( कॉम्प्यूटरग्रस्त आणि फेसबुक वेड्यांसाठी (ज्यात माझा समावेश आहे) एक आगळी वेगळी रचना. )
आठवणीच्या ऑप्शनवरती
नकोस मारू टिचकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
सहजासहजी मैत्री झाली
फेसबुकवरी तुझ्यासवे
जीव तुझ्यावर जडून गेला
पडू लागले स्वप्न नवे
झाली चॅटिंग मधाळ इतकी
तू न वाटसी परकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
कळून आले प्रोफाइल तो
बोगस होता तुझा तरी
मना पटेना, झूठ बरसतिल
श्रावणातल्या कशा सरी ?
घेतलीस तू उगाच माझी
क्रूर अशी का फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
पुरे जाहले मृगजळ आता
नकोत भेटी गाठी गं
फॉरमॅटिंग मी माझे केले
तुला विसरण्यासाठी गं
तरी व्हायरस तुझा असा का
मनात घेतो फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
फुले, कळ्या अन् बाग बघाया
शोध घेतला गुगलवरी
चित्र पाहिले लोभसवाणे
सभोवती दुष्काळ जरी
बागेश्रीची हसरी धुन का
आज जाहली रडकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
व्हर्च्यूअल या जगात आहे
अभासी आकाश निळे
अॅक्च्यूअल कंगाल असोनी
श्रीमंतीचा स्वाद मिळे
अमीर आहे जो तो येथे
खिशात नसता दिडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
शब्द जुळवतो, कविता करतो
शांत शांत मी जगावया
दोस्त सांगती पोस्ट कराव्या
फेसबुकवरी दिसावया
संगणकाच्या नावानेही
मनात भरते धडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
मस्तच अगदी... आठवणीच्या
मस्तच अगदी... आठवणीच्या ऑप्शनवरती
नकोस मारू टिचकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !
लई च आवडली हो...
अगदी झक्कासच हो....
अगदी झक्कासच हो....
फुले, कळ्या अन् बाग बघाया
शोध घेतला गुगलवरी
चित्र पाहिले लोभसवाणे
सभोवती दुष्काळ जरी
हे भारीये!
हे भारीये!
अरे वा... छान लिहिलंय...
अरे वा...
छान लिहिलंय...