वृश्चिकेची साडेसाती

Submitted by बोकलत on 18 October, 2019 - 23:56

मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मला एक विचारायचं आहे. माझी रास वृश्चिक आहे. वृश्चिकेच्या लोकांची साडेसाती येत्या 24 जानेवारीला संपणार आहे असं म्हणतात. मी तुनळीवर अनेक व्हिडिओ पाहिले त्यात वृश्चिकेची लोकं करोडपती होणार, जगावर राज्य करणार वैगरे वैगरे बोललं जातंय. म्हणजे थोडक्यात आमचे दिवस चांगले येणार. परंतु माझ्या बायकोची रास कुंभ आहे आणि कुंभ राशीची साडेसाती वृश्चिकेची साडेसाती संपल्यावर सुरू होते. बायकोला अर्धांगिनी म्हणतात म्हणजे कुंभ राशीच्या साडेसातीचा त्रास मलापण होणार का? एकीकडे आपल्या राशीची साडेसाती संपणार म्हणून आनंद आणि दुसरीकडे बायकोची साडेसाती सुरू होणार म्हणून भीती या द्विधा मनस्थितीत अडकलोय. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लग्न झालं की सार्वकालीन साडेसाती सुरू हिते म्हणतात. बाकी, साडेसाती (विश्वास असल्यास) सर्वांना लाईनीवर आणते म्हणतात.

(पण पण, ह्यांदाच्या साडेसातीचा लय इफेकट जाणवला. चूकीचे निर्णय प्रचंड म्हणजे प्रचंड महागात पडले. आमचं विमान दणकून आपटलं. आता खूपच सांभाळून अन विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिकलोय,)

आमच्याकडे उलट आहे, माझी वृश्चिक रास आणि नवऱ्याची कुंभ, तसं साडेसाती एरवी पण आम्हाला कायम असते की काय असं एकंदरीत वाटत राहतं Happy .

असो जय मारुती. जय शनिदेव, ,न्यायी शनिदेव चांगलं करेल काहीतरी ही प्रार्थना त्याच्याकडे.

कुंभेला आणि मकरेला साडेसाती अशी नसतेच. फक्त यश येण्याची गती मंद होते. सावध पवित्रा घेणे, फार अपेक्षा न बाळगणे, माघार घेण्यास तयार असणे या अंगजात प्रवृत्तींमुळे त्यांना फारसा त्रास होत नाही.

कर्क,सिंह,,वृश्चिकवाले साडेसातीत फार आपटतात. यांच्या अतिभावुकपणा, महत्वाकांक्षा, डावपेच, या गुणांवर शनी पाणी फेकतो.
बाकी कायमचीच साडेसाती असणे ही स्थिती येण्याचं कारण चंद्र रास नसून १)चंद्राचे स्थान, ४)कुंडलीतले चतुर्थ स्थान बाधित असणे हे आहे. कर्मावर आणि पुनर्जन्मावर विश्वास वाढण्याचे कारण हेच असते.

कायमचीच साडेसाती असणे ही स्थिती येण्याचं कारण चंद्र रास नसून १)चंद्राचे स्थान, ४)कुंडलीतले चतुर्थ स्थान बाधित असणे हे आहे. कर्मावर आणि पुनर्जन्मावर विश्वास वाढण्याचे कारण हेच असते>>>>
कुंडलीतील स्थान बाधित असल्यामुळे असे होत असेल तर कर्मफल आणि पुनर्जन्म विश्वास वाढणारच ना.

आणि त्यावरच विश्वास ठेवायचा तर मुळात वाईट कर्मे असतील तर त्याचे फलस्वरूप म्हणून कुंडलीत महत्वाची स्थाने बाधित होणार असे म्हणायला हवे. आणि याजन्मी इतकी कठोर शिक्षा होण्यासारखे काही हातून घडले नसल्यास माणूस पूर्वजन्मीचे पाप म्हणून तिकडे पाहणार. असो. यावर उहापोह भरपूर झालाय आधीच.

