सोनेरी पान (भाग -1 )

Submitted by संयम.... on 3 November, 2019 - 07:51

...सोनेरी पान (भाग -1 )...

दिनांक २८ मे २०१९, हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही कारण या दिवशी मी हॉस्टेल सोडले किंबहुना सोडावं लागलं कारण शेवटची परीक्षा पास झाल्यामुळे मी पदवीत्तर विद्यार्थ्यांमध्ये गिनला जाणार होतो. गावाला येऊन २-३ दिवस झाले असतील पण माझे मन मात्र मधमाशी जशी मधाभोवती फिरते तसंच अजूनही कॉलेज मधेच घुटमळत होते. गावातली पण मित्र मंडळी अजून आली नव्हती त्यामुळे आगीत कोणीतरी तेल ओततंय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोण शिकायच्या निमित्ताने बाहेर गावी होते तर कुणी नोकरीच्या त्यामुळे वेळ घालवण्यासाठी साठी मी रोज रानात जाऊन बसायचो. झाडाखाली लागलेल्या झोपेची मजाच न्यारी नाही का ?? आणि एक कारण होत कि घरी थांबलो कि काही नं काही कामं करावी लागायची. आमच्या शेतात भलं मोठं चिंचेचं झाड आहे. माझे आजोबा सांगतात ते झाड ९ पिढयांपासूनचं आहे. हे झाड माझ्या बेस्ट फ्रेंड्स च्या यादीत अव्वल स्थानी होतं कारण मी कधीही गावाला गेलोकी ते आपल्याच जागी असायचे आणि माझ्या कोणत्याच निर्णयाला आणि मताला त्याचा विरोध नसायचा अगदी देवासारखा उलट त्या झाडाखाली मला बऱ्याच कल्पना सुचायच्या. लहानपणापासून खूप मोठ-मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधताना मी या झाडाखाली झोपी जायचो. उदाहरणार्थ, मी जगात का आलो ?? मला शक्तीमान ची ताकद भेटली तर मी काय करीन ?? वगैरे वगैरे ....खैर विषयांतर नको, तर त्या दिवशी मी जाऊन झाडाखाली स्वतःच्या तंद्रीत बसलेलो तेव्हड्यात कामाला आलेल्या बायकांची सुट्टी झाली आणि त्या झाडाखाली जेवायला येत असतानाची त्यांची बडबड पुसटशी माझ्या कानांवर येत होती. त्यातील कोणत्या तरीआजींचे "गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी" हे शब्द माझ्या कानांवर स्पष्टपणे पडले आणि तसाच मी मनात चाललेल्या विचारांमधून कधी दोन दिवसांपूर्वी सोडलेल्या होस्टेलच्या आठवणींमध्ये हरवून गेलो त्याचा पत्ताच लागला नाही. हॉस्टेल सोडतानाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा किंवा काहीच किस्से सांगत बसण्यापेक्षा मला वाटते की मी हॉस्टेलच्या आठवणींचे मणी माझ्या जीवनाच्या माळेत कसे गुंफले गेले आणि एवढं काय घडलं कि मला या आठवणींना जीवनाच्या पुस्तकात सोनेरी पानाचं स्थान द्यावंस वाटलं याचा उलघडा करण्याचा कसोशीने प्रयत्न मी पुढील काही संभाषणात करणार आहे......

