कॅनव्हास आयुष्याचा

Submitted by @गजानन बाठे on 28 September, 2019 - 23:13

कॅनव्हास आयुष्याचा

पाटीवर गिरवलेली अक्षरे ती,
चुकली की पुसता यायची.
बोल बोबडे भीती नव्हती,
माय तेवढी सावरून घ्यायची.

वाटलं थोडं मोठं व्हावं,
बालपण मागे सुटत होतं.
किशोर स्वप्ने मनही वेडं,
वादळा सम वाहवत नेतं.

काळ मग खडतर तारुण्याचा,
चुकण्याची का सोय होती?
कॅनव्हास रंगीत अपेक्षांचा,
रेखाटनाची ही मुभा नव्हती.

कॅनव्हास एक अन स्वप्नं भारी,
हो!वार्धक्याची पुसट तयारी,
रंग मोजके पण हौसच सारी,
मग उरते ती जवाबदारी..

@गजानन बाठे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद, सामो,मन्या s
कृपया काही चुकल्यास सुचवा... मनमोकळे पणाने.. वैयक्तिक पणे माझ्या कवितेचा दर्जा सांगा plz