झोप येऊ नये म्हणून उपाय

Submitted by रे on 25 November, 2019 - 07:44

माझी मुलगी या वर्षी दहावी ला आहे पण वर्ष संपत आले तशी तिची झोप अनावर होत आहे.... सतत झोप येते , कुठे ही बसली तरी पेंगते बेड ची गरज आहेच असेही नाही .... कृपया उपाय सुचवा सुट्टी च्या दिवशी 8 नंतर उठते , बाकी दिवस 6 ला, सकाळची शाळा आहे.

रात्री जागत नाही 11 पर्यंत सगळे झोपतो, अभ्यासच होत नाही जबरदस्ती बसवले तर फिके दुखायला लागते.....
काय करू .... खुप टेन्शन आले आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टरना विचारा.काही डेफिशियन्सीज असतील तर दूर होतील.तुमची मुलगी आधीही अशीच झोपायची का?
कदाचित अभ्यासाचे टेन्शन असल्यामुळे तिच्याही नकळत हे रनिंग अवे होतंय का हे पहा.
कृपा करून जबरदस्तीने अभ्यासाला बसवू नका ही विनंती.अर्थात सल्ला द्यायला सोपे असते हे खरंय्,तरीही तिचे डोके दुखते अशावेळी ही बाब दुर्लक्ष करू नका.

देवकी +१
इतर कुणाला विचारण्या आधी/स्वतःच उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अभ्यासाचे टेन्शन असल्यामुळे तिच्याही नकळत हे रनिंग अवे होतंय का हे पहा.>>+१

नक्की किती तास झोपते ती?
मी शाळेत असताना (सोम-शनी)रात्री १०.३० ला झोपायचे. सकाळी ६ ला उठायचे(सकाळची शाळा...१२वी पर्यंत). दुपारी १ ला घरी आल्यावर जेऊन परत तास-दोन तास डुलकी Proud
पहाटे उठून अभ्यास करायला जमायचेच नाही. सुट्टीत मात्र न चुकता ५.३० ला उठून बाबा/बहीण्/मैत्रिण बरोबर फिरायला जायचे अन घरी आल्यावर पुन्हा तासभर झोपायचे.

जास्त झोप येणे हे हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे होऊ शकते...सीबीसी करून घ्या... जागण्यापेक्षा लवकर उठणे शक्य आहे का

रात्री जागत नाही 11 पर्यंत सगळे झोपतो>>
मी दहावीत होते तेव्हा नॉर्मल बेड टाईम ९ असे. ९-११ अभ्यास म्हणजे जागरण.
शाळा असेल तेव्हा ६ ला उठणे आणि सुट्टीच्या दिवशी ८ नंतर हा पॅटर्न चुकीचा. शक्यतो सुट्टीच्या दिवशीही साधारण नेहमीच्या वेळेला उठावे म्हणजे बॉडी क्लॉक मधे पॅटर्न सेट रहातो. टिनेजर्सना १० तासाची झोप गरजेची. डॉक कडे जावून काही कमतरता नाही ना हे देखील तपासून घ्या. बर्‍याच मुलांना दुपारी शाळेतून घरी आल्यावर तासाभराची झोप मिळाली की अभ्यास करायला उत्साह वाटतो. लेकीच्या दहावीचे तुम्हाला टेन्शन असेल तर ते तिलाही जाणवेल. त्या ताणाने मनाला थकवा आला असेल तर जबरदस्तीने अभ्यासाला बसवून फक्त पेंगणे होणार. त्यामुळे अभ्यासाला जबरदस्तीने बसवून नका. मला स्वतःला परीक्षा जवळ आली की झोप अनावर व्हायची. अभ्यास पूर्ण झालेला असे तर त्या वेटिंगचाच कंटाळा/ताण येई. थोडा वेळ गोष्टीचे पुस्तक वाचले की झोप उडायची मग रिविजन असे चाले.

