"श्रावण"

Submitted by mi manasi on 12 October, 2019 - 07:21

"श्रावण"

तो श्रावण होता धीट
शीळ घालीत
मला खुणवीत
मागुनी गेले
त्या रंगी रंग रंगले ll१ll

ऊन त्याच्यासंगे चाले
बांधुनी चाळ
पावसाची माळ
घालुनी ओले
रूप आरसपानी ल्याले ll२ll

सांडले इंद्रधनुचे
रंग रानात
फुलापानात
शिवारी सजले
पालवले पालव सगळे ll३ll

उधाण नदी ओढ्यास
शहारे वारे
चिंब जग सारे
झोके झुलले
देवलोक भूवरी सजले ll४ll

वरखाली झुलता झोका
पोपटी तरवे
भासले रावे
जसे उडाले
मन खेळी दंग दंगले ll५ll

सूर सारे गारे गात
सरीवर सर
झरे झरझर
मारवा बोले
मीच श्रावणगाणे झाले ll६ll
..... मी मानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

@मानसी, मला संपर्कातून मेल कराल का?

मधुरा
पुरंदरे शशांक
बोकलत
पाषाणभेद
आपल्या सगळ्यांचे धन्यवाद! लोभ असावा...

मधुरा...माफ करा पण माझ्या मलाच अजून काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत म्हणून मेल केला नाही.

पाषाणभेद... हो, उशिराने टाकली खरी!.... जुनीच होती . काही काळ ब्रेक घेतला होता त्यामुळे श्रावणात टाकली नाही.
आता श्रावणसरी कविता पाहिली आणि आठवली म्हणून टाकली...तुम्हाला छान वाटली याचा आनंद झाला.