कालचक्र : ६ शेवट

Submitted by सोहनी सोहनी on 27 November, 2019 - 04:18

कालचक्र : ६

"ओम नमः शिवाय" "ओम नमः शिवाय" "ओम नमः शिवाय"

न जाणे किती वर्षांनी ह्या घरात देवाचं नामस्मरण होत होतं, अचानक वारे वाहू लागले, वादळांसारखे आवाज करत ते सावट आमच्याभोवती घिरट्या मारू लागले, तिचे बाबा म्हणत होते, अखंड नामस्मरण चालू ठेव ती तुला स्पर्श देखील करू शकणार नाही, ते बोलत होतेच तर एका जोरदार आघाताने ते दूरवर फेकले गेले, भिंतीवर जोरात आदळल्याने ते जागीच मूर्च्छित झाले, मला बाहेर निघायला हवं पण आदनाला सोडून नाही,
आजूबाजूला पाहतोय तर ती कुठेच नव्हती,
माझं मन विचलित होत होतं, मी खूप घाबरलो, किंचाळण्याचे ओरडण्याचे, विचित्र मंत्रांचे आवाज माझं मन व्यापू पाहत होते, माझ्या नामस्मरणाची तीव्रता किंचित खालावते तोच, माझ्या अंतरातून मला आवाज आला,
डोळ्यांसमोर शुभ्र सोवळे नेसून, शांत मुद्रेने बाबा होते, म्हणत होते, "निघ इथून आताच, आताच वेळ आहे, तू इथून बाहेर आल्याशिवाय मी तुझी मदत करू शकणार नाही, आदनाचा विचार आता करू नकोस, जोपर्यंत तिच्या पोटात तुमचा अंश आहे ती सुरक्षित असणार आहे इथे, आता तू बाहेर निघ, आणि तो हाताला बांधलेला धागा आधी सोड, आणि पळ, आपले आराध्य तुला वाट दाखवतील, नामस्मरण कर, अखंड नामस्मरण"

