हर्बल ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टर्सची माहिती हवी आहे.

Submitted by me_rucha on 15 October, 2019 - 00:17

मला पुण्यामध्ये हर्बल ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टर्स बद्दल माहिती हवी आहे. त्या संबंधी काही प्रश्न आहेत.
1. कुणी हर्बल ट्रीटमेंट घेतली आहे का? अनुभव कसा आहे
2.असे ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टर्स ची डिग्री काय असते?
3.पुण्यामध्ये ह्यातले तज्ञ् डॉक्टर्स आहेत का? असल्यास नावे सांगा
मला आयुर्वेदिक डॉक्टर्स नको आहेत हर्बल ट्रीटमेंट देणारे आहेत.

ह्या दोन्हीमध्ये फरक आहेत. इच्छुकांनी गूगल करावे
मला ही ट्रीटमेंट पोटाच्या नानाविध आजारांसाठी हवी आहे.
मी ह्या प्रॉब्लेम्ससाठी आयुर्वेदिक, ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी ह्या तिन्ही घेऊन पहिल्या पण कोणतीही pathy माझे प्रॉब्लेम्स पूर्णपणे सॉल्व करू शकली नाही म्हणून मी शेवटचा पर्याय म्हणून हर्बल ट्रीटमेंट घ्यायचा विचार करत आहे.
कृपया धाग्यावर अवान्तर करून धाग्याला वेगळे वळण देऊ नये

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ही ट्रीटमेंट पोटाच्या नानाविध आजारांसाठी हवी आहे.
मी ह्या प्रॉब्लेम्ससाठी आयुर्वेदिक, ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी ह्या तिन्ही घेऊन पहिल्या पण कोणतीही pathy माझे प्रॉब्लेम्स पूर्णपणे सॉल्व करू शकली नाही >>> हर्बलबद्दल माहित नाही. गूगलवर नीटसं कळलं नाही. तुम्हाला नक्की काय होतंय ते माहित नाही. पण तरी एक सांगू इच्छिते.... माझे आजोबा, ज्यांना कधी रक्तदाब, मधुमेह, ताप, उलट्या/पोट बिघडणे, हे दुखतंय ते दुखतंय किंवा साधी डोकेदुखीही कधी झाली नाही, ज्यांना जातानाही कसली व्याधी झाली नाही (दिवा मालवावा तसे ८३व्या वर्षी शांत झाले), ते माझ्या आठवणीत तरी कायम रोज थोडं त्रिफळा चूर्ण घेत. त्यांच्या निरोगीपणाची जेव्हा आठवण होते तेव्हा मला नेहमी वाटतं की आपणही रोज थोडं त्रिफळा चूर्ण घ्यायला हवं होतं Lol

मी शेवटचा पर्याय >>>> 'शेवटचा' पर्याय असा कधीच नसतो. योग्य पर्याय आपल्या समोर येत नाही इतकंच. आपण सकारात्मक राहून प्रयास करत राहायचं. तुम्हाला तुमच्या दुखण्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा.

अगदी असाध्य रोग सोडले तर इतर कोणतेही रोग सात दिवसांत बरे व्हायला हवेत. तीन दिवसांत जर सुधारणा दाखवत नसेल तर ते औषधच नाही. बाकी तुम्ही एकाच वेळी दोन तीन औषधे घेत नाही ना?

पोट गडगडणं, वायूचा त्रास होऊन पोट फुगल्यासारखे वाटणं, मलावरोध किंवा सतत जुलाब होणे हे बऱ्याचदा मानसिक स्थितीमुळे सुध्दा होते. अंग्झायटी, कामाचा दबाव, आर्थिक असुरक्षितता हे सुद्धा कारणं असू शकतात. आधीचे जेवण पचन होण्यापूर्वी परत खात राहिलं तर पोटात आव होते. आवेचा त्रास खूप तापदायक असतो. शिवाय पोट सुटलं असेल तर मोठ्या आतड्यांची रचना बिघडून पचनसंस्थेची पार वाट लागते.
हिरडा, त्रिफळा चूर्ण हे कोणतेही दुष्परिणाम न करता उपयोगी आहेत.

