Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या फ्रिल साडी ची फॅशन आहे
सध्या फ्रिल साडी ची फॅशन आहे ती जायची मी आतुरतेने वाट बघत आहे. >>> जशी मी कोल्ड शोल्डर जाण्याची वाट पहाते आहे. Racks भरभरून नजर जाईल तिथे फक्त हाच पॅटर्न. जरा एखादा कलर किंवा डिझाईन आवडलं म्हणून हात लावला तर स्लीवज 'कोल्ड शोल्डर्स' असतात, ज्या मला अजिबात आवडत नाहीत. स्लीवलेस घाला, spaghetti घाला, पण कोल्ड शोल्डर्स माझ्या वॉर्डरोब मध्ये कधीच नाही. कधी एकदा मार्केट या फॅशन मधून मुक्त होणार याची वाट बघते आहे.
पारंपरिक साड्यांचे कोल्ड
पारंपरिक साड्यांचे कोल्ड शोल्डर ब्लाउस बघून तर अगदीच कसतरी वाटतं. फार क्वचित असे टॉप किंवा ड्रेसेस चांगले वाटले आहेत.
लहान भगदाड वाला कोल्ड शोल्डर
लहान भगदाड वाला कोल्ड शोल्डर त्यातल्या त्यात चांगला दिसतो
मोठं युरोपियन पत्रपेटी च्या आकाराचं भगदाड असलेला शिंप्याने कापड चोरल्या सारखा दिसतो.
फ्रिल साडी म्हणजे काय ते
फ्रिल साडी म्हणजे काय ते कुतुहल वाटून गुगलून पाहिले.ही साडी कधी पाहिली नव्हती.पण नाही आवडली.अगदी फंक्शनमधेच काय ते ओके असावी.
फार क्वचित असे टॉप किंवा ड्रेसेस चांगले वाटले आहेत.>>>+१. दुसरीकडे त्या फाटक्या जीन्स डोक्यात जातात.
सध्या पलाझो आणि टॉप्स,जरी शोभत नसले तरी घालायला लागले आहे.तरीही सुरक्षित अंतरामधेच घालते.उगा इच्छा राहिली म्हणून बाकीच्यांना त्रास नको.
मला आवडतात फाटक्या जीन्स
मला आवडतात फाटक्या जीन्स
पण ते फाटणं स्किन पर्यंत न झिरपता वरच्या लेयर पर्यंत असायला हवं.(भोकं नको, नुसतंच डिस्ट्रेस कापड)
होजियरी किंवा अगदीच प्लेन कॅज्युअल बरोबर फाटक्या जीन्स छान दिसतात.
पलाझो उन्हाळ्यात कम्फर्ट ला मस्त.पण अडी अडचणीला पायघोळ पलाझो सांभाळत इंडियन टॉयलेट ला जाण्याचा सिनारिओ कल्पून पहा.
फाटक्या जीन्सबद्दल अगदी अगदी.
फाटक्या जीन्सबद्दल अगदी अगदी. अनुष्का शर्माचा एअरपोर्ट लुक का कायसा फोटो बघितला होता तशी जीन्स घालून, भिकार्यासारखं वाटत होतं ते. एव्हडी भगदाडं असलेली जीन्स की कपडे झारामध्ये बघून ऋषी कपूरने मध्ये कॉमेंट केली होती की कटोराही तेच देतात का फुकट म्हणून.
भिकारी जीन्स म्हणतात ना
भिकारी जीन्स म्हणतात ना फाटक्या जीन्स्ला.
माझी आई म्हणते. तिनेच मला तसे सांगितले.
पलाझो उंच, सडपातळ मुलींना
पलाझो उंच, सडपातळ मुलींना सुंदर दिसतात. पलाझो घालुन मैत्रिणीला भयंकर अनुभव आला होता. बागेत का कुठे गेली होती व मधमाशी शिरली. मांडीला चावली. हिने पलाझोबाहेरुन ती तशीच मुठीत पकडली व जीव तोडुन पळत रेस्टरुममधे गेली व कशीबशी माशी काढली.
ते ऐकुन मीपण पलाझो घ्यायचा विचार सोडला. 
हा धागा
हा धागा फक् त स्त्रियान्साठी राखिव आहे का
पलाझो उन्हाळ्यात कम्फर्ट ला
पलाझो उन्हाळ्यात कम्फर्ट ला मस्त.पण अडी अडचणीला पायघोळ पलाझो सांभाळत इंडियन टॉयलेटला जाण्याचा सिनारिओ कल्पून पहा.>>>>> +१
पण ते फाटणं स्किन पर्यंत न झिरपता वरच्या लेयर पर्यंत असायला हवं>>>> हम.त्या जीन्स जरा सुसह्य असतात.
