मी यावर शून्य संशोधन केले आहे. जे आहे ते माझे निरीक्षण आहे. चुकत असेल तर प्लीज कर्रेक्ट करा.
धृतराष्ट्राला शंभरेक मुले होती म्हणतात. कदाचित दंत कथा असेल. पण काही पिढ्यांपूर्वी दहाबारा मुले असणे नवल नव्हते. दूर कश्याला जा, आमच्या घरात माझ्या वडिलांच्या पिढीत काका आत्या मिळून आठ भावंडे होती. आईकडे मामा मावश्या मिळून सहा होते. मी स्वत: एकुलता एक ती वेगळीच कहाणी आहे. पण मलाही दोनच मुले आहेत. गेल्या तीस चाळीस वर्षात बदललेल्या चित्रामागे, म्हणजे घटलेल्या अपत्यसंख्येमागे बरीच ईतरही कारणे असतील. त्यावर चर्चा करायला हा धागा नाही. पण हल्ली एक गोष्ट बरेच दिसून येते की बरेच लोकांना ईच्छा असूनही मूल होत नाही. कमावत्या नवराबायकोंपैकी एकात प्रॉब्लेम असतो. IUI आणि IVF या दोन संज्ञा ज्या कधीकाळी फक्त मेडीकल फिल्डमधील लोकांनाच माहीत असाव्यात त्या हल्ली सर्रास लोकांना माहीत असतात. आणि ते त्या बिनधास्त वापरतातही...
काही दिवसांपूर्वी स्टेशनवर एक विवाहीत मित्र सहज बोलता बोलता मला म्हणाला की त्याला प्रॉब्लेम आहे आणि सहासात वर्षे लग्नाला होऊन ट्राय करूनही मूल नाही. तर IUI ट्रीटमेंट घेत आहे. मी त्याचा ईतकाही खास मित्र नव्हतो. तरीही त्याने हे बिनधास्त माझ्याशी शेअर केले हे बघून खरे तर मला शॉक बसला होता. पण त्यानंतर मी ऑफिसमध्ये आणखीही काही जणांच्या तोण्डून हे सहज ऐकले. लोकं याबद्दल पाठीमागे चर्चा करतानाही कसलेही गॉसिप केल्यासारखे करत नव्हते. मूल होत नाही, ट्रीटमेंट घेत आहेत ईतके सहज बोलत होते. अन्यथा एकेकाळी लोकं आपल्या पौरुषत्वावर शंका घेतील या भितीने कोण हे असे स्वताहून सांगत असेल. पण हल्ली या प्रॉब्लेमचे प्रमाण ईतके वाढलेय वा कॉमन झाले आहे की कोणाला यात काही विशेष वाटत नसावे.
मी वरच म्हटलेय की यात माझे स्वत:चे संशोधन शून्य आहे. पण मला मित्रांच्या चर्चेतूनच याचे कारणही समजले आहे.
माझा स्वत:चा बालविवाह झाला आहे. आणि योग्य वयात मुलेही झाली आहेत. त्यावरून एकदा चर्चा होत असताना असेच दोघे ट्रीटमेण्ट घेणारे मित्र मला म्हणाले की तू या ऑफिसमधील सर्वात सुखी माणूस आहे. कधी स्ट्रेस घेत काम करत नाहीस की कसले टेंशन घ्यायचा तुझा स्वभाव नाही. आमची यानेच वाट लावली आहे.
एकीकडे लोकसंख्येचा विस्फोट होतोय तर कुठेतरी लाईफ धकाधकीची झाली आहे. ज्यांना आपण सुशिक्षित सुसंस्कृत बुद्धीवादी लोकं म्हणतो ते नुसते प्रगती एक्स्प्रेससोबत धावत आहेत. आजच्या तारखेला अक्षयकुमार या विषयावर हलकाफुलका मनोरंजक चित्रपट करतोय. आपण तो पाहून हसतोय. ज्यातून अवेअरनेसही जागतोय. पण मूळ प्रश्न का निर्माण होतोय याकडे आपण कधी डोळे ऊघडून बघणार??
IUI आणि IVF बद्दल कोणाला फारसे माहीत नसल्यास गूगाळून आणलेली माहीती पहिल्या प्रतिसादात दिलीय.
