बुद्धीमत्ता ,सर्जनशीलता, latent inhibition आणि मानसिक रोग!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 10 January, 2017 - 08:15

माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड(पौर्वात्य)ऑस्ट्रेलॉईड्स(भारतीय),निगरॉईड्स(आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत ,तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत.बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत(creativity)खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.जर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त असेल तर बहुतांश शोध ,सर्जनशीलता तिथे दिसायला हवी होती.पण आपण इतिहासात डोकावलो तर आपल्या लक्षात येईल की बहुतांश शोध ,सर्जनशिलता ,कला ,काव्य ह्यात आघाडीवर होते व आहेत ते म्हणजे कॉकेशीयन्स( युरोपियन्स).बुद्ध्यांक व मेंदूच्या आकारमानात दुसर्या क्रमांकावर असलेले युरोपियन्स जगाच्या पुढे कसे ?हे कोडे पडल्याशिवाय रहात नाही.आकारमानात मोठा असलेला मेंदू व उच्च बुद्धीमत्ता असुनही पौर्वात्य(Oriental's) कुचकामी का ठरले?
Race_IQ_Sketch_OrderFlipped.png
इथे विचारवंतांनी एक सिद्धांत मांडला आहे.जो मानसशास्त्राला अनेक दशके ज्ञात आहे. हा सिद्धांत आहे latent inhibition चा.

काय आहे latent inhibition(अव्यक्त अवरोध)?
आपल्या मेंदूकडे येणारी माहीती ही कीती उपयुक्त आहे हे मेंदू ठरवत असतो,आपल्यावर सतत होणारा माहीतीचा मारा (constant stream of information) मेंदूला सहन करावा लागतो.यातील कीती व कोणती माहीती आत घ्यायची व कोणती बाहेर ठेवायची हे ठरवण्याची मेंदूची क्षमता म्हणजे latent inhibition.उदा- आपल्या दाराचे हॅन्डल (doorknob) कसे आहे ,कसे दिसते व ते कसे काम करते हे आपल्याला माहीती असते,प्रत्येकवेळी दार उघडताना आपण जर ह्या माहीतीला ' नवीन माहीती' (new stimulus)म्हणून पाहू लागलो तर आपल्या मेंदूवर माहीतीचा अतिरीक्त ताण येईल(sensory overload) ,म्हणून मेंदू ही नेहमीची माहीती ब्लॉक करत असतो,या ओळखीच्या माहीतीसाठी मेंदूचे गेट बंद असते.
सर्जनशीलता (creativity)कशी उगम पावते?
उच्च बुद्धीमत्ता व low latent inhibition असा योग जुळुण आल्यास व्यक्ती सर्जनशील बनते.युरोपियन बुद्धीमत्तेच्या बाबतीत जरी दुसर्या क्रमांकावर असले तरी त्यांच्यात Latent inhibition कमी आहे.low latent inhibition म्हणजेच मेंदूला जास्तीची माहीती ,तिचे अवलोकन करण्याइतपत बुद्धीमत्ता याचे उत्तम योग युरोपियनांमध्ये जुळुण आले आहेत.याचा अर्थ त्यांच्या बुद्धीमत्तेला नेहमी नवीन खाद्य मिळत असते.एखाद्या जटील गोष्टीतून अन्वयार्थ लावण्याची त्यांची क्षमता जास्त आहे कारण त्यांच्यात low latent inhibition हा गुण प्रकर्षाने आलेला आहे.आता हा गुणधर्म त्यांच्यात का आला हा अजुनही अभ्यासाचा विषय आहे.