त्या प्रत्येक्ष माझ्यासमोर येऊन मला अडवत नव्हत्या पण त्यांची शक्ती, ह्या घरातील प्रत्येक वास्तूच्या कणाकणात वास करत होती,
जी मला अडवत होती, मी धावत सुटलो, बेभान, नामस्मरणामुळे मला प्रत्येक्ष इजा होत नव्हत्या पण न जाणे काय काय आघात होत होते माझ्यावर, कुठून कुठून वस्तू अंगावर येत होत्या, वरून खाली अदालत होत्या, मी घरात प्रत्येक दारावर वेड्यासारखा आदळत होतो, कोणतंच दार उघडायचं नाव घेत नव्हतं, घराचं मुख्य दार तर गायबच झालं होतं, जोरजोरात हसण्याचे आवाज मला भेदरवुन टाकत होते,
आता हार मानण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, माझी मनशक्ती क्षीण झाली होती, पण बाबांचे शब्द आठवले, आपले आराध्य तुला वाट दाखवतील, इथे काहीतरी मार्ग असणार, नाहीतर बाबाही इथून बाहेर पडले होतेच कि, मी सगळ्या खोल्या वेड्यासारखा जोरात दार उघडण्याचा प्रयत्न करू लागलो, वीज चमकावी तशी मला आठवण झाली कुलूप वाली खोली, मी धावत तिकडे गेलो,
एव्हाना हसण्याचे आवाज ओरडण्यात किंचाळण्यात बदलले,
तिथेच पडलेल्या एका वस्तूने आघात करून मी ते कुलूप तोडतच होतो तर मुख्य दारापाशी एक अजस्त्र प्राणी माझ्याकडे हिंस्र नजरेने पाहत होता, त्याची गुरगुर ऐकून माझा थरकाप उडाला, काय होता तो, माझ्या संपूर्ण आयुष्यात मी असलं काही ऐकलं वाचलं नव्हतं, तो माझ्याकडेच येत होता, साक्षात मृत्यू समोरून माझ्याकडे झेपावत होती,
मी जोरजोरात आघात करून दार उघडत होतो, कुलूप तुटलं, ते प्राणी माझ्यावर झेपावलं, मी त्याच्या पकडीत आलोच होतो तर दार उघडलं आणि मी त्या खोलीत होतो, आणि ते प्राणी त्या खोलीच्या बाहेर, दोघेही समोरासमोर, दार सताड उघड, तो दारातूनच माझ्यावर झेपावू पाहत होता,
त्याने पुन्हा उडी घेतली, आता मृत्यू फक्त मृत्यू, मी जोरात नामस्मरण केलं आणि मेन वितळावं तसा तो चौकटीतच वितळला,
मी एका भिंतीला चिपकून ते दृश्य पाहत होतो,
तो प्राणी, ते आवाज, ते वादळ ते नव्वळ मनाचे खेळ होते, मन विचलित करण्यासाठी त्या अघोरी शक्तीने निर्माण केलेले भास आणि ह्या खोलीत प्रवेश करू शकत नव्हते, हीच ती अधिष्ठानाची खोली, इथेच काहीतरी मार्ग असणार होता, मी सगळीकडे शोधलं काही मिळालं नाही, सगळ्या भिंती चापून पहिल्या काही छुपा दरवाजा वैगेरे काहीतरी, पण काही दिसत नव्हतं, मी त्या खोलीत सुरक्षित होतो पण मला घाई करायला हवी होती, माझी आदना तिचे बाबा तिच्या कचाट्यात होते आणि आमचं बाळ देखील ...
खोलीत एकही वस्तू नव्हती, फक्त भरपूर रांगोळी सांडली होती, कदाचित बाबांच्या अधिष्ठानाच्या वेळेस आखलेला रिंगण होतं, भिंतीत काही मिळत नाही म्हणून मी खाली फरशीवर शोधू लागलो, माझं मन सांगत होतं दरवाजा असावा इथेच पण शोध शोध,
मी त्या रांगोळ्यात शोधत होतो तर मला त्यात चावी मिळाली लहानशी, चावी आहे म्हणजे दरवाजा आहे, मी पुन्हा भिंतीत शोधू लागलो, आणि ते दिसलं लहानसं छिद्र, मार्ग मिळाला होता, मी चावी लावून पहिली, करकर करत दार उघडलं गेलं, एक चित्त थरारक किंचाळी पूर्व घर हलवून गेली,
त्या चक्राला दुसरा तडा मिळाला होता,
पूर्ण भिंतीत असलेला हो दरवाजा शोधायला खरंच कठीण होतं, आता समोर कुंपण आणि काहीच अंतरावर फाटक होतं आणि मी बाहेर असणार होतो, मी जीव मुठीत घेऊन सरळ त्या फाटकाकडे झेपावलो,
आजूबाजूची झाडे जणू मला अडवायला माझ्या कडे झेपावत होती आणि ते अजस्त्र बोडकं उंचच उंच झाड माझ्या अंगावर लोटणार होताच तर मी त्या फाटकाबाहेर उडी घेतली,
एक मोठं सावट जणू मला गिळायला आलं होतं आणि मी आता ह्या क्षणाला त्यांच्या कचाट्यातून वाचलो होतो,
ते पूर्ण घर घुमत होतं, हुंकार येत होते त्या घरातून, कुणीतरी जोरात धुमसत असल्याचे आवाज येत होते,
मी पूर्णपणे क्षीण झालो होतो, डोळे आपोआप मिटत होते, आणि मिटणाऱ्या डोळ्यांत समोरून शांत मुद्रेने माझ्याकडे येणार बाबा दिसत होते,
हो बाबा आले होते, त्यांचे दर्शन होताच मी सुटकेचा निश्वास सोडला आणि डोळे मिटले . . .

