अमानवीय..? 3

Submitted by ऩीली on 10 October, 2019 - 07:12

मागच्या धाग्याची मर्यादा पुर्ण झाली.
आता अमानवीय किस्से, अनुभव इथे येऊद्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो ! मागल्या धाग्याचे २००० भाग नाय झाले, अजून ६४ व्हायचेत की वो. इतक्यातच नवीन धागा काढुन सोडलं की तुमी, म्हंते मी.

तिसरा धागा बोकलत उघडणार होते मिरजेत इंटरनेट कनेक्शन घेऊन. तुम्ही हा धागा उघडून अन्याय केला आहे बोकलत यांच्यावर... इस्की सजा मिलेगी - बराबर मिलेगी ... सबका बदला लेगा तेरा बोकलत .....

अद्यक्ष महोदय,
हा बोकलातांचा ड्यूआयडी आहे का? नसेल तर हे अमानवीय आहेय.

अमानवीय 3 हा धागा कोणीही काढला तरी चालेल. मीच काढला पाहिजे असं काही नाही, पण मी त्या धाग्यावर माझ्या कथा लिहिणार असल्याने ज्यांना माझ्या कथा खोट्या वाटतात त्यांनी तो धागा काढू नये. आणि जरी काढलात तरी ही खोटी गोष्ट आहे, असं असूच नाही शकत अशा शंका मनात आणून धाग्याचा विषय भरकटवू नये.

इकडं कुणी सुध्दा खरे किंवा खोटे किस्से लिवू नयेत, कारण खऱ्याखुऱ्या अनुभवांना देखील पुड्या सोडल्या अशी संभावना केली गेली आहे.

इकडं कुणी सुध्दा खरे किंवा खोटे किस्से लिवू नयेत, कारण खऱ्याखुऱ्या अनुभवांना देखील पुड्या सोडल्या अशी संभावना केली गेली आहे>>>> नाही हो..खरे किस्से तर येऊच द्या इथे..बाकी ज्याला खरे किस्सेही खोटे वाटतील त्याला काही करू शकत नाही कोणी..just let it be..

sorry

एक मित्र भूत झाला. पाठोपाठ बायको पण हडळ बनून आली.
तो म्हणाला आता तरी पिच्छा सोड. आपलं कॉण्ट्रॅक्ट संपलं मी मेल्याबरोबर.
हडळ म्हणाली "म्हणजे हडळींच्या मागे जायला तू मोकळा. मला काय वेडी बिडी समजलास का ? उगीच जीव देऊन नाही आले"

.

आधीचे धागे छान होते. काही अनुभव/ ऐकीव गोष्टी खरच भयानक होते. पण बोकलत वगैरे आयडिंनी फालतू प्रतिसाद देऊन धाग्याची वाट लावली. इथल्या काही आयडिंना बोकलतचे लेख/प्रतिसाद कॉमेडी का वाटतात हा अभ्यासाचा विषय आहे. आता ह्या धाग्यावर तरी पूर्वीसारखे छान अनुभव वाचायला मिळावेत. सुरुवात मी करतो. अनुभव अर्थातच आमच्या चुलत मावशीकडून ऐकलेला,
आमचे एक नातेवाईक पूर्व आंध्रप्रदेश मधल्या एका गावात फार मोठे जमीनदार होते. नातेवाईकांचा आज्जा रझाकार होता तिथूनच त्यांची भरभराट सुरू झाली. रझाकारी गेली पण जमीनदारी आणि खाजगी सावकारी मात्र सुरू राहिली. औराद गावाजवळ त्यांची फार मोठी गढी आहे. तो भाग तसा दुष्काळी, जनता प्रचंड गरीब. पैश्याची नड सर्वांनाच सदासर्वकाळ. भरपूर व्याज लावून कर्ज देणं आणि ते परत न मिळाल्यास जमीन, घर, घरातल्या वस्तू वगैरे घेऊन वसूल करणे हे काम सवकारीत चालत. किमान तीन पिढ्या तर हेच करत होत्या. लोकांच्या तळतळाटाला सावकार जुमानत नसत. पैश्याने माजलेले म्हणून कायदा पण खिशात. ८० च्या दशकात कधीतरी असेच कुणाचे तरी सामान उचलून गढी मध्ये आणण्यात आले. त्यात एक तैलचित्र होते. एक साडी मधली घरंदाज बाई हातात दिवा घेऊन एक अरुंद दगडी जिना उतरत आहे असे ते चित्र होते. दिव्याचा प्रकाश बाईच्या चेहऱ्यावर पडला होता. बाई देखणी आणि अलंकारांनी मढलेली होती. डोळे एकदम सजीव आणि ओठांवर हलकेसे खट्याळ हसू होते. चित्रातली बाई सरळ समोर (चित्र बघणाऱ्याकडे)बघत होती. ते तैलचित्र एवढे सुंदर होते की पशूच्या काळजाच्या त्या सावकाराची रसिकता चाळवली आणि त्याने ते दिवाणखान्यात लावले. तिथूनच त्यांची वाताहत सुरू झाली. अक्षरशः ४ वर्षात घरामध्ये अनेक आजारपणं, अकाली मृत्यू, लहान मुलांमध्ये मानसिक आजार असे नाना प्रकार होऊ लागले. घरामधले एक डोक्याने अधू असलेले बुजुर्ग आजोबा रात्रीतून उठून त्या तैलचित्रा समोर उभे रहात आणि रात्रभर अगम्य भाषेत त्याच्याशी बोलत. मध्ये केंव्हातरी गढीला आग लागली पण ते चित्र आगीतून बचावले. लहान मुलांच्या स्वप्नात ती बाई येई आणि पोरं दचकून उठत. मुख्य जमीनदार एका पावसाळी रात्रीत हृदयविकाराच्या झटक्याने दिवणखण्यातच मेला. मरतानी तो चित्राकडेच बघत होता असे म्हणतात. त्या प्रकारातल्या "जाणकार" माणसाने ह्या सगळ्याचा संबंध त्या चित्राशी लावला आणि ते तैलचित्र अडगळीच्या खोलीत फेकून दिले. पुढे वाताहत तशीच सुरू राहिली. ३ पिढ्यांनी कमावलेले एका पिढीत संपले. आज ही ती गढी आणि दुरदूरचे नातेवाईक गढी मध्येच वेगवेगळे भाग करून रहात आहेत. गढी मोठी असली तरी आतमध्ये कमालीचे दारिद्र्य आहे. गढीमधल्या लोकांनी पैशासाठी जुने सामान कावडीमोलाने विकले. काही लांबलांबच्या नातेवाईकांनी चोरून नेले. पण ते तैलचित्र अजून ही बळदात आहे असे म्हणतात.
मी लहानपणी तिथे गेलो होतो पण तेंव्हा हकीकत माहीत नव्हती. पुढच्या वेळेस गेलो आणि तैलचित्र बघायला मिळालेच तर त्याचा फोटो इथे नक्कीच डकवींन.

Pages