Submitted by द्वैत on 4 October, 2019 - 13:31
मी श्वास घेत आहे
प्रत्येक पावलावर
हा भास होत आहे
कैफात वेदनेच्या
मी श्वास घेत आहे
ही वेदना दुःखाची
की वेदना सुखाची
जो दोर सापडावा
तो फास होत आहे
येता मुठीत म्हणता
निसटून जात आहे
मोहात सावल्यांच्या
वनवास होत आहे
ही न्यूनता कशाची
घेऊन दूर जाते
हा कोणत्या दिशेने
प्रवास होत आहे ?
पाहून रोषणाई
इतुकेच वाटते की
बहुतेक संभ्रमांची
आरास होत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ अप्रतिम....
केवळ अप्रतिम....
अप्रतिम!
अप्रतिम!
ही न्यूनता कशाची
घेऊन दूर जाते
हा कोणत्या दिशेने
प्रवास होत आहे ?>>>>>> समदु:खी वाटावे अशी आहे ही द्विपदी!
प्रत्येक पावलावर
हा भास होत आहे
कैफात वेदनेच्या
मी श्वास घेत आहे
ही वेदना दुःखाची
की वेदना सुखाची
जो दोर सापडावा
तो फास होत आहे>>>>>>>>मस्तच! खूपच छान!
शेवटची ही एकदम छान !!
खूपच सुंदर!!
खूपच सुंदर!!
दत्तात्रय जी, मधुरा, सोमा जी
दत्तात्रय जी, मधुरा, सोमा जी प्रतिसादांसाठी खूप खूप धन्यवाद
वाह!! फार आवडलं.
वाह!! फार आवडलं.
ही वेदना दुःखाची
ही वेदना दुःखाची
की वेदना सुखाची
जो दोर सापडावा
तो फास होत आहे>>हे कडवं खुप आवडलं..आणि पटलंसुद्धा..
पुकाप्र!
ही वेदना दुःखाची
प्रकाटाआ
धन्यवाद सामो, धन्यवाद मन्या
धन्यवाद सामो, धन्यवाद मन्या
मन्या हे प्रकाटाआ .... कळले नाही
प्रकाटाआ - प्रतिसाद काढुन
प्रकाटाआ - प्रतिसाद काढुन टाकण्यात आला.
Actually double प्रतिसाद पोस्ट झालेला..म्हणुन काढला.
मस्त.. शब्द आणि रचना ही
मस्त.. शब्द आणि रचना ही अप्रतिम
धन्यवाद happyanand
धन्यवाद happyanand
सुंदर रचना
सुंदर रचना
खूप छान
खूप छान
धन्यवाद भिकाजी, धन्यवाद
धन्यवाद भिकाजी, धन्यवाद ज्योतिराम