112 India अॅप

Submitted by मी सुंदर आहे. on 2 January, 2020 - 02:33

महिला सुरक्षेच्या दृष्टीने वाचा व शेअर, काॅपी पेस्ट करून सर्व ग्रुप व मित्रमंडळींना पाठवा.....

#AD_लघुकथा

#प्रसंगावधान

आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्‍याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही.

आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग अॅप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे.

हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर "मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला." असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग अॅपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले.

तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्‍यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे.

थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India अॅप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India अॅप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या अॅपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत अादिती साशंक होती.

एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India अॅपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.

गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तीला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.

अॅपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं.

तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला एेकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते.

आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले.

आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India अॅपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती.

आदितीने दोघा नराधमां विरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातार जवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले.

112India अॅप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. अॅपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर अॅप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.

भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.

पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप विकसित केलेले आहे. अॅपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते.

आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.

बर्‍याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे अॅप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे.

अॅपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.

©कविता दातार
>>> हा लेख मी थोपुवरुन कॉपी पेस्ट केलेला आहे. कृपया असे अॅप आहे का आणि कुणी ते वापरले आहे का? तसेच हि गोष्ट खरी असेल तर माबोकरणी भगिनींना याचा उपयोग व्हावा हा उद्देश आहे. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

दुर्देवाने असल्या गोष्टींची जास्त पब्लिसीटी होत नाही ,
म्हणुनच ज्यांना खरच ह्या गोष्टींची गरज त्यांना हंया विषयीची माहीती मिळत नाही.

डोकं शांत ठेवून विचार करणारी एक व्यक्ती सहा जणांना भारी पडते. साधी डोक्यातली पीन किंवा एटीएम कार्ड सुद्धा जिवघेण हत्यार होते. ॲप ईन्स्टॉल कराच पण लहाणसे हत्यार सोबत ठेवाच. घाबरू नका. आत्मविश्वास आसु द्या.

धन्यवाद अक्षय, हरिहर, आनंद. साधना जींचा लेख वाचावा लागेल. मुलींना कंपलसरी मार्शल आर्ट शिकवली पाहिजे व जीव रक्षक हत्यार ( सुरीसारखं) कसं वापरायचं याचं प्रशिक्षण द्यायलाच हवे.

अप्पा,
साधी डोक्यातली पीन किंवा एटीएम कार्ड सुद्धा जिवघेण हत्यार होते. >>>
डोक्यातली पीन ठीक आहे पण एटीएम कार्डचा कसा उपयोग होतो? खरच विचारते आहे

मला वाटतंय चार अंकी कोड त्यांना सांगितला कि ते atm मध्ये पैसे काढायला जातात. तेव्हड्या वेळात आपल्याला पळायला चान्स मिळतो.

एटीएम कार्डचा कसा उपयोग होतो? >>> एटीएम कार्ड नाजुक त्वचेवर सुरी सारखे लागते. सपकन मारले तर मानेवर / गळ्याला चिरु शकते, जे अगदी जिवघेणे जरी नसले तरी आपल्या बचावाला वेळ नक्कीच मिळु शकतो त्याअवधीत

मला वाटतंय चार अंकी कोड त्यांना सांगितला कि ते atm मध्ये पैसे काढायला जातात. >>> नै नै तसं नै काई

आपण कोड चुकीचा सांगायचा मग तिकडे सिक्युरिटी अलार्म वाजतो आणि ते आत बंद होतात
मग आपण निवांत पोलिसांना बोलवायचं

अप्पा आणिVB+११,
पेपर आणि मॅगझिनचा घट्ट रोल करुन आणि एक दुमड करुन त्याचाही एक हत्यार म्हणुन वापर होऊ शकतो.(हे शाळेत training देताना शिकवल होत) घाबरुन जाण्यापेक्षा आपल्याकडे असणार्या सोर्सेसचा कसा वापर करता येईल हे पहायला हव.

कधी शहाळेवाल्याला बघा. तो एक नारळाचीच कपची घेऊन आतले खोबरे सोलून काढतो. बस्स त्याच प्रकारे एटीएम् कार्ड वापरले तर एखाद्याचा डोळा सोलू शकतो. घुसवायचे एटीएम कार्ड आणि पार खोबणीतूनच काढायचा बुबुळासकट.. समोरच्याला कल्पनाही नसेल की एक एटीएम कार्ड एवढे घातक ठरू शकेल. त्यामुळे तो गाफील असेल. अगदी नाहीच जमले डोळा सोलायला तर निदान एक रक्ताची धार लागणे पुरेसे आहे. लक्षात ठेवा. डोळ्यावर झालेला आघात थेट मेंदूवर परीणाम करतो. डोळा हा नाजूक भाग असल्याने आणि तितकाच महत्वाचा असल्याने त्याला काही झाले तर नाही ना म्हणून माणूस घाबरतो. बाकी समोरची गुन्हेगार व्यक्ती जर पुरुष असेल आणि त्याने डोळे जर का एकदा मिटले तर पुढची लाथ गुडघा कुठे मारायचे हे सांगायला नकोच.

