वाराणसी काशी ट्रिप बद्दल माहिती हवी आहे

Submitted by VB on 28 October, 2019 - 00:59

फेब्रुवारी/मार्च महिन्यात काशी-वाराणसी ट्रिप प्लॅन करतोय. जायचा यायचा प्रवास शक्यतो विमानाने करू किंवा येताना ट्रेन. प्रवास पकडून साधारण ७ दिवस हाताशी आहेत.
ट्रिप प्लॅनर कडून थोडी माहिती मिळवली आहे पण ती समाधानकारक नाही. पण जर कुणाचा चांगला अनुभव असलेली टुरिस्ट कम्पनी असेल तर सुचवा.
जर स्वतः प्लॅन करून निघायचे तर, तिकडे बघण्यासारखी स्थळे, रहाण्याची सोय याबद्दल सुद्धा सांगा.
तसेच एकाने सुचविले की काशी दर्शन झाले की दिल्ली बघून या, तर याबद्दल अन जर कुणी नजीकच्या काळात जाऊन आले असतील तर ते देखील सुचवा

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त! 'काशी-वाराणसी ट्रिप' पह्य्ल्यांदाच ऐकतोय. मला वाटलेलं की दोन्हि एकच आहेत. किती वेळ लाग्तो काशी ते वाराणसी जायला?

दिल्ली? या ट्रिपमध्ये? छ्या.
----
तशी ही धार्मिक सहल आहे.
सारनाथ (१० किमी)
प्रयागराज उर्फ अलहाबाद १२० >>चित्रकूट>>कलिंजर किल्ला>>खजुराहो>>रेल्वे स्टेशन /एरपॉर्ट

धन्यवाद शरद काका, तुमच्या प्रतिसादाची वाट बघतच होते. आम्हाला तिकडची काहीएक माहिती नाही, अन जितके जास्त गूगल करतोय तेव्हढे कन्फ्युझन वाढतेय.

दिल्ली का नाही अन जर फक्त काशी दर्शन करायचे तर तिकडे जवळपास बघण्यासारखे काय आहे? सांगाल का

एकच सल्ला देईन, जाताना ट्रेन आणि येताना विमानाच्या प्रवासाने आलात तर चांगलं.
तिकडून भरपूर लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येत असतात, त्यामुळे जीवघेणी कसरत होते. (वडिलांचा अनुभव)
काशी वाराणसी अयोध्या हनुमानगढी ही स्थळे शांततेत बघता येतील.

आम्ही तिकडे अजून गेलेलो नाही परंतू ठिकाणे ठरवताना लोनली प्लानिट पुस्तकाचा आधार घेतो. त्यामधले नकाशे, किमि अंतरे,काय पाहण्यासारखं आहे हे अचूक असतं.
वर दिलेली ठिकाणे एकाच दिशेने पश्चिमेला जात पाहता येतील . हायर ट्याक्सी करण्यात नुकसान असे की तो ठिकाण दाखवून परत मूळ जागी आणतो. वेळ वाया जातो.
इथे 'मी_आर्या' आइडीने काशीबद्दल लिहिले आहे मागे. ते शोधून पाहा.
भाविक असल्याशिवाय काशी पाहता येत नाही.
मुंबईत वल्ड ट्रेड सेंटर इमारतीत उप्रदेश पर्यटन कार्यालयात ढीगभर माहिती पत्रके,नकाशे देतात. ट्रिप नियोजनही करून देतात. त्याचाही लाभ घ्या.
(गया आणि बोधगया विरुद्ध बाजूस पूर्वेला बिहारमध्ये आहे.)

गंगाआरती करा. सारनाथ, सीतागुफा आणि प्रयाग पहा. मस्त पुरीकचौडीचा ब्रेकफास्ट करा. सारनाथला तसेच इतर ठिकाणी शाॅपिंग करा. काशी प्रयाग व इतर ठिकाणी फिरायला टॅक्सी hire करा. करतांना घासाघीस करून किंमत ठरवा.

अरूंद रस्ते, कडेची घाण ignore करा. Pm visit पासून परिस्थिती सुधारली असावी. मंदिरासाठी टॅक्सी ड्रायव्हरलाच गाईडबद्दल विचारा. गाईड तुमचं नेलेलं सामान नीट लाॅकर मध्ये ठेववेल. आवश्यक सामग्री आणून देईल किंवा मार्गदर्शन करेल. कितीही गर्दी असली तरी miraculously appear होऊन तुम्हाला दर्शन करून सहीसलामत बाहेर काढेल. शनीमंदिरात गेल्यास सगळी पापं धुतल्याचं समाधान मिळेल. तिकडे जाताना मध्ये अजून एक मंदिर/ आश्रम टाइप ठिकाण आहे. तिथं लहान बाळांना लागलेली 'नजर' (भूत?) उतरवतात असं ड्रायव्हर म्हणाला.
घट्ट बासुंदी सारखी लस्सी चाखून पहा. Sealed गंगा वाॅटर, दिवे, चंदनाची माळ व इतर पूजा सामान विकत घेऊ शकता. Sealed गंगा वाॅटर फ्लाइट मध्ये allowed आहे. तरी खातरजमा करून घ्या.