खरं तर दिवसभरात तिचा अभ्यास पुरेसा होत असेल तर मुद्दाम तिचा पॅटर्न बदलणं आवश्यक नाही. विशेषतः आपण इतर मुलांना जागरण वा पहाटे लवकर उठून अभ्यास 'पाडताना' बघतो वा ऐकतो, त्यामुळे नकळतपणे तुलनेत तिचं अति झोपणं वाटू शकतं.
डॉक्टरांना विचारुन बघायला हरकत नाही, तरीही तुम्हाला शक्य असेल तर तिला सोबत म्हणून कोणी तरी थांबा त्या वेळी इतर काही काम करीत अथवा पेंग लागेल तेव्हा तुम्ही कोणी पाठ्यपुस्तक वा उत्तर यांचं मोठ्यानं वाचन करा तिच्यासमोर. (हतवळणे यांच्या पुस्तकात वाचलं होतं. तसंच मनःशक्ती केंद्राच्या पुस्तकात)
अवांतर :झोप कमी करण्यासाठी उपाय सापडला की धाग्यावर जरूरच सांगा. मलाही उपयोग होईल.

हा एकंदर तब्ब्येतीमुळे किंवा अभ्यासेतर गोष्टीमुळे ऊद्भवलेला मामला नाही असे गृहीत धरून....

झोपेला जागवून ऊपयोग नाही अभ्यासातल्या ईंट्रेस्टला जागवावे.

ह्या वयातले विद्यार्थी एक तर फुंगसूक वांगडू सारखा अभ्यास करू शकतात किंवा राजू रस्तोगी सारखा, आपल्याला काय मिळवायचे आहे ह्याची समज येईपर्यंत ह्या लहान वयात दोन्ही ठीक आहेत.
पण विद्यार्थी फरहान कुरेशी असेल तर त्याला दोन्ही प्रकार जमणार नाहीत.

तुम्ही अभ्यासासाठी मुलीवर जबरदस्ती करताय असे वाटत नाही का तुम्हाला? रात्री ११ ते सकाळी ८ असे ९ तास झोप सुट्टीच्या दिवशी योग्य आहे की.

शाळेचे विषय, पुस्तकं, उत्तरं लिहिण्याची पद्धत कंटाळवाणी झाली आहे.
((शिक्षकांच्या डीएड/बीएड अभ्यासक्रमाची पुस्तकेही भयानक कंटाळवाणी आहेत!!))
झोप येणारच.

अजून नोव्हेंबर महिना चाललाय, शक्य असेल तर एखाद आठवडा मनावर दगड ठेवून तिला झोपण्यावरून बोलू नका. कदाचित आई बोलेनाशी झाली म्हणून जबाबदारी ची जाणीव होऊन अभ्यास नीट करेल. तिला तिच्या आवडीचा अभ्यास करू द्या. नाही फरक पडला तर गोड शब्दांत जबाबदारी ची जाणीव करुन द्या.
माझ्या लहानपणी च्या कॉलनी ग्रुप मधले शाळेत किंवा कॉलेजात एखादी गटांगळी खाल्लेले, दहावी- बारावीला खूप काही मार्क न मिळालेले पण आज छानच आयुष्य जगत आहेत. मला नुकतेच कळलंय की आजकाल अकरावीच्या admission ला entrance test असते. दहावीच्या मार्कांवर काही अवलंबून नसते. मैत्रिणीची दहावीला असलेली मुलगी अकरावीच्या entrance देते आहे. तिला हव्या त्या कॉलेज ची admission मिळाली की दहावीचा परीक्षेचं, मार्कांच pressure कमी होतं असं मैत्रीण म्हणत होती.
All the best, तुम्ही काळजी न कारण जास्त महत्त्वाचे करणे तुम्ही काळजी करताना दिसला की मुलीची काळजी करायचं pressure कमी होतं.

