प्रेम कि मैत्री? भाग ६

Submitted by मनवेधी on 22 September, 2019 - 10:44

काही दिवसांनी श्रेया बरी झाली.... ती आता कॉलेज ला जायला लागली... रोज ती सार्थक ला पिक करायची व घरी एकत्र जायची.... ते आता तर जास्त वेळ एकत्र असायचे...
"सार्थ्या चल बाय....., उद्या लवकर आवर यार.... रोज तुझ्यामुळे फर्स्ट lecture चुकत..." श्रेया त्याला ड्रॉप करताना बोलली...
"हे काय.... लगेच चाललीस तू?... यार थांब ना थोडा वेळ... घरी जाऊन काय करणार आहेस...", सार्थक तिला थांबवत बोलला...
"इथं थांबून तरी काय करणार आहे", श्रेया बोलली
"ठीक आहे... जा...", सार्थक चिडून च बोलला...
श्रेया तिथून निघून गेली... सार्थक थोडा चिडला होता... कारण त्याला अजून थोडा वेळ तिच्या सोबत spend करायचा होता... आणि तीने फक्त आपल्याकडे लक्ष द्यावं अस त्याला वाटायचं....म्हणून त्याने तिला धडा शिकवायच ठरवलं.... श्रेया च्या हे सगळं मनात पण नाही आलं
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे श्रेया त्याला न्यायला आली.. ते दोघे गाडीवरून जाताना नेहमी गप्पा मारायचये... श्रेया काहीबाही बोलत होती पण सार्थक च त्याच्याकडे लक्षच दिल नाही... श्रेया ला जाणवलं... पण काहीतरी तो विचार करत असेल असं समजून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं... परत कॉलेज मध्ये तेच... तो दिवसभर आपल्या कडे दुर्लक्ष करतोय हे तिला जाणवलं... तिने जाताना त्याला विचारायचं ठरवलं..
लंच ब्रेक झाला... लंच ब्रेक ला सार्थक आणि श्रेया नेहमी एकमेकांच्या सोबत बसत... त्या जिन्यावर जिथे त्यांच्या खऱ्या मैत्री ला सुरवात झाली होती... श्रेया नेहमीप्रमाणे सार्थक ची वाट बघत बसली होती... खूप वेळ झाला सार्थक आला नाही... मग तिने टिफिन न खाता तसाच बॅग मध्ये ठेवला... व कॅन्टीनमध्ये कॉफी घ्यायला गेलीं... तिथे एका टेबलवर सार्थक एका मुलींच्या ग्रुप सोबत टिफिन खात होता... आणि त्या मुलींचा ग्रुप म्हणजे हिना चा ग्रुप...
श्रेया आणि हिना मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाल होत... त्या दोघींच्या मधून विस्तव देखील जात नव्हता... पण हिना नेहमी श्रेया ला कसा त्रास देता येईल ह्याचाच विचार करायची.... त्यामुळे हिना नेहमी सार्थक शी ह्या ना त्या कारणाने बोलायचा प्रयत्न करायची... सार्थक खूपदा तिला ignore करायचा... पण श्रेया ला मुद्दाम धडा शिकवण्यासाठी त्याने हे केलं होतं... आणि हिना ला तर हातात कोलीत दिल्यासारख झालं होतं...
श्रेया ला सार्थक चा खूपच राग आला होता... ती तडक classroom मध्ये गेली.... थोडया वेळाने तिचा राग थोडा थोडा शांत होत होता... बेल झाली... श्रेया आणि सार्थक नेहमी एकच बेंच वर बसायचे... त्या दोघांनी नाव च लिहल होत त्यांच्या बेंच वर... श्रेया ला वाटलं की सार्थक तिथेच येईल बसायला... पण सार्थक हिना सोबत आला... व तिच्याच बेंच वर बसला...  आता तर श्रेया चा राग कंट्रोल होण्याच्या पालिकडे गेला होता...  तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं....  तिने बेंच वर डोकं ठेऊन ती रडू लागली..... सार्थक ने ते पाहिलं... त्याला वाईट वाटत होतं...  तो उठून तिच्या बेंच वर येनार इतक्यात सर वर्गात आले.... त्यामुळे सार्थक तिथून उठू शकला नाही...