Intrauterine insemination
Intrauterine insemination (IUI) and in vitro fertilization (IVF) are two commonly used methods of fertility treatment, which increase a couple’s chance of becoming pregnant.
IUI is a procedure during which processed and concentrated motile sperm are inserted directly into a woman’s uterus. This procedure is timed according to a woman’s ovulation, and may be performed one to two times in the days immediately following the detection of ovulation. After ovulation a woman’s egg is picked up by the fallopian tube and waits there for the sperm. Since the IUI procedure deposits higher concentrations of good quality sperm close to where the egg is waiting, the chances that the egg and sperm will find one another are increased.
IVF is the most successful method of fertility treatment utilized today to help couples to conceive. The basic components of the IVF process include stimulation of the ovaries to produce multiple eggs at a time, removal of the eggs from the ovary (egg retrieval), fertilization of the eggs in the laboratory, and subsequent placement of the resulting embryos into the uterus (embryo transfer). The chance of pregnancy from IVF depends primarily on the age of the woman, the cause of infertility, and factors related to the quality of the IVF laboratory.
"पण मलाही दोनच मुले आहेत"...
"पण मलाही दोनच मुले आहेत"....माझा स्वत:चा बालविवाह झाला आहे. आणि योग्य वयात मुलेही झाली आहेत ---->> हे वाचून थोडा धक्का बसला. मागे कोणत्यातरी धाग्यात तुला गर्लफ्रेंड आहे पण अजून लग्न व्हायचे आहे असे वाचले होते. लग्नाअगोदर गफ्रेचा तिच्या सासूबरोबर वॉशिंग मशीन खरेदीचा धागाही आठवतोय. फार दिवस झाले नसावेत.
गर्लफ्रेंड मित्र मैत्रिणी
गर्लफ्रेंड मित्र मैत्रिणी दोन्ही आहेत त्यापैकी एक मैत्रिण एवढंच.
"पण मलाही दोनच मुले आहेत"...
"पण मलाही दोनच मुले आहेत"....माझा स्वत:चा बालविवाह झाला आहे. आणि योग्य वयात मुलेही झाली आहेत ---->> हे वाचून थोडा धक्का बसला. मागे कोणत्यातरी धाग्यात तुला गर्लफ्रेंड आहे पण अजून लग्न व्हायचे आहे असे वाचले होते. लग्नाअगोदर गफ्रेचा तिच्या सासूबरोबर वॉशिंग मशीन खरेदीचा धागाही आठवतोय. फार दिवस झाले नसावेत.
+१
गर्लफ्रेंडवर कितीतरी धागे आहेत. तिला हा आय्डी कळु नये म्हणुन पण काय काय प्रयत्न करायचा ऋन्मेऽऽष. आता मुले पण झाली.
बोलु नकोस् की नातवन्डे पण आहेत.
धाग्याच्या शीर्षकात म्हटलेले
धाग्याच्या शीर्षकात म्हटलेले खरे आहे आणि मोबाईल हा घटक यातील एक सर्वात मोठे कारण असावे असे माझे मत आहे.
बरेचसे पुरुष मोबाईल पँटच्या खिशात दिवसभर ठेवून फिरत असतात. खालील लिंक पहा. त्या प्रयोगात हे सिद्ध झालेले आहे की विशिष्ट अंतरावरून मारा झालेल्या वायफाय सिग्नल मुळे शुक्राणूं चा मोटीलिटी रेट अतिशय कमी होतो. अर्थात हे संशोधन उंदरांवर झालेले आहे. परंतु त्यातील निष्कर्षाला दुर्लक्षित करता येणार नाही.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4503846/
याप्रकारचे स्त्रियांच्या बिजांडावर होणारे दुष्परिणाम सांगणारे संशोधन मला सापडले नाही, परंतु असा काही दुष्परिणाम स्त्रियांच्या बिजांडा वर होत असेल तर परतीचा मार्ग नसेल असं वाटतं कारण पुरुषांचे शुक्राणू जसे नवे बनत असतात तशी बिजांडे नवी बनत नसतात.