अभ्यास मध्ये इंटरेस्ट नसतो त्या मुळे तो गोष्ट कंटाळवाणी होते

मग पुस्तक समोर दिसले की झोप येते.
पण तेच आवडीच काम करताना झोप येत नाही.
अस सुधा जास्त वेळ अभ्यास केला की जास्त मार्क पडतात अस काही नाही थोडाच पण मन लावून केलेला अभ्यास जास्त फायदा देतो.
माझ्या मुलाच्या वरून सांगतो.
आता अशी परिस्थिती आहे की क्लास आणि शाळा मुलांना पूर्ण विषय समजून घेण्याचा सल्ला देतच नाहीत फक्त जे प्रश्न येतील अस वाटत त्याचीच फक्त उत्तर पाठ करायला सांगतात.
ह्या मुळे पायाच कच्चा राहतो.
सर्वात महत्वाचे 10 आणि 12 वीच्य मार्क ला जास्त किंमत नाही.
महत्वाचे मेडिकल,इंजिनिअर,CA
Etc इथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा असते.
10/ 12 वी चे मार्क 70% chya आत असतील तरी काही फरक पडत नाही.
उत्तम healthy शरीर असेल तर माणूस फ्रेश राहतो.
तिला फिजिकल activity करण्यास थोडा वेळ ध्या .
योगा,किंवा तत्सम

महाराष्ट्रात तरी दहावीच्या मार्कांवरच कॉलेज अ‍ॅडमिशन आहे. पण विशिष्ट कॉलेजला प्रवेश मिळाला नाही तर काही खरं नाही, असं समजायचे दिवस गेलेत. त्यामुळे अमुक इतकेच मार्क हवेत हे टेन्शन नको.

डॉक्टरांना भेटा.
रक्तात हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे थकवा येतो, सारखी पेंग येते. उत्साह वाटत नाही.
मला ही असं होत होतं. सीबीसी केल्यावर डॉकनी दिलेल्या गोळ्या चालु केल्या. आता फार फरक आहे.

16 वर्षा ची मुलगी आहे.
Bp low
हिमोग्लोबीन कमी.
D जीवनसत्वाची कमी.
ह्या शक्यता कमीच.
सर्रास मुलांना अभ्यास करताना झोप येते

मी दहावीत असताना सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत झोपायचे. शिवाय दुपारची झोप! यामुळे काळजी वाटून माझे बाबा मला आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेले. सर्व तपासण्या केल्या. त्यात काही वेगळे दिसले नाही. तेव्हा डॉक्टर काकांनी सांगितले होते की हे वय वाढीचे वय असते. शरीराची वाढ ही झोपेत असताना सर्वाधिक होते. Growth hormones ही गाढ झोपेत पहाटेच्या वेळी स्रवतात. तेव्हा टीनेजमध्ये अधिक झोप येऊ शकते.
तरीही चाचण्या करून घ्या. डॉक्टरांनी तपासू दे. शक्यतो तिची रात्रीची झोप नीट पूर्ण होईल असे बघा. शुभेच्छा!

मी दहावीला होतो तेव्हा PL चालू झाल्यावर अचानक सवयी/ मनाविरुद्ध खूप अभ्यास करायला सुरुवात केली.
परिणामी, झोप जास्त येणे, जेवण करायची इच्छा न होणे, अबोलपणा वाढणे, एकच पान अर्धा तास वाचून सुद्धा काही न समजणे असे सर्व चालू झाले.

काही दिवसातच इतका अभ्यास करणे हा आपला पिंड नाही हे लक्षात आले.

निवांत खेळणे, गाणी ऐकणे, अवांतर पुस्तके वाचणे असे करत अभ्यास केला. आठवी नववीत जेवढे मार्क पडायचे त्यापेक्षा थोडे जास्तच मार्क पडून उत्तीर्ण झालो.

देवदयेने आता सगळे ठीक आहे खाऊन पिऊन सुखी आहे Happy

तात्पर्य:- चिल. लै टेन्शन घेऊ नका.

घेऊन गेले. सर्व तपासण्या केल्या. त्यात काही वेगळे दिसले नाही. तेव्हा डॉक्टर काकांनी सांगितले होते की हे वय वाढीचे वय असते. शरीराची वाढ ही झोपेत असताना सर्वाधिक होते. Growth hormones ही गाढ झोपेत पहाटेच्या वेळी स्रवतात.
तेव्हा.
डॉक्टर नी ओळखले असेल तुमच्या शंका आणि प्रश्न ह्यांचे उत्तर
देणे म्हणजे अजुन एक नवीन प्रश्न ओढवून घेणे.
म्हणून हार्मोन्स च पिल्लू सोडून दिले .
काय करणार तो बिचारा डॉक्टर

भरत, चांगल्या लिंक्स.
माझा मुलगा रात्री लवकर झोपत नाही. त्याचं उत्तर मिळालं.