वृश्चिकेची साडेसाती संपतेय हे ऐकून बरे वाटले. माझ्या मुलीची रास वृश्चिक. साडेसातीदरम्यान मानसिक त्रास झाला पण एकंदरीत पाहता फायदाच झाला. तिचे पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण साडेसाती काळात पूर्ण झाले व त्या शिक्षणाचा उपयोग करून ती सध्या स्वतःचा व्यवसाय आकाराला आणायच्या खटपटीत आहे.

मी तुनळीवर अनेक व्हिडिओ पाहिले त्यात वृश्चिकेची लोकं करोडपती होणार>>>>

आपोआप काहीही होत नसते, माणसाला स्वतःची धडपड स्वतःलाच करावी लागते. नशीब हा फॅक्टर असतोच, पण तो एकटाच पुरेसा नसतो.

वृश्चिकेची साडेसाती संपतेय हे ऐकून बरे वाटले >>>> हो मलाही.माझ्या लेकाची वृश्चिक रास आहे.बाकी आधीपासून शनीमहादशा वगैरे मजा मजा चालूच होत्या.अजून काही असल्यास माहित नाही.

माझा,आईचा पत्रिकेवर विश्वास नसूनही आइने त्याची पत्रिका कुठेतरी दाखवली होती.मी,अज्ञानात सुख मानते.आजचा दिवस चांगला गेला ते महत्वाचे!

<<< माझी रास वृश्चिक आहे. वृश्चिकेच्या लोकांची साडेसाती येत्या 24 जानेवारीला संपणार आहे असं म्हणतात. >>>
या असल्या भंपकपणातून बाहेर पडाल तेव्हा खरी साडेसाती संपेल.

या असल्या भंपकपणातून बाहेर पडाल तेव्हा खरी साडेसाती संपेल>>>

ओ भाऊ, साडेसाती असली, नसली, आमच्या रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडला नाही. तितकाच अभ्यास केला, तितक्याच उत्सुतकतेने व धडधडणार्या काळजाने रिझल्ट बघितले, तितक्याच उमेदीने नोकऱ्या शोधल्या व मिळालेल्या सोडून व्यवसाय सुरू केले. साडेसाती आहे म्हणून हातपाय गाळले नाहीत की आता संपणार म्हणजे लगेच करोडपती होणार म्हणून 10 स्विस बँकेत अकाउंट उघडले नाही.

कुंडली बघायची केवळ गम्मत म्हणून, जिथे योग्य वाटले तिथे वापरली, बाकी जे जेव्हा योग्य वाटले ते केले.

सगळ्यांना धन्यवाद, मला अजून एक विचारायचं आहे कि जर जा साडेसाती संपल्यानंतर मी बॉसला उलट सुलट बोललो, कॉलर वैगरे पकडली आणि माझे स्टार चांगले असतील तर कंपनी बॉसला काढेल कि मला?

साडेसाती संपल्यानंतर मी बॉसला उलट सुलट बोललो, कॉलर वैगरे पकडली आणि माझे स्टार चांगले असतील तर कंपनी बॉसला काढेल कि मला>>>>>

नेकीं और पुछ पुछ...???

करून बघा आणि इथे लिहा.

सगळ्यांना धन्यवाद, मला अजून एक विचारायचं आहे कि जर जा साडेसाती संपल्यानंतर मी बॉसला उलट सुलट बोललो, कॉलर वैगरे पकडली आणि माझे स्टार चांगले असतील तर कंपनी बॉसला काढेल कि मला?
>>

बॉस ला.

चंद्राचे स्थान हे फार पटलेलं आहे कधीच, पण मी हल्ली बरेच वर्ष पत्रिका वगैरे कोणाला दाखवणे सोडून दिलंय, आपला कर्मभोग समजून, कर्म करत राहायचं आनंदाने. आपण चांगलं कर्म करत रहायचं, आपल्याला पटत असेल आवडत असेल त्या देवाचं नाम:स्मरण करत रहायचं, बाकी जे नशिबात आहे ते होणार. प्राक्तन, नशीब वगैरे फार पटायला लागलंय हे मात्र नक्की, पण श्रद्धा आहे माझी परमेश्वरावर त्यामुळे लढायचं बळ मिळतं, खचून परत उभं रहायचं बळ मिळतं, हे आपलं माझ्यापुरतं मी शोधलेलं साधं, सरळ, सोपं उत्तर. गणपतीबाप्पा मोरया.

