अमेरिकेत घर खरेदी

Submitted by कटप्पा on 3 November, 2019 - 21:13

सरळ मुद्द्यावर येतो .
एक घर आवडले आहे , ऑफर एक्सेप्ट झाली आहे .

20% डाउनपेमेंट करणे चांगले कि 5/10 टक्के विथ मोटगेज इन्सु हा माझा प्रश्न आहे .

घर तीन वर्षाने विकण्याचे असू शकेल , परत भारतात जाण्याचा प्लॅन आहे .

जाणकारांच्या सल्ल्याचा आणि उत्तरांच्या प्रतीक्षेत . हा सिरीयस धागा आहे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले की वाईटपेक्षाही ज्यांच्याकडे पुरेशी बचत नसते (२०% पेक्षा कमी) त्यांना पर्याय नसतो पीएमआय शिवाय. त्याने तुमची मंथली मॉर्गेज पेमेंट्स वाढतात. तेव्हा तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता ते बघा. ३ वर्षांनी घर विकायचं असलं तरी किती डाऊन पेमेंट केलं होतंत ह्याने फार फरक पडायला नको. तुम्ही ज्या एरियात घर घेताय तिथे मार्केट किती आणि कसं अप्रिशिएट होतंय हे बघा.

सायो - हॉट एरिया आहे. स्कूल 10,10,10 आहे . रिसेल issue नाहीय .
इतकी मोठी अमाऊंट डाउनपेमेंट करावी कि दुसरीकडे इन्व्हेस्ट करावी फक्त 5% टाकून .

३ वर्षात घर विकायची शक्यता असेल तर घर न घेणे चांगले. रीअल इस्टेट एजंट्चे ६-६% कमिशन घर घेताना आणि विकताना द्यावे लागेल.

बायर ला नाही द्यावे लागत कमिशन .
घर घ्यावे का नको हा प्रश्न नाही आहे . 20 टक्के dP करावे का हा प्रश्न आहे .

>> इतकी मोठी अमाऊंट डाउनपेमेंट करावी कि दुसरीकडे इन्व्हेस्ट करावी फक्त 5% टाकून >> ह्या बाबतीत तुमच्या मॉर्गेज ब्रोकरशी आणि अकाऊंटंट किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनरशी वगैरे बोलणं योग्य.

3 वर्षात विकून जाणार असाल आणि इतर कोणत्याही कारणासाठी पैसा लागणार नसेल किंवा त्याची वेगळी तरतूद आधीच केलेली असेल तर डाउन पेमेंट चा विचार करू शकता. ३ वर्षासाठी दुसरीकडे केलेली गुंतवणूक कर्ज व्याजापेक्षा जास्त रिटर्न देईल याची शाश्वती नाही. कालखंड ५ किंवा जास्त वर्षांचा असेल तर DP न करता मॉर्टगेज केलेलं बरे असे मलातरी वाटते. अर्थात सायो यांनी म्हणल्याप्रमाणे प्ल्यानंरशी बोललेले जास्त चांगले.

डाऊन पेमेंट अजिबात नाही असा ऑप्शन इथे नसतो. मिनिमम ५% तरी लागतातच. ते ही कोणत्या मार्केटमध्ये, टाऊनमध्ये आहात त्यावर अवलंबून.

समजा तुम्ही 500k चे घर घेत आहात.
दोन ऑप्शन्स बघू आपण -
20 टक्के डीपी - 100k आणि 400 लोन
5 टक्के डीपी - 25k आणि 475 लोन.

आता तीन वर्षानंतर समजा घराचा प्राईझ कमी झाला आणि 400 झाला.
तुमचा सरळ 100 लॉस आहे पहिल्या ऑप्शन मध्ये.
दुसऱ्या मध्ये 25लॉस आहे फक्त. मॉर्टगेज इन्सु अठरा महिने भरावा लागतो आणि दोनशे प्रति महिना असू शकेल.

माझ्या मते नेहमीच 5 किंवा 10 डीपी करावे.

आम्ही २०% शक्य असुनही १०% डाऊन केले होते. मॉर्टगेज इंशु होता मात्र तो बाय आउट केला होता. म्हणजे सिंगल पेमेंट करायचे. आमच्यासाठी तो पर्याय बराच स्वस्त ठरला. सिंगल पेमेंट आणि दर महिना अशी तुलना करायला लोन ऑफिसरला सांगा. सगळे आकडे समोर असले की काय योग्य पर्याय ते ठरवणे सोपे जाईल.

तुमचा सरळ 100 लॉस आहे पहिल्या ऑप्शन मध्ये.
दुसऱ्या मध्ये 25लॉस आहे फक्त. मॉर्टगेज इन्सु अठरा महिने भरावा लागतो आणि दोनशे प्रति महिना असू शकेल.>> Rofl चालू द्या.