low latent inhibition आणि कमी बुद्ध्यांक----
Psychosis ह्या माझ्या मानसिक आजाराचे जेव्हा मी अवलोकन करायला लागलो तेव्हा अनेक उपयुक्त माहीती मला मिळाली.जर बुद्धीमत्ता कमी असेल व latent inhibition ही कमी असेल तर अशा व्यक्तींचा मेंदू सतत माहीतीच्या ओघाखाली असतो,पण कमी बुद्धीमत्तेमुळे माहीती सर्जनशीलतेत रुपांतरीत होत नाही.परिणामतः अशा व्यक्तींना सायकोसीस पासून स्किझोफ्रेनियापर्यंत कोणतेही मानसिक आजार होऊ शकतात.मानसिक आजारांचे प्रमाण युरोपियनांत अधिक असण्याचे देखील हे एक कारण आहे.ह्यावरुन सरळ दोन समीकरणे बनतात.
High intelligence + low latent inhibition= creativity
Low intelligence + low latent inhibition= insanity

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

चांगला विषय मांडला आहात सिं जी. सुखद धक्का. असे विषय येऊ द्या. तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही.

मी विनाकारण जास्तीची माहिती ठेवत नाही. न्यूज चॅनेल्स वगैरेही बघत नाही. मग मी कुठल्या कॅटेगरीत मोडते हे जाणून घ्यायचे आहे.

कॉकेशिअन्स सर्वात पुढे का या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच द्यावेत.
माझ्या अर्धवट माहितीप्रमाणे मला असे वाटते की गरज ही शोधाची जननी असते. पाश्चिमात्य जगातील तीव्र स्पर्धा, युद्धे यामुळे बुद्धीचा वापर करून प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची आवश्यकता पडली असावी. त्या मानाने भारतीय उपखंड , चीन या भागातले हवामान, सुपीकता यामुळे गरज पडली नसावी. भारतात राजस्थानातल्या प्रतिकूलतेमुळे हा समाज इतरांच्या मानाने उद्यमशील राहीलेला आहे. त्या मानाने महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण असल्याने देशांतराची, देशाटनाची आवश्यकता पडलेली नाही. केल्याने देशाटन.... असे म्हणतात त्याचे फायदे महाराष्ट्रात दिसून आले नाहीत . मा़हे वाचन नसल्याने इथेच थांबते. चुभूदेघे.

लेख आवडलाच आवडला. प्रतिक्रियादेखील सावकाशीने वाचायच्या आहेत.
>> हो,low latent inhibition चा ऑटीझमशी व ADHD शी संबंध आहे,मगाशीच एक लेख वरवर बघितला होता यासंबंधी.>>
मी काही महीन्यांपूर्वी, ADHD शी संबंधित एक लेख वाचला होता. त्या लेखातून दुसर्‍या लेखाकडे जात मला विकीवरती काही माहीती सापडली.
https://en.wikipedia.org/wiki/Hunter_vs._farmer_hypothesis
https://psychology.wikia.org/wiki/Hunter_vs._farmer_hypothesis

मानव आदिम अवस्थेत शिकार करुन जगत असे हे तर सर्वज्ञातच आहे. ती स्टेज आहे 'हंटर' स्टेज. माणसाला अन्न मिळविण्याकरता, स्वतःचे अस्तित्वच टिकवून धरण्याकरता, काही गुणविशेषांची त्या काळात गरज होती - जसे चापल्य, सावधानता, आसपासच्या परिसरावर बारीक लक्ष, नावीन्याचा शोध.
पुढे 'गॅदरर - फार्मर' स्टेज आली जिच्यात एक प्रकारचा आराम, सामाजिक रुढींचे पालन, नियोजन, प्लॅनिंग, संयम(पेशन्स) या गुणांचे महत्व वाढले, मानवाने हे गुण उत्क्रांतीनुसार, आत्मसात केले.
परंतु काही व्यक्तींमध्ये 'हंटर' स्टेजमधील गुणांचे अद्यापही प्रबळ राहीले. त्यांच्यामध्ये ही ADHD ची लक्षणे आढळली.

जर बुद्धीमत्ता कमी असेल>> चूक .
अत्यंत बुद्धिमान व्यक्ती सुद्धा मानसिक आजाराला बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
आणि युरोपिय व पौरात्य असे जरी वर्गीकरण केले तरी प्रत्येक व्यक्ति ही त्या त्या सरसरी बँडच्या अलिकडे पलिकडे असू शकते.

Pages