गिधडकी जब मौत आती है,तब वो शहर आता है स्टाईलमधे मधमाशीचा मृत्यू पलाझोमधे होता त्याला कोण काय करणार?
पलाझो उंच, सडपातळ मुलींना सुंदर दिसतात>>> कितीही खरं असले तरी दोन्ही नसणार्यांचे काय?
धागा फक्त स्त्रिया साठी राखीव
धागा फक्त स्त्रिया साठी राखीव नाही
आपण प्लिटेड ट्राउजर्स,स्ट्रेट फिट ट्राउजर्स, स्लिम फीट शर्ट, बूट,बेल्ट,जॅकेट्स यावर किंवा आणि कोणत्याही कपड्यांवर विषय काढू शकता
धागा फक्त स्त्रिया साठी राखीव
डबल
हा धागा फक् त स्त्रियान्साठी
हा धागा फक् त स्त्रियान्साठी राखिव आहे का. >>>> आपण काही value add करू शकत असाल तर आपलं स्वागत आहे.
Ripped denim चांगली दिसते, पण अगदीच युरोपमध्ये घालतात किंवा त्या झाराच्या फोटोत आहे तेवढी चिंध्या नसावी. Ripped denim च्या आत फिश नेट स्टॉकिंग्ज घातले तर छान स्टायलिश दिसतं. मला फोटो टाकता येत नाही, नाही तर दाखवलं असतं.
प्लेन ड्रेसवर बनारसी
प्लेन ड्रेसवर बनारसी शालूसारखी हेवी ओढणी घेतात. त्या ओढण्या बऱ्याच महाग असतात. खणाच्या कापडाचे वन पीस, स्कर्ट आणि टॉप बघितले मध्ये एका प्रदर्शनात, तेही छान होते.कॉटन/खण साडी, बुद्धाची किंवा तत्सम डिसाईन असलेले ब्लाउज आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी बरीच प्रचलित आहे सध्या.
हो तश्या ओढण्या आरामात 1500
हो तश्या ओढण्या आरामात 1500 पुढे जातात.
चांगल्या दिसतात.पण या सर्व प्रकाराला मेंटेनन्स भरपूर.
iटोकरी वर खूप चांगल्या आहेत.आज फॅबइंडिया ला पण मस्त होत्या.
त्याने पांढर्या कुडत्यासारखे
त्याने पांढर्या कुडत्यासारखे घातले आहे तशा same pattern cha पडदा बायकोने लादीपुसायच्याफडक्यासाठी बाजूला काढला आहे.. अगदीच जुना वाटला तर कमीअधिक डिजाईनचा नवा kitchen apron आहे
Same नीळा लग्नातला कोट धूळ खात पडला आहे
खाली skirt सारखे आहे तशी एक दळणाची पिशवी आहे
कापड तर आहे, देवू का टेलरकडे..? same कपडे घालून स्वतःच्या बायकोसोबत date वर जायचा plan होता.. तिला हा रणवीर खुप आवडतो
देवकी,
देवकी,
कितीही खरं असले तरी दोन्ही नसणार्यांचे काय? >> मला का बरे विचारता? मी फक्त कशा अंगकाठीला छान दिसतात असे लिहिले. बाकींनी काय करावे हे त्यांना ठरवु देत. आणि मधमाशीबद्दलही ऐकलेला अनुभव जो भयंकर वाटला म्हणुन लिहिला.
सॉफ्ट सिल्क बद्दल माहिती द्या
सॉफ्ट सिल्क बद्दल माहिती द्या ना कोणीतरी. काय प्रकार आहे हा.
नाडी आत गेली वगैरे प्रकार
नाडी आत गेली वगैरे प्रकार नाहीत, > ती बाहेर काढण्याचे प्रकार अचाट असत.विशेषतः अडचणीच्या ठिकाणी :फिदी :
सॉफ्ट सिल्क बद्दल माहिती द्या
सॉफ्ट सिल्क बद्दल माहिती द्या ना कोणीतरी. काय प्रकार आहे हा. >>>> सिल्क सॉफ्टच तर असतं की.