तुमच्या आसपास अशी जोडपी असतील जी मुल व्हावे म्हणून प्रयत्न करत असतील तर त्या दोघांनाही मोबाईल पासून जमेल तेव्हढ लांब राहायला सांगा.
बरेचसे पुरुष मोबाईल शर्टाच्या
बरेचसे पुरुष मोबाईल शर्टाच्या वरच्या खिशात (हृदयाजवळ) ठेऊन वावरत असतात. त्यांनीही काळजी घ्यायला हवी.
एकूणच आयुष्यातील वाढता तणाव शरीरावर परिणाम करतोय, हा तणाव पूर्णपणे त्या त्या माणसाने स्वतःसाठी तयार केलेला असतो पण त्याला हे कळत नाही.
रूनमेशने प्रोफाईलवर स्वतःचा फोटो डकवून स्वतःची ओळख अधिकृतपणे जाहीर केली आहे. त्यामुळे ती गफ्रे वगैरे आता विसरा. उगीच जुन्या गोष्टी उकरून त्याला त्रास देऊ नका. त्याचे ते जुने सुखाचे दिवस आता संपले।

उत्क्रांती होत होत माणूस
उत्क्रांती होत होत माणूस यंत्रमानव बनत चालला आहे. नकली दात, नकली सांधे, नकली केस हृदय सुरू ठेवणारं यंत्र अशी प्रगती होत होत एक दिवस मानवाचे बहुतेक अवयव प्लॅस्टिक, धातूंचे बनतील. लैंगिक संबंधातून मुलं जन्माला येण्याऐवजी क्लोनिंग करून लोकसंख्या पाहिजे तेवढी ठेवली जाईल.
प्रजननशक्ती कमी झाली तरी वर उल्लेखलेलं तंत्रज्ञान वापरून मुलं जन्माला घालता येतात.
ऋ.. इतरांना असुया वाटावी
ऋ.. इतरांना असुया वाटावी म्हणून गफ बद्दल लिहित असावा असा अंदाज/ संशय मला पहिल्यापासून होता.
बापरे, मोबाईल छातीजवळ ठेऊ नये
बापरे, मोबाईल छातीजवळ ठेऊ नये याची कल्पना होती. पण पॅन्टीच्या खिशात ठेवल्याने तिकडेही गोळीबार होऊ शकतो हा विचारच नव्हता केला. लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करणेही धोकादायक असते असे मागे कुठेतरी वाचलेले. तेव्हापासून टेबल पाट खुर्ची चौरंग काहीतरी वापरत आलोय. पण मोबाईल, त्याचे काय? वर नाही खाली नाही तर ठेवायचा तरी कुठे??
@ राजदीप, हा मॉडर्न जगताचा
@ राजदीप, हा मॉडर्न जगताचा प्रॉब्लेम आहे. बराचसा भारत आजही खेड्यापाड्यातच आहे. आणि तिथे छापखाना चालू आहे. ऊपी बिहारमध्ये तर तोफखाना चालू आहे. त्यामुळे चिण्ता नसावी.
@ ऋन्मेष आयडी आणि गर्लफ्रेंड, मी वेळ मिळताच हा पुर्ण प्रवास थोडक्यात लिहेन. त्या धाग्यासाठी चर्चा राखून ठेवा. मीन अ व्हाईल अधिक माहितीसाठी माझा नाचाचा धागा बघू शकता.....
17 ते 35,,,, हे वय
17 ते 35,,,, हे वय पुनरुत्पादन करण्याचे आहे.
आज लग्न करण्याचे वय वाढल आहे नोकरी,घर होई पर्यंत 30 वर्ष वय होवून जाते त्या नंतर लग्न .
ज्यांचे योग्य वयात लग्न होते(२२) ते निरोध किंवा गर्भ निरोधक गोळ्या घेतात मुल होवू नये म्हणून कारण त्यांचं पण स्वप्न पाहिले settle hone आणि नंतर मूल असे असते.
म्हणजे पुनरुत्पादन करण्याच्या वयातील ही मंडळी उशिरा लग्न आणि गर्भ निरोधक ह्या पद्धतीने अनु उत्पादक राहतात.
