Submitted by निशिकांत on 20 November, 2019 - 00:52
मनाचे तुझ्या बंद का दार आहे?
आता प्रेम कसले? अहंकार आहे
जरी भोवती दाट अंधार आहे
तयाचाच मी हात धरणार आहे
शहाणी न बोलून आहेस तू पण
अबोला तुझा बोलका फार आहे
तुझा स्वार्थ प्रेमातही गुंतलेला
सुखांचा तुझ्या मी गुणाकार आहे
लिहू काय मी आत्मवृत्तात आता?
जगी प्रेम हा एक व्यवहार आहे
मनाने मनाला किती शांतवावे?
इथे वंचनांचाच बाजार आहे
अता सांगतांना मला मीच गोष्टी
उसास्यात मझाच हुंकार आहे
असा आरसा चेहरा टाळतो का?
तिरस्कार माझा पुरस्कार आहे
मनी पालही चुकचुकावी अशी का?
कमी आत्मविश्वास आजार आहे
किती ऐट "निशिकांत"ला शायरीची !
रुहानी ग़ज़ल हा अलंकार आहे
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. आवडली गझल.
छान. आवडली गझल.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
डॉ बिरुटे साहेब, मनापासून
डॉ बिरुटे साहेब, मनापासून आभार आपले प्रतिसादासाठी.
सुरेख!!
सुरेख!!
सामो, आभार आपले प्रतिसादासाठी
सामो, आभार आपले प्रतिसादासाठी.
तुमच्या गझल उत्तम असतात
तुमच्या गझल उत्तम असतात
आत्ताची गझल पण सुरेख........