७ दिवस हाताशी आहेत.
१) किमी अंतरे आपल्याला सहल आयोजन करायला मदत करतात. काशी(= बनारस,वाराणस,) ते सारनाथ १० किमी आहे. म्हणजे काशीत राहिल्यावर एक दिवस सकाळी सारनाथ पाहून येता येईल. संध्याकाळी गंगेवर.
एक दिवस संपूर्ण काशी विश्वनाथ मंदिर, गंगेचे घाट यासाठी.
२) काशी ते प्रयाग १२० किमी. म्हणजे काशीवरून प्रयाग पाहून परत येणे फायद्याचे नाही. सरळ तिकडे जाणे आणि राहाणे. मग तिथून चित्रकूट, कलिंजर किल्ला करून परत प्रयागला येता येईल. इथे तुमचे सात दिवस संपतील. कलिंजर सोडून सर्व धार्मिक पर्यटन आहे.
३) गंगा आरती प्रयागची खूप जूनी आहे. काशी येथली वीस पंचवीस वर्षे झाली सुरू होऊन. आताचे विश्वनाथ मंदिर अहिल्याबाईने बांधले. जुने खरे नदीपलीकडे मिनारांत बंदिस्त आहे.

काशीत प्रोजे क्ट्साठी जास्त दिवस राहिलेल्यांकडून खालील रेक् मंडेशन्ळ

१) गर्दी व घाण ह्याची सवय करून घ्या.
२) रस्ते अतिशय बारके आहेत काही ठिकाणी चार चाकी गाडी जाउ शकत नाही. खूप व्यवस्थित चालाय्ची तयारी ठेवा.
३) गंगा आरती फारच छान आहे ही नदीतून बोटीतूनही बघता येते आधी प्लॅन केला तर . फोटो जास्त चांगले येतील सोशल मीडिया वर टाका यला.
४) फूड इज टेरिफिक. उत्तर भारती य. तसेच सात्विक थाळी, लिट्टी चोखा. हर प्रकारची मिठाई, चहा व पान ऑफकोर्स.
५) नदीची बोट टूर अवश्य घ्या. इथे बार्गेनिन्ग करावे लागते. नाहीतर महाग पडते.
६) घाटांवर नुसते बसून वेळ घालवायला छान आहे. इथे टुरिस्ट अ‍ॅट्रेक्षन असे काही नाही जस्ट हँग आउट. पण सोबत लहान मुले असतील तर
मणिकर्णिका घाट दशा श्व मेध घाट इथे त्यांना नेउ नका. ह्या सोबर व जीवनावर मृत्युवर विचार कराय्ला लावणार्‍या जागा आहेत. ही टीम तिथे डाँबांशी बोलायलाच अनेक वेळा गेली होती. अस्सी घाट छान आहे.
७) बाकी सर्व आपापल्या श्रद्धे प्रमाणे मंदिरे ही दर्शना साठी आहेत. काशी विश्वनाथ मंदिरात एक ते दोन तास रांगेत उभे राहायची तयारी ठेवा.
८) काशी शहराचा इतिहास व मायथॉलोजी अभ्यास करून जा. समज पडण्यात खूपच फरक पडेल.
९ ) हे विद्यार्थि असल्याने फार महाग खरेदी केली नाही. पण सुती मिक्स काठ पदराच्या साड्या, वह्या, मनातील इच्छा पूर्ण व्हायला व्रतासाठी
तांब्याचे कासव, जपमाळ असे मला गिफ्ट आणले होते. छान आहेत वस्तू. मी गेले अस्ते तर एखादी सिल्क ची बनारसी नक्की घेतली असती.
१०) चिली मी रस्त्यावर मिळतात. भांगेची लीगल दुकाने आहेत. आपापल्या रिस्क वर पुढे जावे. बम बम भोले.

ट्रीट इट लाइक अ स्पिरिचुअल जर्नी. खूप चांगला अनुभव मिळेल. मी गंगा आरतीवर व ह्या शहरावर एक कविता मुलांना करून दिली होती ती इथे डकवते. जय गंगा मां

माझी कविता गंगा व वाराणसी जीवनावर.
अनादि कालसे बहती गंगा
उसके तटपर पलता जीवन

कहीं चल रहा नदिया पूजन
कहीं और पार्थिव होते दहन

जन्म मृत्यू जे अथक चक्रसे
मुक्ति खोजता है यह कण कण

शांत गंभीर से देखते भगवन
मनुष्य प्राणियोंकी नौटंकी

मोक्ष के शाश्वत सत्य को दोहराती
कहानी ये घाट घाट की.