@अश्विनी त्रिफळा चूर्ण मीही घेतलंय.
ते बद्धकोष्ठते साठी आहे. पण इन जनरल पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी ते देतात. मला काही फरक जाणवला नाही.
srd नाही मी एकाच वेळेस अशी कुठलीही 2-3 औषधे घेत नाही. मागच्या 3 वर्षांपासून मी औषधे घेत होते (alopathy ) पण त्याने फारसा फरक जाणवत नव्हतं फारफार तर 30%रिलीफ मिळाला आणि त्याचे भयंकर side effects होतं होते इतके की मला दुसऱ्या डॉक्टराकंडे जाऊन त्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागली. सध्या मी नो ट्रीटमेंट मोड वर आहे. पण असंख्य पथ्य करून जीव मेटाकुटीला आला आहे. म्हणून काही उपाय मिळाला तर बर होईल असं वाटतंय.

योगासनं सुरू करून पहा. कोवळ्या किरणांमध्ये मॉर्निंग वॉक घेवून पहा. सातत्य हवं. ह्याने एकूणच आरोग्य सुधारेल. आपल्या सगळ्या संस्था अप्रत्यक्षरित्या एकमेकींशी जोडलेल्या असतात.

https://www.betterhealth.vic.gov.au/health/ConditionsAndTreatments/herba...>> हर्बल मेडिसिन्स बद्दल माहिती. हर्बल मेडिसिन्स मध्ये झाडाची फुलं, पान, बिया ह्यांचा उपयोग केला जातो.
त्या पासून चूर्ण वगैरे नाही बनवत.
Actual फुलं, पाने वगैरे वापरतात.

पोटाचे नानाविध आजार आहेत असे लिहिलयं तर हे वेगवेगळे आजार आहेत की एकाच व्याधीमुळे उद्भवणारी लक्षणे आहेत? तुम्हाला निरुत्साही करायचा उद्देश नाही पण व्याधी(कंडीशन) असेल तर आहार-विहाराची दैनंदिनी ठेवून व्याधी आटोक्यात ठेवता येते, मात्र पूर्ण बरे वाटले असे होत नाही. आहार-विहारात चूक झाली की लक्षणे उद्भवतात. हर्बल ट्रिटमेंटचा विचार करत आहात पण हर्बल म्हणजे साईड इफेक्ट्स नाही असे नसते. शिवाय सर्टिफिकेशन्/विश्वासार्हता ह मुद्दा आहेच. आरोग्यासाठी वनस्पतींचा वापर हे काही नवे नाही. परंतू चांगल्या डॉक्टर ऐवजी फक्त हर्बलिस्ट कडून ट्रिटमेंट असे नसावे. तुमच्या आजाराचे निदान झाले आहे का? तुमचा पोटाचा त्रास हा व्याधी या प्रकारात मोडत असेल तर हर्बल ट्रिटमेंट घेतली तरी आहार-विहारावर नियंत्रण ठेवून मॅनेजच करावा लागेल.

Intermittent fasting करून पाहिला का? या मध्ये पोटाला नक्कीच आराम मिळतो. आणि अन्न घरीच बनवलेलं खा. मैदा नॉनव्हेज dairy टाळा, तसेच spicy oily खाण टाळा. पित्त, मूळव्याध, indigestion, ढेकर यामध्ये नक्कीच फायदा होतो. सात्विक आहार सर्व शारीरिक व्याधी साठी औषधं च आहे जोडीला IF.
काही काही लोकं IF बरोबर high protien diet करतात त्यामध्ये dairy food, नॉनव्हेग involve करतात परंतु पोटाचे आजार असणाऱ्यांनी शक्यतो हे टाळावेच.

सर्वप्रथम आपण सगळ्यांनी जी माझ्यातब्येतीबद्दल काळजी दाखवली ते वाचून छान वाटलं. त्या बद्दल धन्यवाद.
स्वाती 2 मला ऍसिडिटी आणि अपचन असे दोन मुख्य आजार आहेत.
ह्या संबंधीच्या सगळ्या टेस्ट्स झाल्या आहेत पोटाचा MRI, CTscan, endoscopy, sonography, berium followthrough, असंख्य ब्लड टेस्ट्स सगळं सगळं करून झालं
सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत.