अजून काय वेगळी माहिती असणार? असं म्हणतात ना की प्युअर सिल्क इतकी सॉफ्ट असते की साडीची घडी काडेपेटीमध्ये मावते. ही अतिशयोक्ती झाली, पण लहानपणी असं अनेक वेळा ऐकलं होतं. म्हणून soft as silk किंवा रेशमी स्पर्श अशा उपमा वापरल्या जातात ना
सिल्क सॉफ्टच तर असतं की. >
सिल्क सॉफ्टच तर असतं की. > हो ते pure silk. पण इतक्यातच खूप साईट्स वर ` सॉफ्ट सिल्क ' अशा प्रकारच्या साड्या पाहिल्या (९०० ते १५०० किंमत ). म्हणून उत्सुकता आहे.
साड्यान्ची लायब्रारी काढा अशी
साड्यान्ची लायब्रारी काढा अशी आयडिया मी बराच काळ देतो आहे पण कुणी गांभीर्याने घेत नाही
ईईईईईईईईई लायब्ररी कशाला?
ईईईईईईईईई लायब्ररी कशाला? इतर बायांनी नेसलेल्या साड्या आपण का नेसायच्या???
इतर बायांनी नेसलेल्या साड्या
इतर बायांनी नेसलेल्या साड्या आपण का नेसायच्या???>>>
आई, आज्जी, मावशी, मैत्रीण वगैरेंच्या साड्या कधी नेसल्याच नाहीत का? आणि साडी काय ड्रेस सारखी थेट अंगाला चिकटत नाही. परकर व ब्लाउजवर नेसली।जाते ना.
काडेपेटीत मावणारी ती ढाक्याची
काडेपेटीत मावणारी ती ढाक्याची मलमल होती बहुतेक. सिल्क नसणार. सिल्क कितीही मऊ असले तरी त्याची इतकी बारीक घडी घालायला जीव धजावणार नाही

हो माझ्या डोक्यात पण अशी काही
हो माझ्या डोक्यात पण अशी काही आयडिया होती
पण त्यानंतर लोक श्रीमंत झाले आणि उगीचच कपाट भरून कपडे घ्यायला लागले.
परदेशात जिथे ब्रायडल ड्रेस आयुष्यात एकदाच घालता येतो(आपल्या सारखं लग्नाची साडी जवळच्या इतर लग्नात नेसून मिरवता येते तसं नाही) तिथे रेंटल ब्रायडल गाऊन ची सोय पण असेलच.
साड्या रोज नेसणारी पिढी मला
साड्या रोज नेसणारी पिढी मला वाटतं अस्तंगत झाली. आता फक्त सणासुदीला साडी नेसतात शहरात तरी. गावाकडे अशी लायब्ररी चालेल की नाही शंका आहे.
कॉफी विथ करण मधे काजोल आली
कॉफी विथ करण मधे काजोल आली तेव्हा करण' ती कशी ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही 'वरुन तिची खेचत होता त्यावर तिने सान्गितल ती एक्दा वापरुन पडुन राहणार्या गोश्टी वर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ते पैसे लॉन्ग टर्म इन्व्हेस्ट्मेन्ट मधे गुन्तवते , एकदरित ती बहुधा डिझायनर गोस्टी रेन्ट करते अस वाटत होत, नक्की काय करते ते निटस कळल नाही पण तस आसाव बहुधा, मला तरी तिच थिन्किन्ग आवडल.
हो प्राजक्ता. मला नेहमी
हो प्राजक्ता. मला नेहमी (उगीचच) प्रश्न पडतो. या नट्यांकडे इतके कपडे असतील ते त्या कुठे ठेवत असतील. परवाच सोनाक्षी कपील शो मधे म्हणाली, ४०० चपला होईपर्यंत मोजले पण त्यानंतर मोजणे सोडुन दिले.
हल्ली नाही का, हिरोईन 3
हल्ली नाही का, हिरोईन 3 पिक्चर हिट झाले की सव्वा लाखाच्या गुची च्या बॅग आणि 50000 चे डीऑर चे शर्ट घालून फिरतात. बहुतेक ही बातम्यांत राहाण्यासाठी केलेली गुंतवणूक असते.
या सर्वांना एअरपोर्ट, जिम,देऊळ,पार्लर अश्या कुठूनही बाहेर पडताना स्पॉट करून फोटो काढणारेही तितकेच जबाबदार. आता 12 तास विमानं बदलून प्रवास करून वैतागून बाहेर येणारी बाई 'डोल्स आणि गाबाना' च्या साध्याश्या (म्हणजे 50000 च्या) टीशर्ट मध्ये प्रिस्टीन आणि प्रसन्न वगैरे दिसून कोणाला काही फायदा आहे का?1000 च्या टीशर्ट मध्ये नॉर्मल थकलेली दिसली तरी चालेल ना?
Pages