Submitted by निशिकांत on 23 September, 2019 - 00:40
एक प्यास अंतरात, शांतवून टाक ना !
माझिया मिठीत रात्र दरवळून टाक ना !
का असा उगाच बाण मारतोस चहुकडे ?
मार नेम, काळजास भळभळून टाक ना !
कैद आसवास मी किती सख्या करायचे ?
आठवात ये तयास ओघळून टाक ना !
वेदनेतही सुखास शोध शोध शोधले
अन् बजावले मनास "तू हसून टाक ना" !
फैसले विकावयास बैसलेत पंच हे
लाच दे नि न्यायदीप मालवून टाक ना !
"काय जग म्हणेल?" या विवंचनेत त्रस्त का ?
हो भणंग, काळजीस ठोकरून टाक ना !
माणसा जुलूम कोठवर किती सहायचे ?
घे मशाल रान सर्व पेटवून टाक ना !
प्रेत विनविते सख्या चिता नकोस पेटवू
झाड वाचवावया, मला पुरून टाक ना !
काफिया, रदीफ अन् खयाल मस्त पाहिजे
शक्य हे असेल तर गझल लिहून टाक ना !
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!!
सुंदर!!
दंडवत !!!
दंडवत !!!
खूप छान
खूप छान
मस्त
मस्त
वाह वाह! मस्तच! मी तर चालीत
वाह वाह! मस्तच! मी तर चालीत गुणगुणुनही पाहिली. उत्तम!
फक्त इथे-
का असा उगाच बाण मारतोस चहुकडे ? >>>> 'हु' ऱ्हस्व आहे आणि मी दीर्घ वाचतेय. तिथे अडकते आहे. बाकी सगळ मस्त गुणगुणता आलं.
वाह!
वाह!
मस्तच!
मस्तच!
सुंदर
सुंदर
मधुरा ताई अगदी बरोबर आहे
हे गीत गुणगुणता यतेय