मग डॉक्टरांनी माझ्या ऍसिडिटी मुळे होणाऱ्या उलट्याना functional वोमिटिंग आणि अपचनाला dyspesia अशी नावे दिली(म्हणजे काय ते त्यांनाच माहिती ). आणि ट्रीटमेंट चालू केली ही ट्रीटमेंट मी 3 वर्ष घेतली त्यामुळे काही फरक जाणवला नाही फक्त आधीपेक्षा बर वाटत होतं. पण जवळपास 2-2.5 वर्षांनी माझे periods येणं बंद झालं मग गायनॅक कडे गेले तिकडे परत sonography, thyroid, अमूक, तमूक सगळ्या टेस्ट्स केल्या ठरल्याप्रमाणे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल मग मी विचारलं periods का येत नाहीयेत तर doctoranani जे काही सांगितलं ते ऐकून मी हादरून गेले त्या म्हणाल्या तुला premature menopause आलाय. I was like what? !! माझं वय बघता मी ते ऐकून हादरलेच. मी, नवरा आम्ही विचार करता आम्हला असं वाटलं की हे सगळे त्या alopathic medicine चे side effects aahet.
म्हणून आधी ती ट्रीटमेंट बंद करायचा निर्णय घेतला.
आणि homeopathy सुरु केला
त्यामुळे माझी ऍसिडिटी thambali
आणि periods ही सुरु झाले
पण अपचन काही कमी झालं नाही.
ते आजतागायत आहेच त्यासाठीच मी हर्बल मेडिसिन घ्यायचा विचारलं करतीय.

कोरेगाव पार्कला तिबेटी हर्बल ऍक्युपंक्चर क्लिनिक आहे. फक्त नाव ऐकून माहिती आहे, माहिती काढुन बघा.

तुम्हाला dyspepsia करता levosulpride हे औषध दिलं होतं का?

रोज घरी लावलेलं वाटीभर दही, साल काळी झालेलं केळं खाल्ल्यास gut flora maintain होईल. हे पदार्थ रोजच्या आहारातले व उत्तम प्रोबायॉटीक पुरवणारे आहेत.

मी, नवरा आम्ही विचार करता आम्हला असं वाटलं की हे सगळे त्या alopathic medicine चे side effects aahet.>> हा गै र समज आहे हो.

तुम्ही अ‍ॅलोपथिक उपचार त्या पोटाच्या पक्षी पचन संस्थे साठी घेतलेत. मेनोपॉज आपल्या जनन संस्थेस येतो. प्रिमेचुअर मेनोपॉज येउन गेला आहे का ते कन्फर्म करायला गायनॅक कडे गेले तर उत्तर मिळेल. ते झाले असेल तर त्याप्रमाणे पुढे जाता येइल.

लिव्हर, गॉल ब्लॅडर पँक्रिआ च्या डिसॉर्डर साठी चेक केलेत का?

पोटाशी संबंधित अमुक त्रास का होतो हे माहीत करून घ्यायचे तर आहारावर लक्ष ठेवायचे. मला ऍसिडिटीचा त्रास होतो व त्यात भयंकर पोट दुखते. लक्ष ठेऊन राहिल्यावर कळले की रात्री जेवण चुकवले किंवा सटरफटर खाऊन पोट भरले की ऍसिडिटी होते. चपात्या खाल्ल्यास जेवल्यानंतर पोट फुग्यासारखे फुगते हा शोध गेले काही महिने ज्वारी/बाजरी/नाचणी भाकर खात काढले व नंतर परत 2 आठवडे चपात्या खालल्या व पोट परत फुगायला लागले तेव्हा लागला. हा पोट फुग्यासारखे फुगण्याचा त्रास गेले कित्येक वर्षे होता पण त्याचे कारण भरपूर जेवण हे मी स्वतःच ठरवले होते Happy Happy

त्यामुळे डॉक्टर नंतर शोधा, आधी आहाराची डायरी सुरू करा व नोंदी लिहून ठेवा. उद्या डॉक्टर सापडल्यावर त्यालाही उपयोग होईल या नोंदींचा.