>>घर तीन वर्षाने विकण्याचे असू शकेल , परत भारतात जाण्याचा प्लॅन आहे .<<
घर विकत घेण्याचा फेरविचार करा. ३-५ वर्षांत घर विकायचं म्हणताय तर या ट्रांझॅक्शन मधल्या अपफ्रंट कॉस्ट्स (डाउन पेमेंट, क्लोजिंग इ.) रिकुप होणार नाहित. पहिली काहि वर्षं मॉर्गेज पेमेंटचा मेजर पोर्शन इंटरेस्ट मधे जात असल्याने इक्विटी हि हवी तशी बिल्डप होणार नाहि. च्रप्स म्हणतायत तसा लॉस झेलायची तयारी असेल तर गोष्ट वेगळी. पिएमायच्या भानगडित तर पडुच नका. मला वाटतं तो प्रिंसिपल साधारण ७५% फिटेपर्यंत द्यावा लागतो, आणि आतातर त्यावर टॅक्स डिडक्शन हि मिळत नाहि (चूभूदेघे)...

३ वर्षांत घर विकायचं असेल तर जे काय मॉर्गेज घ्याल त्यावरचा ३ वर्षाचा इंटरेस्ट, प्रॉपर्टी टॅक्स, प्रॉपर्टी एन्श्युरंस, (लागणार असेल तर) मोर्जेज इन्शुरन्स, क्लोजिंग कॉस्ट, एच ओ ए असेल तर त्याचे तीन वर्षाची कॉस्ट हे सगळं add करा. आता हे घराच्या मूळ किमतीच्या जे काय टक्के होत असेल त्या पेक्षा घराची किंमत वाढेल असं वाटतंय का? किंवा ह्यापेक्षा रेंट महाग आहे असं वाटतंय का?
मला खात्री आहे उत्तर नाहीच असेल. ३ वर्षांत घर विकून आर्थिक नुकसान होईल याची जवळपास खात्री बाळगा.
घर आपण राहायला घेतो, ते एन्जॉय करतो. ती फक्त आणि फक्त आर्थिक उलाढाल नसते. सो अश्या enjoyment
Cha Jo काही तुमचा प्राईस टॅग असेल तो लावा( अप टू अमूल्य). त्या पेक्षा स्वस्त असेल तर घ्या विकत. शुभेच्छा.

३ वर्षात विकणे नक्की असेल तर घेऊ नका .... कारण अपफ्रंट कॉस्ट्स (डाउन पेमेंट, क्लोजिंग इ.) रिटर्न्स मिळणार नाहीत. तास resale पण खूप त्रासदायक होऊ शकते तसाच आपण कुठल्या ठिकाणी घर शोधता आहात हे कळू शकेल का?

हाब सर - हा सिरीयस धागा आहे इथे शी करू नका .

च्रप्स तुमचा मुद्दा समजला नाही . 200 pmi?

अमितव धन्यवाद .

उडाणटप्पू - ऑस्टिन टेक्सास .

Austin market is getting better because of Apple proposed plan. The chances that your property may get appreciated in next 3 years.

च्रप्स तुमचा मुद्दा समजला नाही . 200 pmi? >> हो हो च्रप्स नक्की सांगा, मी पण फार ऊत्सुक आहे हे गणित समजून घ्यायला. Proud

अभिनंदन!! It's a milestone. आपल्याला शुभेच्छा.
अवांतर - कालच मी वास्तूबद्दल वाचत होते. इशान्येला देवघर असावे. असो. आपली रास वृश्चिक का? कारण आजच गुरुपालट होउन, गुरु धनुमध्ये जातो आहे.
असो अवांतर आवरते घेते.
या अवांतरावर कटप्पा यांखेरीज कोणीही कृपया प्रतिसाद देउ नये.

राज यांच्याशी सहमत. खरोखरच तीन वर्षांत विकणार असाल तर विकत घेउ नका. आर्थिक फायदा फारसा होण्याची शक्यता कमी आहे कारण सेलिंगच्या वेळचा खर्चही असतो (अपवादः बे एरिया किंवा तत्सम मार्केटचा, जेथे १० टक्क्यांपेक्षा जास्त अ‍ॅप्रेशिएशन होते अशा मार्केट्सचा) रेण्ट करणे चांगले. पण "खरोखरच" हे महत्त्वाचे आहे. मी इथे आल्यावर दोन वर्षांनी परत जाणार होतो. आता अनेक वर्षे झाली त्याला Happy इथे आलेले बहुसंख्य लोक इथेच राहतात या स्टॅट वरून विचार करा. इतक्या लगेच विकणार नसाल तर ठीक आहे.

दुसरे म्हणजे जर तुम्हाला तीन वर्षांनंतर भारतात हे पैसे लगेच लागणार नसतील तर विकायची गरज नाही. इथे रेण्टवर देउन जाउ शकता. ते मॅनेज करणार्‍या कंपन्या असतात.

