कालचक्र

Submitted by सोहनी सोहनी on 24 November, 2019 - 06:54

कालचक्र

अठरा वर्षाचा भूप गेली कित्येक वर्षे धैवतला एकच प्रश्न कित्येक वेळा विचारून भंडावून सोडायचा, आणि धैवत देखील त्याला कित्येक वर्षे टाळत होता. . .

इतके कसले व्रण आहेत तुमच्या शरीरावर ?? आणि कशामुळे??, एखाद्या पुजाऱ्याच्या शरीरावर असं काही म्हणजे जरा अशक्यच गोष्ट आहे ना, सांगा ना बाबा,
आणि आई बद्दलही काही जास्त सांगत नाही तुम्ही मला, आज काही झालं तरी मी इथून उठणार नाही, मला माझ्या आई बद्दल सगळं माहित असायला हवं, कमीत कमी ती कशी होती, माझ्यावर प्रेम करायची कि नाही, आणि मला अशी अचानक सोडून का गेली ??
ते हि मला ऐकायचं आहे, आत्ताच.

नाहीतर . . . नाहीतर पुढल्या वर्षी आईचं वर्षश्राद्ध मी एकटाच तिकडे करेन आणि येणार देखील नाही इथे, केव्हाच. . .
आज भूप हट्टालाच पेटला होता काही केल्या ऐकायलाही तयार नव्हता, शेवटी धैवतनेहि हार मानली, तसंही त्याला सगळं सांगायला हवंच होत कधीतरी. . .
शेवटी त्याने ती गोष्ट त्याला सांगायला सुरुवात केली, हे बजावून कि फक्त गोष्ट म्हणून ऐक आणि नंतर विसरूनही जा . . .

हि वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बेटा, तुझी आई आदना आणि मी एकाच ऑफिस मध्ये होतो, मी तिच्यापेक्षा सिनियर होतो, तिने नवीनच ज्योइन केलं होतं,
खूप साधी होती ती, सरळ सुस्वभावी, आणि सोज्वळ, कधी तिच्या प्रेमात पडलो मला कळलं देखील नाही,
हळूहळू तिला हि जाणवू लागलं माझं प्रेम आणि एक दिवस मी विचारलं तिला तिने चक्क होकार दिला,
मला तिच्या विषयी जास्त काहीच माहित नव्हतं तेव्हा, पण हळूहळू आम्ही भेटायला लागलो, मनातलं एकमेकांना सांगायला लागलो तेव्हा कळलं कि ती तर बिचारी जन्मापासूनच एका घरघुती कचाट्यात अडकली होती,
वडील लहान असतानाच अचानक वारले होते , पण ती म्हणायची कि ते अचानक गायब झाले होते, ना त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते ना तिने त्याचा शव पहिला होता, लहान होती तरीही, मेल्यावर माणसाचं काय होतं हे कळण्या इतपत नक्कीच जाणती होती ती, पण आईने सांगितलं म्हणून तिने मान्य केलं होतं कि ते वारले,
तीच्या घरात राहायला फक्त आई आणि ती दोघीच, आई तिच्याशी केव्हाच नीट वागली नाही, अगदी लहानपणा पासून तिचा तिरस्कार करायची, का तर ती मुलगी होती म्हणून,

अर्ध्या तासापेक्षा जास्त थांबणं तिला शक्य नव्हतं तेव्हा, थोडा वेळ भेटायची आणि लगेच पळायची, मी कित्येक वेळा म्हणायचो मी सोडतो, हवंतर थोडं दूर सोडतो, पण तिने कधीच मला येऊ दिलं नाही तिकडे,
आईला कळलं तर, मग ऑफिसला वैगेरे यायचं बंद केलं मग?? असं काही असेल म्हणून मी हि हट्ट सोडून दिला. ..

ती जेव्हा जेव्हा मला भेटायची नेहमी काही ना काही सांगायची, खूप वेळा रडायची, आईने असं केलं, आईने तसं केलं, आज आई असं बोलली, असं ओरडली नेहमी काहींना काही असायचंच,
मी हि शांत ऐकून घ्यायचो आणि तिला धीर द्यायचो, तसंही माझ्याव्यतिरिक्त ना तिचे मित्र मैत्रिणी होते ना नातेवाईक,
आईने कोणासोबतच तिचा संबंध येऊ दिला नव्हता,
तिला तिच्या आईमुळे होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता, मला सहन नव्हतं होतं, तिला इतक्या मानसिक तणावाखाली मला पाहवत नव्हतं, आणि तिची तब्येत देखील हळूहळू खालावत चालली होती.

म्हणून मी तिच्यासोबत लवकरच लग्न करायचा निर्णय घेतला, मी एकटाच राहायचो, त्यावेळेस मी हि माझी नाती माझी माणसं तोडून एकटाच इकडे राहत होतो, माझ्या आयुष्यात मला तुझ्या आजोबांची त्यांच्या पाठपूजेची सावलीही नको होती,
मी लग्नाच्या निर्णयाबद्दल तिला सांगितलं तर तुला सांगू किती सुखावली होती ती, जणू पिंजऱ्यातून आझाद होणार होती ती, खूप आनंदात होती ती,
पण त्या साठी आधी तिच्या घरी जाऊन तिच्या आईला विचारावं लागणार होतं,

ती खूप घाबरली होती त्या वेळेस, माझीही सारखीच परिस्थिती होती रे, पण आदनासाठी मी काहीही करायला तयार होतो,
आणि तसंही लग्न झालं कि आम्ही माझ्या घरी राहणार होतो, अगदी सुखाने दुःखांपासून दूर एकमेकांच्या प्रेमाच्या सावलीत. . .