रुचा,
functional vomiting म्हणजे अमुकच एक कारण दर्शवत नाही पण त्रास होतो. dyspesia म्हणजे पोटाच्या वरच्या भागाशी संबंधीत अपचन.
बरेचदा तणावामुळे त्रास वाढतो. मेडीटेशन केल्यास लक्षणे कमी होतात. साधा चालण्याचा व्यायामही नियमित केल्यास आराम मिळतो. काही जणांना फ्लावर थेरपी मुळे ताण कमी झाल्याने फायदा होतो. दुसरे म्हणजे अन्न डायरी ठेवली तर काय ट्रिगर्स आहेत ते लक्षात येते. काही वेळा अन्न कसे शिजवले आहे आणि ते कधी, किती प्रमाणात खाल्ले याने ही फरक पडतो. बरेचदा बाहेरच्या पदार्थात जी अ‍ॅडिटिव्ज असतात ते ट्रिगर असतात. माझ्या लेकाला विकतचा साल्सा चालत नाही पण घरी केलेला ताजा साल्सा चालतो. मला स्वतःला काही पदार्थ दुपारच्या जेवणात खाल्ले तर चालतात पण रात्रीच्या जेवणात खाल्ले तर त्रास होतो. कुठल्याही प्रकारचा चहा-कॉफी रोज घेतल्यास त्रास होतो पण घरगुती हॉट चॉकलेट, चॉकलेट शेक चालते. दाण्याच्या कुटाऐवजी तिळकुट वापरते.
कडधान्ये भिजवून मोड आलेलीच वापरणे, वरणासाठी डाळ देखील आठ तास भिजवून वापरणे, घरचे साधे , कमी मसाल्याचे जेवण योग्य वेळी जेवणे याने बराच आराम मिळतो.
कोमट लिंबू पाणी(बिन साखर मीठाचे) पिणे, घरगुती आंबेहळदीचे ताजे लोणचे (आंबेहळद, आले , लिंबू रस आणि सैंधव मीठ) , हळदीचा काढा( १ कप पाण्यात पाव चमचा हळद आणि चिमूटभर सुंठ उकळवून) , घरच्या बीन सायीच्या दह्याचे ताक पुदीना आणि जीरे पूड घालून हे काही घरगुती उपाय.

साधनाताईंनी सुचवल्याप्रमाणे गव्हाऐवजी ज्वारीची भाकरी खाणं सुरू करा. जेवण शक्यतो अन्न गरम असतानाच खावं. मालदांडी ज्वारी उत्तम असते.

बरेचदा तणावामुळे त्रास वाढतो. >>>> अगदी हेच लिहायला आले होते.
me_rucha, तुम्हाला काही मानसिक त्रास/ तणाव असेल तर तो कमी करण्यासाठी मन दुसरीकडे गुंतवा.अर्धा तास नियमित फिरायला जात चला.बाकी ध्यान, प्राणायाम, वगैरे आहेतच.

@स्वाती 2 तुम्ही जे सांगितलंय ते मी गेली 1, 2 नाही तर तब्बल 4 वर्षांपासून करतीय. पथ्य -पाणी करून जीव त्रासून गेलाय. म्हणूननच काही उपाय आहे का ते शोधतिय.
@साधनाताई प्राणायाम करावा लागेल सुरु. ह्या सगळ्या गोष्टी करून काही फरक जाणवत नव्हतं त्यामुळे बंद केल्या. त्या सुरु कराव्यात.
देवकी तुम्ही जे म्हणताय ते बरोबरय.
ह्या सगळ्याची सुरवात मानसिक ताणातूनच झालीय. पण
त्या गोष्टी आता माझ्या आयुष्यात नाहीयेत पण तरीही आजार काही कमी व्हायचं नाव घेत नाहीय.
सगळ्याच्या सूचना आणि सल्ल्यांबद्दल धन्यवाद.

