गूढ अंधारातील जग -५

Submitted by सुबोध खरे on 4 January, 2020 - 00:01

पाणबुडीतील शस्त्रास्त्रे-

पाणबुडी बद्दल एवढे गूढ आणि भीतीदायक काय आहे?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणबुडी आपल्या अगदी जवळ येईपर्यंत ती आपल्याला सापडतच नाही. आणि एकदा परत बुडी मारली कि एवढ्या प्रचंड महासागरात तिला सर्वशक्तीनिशी शोधणे हे जवळजवळ अशक्यच आहे.

जेवढे आपण हत्तीला घाबरत नाही तेवढे बिबळ्याला घाबरतो. कारण बिबळ्याचे वजन ४० किलो असले तरी तो एवढासा लहान ( २-३ टन वजनाच्या हत्तीच्या तुलनेत ) पण अत्यंत चपळ आणि सहज दिसून येत नाही आणि केंव्हा हल्ला करेल हे हि समजणार नाही.

पाणबुडीत असलेली शस्त्रे म्हणजे त्यात असलेले क्षेपणास्त्रे आणि पाणतीर .

क्षेपणास्त्रे हि पाण्याच्या बाहेर येऊन हवेतून प्रवास करून लक्ष्यावर आघात करतात.

तर पाणतीर हे पाण्यातूनच "पोहत" प्रवास करून लक्ष्यावर आघात करतात.

क्षेपणास्त्रे हि डागण्यासाठी एक तर पाणबुडीला पृष्ठभागावर यावे लागते किंवा क्षेपणास्त्रे पाण्याखालूनच डागण्यासाठी एका अत्यंत गुंतागुंतींच्या प्रणालीचा वापर केला जातो (खाली पहा)

पाणबुडीतून डागलेली क्षेपणास्त्रे दोन प्रकारची आहेत

१) क्रूझ -- हि क्षेपणास्त्रे जमिनीलगत जाऊन लक्ष्यावर आघात करतात आणि

२) बॅलिस्टिक -- हि क्षेपणास्त्रे एखाद्या रॉकेट सारखी हवेतून वातावरणाच्या बाहेर जातात आणि प्रचंड अंतर कापून परत लक्ष्यावर सरळ वरून हल्ला करतात.

१)क्रूझ क्षेपणास्त्रे -- हि क्षेपणास्त्रे जमीनीवरील लक्ष्य (किंवा एखादे जहाज किंवा पाणबुडी असू शकते).यावर मारा करण्यासाठी असते

भारताने स्वतः विकसित केलेले ब्राह्मोस१ हे क्षेपणास्त्र या प्रकारात मोडते. हे क्षेपणास्त्र आपल्या चक्र अरिहंत किंवा सिंधुघोष क्लासच्या पाणबुड्यांवर बसविण्यात येणार आहे. हे पाण्याच्या पृष्ठभागाच्या ४०-५० मीटर खालूनच डागता येते. त्यामुळे आपल्या पाणबुड्याना पृष्ठभागावर येण्याची गरज राहिलेली नाही.
http://www.brahmos.com/content.php?id=20
याचा सध्या टप्पा २९० किमी आहे. हे क्षेपणास्त्र जगात सर्वात जलदगतीचे समजले जाते. ज्याचा वेग ३६०० किमी ताशी (supersonic -mach ३) आहे. म्हणजे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ अडीच मिनिटात पार करू शकते. इतक्त्या प्रचंड वेगाने लक्षयावर आघात करत असल्यामुळे लक्ष्याला त्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही करणे अशक्य होऊन बसते. या क्षेपणास्त्राचा वेग ६००० किमी ताशी (mach ५) वाढवण्याचा प्रकल्प चालू आहे शिवाय आता MTCR (MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME) यावर आपण सही केल्यामुळे रशिया आणि भारत सहकार्याने या क्षेपणास्त्राचा टप्पा ६०० किमी पेक्षा जास्त वाढवण्यात येत आहे. यामुळे हे क्षेपणास्त्र आता पाणबुडीतून डागून संपूर्ण पाकिस्तान त्याच्या माऱ्याच्या टप्प्यात येईल.