>> आपण राहायला घेतो, ते एन्जॉय करतो. ती फक्त आणि फक्त आर्थिक उलाढाल नसते. सो अश्या enjoyment
Cha Jo काही तुमचा प्राईस टॅग असेल तो लावा( अप टू अमूल्य). त्या पेक्षा स्वस्त असेल तर घ्या विकत>> ह्या अमितवच्या म्हणण्याशी सहमत. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी असेल तर फायद्या तोट्याचा विचार नक्की करावा पण प्रायमरी रेसिडन्सकरता बाकी फॅक्टर्सवर जास्त भर द्यावा.
तसंही घर घेतल्याच्या पहिल्या दोन तीन वर्षातच इक्विटी बिल्ड होत नाही पण चांगल्या शाळा, सेफ आणि कम्युटकरता सोयिस्कर नेबरहुड असेल तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी होते.

इशान्येला देवघर असावे>>>या मागील शास्त्र काय आहे? कारण भारताच्या ईशान्येला म्हणजे अमेरिकेच्या वायव्येला होईल ना? जसे भारतातले मुसलमान पश्चिमेच्या दिशेने नमाज पढतात तर अमेरिकेतले पूर्वेच्या, त्याप्रमाणे.

राज +१
इतक्या कमी कालावधी करता तर आजिबात घर वगैरे घेऊ नका.

अरे ऑफर अ‍ॅक्सेप्ट झालीय आणी डाऊन पेमेंटबद्दल प्रश्न आहे असं अगदी स्पेसिफिक त्यांनी लिहिलंय ना?
ऑस्टिनसारख्या हॉट मार्केटमध्ये तीन वर्षात सुद्धा फायदा होऊ शकतो.

या मागील शास्त्र काय आहे? कारण भारताच्या ईशान्येला म्हणजे अमेरिकेच्या वायव्येला होईल ना? >>>>>>>> भारतीय वास्तुशात्र दिशेवर चालतं मग तुम्ही पृथ्वीवर कुठेही असा. उदा घराचे दार पूर्व पश्चिम असावे म्हणतात कारण त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश घरात येतो (अर्थात घर चहूबाजूंनी उंच बिल्डिंग ने वेढले नसेल तर). आता तुम्ही अमेरिकेत असला तरीपण सूर्य पूर्वेलाच उगवेल त्यामुळे हा नियम तेथेही लागू होईल.

जसे भारतातले मुसलमान पश्चिमेच्या दिशेने नमाज पढतात तर अमेरिकेतले पूर्वेच्या, त्याप्रमाणे.>>>>>>>> ते मक्केच्या दिशेकडे तोंड करून नमाज पडतात. मग तुम्ही पृथ्वीवर जेथे असाल त्याप्रमाणे दिशा बदलते. मात्र भारतीय वास्तुशात्र स्थळावर अवलंबून नाही.

समजा तुम्ही 500k चे घर घेत आहात.
दोन ऑप्शन्स बघू आपण -
20 टक्के डीपी - 100k आणि 400 लोन
5 टक्के डीपी - 25k आणि 475 लोन.

आता तीन वर्षानंतर समजा घराचा प्राईझ कमी झाला आणि 400 झाला.
तुमचा सरळ 100 लॉस आहे पहिल्या ऑप्शन मध्ये.
दुसऱ्या मध्ये 25लॉस आहे फक्त. मॉर्टगेज इन्सु अठरा महिने भरावा लागतो आणि दोनशे प्रति महिना असू शकेल.

माझ्या मते नेहमीच 5 किंवा 10 डीपी करावे.

Submitted by च्रप्स on 4 November, 2019 - 07:01>> अरे.. कोणी तरी हे गणित समजाऊन सांगा राव.
गाडी एअरपोर्टला सोडून वन वे तिकिट काढून पोबारा करायचा एवढे एकच ऊत्तर मला मिळते आहे.

मला वाटतं फर्निचर कंपन्यांच्या 'नो पेमेंट्स अन्टिल २०२३' वगैरे सारखं असावं ते. तीन वर्षांनी पेमेन्ट सुरू होतील असं लोन घ्यावं. जर तीन वर्षांनी परत जायला लागलं तर 'आम्हाला आता तुमचं लोनच नको आहे, तर पेमेन्टचा प्रश्न कुठे येतो?' असं बँकेला सांगता येईल.
ऑन अ सिरियस नोट, रिअ‍ॅल्टर नामक प्राण्यावर फारसा विश्वास ठेवू नका.

डीपी एव्हढा लॉस आहे असे सुचवलेत्य त्यामूले बर्गा तू म्हणतो तसे, घर विकण्याच्या वेळी किल्ल्या बँकेकडे पाठवून बादबिस्तारा गुंडाळा नि छू मंतर व्हा असे लिहिलय असे मलाही वाटले.

Pages