तुम्हाला dyspepsia करता levosulpride हे औषध दिलं होतं का?>> हो घेतलंय मी ते.
I had all the alopathic medicines.
त्याचा फार फरक वाटला नाही.
पथ्य नाही केले की त्रास होतोच.
ते कोरेगाव पार्क च हर्बल शॉप मलाही गूगलकृपेनी दिसलं.
This shop is permanently closed असं दिसतंय.
Reviews मध्ये लोकांनी लिहिलंय ते क्लोज झालंय असं.

प्रिमेचुअर मेनो पॉज असेल तर हार्ट डिसीजची रि स्क वाढते असे आजच पेपर ला आले आहे. हार्ट शी संबंधीत सर्व चाचण्या एकदा करून घ्या. मधुमेह आहे का तुम्हाला?

maazya maahitit punyat ek gruhastha aahet - Shri. Arvind Joshi. Te fulanchi aushadhe sangtat ani anekana changala anubhav ala aahe. Te sinhagad road var rahatat. Tumhi tyana phone karun vel gheun jau shakta - Phone No-9421948894. Tyancha gelya anek varshancha bhartiy fulanvarcha abhyas aahe. English typing baddal mafi asavi. marathila jara tras hotoy, savay geli aahe.

तुम्हाला dyspepsia करता levosulpride हे औषध दिलं होतं का?>> हो घेतलंय मी ते. >>>
levosulpride मुळे बऱ्याचजणांचे prolactin खुप वाढते आणि त्यामुळे पाळी बंद होते. औषध बंद केले की प्रोलॅक्टिन परत नॉर्मल होत जाते आणि पाळी सुरू होते.

रुचा, तुमचा त्रास समजू शकते . तुम्हाला योग्य उपायांनी बरे वाटो !>>>>> + १
वर बर्याचजणांनी उपाय सुचवले आहेत.
मानसिक तणाव नाहीये असा वाटतो पण ब्याक आॅफ द माईंड असू शकतो त्याचे निराकारण करून घे.
माझा निसर्गोपचारावर खूप विश्वास आहे. ज्यात फक्त आहारावर भर असतो तो घेऊन बघ. मी नियमीत उरूळीकांचनला जात असते. मला ब्रॅंड एम्बेसेंडर म्हणतात Happy फायदा नाही झाला तरी नुकसान काही नाही.

एक चहाचा चमचाभरून शतावरी पावडर (साखरेचे वावडे नसेल तर शतावरी कल्प) आणि चतकोर चमचा यष्टीमधु (ज्येष्ठमध) पावडर कप भर दुधातून सकाळ, रात्री घेऊन बघा दोन आठवडे. फरक पडला तर तीनेक महिने घ्या.
लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर पाण्यातून घ्या.
डिस्क्लेमर: हा वैद्यकीय सल्ला नाही, तसे माझे कसलेही क्वालिफिकेशन नाही. वैयक्तिक अनुभव आहे. दोन्ही हर्ब्स आपण घेऊ शकता की नाही, कीती काळ, किती प्रमाणात घेऊ शकता हे डॉक्टरांकडुन कन्फर्म करून घ्या.

शतावरी २ असतात बरं का - एक डिलीव्हरी नंतर आईस दूध यायला व एक वृद्धांकरता (१९ वर्षांपूर्वीची माझी खात्रीशीर माहीती)

तुमची काहीतरी गल्लत होत आहे.
शतावरी एकच आहे.
शतावरी हे फक्त स्त्रीने घाययचे असते / फक्त बाळंतपणात घ्यायचे असते असे नाहीये.
स्त्री / पुरुष घेऊ शकतात.

मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दिंचे कारण. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्यूअर. जगाला फाट्यावर मारुन स्वत: साठी जगता आलं पाहिजे.

अन्जु , स्वाती
तुमच्या शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.
मानवजी तुम्ही जे म्हणताय मलाही तसंच
वाटतं. लॅक्टोज इंटॉलरन्स अँड इंटॉलरन्स ऑफ मेनी फूड आयटम्स मे बी..

कार्यव्यग्रतेमुळे प्रतिसाद द्यायला उशीर झाला. त्याबद्दल दिलगिरी.