पण म्हणतात ना आपण ठरवतो तसं नियतीनेही ठरवावं हा योगायोग कोणाच्याच नशिबी नसतं. . .

नियतीने पुढ्यात एक महा भयंकर खेळ मांडला होता, ज्याची सुरुवात मी तिच्या अंगणात पाहिलं पाऊल ठेवल्या पासूनच झाली होती. . .

इथून ४५किमि पुढच्या गावात ती राहायची, गावात कसली गावापासून पूर्णपणे अलिप्त, एक कोरडा रखरखीत रस्ता होता, आजूबाजूला कसलीशी झाडे वाढलेली होती, दिवसादेखील तिथे सूर्याची किरणे येत नव्हती, आणि झाडे असूनदेखील गारवा मुळीच जाणवत नव्हता, मी कशीतरी गाडी चालवत तिथून पुढे गेलो, जसजसा जवळ गेलो तर एका चौरस शेतामध्ये एक गोलाकार वाड्यासारखं बैठी घर दिसलं, बरंच मोठं होतं ते, त्या घराला पूर्णपणे गोलाकार बंदिस्त असं उंच कुंपण होतं, मला आश्चर्यच वाटलं, असं देखील घर असत? असेलही, पण मला खरंच विचित्र वाटलं ते,
त्यापेक्षा वाईट मला आदनाचं वाटलं रे, एकतर आजूबाजू कुणी नाही, त्यात घरात त्या दोघीच आणि आई हि अशी,
मला काही करून तिला इथून घेऊन जायचं होतं कायमचं. . .

मी बाईक बाजूला पार्क केली आणि, त्या गोलाकार कुंपणाचं फाटक उघडलं, किर्र्रर्र्र आवाज करत ते मी उघडलं, दोन पाऊले पुढे आलो आणि ते फाटक पुन्हा किर्र्रर्र्र करत बंद झालं, तरीही मी दचकलोच,

तुला सांगू, ती वास्तू पूर्णपणे एक वर्तुळ होतं, ते घर त्या वर्तुळात होतं पण पूर्ण वर्तुळाचा एक केंद्रबिंदू असतो ना तसंच त्या जागी एक भलं मोठं झाड होतं, खूप उंच, कसलं होतं मला माहित नाही पण त्यांला ना पान होती ना फांद्या, फक्त एक जाडजूड ऊंचच उंच खोड, आजूबाजूला हि बरीच छोटी छोटी झाडं होती तीही विचित्रच माझ्याकडे रोखून पाहत होती जणू, आणि तो मोठा अजस्त्र झाड जणू मला उंचावरून वाकून पाहतोय असं जाणवलं,
मला वेगळंच दडपण आलं होतं, असं वाटत होतं पळून जावं इथून, मनाच्या आत खूप खोलवर काहीतरी विचित्र खूप विचित्र जाणवत होतं, पण काहीतरी होतं जे मला तिथे ओढून नेत होतं,
मी एक मोठा श्वास घेतला, मला आदनासाठी सगळं पार करावं लागणार होतं,
मी पटकन त्या चार पायऱ्या चढून दार वाजवणार तोच मी दचकून पुन्हा दोन पायऱ्या खाली झालो,

कपाळाला कसलंसं ओलं मळवट, नववारी साडी, आजूबाजूला वारा वाहण्याच्या कोणत्याची खुणा नसतानादेखील पदर वाऱ्याने उडत होता नजर माझ्यावर रोखून, अंगार होते त्यांच्या डोळ्यात, मला जागीच जाळून खाक करणारी नजर मला सहन झाली नाही, मी अजून दोन पायऱ्या खाली उतरलो,
जणू मी तिच्या हद्दीत तिच्या परवानगी शिवाय घुसलो होतो, ती काही बोलणार तोच आदना धावत बाहेर आली,
" आई रागावू नकोस, तो तो . .. माझ्यासाठी, नाही म्हणजे तुला, तुला भेटायला आलाय.."
तिने कसंबसं तिला सांगितलं, तिने तीच नजर तिच्यावर फिरवली, नखशिखान्त शहारली ती...

त्यांनी काही क्षणांत नजर शांत करून घेतली आणि मला आत यायला सांगितलं, आम्ही तिघे आत गेलो, खूप मोठं होतं ते घर आठ नऊ खोल्यांचं, घराचं निरीक्षण करायची हिम्मत तेव्हा माझ्यात नव्हती कारण मी मनापासून घाबरलो होतो तिच्या आईला, आणि त्या घरात वेगळंच काहीतरी असल्याचं जाणवत होतं मला,
पण ते काय होतं आधीच कळलं असत तर . . .

कदाचित मी त्या तिघांचे जीव वाचवू शकलो असतो . . .

( काहीतरी नवीन प्रयत्न करतेय, बघुयात जमतंय का )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे सुरुवात,
भूप, धैवत , आदना अशी नावं वाचुन पांडव कालिन कथा असावी असं वाटलं., पण 'ऑफिस', 'सिनियर' 'ज्योइन' हे वाचलं आणी गाडी २० व्या शतकात आली.
हं घ्या..

अग्निपंख सर मनापासून आभार, माझ्या कथेत मुख्य पात्रांची नावे शास्त्रीय संगीतातील रागांची आवर्जून ठेवण्याचा प्रयत्न करते