बारावीचा, जेईई आणि जेईई ऍडव्हान्स चा रिझल्ट लागल्यानंतर साधारण दोन महिने आयआयटी नाही भेटले याचे दुःख आणि एनआयटी व गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस याच्या ऍडमिशन्स मध्ये गेले .शेवटी मी व्हीजेटीआय या मुंबईतल्या गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज मध्ये येऊन पडलो. कॉलेज आणि मार्क्स चांगले भेटल्यामुळे आणि त्याच्या जोरावर हे कॉलेज मिळाल्यामुळे मला कॉलेज चे नावाचा उल्लेख करण्याचा मोह आवरता येत नाहीये त्याबद्दल क्षमस्व. आणि तसंही पुढच्या बऱ्याच गोष्टींमध्ये माझे कॉलेज आणि तेथील परिसर म्हणजेच माटुंगा व दादर या परिघावरती फिरण्याची दाट शक्यता असल्यामुळे कॉलेजचे नाव सांगायची गरज होतीच.
माझ्याबद्दल सांगायचं झालाच तर,मी टिपिकल नुसता अभ्यास करणारा अर्थात मी नववी पर्यंत हॉकी विभागीय स्तरापर्यंत खेळलो तसेच बऱ्याच आवांतर स्पर्धांमध्ये असायचो पण १० वी, ११ वी आणि १२ वी आपण फक्त अभ्यास नाही केला तर जीवनात काहीच करू शकणार नाही अश्या मनातील म्हणा किंवा लोकांनी घातलेल्या भीतीमुळे म्हणा मी फक्त अभ्यासचं केलेला आणि एक महत्वाचे मी अगदीच गरिबीही नाही म्हणता येणार पण नाकासमोर चालणारा अगदी मित्र सींसीयर मानतील अश्या टाईप चा होतो . आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गावाकडून गेल्यामुळे मुलींबरोबर बोलण्याची तर माझी खूप मोठी बोंब आणि न्यूनगंड हे दोन्ही होतं .
१० वी पर्यंत तर आमच्या वर्गात मुलींच्यामध्ये आणि मुलांच्यामध्ये खुन्नसच होती त्यामुळे आम्ही कळत- नकळत मुलींशी स्पर्धा केलेली पण तीही नं बोलता, खुन्नस अशी कि वर्गात पहिला मुलांमधून येतो कि मुलींमधून यावर खूप चर्चा होत असल्यामुळे तो आमच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. अजून एक महत्वाचे हेही कारण होतं कि मुलींनी मुलांशी बोलणं हे असभ्य पनाचं लक्षण होतं त्यामुळे आमच्या कितीही मनात असलं तरी पोरी बोलायला तयार नसायच्या.
शाळा आणि कॉलेज च्या आठवणींबद्दल नंतर कधीतरी, मी सरळ अभियांत्रिकी च्या दिवसांकडे येतो. कॉलेज सुरु होऊन ७-८ दिवस झाले होते पण हॉस्टेल ला लिमिटेड सीट असल्यामुळे मला पहिल्या वर्षी होस्टेलला प्रवेश मिळाला नाही . दुसऱ्या वर्षी मी परत अप्लाय केले व हॉस्टेल रेक्टर समोर रडून आणि माझ्या पेक्षा कमी रँक्स असून सुद्धा मुलांना हॉस्टेल का मिळाले अश्या अर्ग्युमेंट्स करून मला कशेबशे हॉस्टेल मिळाले अर्थात माझी अर्ग्युमेण्ट चुकीची होती कारण जरी माझ्यापेक्षा कमी रँक असला तरी त्यांची अँप्लिकेशन्स माझ्या आधीची होती पण म्हणतात ना "गरजवंताला अक्कल नसते". मला कसं माहित असणार कि ज्यांच्या प्रवेशाबद्दल मी तक्रार करतोय तेच माझे नंतर बेस्ट फ्रेंड्स बनणारेत.
होस्टेलबद्दल सांगायचे झाले तर मुलांसाठी ३ होस्टेल्स होती, B - ब्लॉक , C -ब्लॉक व D - ब्लॉक अजूनही आहेत पण मी तिथे नसल्यामुळे मी होती असा उल्लेख करतोय हे समजून घ्या. आमचा कॉलेज कॅम्पस जवळपास १६ एकर होता. पहिल्या वर्षाच्या मुलांसाठी B - ब्लॉक, दुसऱ्या वर्षाच्या मुलांसाठी C -ब्लॉक व D - ब्लॉक हा तिसऱ्या आणि शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या मुलांसाठी होता. पण दुसऱ्या वर्षी होस्टेलला ऍडमिशन मिळून सुद्धा मला B - ब्लॉक मिळालेला कारण तिथेच व्हॅकंसीज होत्या त्यामुळे आम्ही ८ लोकांना B - ब्लॉक आणि बाकी सर्व क्लासमेटस C -ब्लॉक ला अशी एकंदरीत परिस्थिती होती. त्या ८ लोकांमधील त्यातील ६ जणांची आधीपासून मैत्री असल्यामुळे आणि प्रत्येक रूम ची कॅपॅसिटी ३ जणांची असल्यामुळे मला राहिलेल्या मुलाबरोबर रूम घेण्यावाचून गत्यंतर नव्हते. कल्पेश त्याचे नाव असून तो इलेक्ट्रिकल चा आहे हे लिस्ट मध्ये पहिले होते . इंजिनीरिंग कॉलेजेस ला रॅगिंग वगैरे होते असा समाज थ्री इडियट्स पाहून आणि इकडून तिकडून ऐकून होताच त्यामुळे भावी रूममेट रॅगिंग करणारा, व्यसनी नाही ना याची खात्री करणे जरुरी होते. इलेक्ट्रिकल ब्रांच च्या विशाल ची ओळख होती त्यामुळे त्याला कॉल करून कल्पेश बद्दल विचारले तर तो बोलला खूप अभ्यासू आहे तो !! बस मग ठरला आपला रूममेट आणि तिसरा होता तो आदित्य जो आधीपासूनच होता किंबहुना त्याच्या रूम मध्ये दोन जागा शिल्लक असल्यामुळे आम्हाला हॉस्टेल मिळालं होतं. पहिले काही दिवस आमच्यामध्ये ( मी आणि कल्पेश ) कामापुरतं बोलणं व्हायाचे पण एक दिवस त्याच्या कॉट वर मी "झाडाझडती" हि कादंबरी पहिली जी माझी रिडींग लिस्ट मध्ये होती. मग आमचे संभाषण चालू झाले आणि माझ्या लक्षात आले कि त्याला पण माझ्यासारखे कादंबऱ्या वाचणे आवडायचे. खरं सांगायचे झले तर आमचे बॉण्डिंग व्हायला माझ्या इतर मित्रांच्या तुलनेत खूप वेळ लागला पण का माहित मी आज असं सांगू शकतो ती सगळ्यात स्ट्रॉंग बॉण्डिंग झालीये . मायबोली बद्दल पण मला कल्पेश कडूनच समजले तसेच आपली इंग्लिश ची पंचाईत असल्यामुळे आपल्याला इंग्लिश चित्रपट समजणार नाहीत असं मला वाटायचे पण मला पहिला चित्रपट कल्पेशनेच दिला. मग मी हॉलीवूड चे सिलेक्टिव्ह चित्रपट पाहायला लागलो. मला असं वाटत कि याच काळात मी स्वतंत्र विचार करायला लागलो, पहिलेही करायचो पण आता मी मला काय आवडते , मला भविष्यात काय करायचंय या गोष्टींवर स्वतंत्र विचार करायला लागलो होतो. बऱ्याच अवांतर विषयात इंटरेस्ट निर्माण झाला होता तसेच बऱ्याच प्रश्नांचे द्वंद्व मनात सुरु वयाला लागले होते. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करायला लागलो होतो म्हणजे कोणतीही गोष्ट का घडते यामागची कारण शोधणे वगैरे वगैरे. मला वाटत कि यामागे सभोवतालचे वातावरण म्हणजे मित्रमंडळी आणि वाढतं वय अन त्यामुळे येणारी समज या दोन्ही गोष्टी कारणीभूत असाव्यात. पुढे कॉलेज संपेपर्यंत मी आणि कल्पेश रूममेट राहिलो तिसरा प्रत्येक वर्षी वेगळा असायचा.
अशाप्रकारे मी हॉस्टेल मध्ये सेटल व्हायला सुरुवात झाली.