सरांनी श्रेया कडे पाहिलं... श्रेया ला ह्याच देखील भान नव्हतं की सर वर्गात आलेत...
"श्रेया... श्रेया... ", सर श्रेया ला हाक मारत होते..
"येस सर....", श्रेया उठत बोलली
श्रेया चे डोळे सुजले होते.. तिचा अवतार बघून सरांनी तिला विचारलं, "बर वाटत नाहीये का...?"
"हो सर..... मी घरी जाऊ का?", श्रेया ने विचारलं...
"हो... तू जाऊ शकतेस.... सार्थक तु जातोस ना तिच्यासोबत नेहमी.... तिला घरी सोड..." सर सार्थक कडे बघत म्हणाले....
"हो सर"... सार्थक उठत म्हणाला....
सार्थक आणि श्रेया वर्गातून बाहेर पडले.... सार्थक ने श्रेया कडे पाहिलं... तिच्या चेहऱ्यावर शून्य भाव होते... सार्थक ला खूप वाईट वाटत होतं.... ते तसेच पार्किंग मध्ये आले...
"सॉरी...", सार्थक बोलला... 
तिच्या डोळ्यात पाणी आलं... ती खूपच hurt झाली होती...सार्थक सोबत बोलायची तिची अजिबात इच्छा नव्हती... तो अस काही वागेल हे तिने expect च केलं नव्हतं...
अजूनकाही आपण बोललो तर ही रडायला लागेल... अस म्हणून तो काहीच न बोलता गाडी सुरू केला....
येताना वाटेत ते दोघे ही एकमेकांशी काही न बोलता आले... सार्थक ने श्रेया ला घरी सोडले... श्रेया त्याच्याकडे न बघता च घरामध्ये गेली...
सार्थक त्याच्या घरी आला... तो खूप अस्वस्थ होता...त्याला कळाल होत की आपण श्रेया ला खूप दुखावलं आहे...
"उद्या तिच्याशी सविस्तर बोलूया...  व माफी मागूया.. ती पण नाही राहू शकणार माझ्या शी न बोलता..." सार्थक मनाशीच म्हणला...
इकडे श्रेया ची अवस्था पण काही वेगळी नव्हती.... तिला तिच्या शाळेचे दिवस आठवले.... हिना आणि श्रेया एकाच शाळेमध्ये होत्या.... हिना ने श्रेयापासून तिची शाळेतली बेस्ट फ्रेंड लांब केली होती... तिच्या मनात खूप काही भरवलं होत श्रेया बद्दल..... सार्थक सोबत पण असेच करून ती सार्थक ला आपल्यापासून दूर करेल असा विचार तिच्या मनात आला.... ती खूप घाबरली..
"उद्या सार्थक शी बोलू..... आणि पुन्हा तो अस नाही करणार अस बजावू..", अस स्वतःशीच बोलून श्रेया न जेवताच झोपी गेली
दुसऱ्या दिवशी सार्थक च तिला न्यायला तिच्या घरी आला... श्रेया आवरून त्याच्या सोबत कॉलेज ला जायला निघाली... आज सार्थक काहीतरी बडबड करत होता... पण श्रेया ने मुद्दाम लक्ष नाही दिल.....
"मला काल त्रास दिलास ना... आता थोडं तू पण सहन कर.....", श्रेया मनातच बोलली...
ती दोघे कॉलेज मध्ये पोहचली... कॉलेज मध्ये फेस्टिव्हल सुरू होणार होत.. त्याची तयारी आजपासून सुरू होत.... त्यामुळे lecture होणार नव्हते....