ट्रीट इट लाइक अ स्पिरिचुअल जर्नी.
हे बरोबर. आमचं स्पिरिट वाढल्यावर आम्ही जाणार आहोत.

इथे १. सांड, २.संदुक और ३. सिढी सम्हाले म्हणतात.

एकच सल्ला देईन, जाताना ट्रेन आणि येताना विमानाच्या प्रवासाने आलात तर चांगलं. >> अज्ञातवासी धन्यवाद , आम्ही जाणे - येणे दोन्ही विमानाने किंवा विमानाने जाणे अन ट्रेनने परत असा विचार करतोय. माझ्या मम्मीला युपीकडच्या ट्रेनचा प्रवास कितपत झेपेल हिच शंका आहे. तिची तब्बेत खुप नाजुक आहे, तिला त्या ट्रेनमधला घाणेरडा वास , आवाज बिलकुल सहन होत नाही.

शरद काका , प्रतिसादाबद्दल अन मी_आर्या च्या धाग्याबद्दल आभारी आहे, त्याचा नक्कीच ऊपयोग होइल. तो धागा वाचुन घरी सुचवुन पाहीले की हा प्लॅन कँसल करु पण कसले काय.. खरतरं आमची दर डिसेंबर मध्ये एक अशी ट्रिप असते. या वेळी मी अंदमान अन भावाने सुवर्णमंदीर सुचविले होते, पण मम्माला काशी दर्शन करायचे आहे सो ....

चिन्नु, धन्यवाद. तिकडे शॉपिंगसाठी काय फेमस आहे सांगाल का? अन "Sealed गंगा वाॅटर " म्हणजे काय? गंगापाणी विकत घ्यायचे का? कारण आपल्या कर्नाटकात अन महाराष्ट्राच्या तिर्थक्षेत्री तर सरळ आपल्याकडच्या बाटलीत भरुन घेतात पाणी.

अमा, कविता खुप छान आहे. अन प्रतिसादासाठी आभारी आहे. नदीची टुर तर नक्कीच घेणार. फक्त ते मनीकर्णीका घाट बघावा की नको असा प्रश्न पडलाय.

<<चिली मी रस्त्यावर मिळतात. भांगेची लीगल दुकाने आहेत. आपापल्या रिस्क वर पुढे जावे. बम बम भोले.>> चिलीम / भांग किंवा ईतर कुठलेच व्यसन कुणालाच नसल्याने आम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही.

मी_आर्याचे दोन्ही धागे अन वरील प्रतिसादांची नक्कीच मदत होईल असे वाटतेय. तरी काही प्रश्न पडलेत.. जसे
फक्त चौघांना जायचे आहे तर रहाण्याची सोय काय?
गंगाआरती म्हणे खुप सार्या घाटावर होते तर मुख्य गंगा आरती कुठल्या घाटावर होते.
फेब्रुवारी मध्य किंवा मार्च सुरुवातीला गेलो तर तीकडचे हवामान कसे असेल?
मणिकर्णिका घाट दशा श्व मेध घाट प्रेत दहन होते फक्त की ईतर काही बघण्यासारखे आहे?

आपण नेलेल्या बाटलीतून भरून आणलेलं गंगेचं पाणी फ्लाइट मध्ये कदाचित आणू देतील की नाही पण गंगोदक भरलेले छोटे रागीचे सील्ड चंबू मिळतात. ते allowed आहे.
गाईड तसेच एयरपोर्टवर देखील लोकं माहिती देतात.
घाटावर आणि आसपास बरीच घाण असते. तसेच तिथं आणि अलमोस्ट सगळीकडे लोकं/ पंडे मागं लागतात. चेंज जवळ ठेवावी.
शाॅपिंग depends. पुजेचे सामान चांगले असते असं ऐकून आहे. सारनाथला तसेच इतर ठिकाणीही सिल्क साड्या, दुपट्टे आणि ड्रेसेस घेऊ शकता.

अमा कविता मस्तच.

VB शुभेच्छा तुम्हाला, मनासारखं होऊदे सर्व.

तिथे एक छान मोठ्या भरलेल्या मिरच्यांचे लोणचे मिळते, खूप वर्षापूर्वी बडोद्याला एका लग्नाला गेलेले, तिथे एक लांबचे नातेवाईक बदलीच्या नोकरीमुळे बनारसला होते, त्यांनी आणलेलं पण खूप आवडलेलं. सहज आठवल म्हणून लिहिलं.