साडेसातीत खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्याचा पुढे फायदा होतो. जो कष्टाचा डोंगर उपसण्यापासून दूर राहतो त्याचे नुकसानच होते.
समजा कुणी ज्योतिष पाहून काही करत नाही आणि हीच परिस्थिती आल्यावर काम करत राहतो त्याचाही फायदा होणारच. ज्योतिष पाहाच हा सल्ला देण्याचा प्रयत्न अजिबात नाही.
साडेसातीमध्ये बऱ्याचदा आपल्या आजुबाजुच्या लोकांमुळे आणि घटनांमुळेही अनपेक्षित त्रास भोगावा लागतो असं भाकित आणि काळ ज्योतिषशास्त्रात वर्तवण्याचा प्रयत्न असतो.
धागा लेखकाच्या प्रश्नाला उत्तर दिलंय, इतर अनेक चर्चा झालेले पुन्हा उगाळण्याचा हेतु नाही. किंवा ज्योतिषाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन {उघड आणि गुप्त} शत्रु, मित्र, शेजारी यांचेवर बारीकसारीक हल्ले केव्हा करावेत हे सांगण्याचा प्रयत्न नाही.

बायकोला अर्धांगिनी म्हणतात म्हणजे कुंभ राशीच्या साडेसातीचा त्रास मलापण होणार का?

>> याचं उत्तर कोणीच नाही दिलं शेवटी.

>>>कर्क,सिंह,,वृश्चिकवाले साडेसातीत फार आपटतात. यांच्या अतिभावुकपणा, महत्वाकांक्षा, डावपेच, या गुणांवर शनी पाणी फेकतो.>>>
पहिली गोष्ट म्हणजे साडेसाती सगळं वाईट च करते असे नाही...उलट बऱ्याच गोष्टी आपल्याला शनी देव प्रसन्न झाल्यावर मिळतात..माझ्या नवऱ्याची सिंह आणि मुलीची वृचिक रास आहे .. जेव्हा नवऱ्याची साडेसाती संपत आली तेंव्हा त्याचा बिझनेस एकदम मस्त चालू होता आणि आता ही चांगला आहे... माझी मुलगी ही या वर्षी पुढच्या शिक्षणासाठी कॅनडा ला गेली.. म्हणजे तुम्ही चांगले वागत असाल आणि मेहनत करत असाल तर साडेसाती चांगलेच करते असा माझा तरी अनुभव आहे Happy

>>बायकोला अर्धांगिनी म्हणतात म्हणजे कुंभ राशीच्या साडेसातीचा त्रास मलापण होणार का?

>> याचं उत्तर कोणीच नाही दिलं शेवटी.>> Rofl

@ बोकलत ..तुमची साडेसाती चालू होती तेव्हा हा प्रश्न पडला नव्हता का तुम्हाला .. तुमची साडेसाती चालू असताना जो इफेक्ट तुमच्या बायको वर झाला तसाच तुमच्यावर होणार असे समजा कारण घरातला एक व्यक्ती खुश असेल तर बाकी सगळे खुश आणि दुःखी असेल तर दुःखी असेच असतें कुटुंब म्हणजे Happy

पण श्रद्धा आहे माझी परमेश्वरावर त्यामुळे लढायचं बळ मिळतं, खचून परत उभं रहायचं बळ मिळतं,>>>>नशीबवान आहेस.

जेव्हा नवऱ्याची साडेसाती संपत आली तेंव्हा त्याचा बिझनेस एकदम मस्त चालू होता आणि आता ही चांगला आहे... माझी मुलगी ही या वर्षी पुढच्या शिक्षणासाठी कॅनडा ला गेली..

>> साडेसातीची काही वर्षे अतिशय खडतर, काही वर्षे त्यातल्या त्यात मध्यम आणि शेवट भरभराटीचा असतो हे तुम्हाला माहीत नाही काय?