काय माहित किती वेळ बेशुद्ध होतो, पण जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा, बाबांच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेलो होतो आणि बाबांचं अखंड नामस्मरण चालू होतं,
माझ्या डोळ्यांत पाहून त्यांचेही डोळे पाणावले,
माझ्याकडे बोलायला सांगायला खूप काही होतं पण त्यांनी डोळ्यांनीच सांगितलं मला माहित आहे सगळं,
मी त्यांना बिलगून लहान मुलासारखं रडलो, खूप रडलो, त्यांची माफी मागितली, अर्थात त्याची गरज नव्हतीच पण माझं मन मला काचत होतं, चुकी नसताना मी त्यांनाच गुन्हेगार समजत होतो,
त्यांच्या मिठीत माझं गेलेलं सगळं बळ नव्याने एकवटलं, नवीन हुरूप आला होता मला,
आता वेळ वाया घालवून चालणार नव्हता, आम्हाला फक्त आदना आणि तिच्या बाबांनाच वाचवायचं नव्हतं तर त्या शक्तीला आणि जे बाहेर येऊन अमर होऊ पाहत होतं त्या अघोरीला समूळ नष्ट करायचं होतं,
त्यासाठीच बाबांनी इतके वर्ष तप, पूजा, नामस्मरण करून सामर्थ्य प्राप्त केलं होतं,

"तिने ह्या आधी आपल्या परिवारावर घात करून आपल्याला तोडलं होतं, आणि आता पुन्हा तेच करू पाहतेय, पण आता नाही, तिचा समूळ नाश केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही, आणि एक खूप वाईट गोष्ट होणार आहे, उद्या येणाऱ्या अमावास्येला ती गर्भार स्त्रीचा म्हणजे आदनाचा बळी देणार आहे, तिला कळलं आहे कि आता आपण गप्प राहणार नाहीत, म्हणून तिने विधी मध्ये बदल केलेत, त्यामुळे तिचा तोटा होणारच आहे कारण तिच्या अंशाचा बळी ती त्या अघोरीला अर्पण करणार आहे त्यामुळे तो एकटाच अमर होईल, आदनाच्या आईला आता काही शक्ती मिळणार नाही, तसाही तो अमर झाला कि ते मिळून मार्ग काढतीलच, पण आता त्यांच्या साठी तो अघोरी ह्या भूतलावर येणं जास्त महत्वाचं आहे, आणि ह्या क्रियेत आदना सगळ्यात महत्वाची आहे, आणि त्यानंतर तिच्या वडिलांचं शरीर जे अघोरीने स्वतःच्या वावरासाठी निवडलं आहे"

बाबा सांगत होते, मला काहीच कळत नव्हतं, मी ज्या देवाचं अस्तित्व काही वर्षे झिडकारलं होतं, त्याच्या नुसत्या नामस्मरणाने मी इथे सुरक्षित बसलो होतो,
आम्हाला घाई करावी लागणार होती,
बाबांनी सगळी तयारी करायला घेतली, तोवर त्यांनी मला मनोभावे माझ्या आराध्याच नामस्मरण करायला लावलं,
मी कितीतरी वर्षांनी त्या गाभाऱ्यात प्रवेश करत होतो, प्रवेश करतात माझ्यात नवीन चैतन्य संचारलं, सगळं ठीक होईल हि भावना आपोआपच मनावर उमटू लागली,
सतत २ प्रहर मी न थांबता नामस्मरण करत होतो,
बाबांची तयारी झाली होतीच त्यामुळे तेही माझ्या सोबत नामस्मरण करू लागले, ३ प्रहर मी तसंच मनोभावे नामस्मरण करत होतो, बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मन तृप्त झालं होतं, मन भरून आलं, आणि मी जागीच झोपलो कसा कळलं नाही, कानावर बाबांचे मंत्रपठण येत होते, पण माझ्यात समाधानाच्या शांततेच्या लहरी वाहत होत्या जणू,ते मंत्र कणाकणाने माझे मन खंबीर आणि कणखर बनवत होते,
दुसऱ्या दिवशी दुपार नंतर मला जाग आली, बाबांचे मंत्र पठण पूर्ण झाले होते, त्यांनी रुद्राक्ष माळ माझ्या कपाळी लावली,
आणि म्हणाले, मन कणखर कर, हे युद्ध आपल्याला आपल्या मनाच्या शक्तीने जिंकायचं आहे, मन विचलित होऊ देऊ नकोस, मी सांगेन त्याकडे नीट लक्ष दे. . .

