भय इथले संपत नाही

Submitted by andy.rock on 9 December, 2019 - 13:38

माझ पिल्लू,
तू मला आणि तुझ्या आईच्या ला पडेल ल खूप सुंदर स्वप्न.
पण आज काल खूप भीती वाटते, tv varchya news पाहून.
काळजी वाटते , तुझ्या बद्दल.
एक बाप म्हणून काय करावं समजत नाही.
हेल्प मी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळजी करु नये. लेकीला/लेकाला, अनोळखी माणसांकडून, चॉकलेट, प्रसाद, खाऊ घ्यायचा नाही हे वारंवार सांगावे. ठसवावे. कोणी अनोळखी व्यक्तीने बोलावले (अगदी मी बाबांचा मित्र आहे किंवा बाबांना अपघात झालाय) असे सांगीतले तरी त्या व्यक्तीबरोबर जायचे नाही असे शिकवावे.

andy.rock, प्रत्येक बापाच्या मनातली भीतीच तुम्ही इथे मांडलीत, धन्यवाद. खरंच प्रश्न पडतो, आपल्यासारखेच दिसणारे हे लोक असे कसे करू शकतात ?

सतत सावध राहणे हाच एक उपाय आहे, माणुसकी वरचा विश्वास उडून गेला आहे आता. मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सशक्त बनवणे आणि मुख्य म्हणजे मुलांशी असलेला संवाद वाढवणे ज्यामुळे मुले काहीही आपल्यासोबत बोलायला भिणार नाहीत हे उपाय करावे.

समवयस्क , एकाच वर्गात शिकणाऱ्या,समविचारी मुला ,मुलींचा ग्रुप असावा.
क्लास , कॉलेज,जाताना एकत्रित ग्रूप नी च जावे.
मुलगी लहान असेल तर तिच्या प्रत्येक तक्रारी ऐकून घ्याव्यात.
विनाकारण रागवू नये .
त्यांना पालकांना विषयी भीती न वाटता
आपुलकी वाटली पाहिजे.
मग मुल बिनधास्त सर्व पालकांशी share करतात.
लहान असेल मुल तर शाळेत सोडणे,आणणे,शिक्षक शी संपर्कात राहणे.
मुलांच्या मित्र ,मैत्रिणी शी गप्पा मारणे हे करावे म्हणजे शाळेत नक्की काय घडत ह्याचे आकलन होते.
आई वडील सोडून बाकी लोकांच्या वर जास्त विश्वास पण ठेवू नये आणि जास्त अविश्वास सुद्धा दाखवू नये..
अविश्वास दाखवल्या मुळे काही लोकांना इगो हार्ट झाला असा भास होतो.

पूर्वी हुंडाबळीच्या बातम्या असायच्या, आता अश्या बातम्या! मुलींना- बाईला जाळून मारणं काही नवीन आहे का भारतीय समाजाला!

हुंडा बळीत स्त्रिया ना जळण्याच्य च्या घटना होत्या त्या मध्ये स्त्री च गुन्हेगार होती.
पुरुष खूप कमी कारणीभूत होते.
सासू,नणंद,भावजय अश्या नात्यातील स्त्रिया च स्त्री वर अत्याचार करत होते

लोकांच्या मुली बाळींबद्दल वाइट विचार मनात आणू नका. आल्यास काउ न्सेलिन्ग घ्या.
व्हात्सेप वर मेन ओन्ली जे गृप असतात त्यात नॉनव्हेज जोक्स व पॉर्न क्लिप्स शेअर करू नका अश्या गृप मधून बाहेर पडा तुमच्या मित्रांची कान उघाडणी करा. मुलीला सक्षम व सबल करा. ऑल द बेस्ट. पण हा एकटे पालक मध्ये का काढला आहे?

पूर्वी हुंडाबळीच्या बातम्या असायच्या, आता अश्या बातम्या!>> ह्या घटना पूर्वीही होतच होत्या. पण त्याच्या बातम्या होत नव्हत्या. लोकलाजेस्तव! आता जास्त जागरूकता आहे.

>>>> अविश्वास दाखवल्या मुळे काही लोकांना इगो हार्ट झाला असा भास होतो.>>> हाहाहा
इगो हर्ट झाल्याचे उगाचच वाटुन घेतात. खरे आहे.

मला समजच नाही एकटे पालक असू कसे शकतात
मला वाततय सिंधुताई या पहिल्या असतील. पण त्यांच्या यातना बर्‍याच आहेत. नववीत असताना धडा होता. मला अजून एक प्रश्न आहे की जसा आपल्या आई-वडील, आजी-आजोबांनी संंसार केला तसा का नाही होऊ शकत त्यांंच्यानंतर च्या पिढीतल्यांचा विहीर आटली तरी , वरून पाऊस पडतोच की मग माणूस आटला तर, दुसरा माणूस का नाही बरसू शकत त्यावर? गिव्ह अ‍ॅंड टेक निव्वळ भकास कन्सेप्ट आहे. सोडषवर्षिय युवती जेव्हा त्यांच्या बायो मध्ये "गिव्ह रिस्पेक्ट अ‍ॅंंड टेक रिस्पेक्ट" अस काही तरी लिहितात तेव्हाच त्यांच्यातील माणूसपणाची अनुभुती येते. काका मी खूप लहान असेन... मान्य...पण मला माफ करा पण एकदा तरी तुमच्या सौं ना फोन करा आणि चुक कुणाचीही असेल फक्त "सॉरी" म्हणा. पुढल्या दोन-पाच मिनीटांमध्ये त्यांचा फोन तुमच्या पिल्लाच्या हातात असेल. आणि तुम्ही पिल्लू शी बोलू शकाल. आम्ही ऑनलाईवरील सहानभूती शिवाय काय देणार...पण आज बोलावं वाटलं...जास्त असेल तर खरच माफ कर. मी नवीन आहे मायबोलीवर चुकून कविता/गझल शोधता शोधता इकडे आलो!