( तुम्हला माझ्या गोष्टीत आवड निर्माण होतं असेल तर प्रतिसाद नोंदवा आणि नसेल तर काही सुजेशन्स जरूर नोंदवा जेणेकरून मला सुधारणा करता येईल. )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पदवीत्तर विद्यार्थ्यांमध्ये गिनला जाणार होतो>>>मी ते तुम्ही जिम च्या ऐवजी चुकून गिन लिहिले असे समजले,पण तरीही अर्थ लागेना ,मग परत वाचले तेव्हा कळले Rofl
बाकी चांगली आहे कथा

मित्रा मायबोलीवर स्वागत आणि माझं इतकं कौतुक केल्याबद्दल आभार ... आता पुढला भाग ( सुधारित व्याकरण आणि जास्तीतजास्त मराठीकरणासह ) लवकर येऊ दे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ... मी सगळं मराठीतच लिहीत होतो पण काही शब्द मराठीत केले की कधी कधी जास्तच विचित्र वाटतात.. .....

आमच्या वेळेला A ब्लॉक सुद्धा मुलांचा होता.
मुलींसाठी VJTI हॉस्टेल नव्हते अगोदर.
They started I believe only in 2008-09.

मला FE ला C ब्लॉक मिळाला होता. A, B, C ला काही रूल्स नव्हते. D ब्लॉक for TE, BE & PG.

बरं होतं कारण FE ला C1 मेस होती खालीच.
Rushing all those nostalgic memories of 4 years there college, hostel, 5G, etc.

Very excited to read next.

पण जरा लांब लेख टाक यार बंटी.

And cover : workshops, lectures, quadrangle, canteen, labs, vadala area night time dhaba, udct & khalsa college chiks, saraswati vachnalaya, sadguru, vidyalankar, daaji classes, Dadar, parsi colony, technovanza, pratibimb etc.

धन्यवाद @vichar.....
Me prayantna karin changla... Sadya maza focus hostel aani friends kashe banale yavar aahe.....
Let's see... Kas suchatay tyapramane .. college include kela tar khup motha hoil lekh.... Pahu....
Thanks...

माफ करा पण सध्या थोडा कामामध्ये गुंतलो होतो. तरीही मी पुढील १५ दिवसात पुढचा भाग नक्की लिहून अपलोड करीन आणि धन्यवाद आठवणीत ठेवल्याबद्दल.