"आपल्याला त्याच खोलीत प्रवेश करून पुन्हा अधिष्ठान करायचं आहे, मी मंत्रउच्चारण करत राहीन पण तुला प्रत्येक्षात तिच्या शक्तीशी लढायचं आहे,
कठीण आहे पण अशक्य नाही,
आता ती विधी करायला बसेल, काहीच मिनिटांनी आमावश्या चालू होईल, ह्या काळात तिची विधी पूर्ण करून एका विशिष्ट पद्धतीने बळी देणार, एका विशिष्ट रिंगणात बसून सर्व आहुत्या आदनाच्या अंगावर टाकूनच तो बळी मान्य होणार आहे, लक्षात ठेव, त्याच्या आधी जर तिला काही झालं तर तिचा विधी पूर्ण होणार नाही, त्यामुळे तुला काही करून अदनाला त्या रिंगणातून बाहेर काढून आणायचं आहे तरच तिचा जीव वाचेल नाहीतर अनर्थ होईल,
जर बळी पोहोचली तर तो अघोरी त्या झाडातून बाहेर येऊन आदनाच्या वडिलांच्या शरीराचा ताबा घेईल कायमचा आणि अघोर साम्राज्य स्थापित होईल ह्या भूतलावर,

पण कायम लक्षात ठेव ह्या काळ्या शक्तींच्या वर ईश्वरी शक्ती असते, शिव तुझ्या सोबत असतील कायम, तुझ्या मनात वास करतात ते, ध्यान करत राहा त्याचं,
तुला तिची विधी उध्वस्त करायची आहे आणि मी इकडून त्या झाडाला नष्ट करेन, तिचे ते अभद्र मंत्र थांबले तरच मी ते झाड नष्ट करू शकेन, शिव तुझं रक्षण करो "

त्यांनी ती रुद्राक्ष माळ माझ्या गळ्यात दिली, तुझा त्या शक्तीपुढे निभाव लागायला मदत होईल, आणि मनावर ताबा ठेवायला सुद्धा . . .

आम्ही दोघांनी त्या घरात पुन्हा प्रवेश केला, ह्यावेळेस काही प्रतिकार झाला नाही आम्हाला, कारण ती पूर्ण तयारीत होती,
तिचे जोरात मंत्रोच्चरण चालू होते, घर जणू स्वतः भोवतीच घुमत होते, ते सावट सगळीकडे घिरट्या घालत होतं, आम्ही अधिष्ठानाच्या खोलीत प्रवेश केला,
बाबांनी रिंगण आखले, कापूर, धूप, सगळ्या पवित्र वस्तू, समोर मांडल्या आणि माझ्या हातात ते दिलं, ज्याने तिचा नाश होणार होता,
विशिष्ट पवित्र वस्तूंनी विशिष्ट पूजा करून माझ्या आराध्यांच्या अभिषेकाचे अभिमंत्रित जल,
जे मंत्रोच्चारण थांबल्यावर त्वरित तिच्या अंगावर टाकायचं होतं, नुसता स्पर्श देखील झाला तरी तिचा नाश अटळ होता, आणि बाबदेखील ते जल त्या झाडाच्या बुंध्याशी टाकून त्याच्या नाश करणार करणार होते पण...
ते इतकं सरळ आणि सोपं नव्हतं . . .