सेक्स वर अनेक घटक सामाजिक घटक
परिणाम करत असतात.
त्या मुळे शुक्राणू च्या निर्मिती वर परिणाम होत असतो.
आता नवा मोबाईल बाजारात येतोय
आता नवा मोबाईल बाजारात येतोय तो सारखा पँटच्या खिशात ठेवल्याने पुनरुत्पादन क्षमता वाढणार आहे आणि शर्टाच्या खिशात ठेवल्यावर हार्ट अटॅक येणार नाही.
दशरथाला मूल होण्यासाठी यज्ञ
दशरथाला मूल होण्यासाठी यज्ञ करावा लागला. पायसदान मिळाले तेव्हा मुलं झाली.
पंडुला नियोगाचा आसरा घ्यावा लागला.
तेव्हा हा प्रॉब्लेम आजचा नाही.रामायण महाभारतापासून आहे.
तेव्हा हा प्रॉब्लेम आजचा नाही
तेव्हा हा प्रॉब्लेम आजचा नाही.रामायण महाभारतापासून आहे. >>>
हेन्स प्रूव्ह्ड आमच्याकडे मोबाईल आणि तो ठेवायला खिसे असणारी धोतरे आणि उत्तरीये रामायण महाभारतापासून होती.
तेव्हा हा प्रॉब्लेम आजचा नाही
तेव्हा हा प्रॉब्लेम आजचा नाही.रामायण महाभारतापासून आहे. >>>>> अच्छा म्हणजे भारतीय वैद्यकशास्त्र इतके प्रगत होते की IUI आणि IVF तंत्रज्ञान पाश्चात्यांच्या आधी पासून भारतीयांना माहित होते. फक्त त्याला यज्ञ करून पायसदान मिळवणे आणि नियोग असे संबोधत असत.
आणि हो क्लोनिंग राहिलेच की. धुतराष्ट्राला शंभर मुले क्लोनिंग तंत्रज्ञानानेच झाली असतील.
भरत हिंदू धर्म विरोधी आयडी
भरत हिंदू धर्म विरोधी आयडी आहे.
संजयकडे(महाभारताला संजय, आपला
संजयकडे(महाभारताला संजय, आपला किंगमेकर नव्हे) ड्रोन होता. त्यामुळेच तो प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय चाललंय हे सांगू शकत होता.
नैसर्गिक पने मुल होणे ह्या वर
नैसर्गिक पने मुल होणे ह्या वर मत व्यक्त होणे जरुरी च आहे.कृत्रिम पण मुल उत्पादन करायला आता तरी खूप पर्याय आहेत.
पण जो देश जगातील गरीब देशाच्या यादीत येतो त्यांना १ मुल कृत्रिम पने होण्यासाठी १५/२०. लाख रुपये खर्च करण्याची कुवत तरी असली पाहिजे.
त्या मुळे आपल्या कुवत ओळखून व्यक्त होणे.
ते पुर्वाश्रमीचे मुळाला अजुन
ते पुर्वाश्रमीचे मुळाला अजुन घट्ट पकडुन असलेले व आपल्या मुळ धर्माचं ज्ञान अद्ययावत ठेवणारे डॉ. अजुन कसे आले नाहीत.
जमल्यास व शक्य असेल तिथे आपल्या पुर्वाश्रमीच्या धर्मावर शिंतोडे उडवायचा त्यांचा छंद आहे.
आणि आम्ही पातळी सोडली की मग
आणि आम्ही पातळी सोडली की मग सर्वधर्म च राग गायला सुरावात करतील.
हिंदू वर पातळी सोडून टीका करायची आणि त्याचे प्रतिसाद उमटू लागले की हिंदू कसे धर्मांध झालेत अशी ढोलकी वाजवायची..
मजाक उडवणारी एक जरी पोस्ट आली तरी.
आम्ही पण सर्व नीतिमत्ता सोडून टीका करू.
धकाधकीचे जीवन आणि त्याचे
धकाधकीचे जीवन आणि त्याचे दुष्परिणाम असल्याने हे असे होत असावे.
धकाधकीचे जीवन आणि त्याचे
धकाधकीचे जीवन आणि त्याचे दुष्परिणाम असल्याने हे असे होत असावे.