"श्रेया.... याररर.... सॉरी ना यार.... चुकलं माझ.... तू त्यादिवशी थांबली नाहीस म्हणून माझी किंमत कळावी म्हणून मी तुझी मज्जा केली.... मला माहित नव्हतं तुला इतकं वाईट वाटेल....." सार्थक काकुळतीला येत म्हणाला
"माहीत नव्हतं ना... मग जा परत हिना कडे", अस बोलून श्रेया तिथून निघाली
सार्थक हसत राहिला.... कारण त्याला माहित होतं... चिडून बोलली म्हणजे माफ केले.... जर माफ नसत केलं तर बोलली पण नसती... तो हसत तिच्या पाठी गेला...
"चल.... डोसा खाऊ.... तुझा आवडता.... मी देतो..", सार्थक बोलला
तिने त्याच्याकडे बघितल आणि  म्हणाली
"10 टाइम्स सॉरी म्हण..... आणि उधबशी काढ कान धरून"....
"इथं... डोक्यावर पडलीयेस काय?"...सार्थक हसत म्हणाला...
"मग जा तोंडं घेऊन इथन", श्रेया जिन्याकडे जात बोलली..
"आता नको नंतर"... सार्थक बोलला....
त्यांची ही मजामस्ती सुरू होती.... तोपर्यंत हिना तिथे आली.
"सार्थ्या.... इथे काय करतोयस.... चल आपल्याला डान्स ची प्रॅक्टिस करायची आहे", हिना तोऱ्यात बोलली...
"excuse me... आम्ही बोलतोय..... दुसरे बोलत असताना मध्ये बोलू नये इतकं पण कळत नाही का तुला...", श्रेया चिडून बोलली....
"सार्थक चल", अस म्हणून ती सार्थक चा हाथ धरून तिथून त्याला निघून गेली...
सार्थक तिला हे समजावन्या साठी गेला होता की तो ह्या डान्स मध्ये part घेऊ  शकत नाही...
पण श्रेया ला ते बघून परत वाईट वाटलं...  श्रेया ची अवस्था बघून सार्थक परत श्रेया कडे आला..
"हिना.... मी नाही part घेऊ शकत तुमच्या डान्स मध्ये.... आणि पुन्हा श्रेया ला त्रास देऊ नकोस", सार्थक श्रेया च्या शेजारी बसला....
"तुला सोडून मी जाईन का कुठे??? रडुबाई.... येडी....", सार्थक श्रेया च्या खांद्यावर हात ठेवत बोलला...
श्रेया ने त्याला मिठी च मारली.... व खूप रडु लागली....
"काय झालं येडाबाई.... गेली ती....", सार्थक ने विचारलं....
"मी तुला नाही गमावू शकत आता", श्रेया रडतच बोलली....
"काय झालं श्रेया.... मे कुठे जाणार आहे.... मी इथेच आहे ना", सार्थक तिला समजावत बोलला...
श्रेया ने रडत रडत तिच्या शाळेमध्ये घडलेली सगळी गोष्ट सांगितली....
"मी हिना मुळे तुला आता परत नाही गमावू शकत, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस.... आणि नेहमी राहणार.... मी तुला कुठेच जाऊ देणार नाहीं", श्रेया रडतच बोलली....
"आलें.... बापले.... अस झालं का??? तू लडू नको ह... आपण हिना च घर उन्हात बांधू.... ", सार्थक हसत बोलतो... आणि मोठयाने हसतो.... श्रेया त्याला मारते.... आणि तिच्या लक्षात येत की त्याच्या मिठीत आहे.... ती हळूच बाजूला होते... कारण असे तिने ह्या अगोदर कधीच कोणत्याच मुलाला मिठी मारली नसते... १ मिनिट awkward  होतात दोघेही...
"अग शांताबाई..... तू कशाला काळजी करते... तूच माझी बेस्ट फ्रेंड आहे.. आणि ती जागा कोणीही घेणार नाही...", सार्थक विषय बदलत बोलतो....
हे ऐकून श्रेया त्याला मारते... आणि दोघंही खोटी खोटी मारामारी करत हसत असतात.
....
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Next पार्ट कधी येणार..? खूप आतुरतेने वात पाहतोय.. कारण कथा माझ्याशी मिलती जुळती वाटतिये