बाबांचे मंत्रोच्चरण चालू झाले, मी ते जल स्वतः जवळ संभाळुन ठेऊन त्या खोलीच्या बाहेर प्रवेश केला,बाहेर वादळ पेटलं होतं, बाबांचे मंत्रोच्चार आणि आदनाच्या आईचे मंत्रोच्चार एका लयीत, एकावर एक वरचढ होत चालले होते,
एकीकडे अघोर काळ्या शक्तीला जागवण्यासाठीची मंत्र तर दुसरीकडे त्या शक्तीला थोपवण्यासाठी माझ्या आराध्यांचे मंत्र . . .
अधिष्ठानामुळे तिच्या पूजेत अडथळे येत असावेत त्यामुळे ती किंचाळत ओरडत होती, मला आदनाला शोधायचं होतं,
मी साधनेच्या खोलीत प्रवेश केला, हवनासमोर एका विशिष्ठ रिंगणात आदना बसलेली होती, ती निश्चल होती, तिच्यासोबत काय होणार आहे तिला पूर्ण कल्पना आली होती, कदाचित तिने मृत्यूचा स्वीकार केला असावा तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते, तिच्या बाजूला तिचे वडील अर्धमूर्च्छित अवस्थेत बसले होते,
मी जोरात ओरडलो आदना, कदाचित सगळं प्रेम एकवटून आर्त हाकेमुळे ती शुद्धीवर आली, माझ्याकडे पाहू लागली,
अचानक माझ्या भोवती ते सावट घुमायला लागलं, मला आदनाकडे जाण्यापासून रोखू लागलं, त्या जोरजोरात हसू लागल्या,
मूर्ख माणसा माझा विधी तुझा बाप देखील रोखू शकणार नाही तू तर माझ्यासमोर काहीच नाहीस,

मी जोर जोरात ओरडू लागलो आदना उठ, पळ इथून त्या कुलूप बंद खोलीत जा, धाव आम्ही तुझी मदत करायला आलो आहोत, जा नाहीतर तुला, आपल्या बाळाला हे मारून टाकतील, उठ, आणि मी गळ्यातली माळ तिच्या कडे फेकली, हि घाल तुला मदत होईल,
मी माळ काढली तसा मी एका भिंतीवर जोरात आपटलो गेलो,मरण यातना काय असते ते जाणवलं इतकं लागलं, मूर्खपणा केला, ती माळ दूर फेकली गेली,
मंत्रोच्चारण जोरात होऊ लागले, आणि एक अनपेक्षित घटना घडली,

आदना मला म्हणाली, "माझ्यामुळे तू ह्या कालचक्रात अडकला आणि सुटलेला पुन्हा परतही माझ्यासाठीच आलास, धैवत मला माफ कर पण सगळ्यांपेक्षा मला तू महत्वाचा आहेस, माझ्या नंतर तू स्वतःची सुटका करशील पण त्या आधी ह्या कैदाशिणीचा नाश कर"

कोणाला काही कळायच्या आत ती रिंगणातून बाहेर पडली, बाजूलाच पडलेलं धारदार पात उचलू धावतच स्वतःच्या गळ्यात खुपसलं, कोणाला काही कळायच्या आतच ती माझ्या डोळ्यांदेखत प्राण सोडून पडली होती,
मी सुन्न झालो होतो, सगळं संपलं होतं,
माझ्यापेक्षा मोठा धक्का तिच्या आईला बसला होता, असं काही होईल ह्याची अपेक्षाच नव्हती त्यांना,
त्या रागाने उठून त्यांनी आधी आदनाच्या वडिलांना लाथेने भिंतीवर उडवलं, पूर्ण शरीराच्या चिथड्या होऊन ते तिथेच मरण पावले,
त्या अत्यंत्य क्रोधीत झाल्या होत्या,
त्यांचे इतक्या वर्षांचे प्रयत्न आदनाच्या ह्या अनपेक्षित कृत्याने धुळीत मिळाले होते, आता काहीच शक्य नव्हतं,मी तर शुद्धीतच नव्हतो,
त्या माझ्याकडे वळल्या, त्यांचे मंत्रोच्चार थांबले होते, आता मी मरणाला तयार होतो, जिच्यासाठी इतकं केलं तिला मी माझ्या डोळ्यांदेखत मरताना पाहिलं आता जगून काय करणार होतो,
त्यांच्या नजरेनेच माझ्या शरीरावर असंख्य घाव होत होते मी मरणार होतोच तर त्या माझ्याकडे न वळता सरळ बाहेर अंगणात धावल्या, मंत्रोच्चार थांबल्याने बाबांनी त्या अघोरीच्या मुळाशी जल टाकलं होतं, होळी पेटावी तसे ते झाड जळत होतं, सगळं नष्ट झालं होतं, तिने रागाने बाबांना कुंपणावर फेकलं,
ती सर्व शक्ती एकवटून बाबांवर प्रहार करत होती, माझ्या डोळ्यांदेखत ते सगळं होत होतं पण मी सुन्न होतो,
बाबा जोरात ओरडले, नामस्मरण कर. ते जल टाक तिच्या अंगावर, नाहीतर भयानक मृत्यू मिळेल, लवकर,
त्या क्षणाला इतकं सगळं पाहून देखील माझं मन कस कणखर झालं अजूनही मला कळलं नाहीये, पण त्या ३ प्रहरच्या अखंड नामस्मरणाचा प्रभाव असावा,

