चीरफाड केलेली आहे का? तसे असेल तर सर्व १००+ पानं वाचावी का विचार करतेय.
पण तरी बरं वाटलं असं ऍनालिसिस पाहून.
===

अनु, लिटल वूमेन वाचायला हरकत नाही, पण असं काहीतरी होण्याची शक्यता जास्त वाटते. त्यामुळे पुस्तक वाचण्याऐवजी सिनेमा बघेन.

लिटल विमेन ची चेतन भगतशी तुलना म्हणजे अल्कोटआजी ग्रेव्हमधून उठून येऊन मारतील हो.

अल्कोट आणि जेन ऑस्टिन दोघी spinster होत्या. दोघींनी आयकोनिक रोमान्स लिहिला विशेषतः mr Darcy.
(लग्न -मूल वाल्या असत्या तर रोमान्सऐवजी- नायिकेचा नवरा कसा इकडची काडी तिकडे करत नाही, पोर कसं आत्तापासून उलट प्रश्न करतंय याबद्दल लिहिलं असतं बहुतेक Lol )

Pages