@भिकाजी आणि बोकलत, गंभीर गोष्टींवर मस्करी करण्यापेक्षा सुरक्षेसाठी डोळसपणे बघा. मुद्दा लवकर लक्षात येईल. Happy

पेपर आणि मॅगझिनचा घट्ट रोल करुन आणि एक दुमड करुन त्याचाही एक हत्यार म्हणुन वापर होऊ शकतो.
>>>
फार पूर्वी एक व्हीटसप की फेबूवर पोस्ट वाचलेली. त्यात अश्या छोट्या छोट्या गोष्टी कश्या ऐनवेळी हत्यार म्हणून वापरता येतात हे दिलेले. तसेच त्यातील कन्सेप्ट लक्षात घेऊन आपल्याही उपलब्ध वस्तू कश्या वापरता येतील याचा इनोव्हेटीव विचार करायचे आव्हान केले होते. एकदा डोके शांत असले की ऐनवेळीही सुचते. नसले तर पाठ केलेलेही विसरायला होते.

चोर आला. हातात सुरा. पाकिट काढा. एटीएम कार्ड काढा. स्वाईप करा डोळ्यावर. तो गाफिल. त्याला कल्पनाही नसेल पाकिटातून पैश्याऐवजी असे काही आपण काढत आहोत.

येथे गंभिर चर्चा सुरु आहे. पण तुम्ही नको ती घाण घातलीच शेवटी. माणूस शक्यतो आपल्या नावाने किंवा वृत्तीप्रमाणे आयडी घेतो. भिकाजी आणि बोकलत ही दळभद्र नावे का घ्यावी वाटली तुम्हाला? घरी आई, बहिण, बायको आणि मैत्रीणी असतील ना तुम्हाला? आजूबाजूला ज्या वाईट गोष्टी होतात मुलींच्या, स्त्रीयांच्या बरोबर त्यात ह्याच वृत्ती असतात. हायला इग्नोर करता करता हा गावाबाहेरचा उकीरडा घरात यायला लागला चक्क. नको वाटतय पण ही वृत्ती ठेचायलाच हवी.

येथे गंभिर चर्चा सुरु आहे. तरी इकडं एड्या वानी जोक वर जोक टंकु लागलाय म्हटलं जरा शाला घ्यावी तर राग आला की Proud
ह्या असल्या फडतुस आइडिया लिवताना लाज वाटली पायजे हरिहर आणि कंपुला
असल्या टिप्स कधी प्रत्यक्ष उपयोगी आल्याच्या बातम्या आहेत का ? स्वताच्या डोक्यातला उकिरडा साफ़ कर आधी दुटप्पी माणसा

Atm जीवघेणा आघात करू शकतो अशी हास्यास्पद विधानं तुम्हीच केलीत. इजा करू शकतो इतपत समजू शकतो. तरीपण माझ्या विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील मन्या, अप्पा तर मी माफी मागतो.

ऍपबद्दल आधीच एक धागा आहे आणि हां अजुन असला तरी काही फर्क नाही पडत
पण इकडे फालतू टाइमपास सुरुय सेफ्टी पिन आणि ATM कार्ड सारख्या तद्दन धागा भरकटवणाऱ्या पोस्ट टाकण्यापेक्षा ऍप बद्दल चर्चा होऊ दे

डोक्यातली पीन ठीक आहे पण एटीएम कार्डचा कसा उपयोग होतो?>>>>>> सॉरी मला दोन्ही बाबी पटल्या नाहीत.
तरीही......घाबरुन जाण्यापेक्षा आपल्याकडे असणार्या सोर्सेसचा कसा वापर करता येईल हे पहायला हव. >>>> >> हेच विचारात घेतले.

घाबरुन जाण्यापेक्षा आपल्याकडे असणार्या सोर्सेसचा कसा वापर करता येईल हे पहायला हव. >+७८६ सहमत
पण आधीच्या २ फालतू उदाहरणासाठी प्रचंड असहमत

बोकलत खरंच कुणी माफी मागावी या हेतुने तो प्रतिसाद मी दिलेला नाही. पण गंभीर विषयावर उगाच पिंका टाकु नयेत. अस वाटल. Happy

भिकाजी मी मुद्दामच तुम्हाला इग्नोर केले होते. कृपया या धाग्यावर वाद नको.
हे अॅप खरं आहे का? आणि कुणी/ कुणाच्या परिचित स्त्रीनं ते वापरलं आहे का? त्याचा अनुभव यावर चर्चा मला अपेक्षित आहे. धन्यवाद.

आणि हो. एटिएम कार्ड सारखं हुबेहूब दिसणारं अत्यंत धारदार चाकूत रुपांतर होणारं हत्यार ऑनलाईन विकत मिळतं.

त्याचा अनुभव यावर चर्चा मला अपेक्षित आहे>>> हेच तर मी केव्हापासून बोलतोय पण काही लोक नको ती उदाहरणे देवून धागा भरकटवायला पाहतात म्हणून फक्त मी हस्तक्षेप केला तर जीवे मारण्याची धमकी मिळते. किमान उदाहरणे पटतील अशी द्यावी कारण इकडे गंभीर चर्चा सुरुय हे सांगितले तर वाहयात भाषेत उत्तर मिळतात.

मग ह्या २ गोष्ठी आजकाल सर्वच नोकरदार स्त्रीया बाळगत असतात तरी हैदराबाद घडते पुणे घडते असे का ?
सर्वजण त्या २ वस्तुना हत्यार बोलणारे हां भातुकली समजून गोड गैरसमजात आहेत की वाईट हेतुने आला तो /ते डोव साबण वापरलेले मुलायम सॉफ्ट त्वचा वाले असतात जे क्षुल्लक बोचकाऱ्यांनी गंभीर जख्मी होणारेत Lol

Pages