कोडा विषयी माहिती हवी आहे

Submitted by Namrata Siddapur on 6 January, 2020 - 08:33

1. कोडाचे डाग पूर्ण जातात का?
2. पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड जवळपास कोणत्या डॉक्टरला दाखवाव?
3. कोणाला स्वताला काही किंवा जवळपास च्या लोकांना काही अनुभव आहे का?
4. कोड हे अनुवांशिकता असतात का? माझ्या आजोबांना वयाच्या 80 वर्षी कोड झाले होते. तेही अंगभर नाही

मला आणि नवर्‍याला नाही आहे पण दोन्ही लहान मुलांच्या अंगावर छोटे फिके पांढरे डाग दिसू लागले आहेत.

माझ्या नणंदेच्या मुलीच्या चेहर्‍यावर कोडाचा डाग आहे. हे डॉ कडून कन्फर्म केल आहे.
आम्ही जाणार आहोत डॉ कडे.

please suggest good doctor

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला आणि नवर्‍याला नाही आहे पण दोन्ही लहान मुलांच्या अंगावर छोटे फिके पांढरे डाग दिसू लागले आहेत.>>>>हे कोडचे डाग नसतील,हल्ली खूप लहान मुलांच्या अंगावर असे डाग दिसत आहेत,माझ्याही मुलाच्या दोन्ही गाल व हातांवर होते मात्र आता गेले आहेत,विटामिन च्या कमतरतेमूळे येतात हे डाग

उपचार घेताना खूप वेगवेगळे सल्ले आणि औषध सुचवली जातील.
काही घरगुती उपाय suchavtil.
पण औषध उपचारांची मिसळ करून अनेक प्रकारची औषध घेवू नका.

आधी dermatologist ला दाखवून नक्की कोड आहे की नाही हे कन्फर्म करा.>>>>> अगदी अगदी.पण प्रथम तुमच्या नेहमीच्या डॉक्टरकदे जा.

विटामिन च्या कमतरतेमूळे येतात हे डाग>>>>>>>> होय.
मला स्वतःला असा एक फिकट डाग आला होता.व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांनी गेलाही.अर्थात मी त्यावेळी २३-२४ ची होते.इथे तिथे विचारण्यापेक्षा डॉक्टरना विचारा.तुम्ही चिंचवडला रहात असाल तर निरामय हॉस्पिटलमधील डॉ.अनिल यादवना भेटा.त्यांचे प्रायव्हेट क्लिनिक असेल तर मला माहित नाही.

डॉ. माया तुळपुळे यांचा कोडावर काम करणारा एनजीओ आहे. https://www.myshweta.org/ तुम्हाला येथे बरीच माहिती मिळेल. मायाताई अनेक वर्षे या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी याच विषयावर "नितळ" नावाचा चित्रपटदेखिल काढला आहे. यांचे ऑफीस पुण्यातच असल्याने तुम्ही तेथे जाऊन या लोकांना भेटावे असे मी सुचवेन.

नम्रता, निगडीमध्ये डॉ मिलींद पटवेकर आहेत, त्यांना दाखवुन बघ . चांगले डॉ आहेत. प्रदीप स्विट्सच्या मागच्या बाजूला जी बिल्डिंग आहे त्यात पहिल्या मजल्यावर आहेत. शनीवार ( बहुतेक ) रवीवारी दवाखाना बंद असतो.. निगडी बसस्टॉप समोरच आहे प्रदीप. माहीत असेलच तुला.

हो आणी लहान मुलांमध्ये जर प्रोटिन्स कमी असतील तर असे हलकेसे पांढरे डाग उमटतात त्वचेवर. तरी पण दाखव.