चित्रकला साहित्य देणे आहे

Submitted by प्रकाश घाटपांडे on 18 November, 2019 - 01:24

आपल्याला नको असलेले परंतु इतरांना उपयुक्त ठरु शकेल असे सुस्थितीतील साहित्य संबंधितांपर्यंत कसे पोहोचवावे असा प्रश्न मला नेहमी पडतो. मध्यंतरी एक मोठा सुस्थितीतील लाकडी झोपाळा मला द्यायचा होता पण कुणाला द्यायचा असा प्रश्न पडला मग मी शेवटी फर्निनचर भंगारवाल्याला देउन टाकला. त्याने ५०० रु दिले. प्रश्न पैशाचा नव्हता ज्याला तो उपयुक्त आहे अशा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा होता. पण ते झाले नाही. नंतर मायबोलीवर गप्पात कळले की कुणाला तरी अगदी तस्साच हवा होता. त्यामुळे हळहळ वाटली. माझी मुलगी कमर्शियल आर्टिस्ट आहे. आता ती सासरी गेली. तिचे काही साहित्य आहे. सध्या माझ्याकडे ए १ साईज चा ड्रोईंग बोर्ड व त्याच साईजचे शीट फोल्डर आहे. तसेच अजून एक ए २ साईजचे आहे. ते मला ज्यांना उपयुक्त ठरेल अशांपर्यंत पोहोचवायचे आहे. चित्रकला क्लासेस वाल्यांना फोन केला तर त्यांच्याकडे अशी गरज असणारे कुणी नाही. कुणापर्यंत पोहोचवावे.?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीला च द्या
तिला उपयोगी पडेल
तीने नेले नाही का..? का..?

अशी काही जागा पाहिजे तिथे वस्तू देवाणघेवाण करता येईल. जड वस्तू ने आण नको म्हणून फोटो दाखवावा. ठरल्यावर न्याव्या.

आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये कोणतीही गोष्ट फुकट available आहे असे सांगितले की 30 सेकंदात कोणीतरी घेतलेली असते. तुम्ही अश्या वसाहतीत राहत नाहीत का? व्हाट्सएपवर टाकायचं ग्रुप मध्ये.
घरातला नको असलेला पसारा1 दुसऱ्या कडून फुकटात साफ करुन घायचा नामी उपाय, शिवाय त्याचा उपयोग पण होतो.

व्हाट्सएपवर टाकायचं ग्रुप मध्ये.>>> टाकून झाल.
तीने नेले नाही का..? का..?>>> ती पंजाब मधे आहे तिथे नेणे अवघड आहे. शिवाय आता तिला त्याची उपयुक्तता नाही. विद्यार्थ्यांना जास्त उपयुक्त आहे

हो ओ एल एक्स ट्राय करा. अगदी फुकट न देता नॉमिनल किंमत तरी ठेवा असा सल्ला देईन.
मी इथे येण्यापूर्वी माझ्या ब्रँडेड कलर्ड पेन्सिल्स ओळखीच्या व उत्तम रेखाटन करु शकणार्‍या व्यक्तिला विनामूल्य दिल्या. 'योग्य व्यक्तीच्या हातात पडत आहेत' असा विचार करुन आणि अतिशय त्रासदायक अनुभव आला त्या व्यक्तीकडून.
ओळखीपाळखीत चित्रकला येऊ शकणारे तसे कमीच असतात असा माझा अनुभव. असले तरी हौशी लोक डायरेक्ट ड्रॉईंग बोर्ड वगैरे वापरत नाहीत.

इंजिनीअरींग कालेजात द्या नेऊन. तिथे कोणी ना कोणी गरजू विद्यार्थी माहीत असतात हापिसात.>> +१
हा सल्ला उत्तम आहे. हायस्कूल मध्ये ई ८ - १० ला टेक्निकल ला असणारे विद्यार्थी, यांना गरज असते. मी हायस्कुल ला शिकत असताना, एका मित्राच्या घरी drawing शीट्स काढायला जात असे. त्याच्या मोठ्या भावाचा बोर्ड आम्ही जमेल तसा वापरत असू. नंतर दादासाहेबांनी ऍटिट्यूड दाखवल्याने मी वडिलांच्या मागे लागून नवीन विकत घेतला. तो बोर्ड २२-२३ वर्षांपासून माझ्याकडेच आहे. आठवणी..

मेधावि मी उपयुक्त असणार्याना म्ह्टल आहे. एका चित्रकला क्लास च्या बाईन्नी दोन दिवसांनी सांगते म्हटल आहे

चित्रकला क्लास मधे ते साहित्य दिले. त्यांच्याकडे येणार्‍या आर्किटेक्ट स्टुडंट ला ते उपयोगी होते.धन्यवाद. पण या निमित्ताने आपल्याला उपयुक्त नसणारे साहित्य हे उपयुक्त वाटणार्‍यांकडे कसे पोहोचवायचे हा प्रश्न अधोरेखित होतो. काहीतरी व्यवस्था हवी.