तिचा खेळ बाबांमुळे विस्कटला होता, क्रोधात ती धुमसत होती, तिने सगळ्या शक्ती एकवटून बाबांवर आघात केला आणि मी त्याचवेळी ते जल तिच्या अंगावर टाकलं,
आगीचा भडका उडाला, तिच्या किंचाळ्या ऐकून तर त्या घराच्या भिंतींनी देखील कानावर हात ठेवले असतील,
ती जाळून तिथेच भस्म झाली, ते घर देखील कोसळलं. .

कालचक्र संपलं होत, सगळं उद्धस्त झालं होतं , माझ्या शरीरावर अगणित जखमा झाल्या होत्या, पूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं ,
पण त्या क्षणी मी जिंकलो होतो,
आणि हरलो देखील मीच होतो, मी तुझ्या आजोबांना, आईला, त्या पोटात अजून रूपालाही न आलेल्या माझ्या अर्भकाला आणि आदनाच्या वडिलांना कायमचा गमावून बसलो होतो. . .

- सगळं विसरून मी पुन्हा शिवाच्या भक्तीच स्वतःला वाहून घेतलं,
काही दिवसांनी अचानक नुकतच जन्मलेलं बाळ माझ्या अंगणात रडत सोडून गेलं, तुला कुणीतरी माझ्या पायरीशी ठेऊन गेलं होतं, कदाचित माझ्या आराध्यांनी माझं बाळ मला परत केलं असावं, आणि तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलास. . .

इतकंच, काहीही असलं तरीही तू माझाच अंश आहेस, हे शिव आणि तूच माझं विश्व् आहात,
आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेव,
- ईश्वरी शक्तीपुढे कोणतीच शक्ती काहीच नाही, ईश्वरी शक्तीत पवित्रपणा, निस्वार्थ भाव असतो, मनोभावे नामस्मरण करत राहायचं, हे शिव सदैव आपल्या सोबत आपल्या मनात असतात . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त झाली कथा,
पूर्ण झाल्यावर परत एकदा वाचेन असे ठरवले होते, आता परत वाचेन, पण काही टायपो राहिले आहेत, कृपया बघाल का?

खूप छान आहे कथा...
मागील भागांवर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही... आज पुर्ण झाली म्हणून आवर्जुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मस्त.
शेवटही छान.
ओघवती शैली आणि खिळवून ठेवणारे कथानाक यांमुळे मजा आली.
पटापट पुढील भाग टाकून आणि कथा फार लांब न खेचल्याचे विशेष आभार.
तुमच्या पुढील लेखनासाठी फार उत्सुक.
शुभेच्छा.

विनिता मॅम धन्यवाद, सुधारणा केली आहे मी, प्रसन्न सर, सामान्य वाचक मॅम, किल्ली मॅम, प्रवीण सर, माधव सर, धवल सर, विचार सर, अथेना मॅम,
सगळ्यांचे खूप खूप आभार, तुमचे प्रतिसाद खूपच महत्वाचे आहेत. . . मनापासून आभार . . .

छान झालीये.. थोडं वाढवला असता हा भाग तरी चालले असते. म्हणजे लवकर संपवलंत. या भागात जे लिहिला ते अजून विस्तारून लिहलं असता तर.. 2 भाग झाले असते अजून. घाई केलीत.

सगळ्यांचे खूप खूप आभार,
आसा सर, मला पुढच्यालेखनात काळजी घेईन,
शीतल मॅम, सुचलं तसं लिहलं, पण पुढच्या वेळेस विचार करेन.