रहाण्याची सोय काय?

वाराणसी जंक्शनच्या उत्तरेला कंटोनमेंट एअरियात शांत जागेत हॉटेल्स आहेत. हाच रस्ता बाबटपूर एरपोर्टला(२२ किमि) जातो.
जुने वाराणसी , काशी विश्वनाथ मंदिर हे नदीकाठी दशाश्वमेध घाटाच्या आसपासच आहे. तिथे गर्दी आणि बजेट हॉटेल्स, खानावळी आहेत.
(लोनली प्लानिट पुस्तकातून )

नेटफ्लिक्स असेल तर त्यावर राजा रसोई और अन्य कहानिया सीरीज मध्ये वाराणसी वर फुल एक एपिसोड आहे तो बघून घ्या. तसेच उर्मिला मातोंड कर ची एक बनारस म्हणून फिल्म आहे ही कुठे मिळेल माहीत नाही. व मुक्ती दर्शन म्हणून एक छान फिल्म आहे. ही पण फक्त फेस्टिवल रिलीज होती. वाराणसीत मृत्यु आल्यास तत्परतेने मोक्षच मिळतो. जीवन मृत्युच्या फेर्‍यातून सुटका होते म्हणून तिथे येउन राहणा रे खूप वयस्कर लोक दिसतील. हे धर्मशाळेत राहतात व इतर वेळी ध्या न धारणा जप जाप्य करत असतात. साधू व विधवा लोकांचे जथे व फ्लोटिन्ग पॉपुलेशन आहे.

शहनाई वादक बिस्मिल्ला खान ह्याचे घर ही इथे आहे तिथे व्हिजिटर अलाउड आहेत कि नाही माहीत नाही पण शहनाई आव ड त असल्यास नक्की बघा.

अंजुताई धन्यवाद
मिरचीचे लोणचे म्हणजे ते लाल मोठ्या भरलेल्या मिरच्या का? आमचे एक फॅमीली फ्रेंड आहेत युपीचे त्यांच्याकडुन दरवर्षी ते
लोणचे येते आम्हाला , खुप छान असते ते चवीला.

शरद काका, अमा, धन्यवाद.

माझी ऑफिस कलीग गेल्यावर्षी सहकुटुंब काशीला गेली होती, त्या संयोजकांतर्फेच जावू शक्यतो. १० दिवसांचा प्लॅन आहे अन बर्यापैकी स्वस्त देखील, मुख्य म्हणजे त्यांचा अनुभव खुप छान होता. जवळ पास ३१ ठिकाणे(?) अन ४ पुजा आहेत त्यात फक्त सारनाथ नाहीये फक्त राहाण्याची सोय हॉटेलात नसुन गुरुजींकडे किंवा धर्मशाळेत असते पण तेही ठिकेय कारण तिच्या म्हणण्यानुसार बाकी सोयी खुप छान आहेत आपल्याला कसलाच त्रास नाही. त्यांची एक ट्रीप या फेब-मार्च मध्ये जाणार आहे, तर त्यातुन जायचा विचार चालुए

माझी ऑफिस कलीग गेल्यावर्षी सहकुटुंब काशीला गेली होती, त्या संयोजकांतर्फेच जावू शक्यतो... कोण आहेत? इथे माहीती द्याल का?

केसरी आणि वीणा मी रेकमेंड करेन >>> सगळ्यात आधी दोन्हीकडे चौकशी केली होती तर त्यांनी अशी ट्रिप सध्या त्यांच्याकडे नसल्याचे सांगीतले

चित्रकुट कुठे अन अयोध्या कुठे! एवढी दगदग झेपेल का? >>> १० दिवसांचा प्लॅन आहे अन बसेस / रिक्षा अन नाव देखिल तेच अरेंज करतायेत

हे मी मुद्दाम ईकडे टाकले, जर कुणाच्या काही सुचना / सल्ले असतील तर सांगा

वीणा केसरी मी तरी रिकमेंड करणार नाही, एकतर अव्वाच्या सव्वा दर, आणि जबर दामटवतात! जास्तीत जास्त स्थलदर्शन, म्हणून नुसते पळवतात.
बाबा आणि काका नेहमी जातात, त्यांच्याकडून फर्स्ट हॅन्ड माहिती काढून इकडे टाकतो.

संयोजकांचे नंबर्स आहेत का? >>> खाजगी आहेत, त्यांची काही यात्रा कंपनी नाही आहे, ते वर्षातुन एक-दोनदा जवळपासची माणसे एकत्र करुन जातात. खुप वर्षे जातायेत तसेच ते स्वत: पुजारी आहेत अशी माहिती तिने मला दिली आहे.

तुम्हाला यायचे आहे का?

Pages