मार्च २०१७ महिन्यात याची वाढीव टप्प्याची (EXTENDED RANGE) ५०० किमी साठी केलेली चाचणी अतिशय यशस्वी झाली आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/defence/upgraded-brahmos-with-...
https://en.wikipedia.org/wiki/BrahMos .

या क्षेपणास्त्रांमुळे अरबी समुद्रात खोल बुडी मारून बसलेल्या आपल्या पाणबुड्याना पाकिस्तानच्या भूमीवर कुठेही अचूक पणे हल्ला करता येईल अशी परिस्थिती आहे.

ब्राह्मोस २ हे क्षेपणास्त्र सुद्धा विकसित केले जात आहे ज्याचा वेग ८४०० ते ९६०० किमी ताशी (HYPERSONIC mach ७-८) म्हणजेच मुंबई पुणे हे अंतर एक मिनिटात पार करेल. https://en.wikipedia.org/wiki/BrahMos-II

सागरिका (K -१५) K = KALAM (किंवा पूर्वीचे गुप्त नांव B -०५) या ७५० किमी टप्पा असलेल्या अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्राच्या पाण्याखालून डागण्याच्या तीन चाचण्या ११ आणि १२ ऑगस्ट २०१८ मध्ये अत्यंत यशस्वी झाल्या आहेत. हे पृथ्वी या भारतीय सेनेत तैनात असलेल्या क्षेपणास्त्राचे पाण्याखालून डागण्याची प्रतिरूप आहे. आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या अगणित चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

आपल्या सिंधुघोष क्लासच्या पाणबुड्या रशियन बनावटीचे क्लब एस हे क्षेपणास्त्र २२० किमी अंतरापर्यंत आपल्या टॉरपेडो ट्यूब मधून डागू शकतात
फ्रेंच स्कॉर्पियन वर्गाच्या पाणबुड्यांवर फ्रेंच बनावटीची एक्सोसे हि क्षेपणास्त्रे बसविण्यात येणार आहेत.यापैकी कालवेरी हि पाणबुडी या क्षेपणास्त्रासह नौदलात नुकतीच दाखल झाली आहे. https://www.navyrecognition.com/index.php/news/defence-news/2017/march-2...

२) बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे-- अग्नि पृथ्वी इ क्षेपणास्त्रे या वर्गात मोडतात
पाणबुडीतुन डागण्यासाठी भारताने "अग्नि" प्रणालीवर आधारित के वर्गाची क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत.

डॉ ए पी जे अब्दुल "कलाम" याना मानवंदना देण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वर्ग "के" ( कलाम) या नावाने ओळखला जाईल.

हि क्षेपणास्त्रे अग्नी पेक्षा हलकी जास्त वेगवान आणि गुप्त - सहज न शोधण्यासारखी (STEALTHY) आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/K_Missile_family

यातील K --१५ हे सागरिका नावाने ओळखले जाते आणि हे क्षेपणास्त्र चाचण्या पूर्ण करून नौदलात दाखल झाले आहे. सागरिका (K -१५) K = KALAM (किंवा पूर्वीचे गुप्त नांव B -०५) या ७५० -१५०० किमी टप्पा असलेल्या अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्राच्या पाण्याखालून डागण्याच्या तीन चाचण्या ११ आणि १२ ऑगस्ट २०१८ मध्ये अत्यंत यशस्वी झाल्या आहेत. हे पृथ्वी या भारतीय सेनेत तैनात असलेल्या क्षेपणास्त्राचे पाण्याखालून डागण्याची प्रतिरूप आहे. आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या अगणित चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
https://www.newindianexpress.com/specials/2018/aug/19/nuke-capable-subma...

SLBM.jpg
या श्रेणीतील पुढची क्षेपणास्त्रे K -४ (३०००ते ३५०० किमी)
K -५ (५००० किमी)
http://idrw.org/k-5-slbm-indias-next-big-thing/
आणि K -६ (६००० किमी) हि आहेत.