आणि त्या बरोबर च अस्थिर आर्थिक स्थिती,वाढलेल्या अपेक्षा त्या मुळे येणार मानसिक ताण हे सुद्धा कारण असावे.
मूळ मुद्दा काय आहे आधुनिक
मूळ मुद्दा काय आहे आधुनिक काळात मूल न होणं .
त्याचा जुन्या जमान्याशी, धर्माशी किंवा पुराणाशी काय संबंध आहे?
कोणत्याही धाग्यावर केवळ धुळवड खेळायचा हा उद्योग निंदनीय आहे.
फुकटची आपली धुणी धुवायला लोकांनी येथे सुरुवात केली आहे.
अशामुळे अनेक मायबोलीकरांनी मायबोलीवरून रजा घेतली आहे याचे कुणाला काहीच नाही.
इतरांनी रजा घेतली मग आपल्या
इतरांनी रजा घेतली मग आपल्या रुजू होण्याचे कारण काय असावे बरे?
ऋ, https://m.youtube.com/watch?v=A_Ls1GxlSiA हे बघ.
ऋन्मेष, तुला तुझ्या ऑफिस /
ऋन्मेष, तुला तुझ्या ऑफिस / कंपनीमध्ये खरच काही काम नसते की ते तू इतरांवर सोपवत असतोस ?
रात्री साडेबारा वाजता ऑफिसची
रात्री साडेबारा वाजता ऑफिसची काम?
रश्मींनी मला दिलेलं रि टे हे सर्टफुकट मी फ्रेम करून घेणार आहे.
बरोबर आहे ऋन्मेष. प्रजनन
बरोबर आहे ऋन्मेष. प्रजनन शक्ती कमीच होत चालली आहे. एकिक डे पॉर्न बघून नैसर्गिक इच्छा मरूनच जाते , त्यात पॉर्न मध्ये अशक्य लेव्हलचे पर्फॉर मन्सेस दाखवतात त्यामुळे पर्फॉर्मन्स अॅक्क्षायटी पक्षी मला तसे जमेल का ही काळजी वाढत जाते व नैसर्गिक स्किल डेव्ह लप होतच नाही.
आरोग्य पण धोक्यात आहे. बायस्फेनॉल, थॅलेट्स सार्खी केमिकल्स पोटात जाउन त्याचा हेल्दी शुक्राणू निर्मितीवर परिणाम होतो.
रेपिस्ट लेचरस भारतीय पुरु ष मानसिकतेवर निसर्गाने काढलेला उपाय आहे. हा निर्मिती क्षमताच कमकुवत करून टाकलेली आहे.
रेपिस्ट लेचरस भारतीय पुरु ष
रेपिस्ट लेचरस भारतीय पुरु ष मानसिकतेवर निसर्गाने काढलेला उपाय आहे. हा निर्मिती क्षमताच कमकुवत करून टाकलेली आहे >>>>
वरील दोन शब्दांचा परस्परसंबंध या पामराला कुणी समजावुन सांगेल काय?
वरील दोन वाक्य सोडली तर अंमा
वरील दोन वाक्य सोडली तर अंमा ची पोस्ट योग्य आहे
बाकी भारतीय पुरुष rapisht आहेत त्याला काही आधार नाही.
रेपिस्ट लेचरस भारतीय पुरु ष
रेपिस्ट लेचरस भारतीय पुरु ष मानसिकतेवर निसर्गाने काढलेला उपाय आहे. हा निर्मिती क्षमताच कमकुवत करून टाकलेली आहे >>>>
रेपिस्ट लेचरसला निर्मितीत रस असतो???
शुक्राणू कमकुवत/अजिबात नसणे याचा पुरुषाच्या परफॉर्मन्सशी काय संबंध? पुरुष नसबंदीत विर्यात शुक्राणू सोडणारी वाट बंद करतात, पण त्यामुळे पुरुषाच्या कामावर परिणाम होत नाही.
पण असा परिणाम होतो हा गैरसमज अजूनही पुरुषांच्या मनात आहे, त्यामुळे स्त्रीवर नसबंदी करून घ्यायची जबाबदारी ढकलली जाते.
Pages