तीन पत्ती

Submitted by सतीश कुमार on 7 October, 2019 - 06:50

तीन पत्ती

भारतातील काही भागात, विशेषत: गुजरातमध्ये दीपावली दरम्यान " तीन पत्ती " खेळणे शुभ मानले जाते कारण असे केल्याने संपत्ती आकर्षित होते असे मानतात. सूरतचे हिरे व्यापारी या प्रथेचे पालन करतात. प्रथम पत्त्याची चाळत मांडतात आणि त्यावर सुगंधी फुले ठेऊन आणि अगरबत्ती लाऊन त्यांची पूजा करतात. पत्यातील एक्का राजा राणी आणि गुलाम यांना अत्तर लावले जाते आणि गोड शिऱ्याचा प्रसाद वाटला जातो आणि त्यानंतर पत्ते पिसायला घेतात. घरातल्या स्त्रियां पण पत्ते खेळतात. सुरतचे हिरे व्यापारी आपल्या कामगारांना बोनस म्हणून ३ बीएचके फ्लॅट दिल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. काहीं व्यापाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी कामगारांना " एर्तीगा " बोनस म्हणून दिले होते. महाराष्ट्रात कांहीं दशकापूर्वी इचलकरंजी येथील एका उद्योजकाने आपल्या कामगारांना बोनस म्हणून " लूना " दुचाकी वाटल्या होत्या.

बावन्न पत्ते म्हणजे वर्षाचे बावन्न आठवडे. प्रत्येक मोसम हा १३ आठवड्याचा असतो म्हणून ४ मोसमाचे प्रत्येकी तेरा पत्ते. तेरा आठवडे गुणिले ४ म्हणजे १२ महिने आणि बाराही महिने राजेशाही टिकावी या उद्देशाने ४ राण्या, ४ राजे, ४ गुलाम. लाल पाने म्हणजे दिवस आणि काळी पाने म्हणजे रात्र.

आता प्रत्येक रंगातले एक्यापासून राजापर्यंत तेरा पत्ते घेऊन त्यांची बेरीज केली तर ९१ येते. उदा. १+२+३+४+५+६+७+८+९+१०+११+१२+१३=९१. या आकड्याला ४ नी गुणिले तर बेरीज ३६४ अधिक एक जोकर घातला तर बेरीज ३६५ येते हे वर्षातील दिवस. एवढेच काय तर इंग्रजी भाषेतल्या one two three four five six seven eight nine ten jack queen king अश्या या प्रत्येक अक्षरांची बेरीज करून पाहिली तर बावन्न येते. बावन्न आठवडे म्हणजे वर्ष.

इस्पिकचे चित्र फावड्यासारखे असते. म्हणजे शेती करणे.बदाम म्हणजे शेतीवरचे प्रेम. कीलवर म्हणजे वाढलेले पीक आणि चौकट म्हणजे हिरा, पीक विकून मिळवलेली संपत्ती या अर्थाने. कुणाला कुठलीही पाने आली तरीही विजय ठरलेलाच कारण कुठल्याच पानांचा नकारार्थी अर्थ होत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नवीन माहिती मिळाली. खरंच अशी पार्श्र्वभूमी आहे की रचलं आहे.
शीर्षक तीन पत्ती आहे, हा खेळ जुगारासाठीच खेळतात ना? हा खेळ खेळणारांना पोलिस पकडतात.‌ बऱ्याच पोलिसांना पत्त्यांचा जुगार खेळताना पाहिले आहे.

कलीयुगात रावणाला हीरो बनवत उदत्तिकरणाच्या पोस्ट्स व्हाट्सऐपला फिरत असतात तसे हे जुगाराचे उदात्तीकरण वाटतेय Sad
कुठल्याही धनाचा /लक्ष्मीचा वापर व्यभिचार / वैश्यागमन आणि जुगार ह्यासाठी केला तर ती आपल्या जीवनात अलक्ष्मी / अवदसा बनून येत राहते.... कुकर्म करण्यास अधिकाधिक प्रवृत्त करून पातकांचे धनी बनवण्यासाठी !

@सोमा वाटाणे, माझं अर्ध आयुष्य सूरत येथे गेलं. हा खेळ घरात खेळतात त्यामुळे जुगार म्हणता येत नाही. आपणही घरात दहा पैसे पॉइंट लावून रमी खेळतोच की! त्यामुळे पोलिस पकडतात वगैरे असं काहीं होत नाही. शिवाय हा खेळ परंपरेने खेळला जातो तिथे पैशांची देवाण घेवाण होत नाही.

म प्रदेशातील उज्जैन इथे काळ भैरव देवतेला नैवेद्य म्हणून दारूच्या बाटल्या देतात तिथे पोलीस काहीच करू शकत नाहीत. ती परंपरा आहे. ते मोडण्याचं धाडस पोलीस कसे करतील? तसच हे आहे. असो. धन्यवाद.

@ भिकाजी, खरं तर या गोष्टी काल सापेक्ष आहेत. लहानपणी पायाचाअंगठा धरण्यात अपमान वाटायचा आणि म्हातारपणी अभिमान वाटतो. रामाच्या हातून मरण येणं हेच रावणाचं उदात्तीकरण. महाभारतातल्या कर्णाला पण आपण उगीचच खलनायक समजत होतो पण शिवाजी सामंत यांनी मृत्युंजय लिहिला आणि कर्णाची तगमग समजली. रावणाला पण समजून घ्यायला काय हरकत आहे? सूरत येथील व्यापारी पत्ते खेळतात तो जुगार म्हणून नव्हे. ते वर्षातून एकदाच खेळतात परंपरा म्हणून. अट्टल जुगारी रोज खेळतात आणि मग घर बरबाद करतात. हे व्यापारी कामगारांना घरे बक्षीस देतात. प्रत्येक हिरे व्यापारी चे युरोप मधील बेल्जियम येथे ऑफिस असतेच. महिन्यातून एकदा हिरे खरेदीला अँटवर्प इथे जातात आणि भारतात आणून पैलू पाडतात. असो. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माझे आजोबा बर्बाद झाले या तीन पत्तीच्या जुगारात.
एकवेळ रमी परवडली ज्यात तुलनेत कमी पैसे जातात..गणपती नवरात्रला मंडपात जगरण करणारे खेळतात. पण हा तीनपत्त्ती उर्फ फ्लश हा मात्र झटपट जुगार झाला.
असो
बावन्न पत्त्यांची
माहीती रोचक वाटली तरी जुगाराचे उदात्तीकरण नको.
मेंडीकोट, बदामसत्ती, चॅलेंज, पाचतीनदोन. साताआठ, भिकारसावकार असे मौजमजेचे गेम खेळावेत.
तीन पत्ती खेळायचा मोह झालाच तर पैश्याऐवजी गोट्या लाऊन खेळावे. आम्ही कॉलेज्ला स्टडी नाईट्ला हेच करायचो.

बावन्न

जन्मःताच आयुष्याचा नवा कोरा कॅट
देवाने नशिबाच्या हातात दिला
नशिबाने पण मनापासून पिसले
एक एक पान उलगडून दिले

कधी दुररि तर कधि तिर्री
कघी गुलाम तर कधी राजा
सिक्वेंन्स कघी जुळला नाही
पेअर मात्र मस्त जुळली

बावन्न पाने वाटून झाली
राहिला फक्त जोकर
असेल बरोबर कोणी तर किंमत
नाहीतर झिरो बरोबर

राजेंद्र देवी