सगळ्यांची आभारी आहे.
टीव्ही मोबाइल चालू असेल तर झोप गायब असते. रात्री जागून किंवा पहाटे लवकर अभ्यास करायला सांगतच नाहीये.
संध्याकाळी अभ्यास करताना पण तिला झोप येते, शाळेत पण तेच , तिच्या मैत्रिणी देखील झोप काढत असतात....

सकाळी झोपेतून उठल्यावर देखील फ्रेश नसते ,,,
एक तास पेक्षा जास्त अभ्यास म्हणजे कहर असा प्रकार आहे म्हणून काळजी वाटते

कोणता विषय अभ्यास करताना झोप येते ते बघा. मला जॉग्राफी वाचताना बोर व्हायचे. मग असा विषय आधी घ्यायचा 30 मीन . नंतर आवडीच्या विषयाकडे वळायचे जसे कि गणित, हिंदी वगैरे .
दहावीला एक तास अभ्यास पुरे आहे. लहान लहान चॅप्टर असतात - एकाच दिवशी अक्खे पुस्तक संपवायच्या मागे लागू नका.

रे, सध्या सेम परिस्थिती आहे आमच्या घरी पण. त्यामुळे समजू शकते.
अजून उपाय सापडला नाही. पण तरी मी काय करते ते सांगते.
लेक तिच्या रुममध्ये बसते अभ्यासाला. मी तिला अधूनमधून हाक मारत असते. रुम बाहेर बोलावते. एखादी छोटीशी मदत मागते. नाहीतर एखादा व्हिडिओ दाखवते. थोड्या गप्पा मारल्या की ती जरा फ्रेश होते.
त्या वेळात अभ्यासाबद्दल शक्यतो काही बोलत नाही. तिला बोलायचे असेल तर ऐकून घेते. सकाळी लवकर उठवले अभ्यासाला तर आधी रुम बाहेर येऊन ब्रेकफास्ट करायला लावते. इथे सध्या खूप थंडी असल्याने पांघरुणातून उठवत नाही मग पेंग येत राहते. जरा रुम बाहेर पडली की झोप उडते तिची. एखाद्या दिवशी ती खूपच पेंगुळलेली वाटली तर तिला झोपू देते. काही बोलत नाही. माझाही पेशन्स संपतो कधी कधी, वाद होतात, मी चिडतेपण. पण तिच्या वर चिडून काही फायदा नाही हे आता समजले आहे.
वरील उपायांचा थोडाफार फायदा होतो आहे.
तळटीप - गेल्या महिन्यात काही कारणाने तिच्या सगळ्या टेस्टस् करवल्या होत्या. काही डिफिशियन्सी नाहीये. पण तरीही तिला खूप झोप येते. अभ्यासाच्या ताणामुळे होत असावे. शक्यतो ताण कमी करायचा मी आणि बाबा प्रयत्न करतो.

निदान ८ तास चांगली, शांत झोप अत्यावश्यक. उरलेल्या वेळात झोपाळल्यासारखे होत असेल तर अभ्यासाच्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब करता येईल(रेकॉर्ड केलेली सूत्रे, धडे ऐकणे), बेसिक कन्सेप्ट्स युट्युबवरून समजून घेणे, पाठांतरावरचा भर कमी करून स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहण्याचा सराव करणे आदी. कित्येकदा पुस्तक समोर आलं की पेंग येते, मुख्य कारण कंटाळवाणे अभ्यासरूटीन असते.

एक सायकोलॉजीही असते..
आपण काही टाईमपास करत असू तर झोप येत नाही. तेच अभ्यासाचे पुस्तक हातात घ्या अचानक डोळे जड होऊ लागतात.
कुठेतरी हे मनात असेल की हे दहावीचे वर्ष, अभ्यास करायचे वर्ष, मग आतले मन झोपायचा सल्ला देत असेल.

शारीरिक हार्मोन्स मुळे झोप येवू शकते पण ते rare आहे.
झोप येवू नये ह्या वर उत्तम उपाय आपल्या मनाची तयारी .
आडात च नसेल तर पोहऱ्यात कोठून येणारं .