यापैकी K -४ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे.
http://www.sunday-guardian.com/news/india-tests-3000-km-range-n-missile-...
https://www.navyrecognition.com/index.php/news/defence-news/2016/april-2...
या क्षेपणास्त्रामुळे दक्षिण चीनच्या समुद्रात जाऊन चीन मध्ये खोलवर कुठेही अणु क्षेपणास्त्र डागणे शक्य झाले आहे.

हि क्षेपणास्त्रे पाणबुडी पाण्याखाली असताना डागता येतात. त्यामुळे पाणबुडी प्रत्यक्ष कोठे आहे हे समजून येत नाही. यासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरले जाते. पाणबुडीमध्ये एका मोठ्या नळकांड्यात हे क्षेपणास्त्र हवाबंद ठेवून त्याच्या बाजूला पाणी असते. या पाण्याखाली स्फोटके वापरली जातात त्यामुळे यापाण्याची क्षणार्धात वाफ होते आणि हि वाफ आपल्या प्रचंड दाबाने क्षेपणास्त्र असलेले नळकांडे वरच्या बाजूला वेगाने ढकलते. हे नळकांडे पाण्याच्या बाहेर वर वर जाते आणि जसे गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली येऊ लागते त्यावेळेस त्यातील इंधन पेट घेते आणि क्षेपणास्त्र डागले जाते.
हि तांत्रिक दृष्ट्या फार कठीण गोष्ट आहे कारण सुरुवातीच्या पाण्याची वाफ करण्याच्या स्फोटकांनी ते क्षेपणास्त्र "जागृत" होऊन त्याचा स्फोट होऊ नये हि एक कर्म कठीण कामगिरी असते शिवाय पाण्याच्या बाहेर आल्यावर हवेत असताना क्षेपणास्त्राच्या सर्व मोटार व्यवस्थित चालू झाल्या पाहिजेत. अन्यथा क्षेपणास्त्र वेड्यावाकड्या जाणाऱ्या दिवाळीतील रॉकेट सारखेच इतस्ततः जाण्याची शक्यता असते. जर दुर्दैवाने असे झाल्यास त्यातील स्फोटके बॉम्ब किंवा अण्वस्त्रे निकामी होतील हि सुद्धा "सोय" पाहावी लागते. जिज्ञासूनि खालील दुवा आवर्जून पाहावा
http://www.popularmechanics.com/military/weapons/a25176/launching-missil...

या पार्श्वभूमीवर K -४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी महत्वाची ठरते.

https://www.youtube.com/watch?v=F0i6uoGuPwc

२०१७ या वर्षी ब्रिटिश शाही नौदलाची ट्रायडेंट क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाली.

३) पाणतीर-- हे म्हणजे पाणबुडी किंवा जहाजावर हल्ला करण्याचे अस्त्र आहे. आपल्या सिंधुघोष क्लासच्या पाणबुड्यांमध्ये रशियन बनावटीचे Type 53-65 torpedo वापरले जातात. आणि जर्मन बनावटीच्या शिशुमार वर्गाच्या पाणबुड्यातून सूट(SUT) हे पाणतीर मारले जातात.

आता भारतीय बनावटीचे श्येन आणि वरुणास्त्र या पाणतीरांच्या चाचण्या पूर्ण होऊन प्रत्यक्ष उत्पादनासहि सुरुवात झाली आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Advanced_Light_Torpedo_Shyena
https://en.wikipedia.org/wiki/Varunastra_(torpedo)

एकंदरीत गेल्या काही वर्षात भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात भारत बराच पुढे येत आहे.

DISCLAIMER -- पाणबुड्या, पाणतीर आणि क्षेपणास्त्रांचा टप्पा,वेग, मारक क्षमता,त्यातील स्फोटके आणि त्याची दिग्दर्शक प्रणाली इत्यादी गोष्टी या अत्यंत गुप्त असतात. काही वेळेस शत्रूला घाबरवण्यासाठी त्याची अतिशयोक्ती केली जाते तर काही वेळेस शत्रूला गाफील ठेवण्यासाठी त्याच्या जाहीर क्षमतेबाबत कृपणपणा केला जातो.

यामुळे या अस्त्रांच्या बाबतीत माझे ज्ञान १०० % सत्य आहे असा माझा दावा नाही आणि यासाठी उपलब्ध दुवे मी शक्य तिथे दिलेले आहेत.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पाणबुड्या, पाणतीर आणि क्षेपणास्त्रांचा टप्पा,वेग, मारक क्षमता,त्यातील स्फोटके आणि त्याची दिग्दर्शक प्रणाली इत्यादी गोष्टी या अत्यंत गुप्त असतात. काही वेळेस शत्रूला घाबरवण्यासाठी त्याची अतिशयोक्ती केली जाते तर काही वेळेस शत्रूला गाफील ठेवण्यासाठी त्याच्या जाहीर क्षमतेबाबत कृपणपणा केला जातो.>>>>

शत्रूला हे सगळे माहीत असणारच. गेल्या फेब्रुवारीपासून सुरू होऊन ऑगस्टला टीपेला पोचलेली पाकिस्तानची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी भारताने व जगानेही दुर्लक्षित केली याचे कारण अण्वस्त्रहल्ला केल्यास भारत उलटूत्तरी काय करू शकेल हे पाकिस्तानला पुराव्यासकट माहीत आहे व त्यामुळे तो थेट हल्ला कधीही करणार नाही हे आहे का?

अण्वस्त्र हल्ला कोण्ही ही करणार नाही.
कारण अण्वस्त्र हल्ला करणारा देश सुद्धा दुष्परिणाम चा शिकार होईल.
नाही तर अण्वस्त्र हल्ल्याची साखळी होईल आणि जग (म्हणजे फक्त सजीव सृष्टी पृथ्वी नाही.पृथ्वी नष्ट करण्याची ताकत माणसात नाही,)
नष्ट होईल

भारत उलटूत्तरी काय करू शकेल हे पाकिस्तानला पुराव्यासकट माहीत आहे व त्यामुळे तो थेट हल्ला कधीही करणार नाही हे आहे का?

हो

नौदलात असताना एकाशी माझं भांडण झालं होतं. तेंव्हा तो दोन तीनदा म्हणाला की मी सरळ आहे तर सरळ एकदा का माझं डोकं सटकलं तर मी काय करेन ते तुला समजणार सुद्धा नाही.
मी त्याला थंडपणे म्हणालो चल तुझं डोकं सटकलंय , जे काय करायचंय ते करून दाखवच. दोन तीन वेळेस मी त्याला सरळ आव्हान दिले त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तो माझं काहीही बिघडवू शकणार नाही.
हे झाल्यावर त्याला काय करावे हे समजेना.
पाकिस्तान इतके दिवस पोकळ धमकी देत होते. त्या धमकीतील पोकळ पणा जेंव्हा श्री मोदींनी दाखवून दिला त्यानंतर आता पाकिस्तान बावचळला आहे.

नौदलात असताना एकाशी माझं भांडण झालं होतं. तेंव्हा तो दोन तीनदा म्हणाला की मी सरळ आहे तर सरळ एकदा का माझं डोकं सटकलं तर मी काय करेन ते तुला समजणार सुद्धा नाही.
मी त्याला थंडपणे म्हणालो चल तुझं डोकं सटकलंय , जे काय करायचंय ते करून दाखवच. दोन तीन वेळेस मी त्याला सरळ आव्हान दिले त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तो माझं काहीही बिघडवू शकणार नाही.
हे झाल्यावर त्याला काय करावे हे समजेना.
पाकिस्तान इतके दिवस पोकळ धमकी देत होते. त्या धमकीतील पोकळ पणा जेंव्हा श्री मोदींनी दाखवून दिला त्यानंतर आता पाकिस्तान बावचळला आहे.

>>> समर्पक उदाहरण.. धन्यवाद