लंबी रेस का घोडा...

Submitted by झुलेलाल on 22 September, 2019 - 05:16

कोणातरी टीव्ही अॅंकरने आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेनेचा राहुल गांधी’ असा केला. ती तसे बोलली तेव्हा समोरचा मायक्रोफोन सुरू असल्याचे तिच्या लक्षात आले नसावे. त्यामुळे त्या वक्तव्याचा व्हिडिओ विनाविलंब व्हायरल झाला. तिच्या या वक्तव्याबद्दल व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये नापसंती वा संताप दिसतो. पण त्याचे कारण अनाकलनीय वाटते. ‘ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा... लिखके रख लीजिये’ असे या अॅंकरचे ‘आॅफ दि माईक’ वाक्य स्पष्ट एेकू येते. तिच्या या वाक्यामुळे काहीजण अस्वस्थदेखील झाले असून त्या वाहिनीने ताबडतोब खुलासा करावा, असे काहींनी म्हटले आहे. ‘या अॅंकरला घरचा रस्ता दाखवावा’ असेही काहींना वाटते.
माझा मुद्दा वेगळाच आहे.
आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे भावी राहुल गांधी आहेत ही त्या अॅंकरची ‘भविष्यवाणी’ ऐकून संताप येणे हा राहुल गांधींचा घोर अपमान आहे. या महिलेने आदित्य ठाकरेंविषयी आदर दाखविला असून राहुल गांधींनी ज्या कणखरपणाने एकहाती पक्षाची कमान सांभाळली, तो कणखर बाणा आदित्य ठाकरेंच्या अंगी तिला दिसला असावा, असे मानण्यास वाव आहे. ‘राहुल गांघी’ हे नाव बदनाम आहे असा ज्यांचा समज आहे, त्यांनाच या अॅंकरच्या वाक्यामुळे राग आला यात शंका नाही. राहुल गांधी हे काॅंग्रेसचे भविष्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच काॅंग्रेस पुन्हा उभारी घेईल असा दृढ विश्वास असलेला मोठा वर्ग राजकारणात आहे, आणि त्यापैकी अनेकांची राजकीय कारकिर्द राहुलजींच्या वयाएवढी प्रदीर्घ राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही बिगरकाॅंग्रेसी नेत्यांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली होती. ‘एकदा त्यांना संधी देऊन पहायला काय हरकत आहे?’ असे तर एकदा खुद्द राज ठाकरेही म्हणाले होते. राहुलजींच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या वक्तृत्वाची, हजरजबाबीपणाची छाप पडल्याने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ त्या काळात किती व्हायरल झाले होते ते आठवा. त्याच काळात राहुलजींनी देश विदेशात संवाद साधून भावी भारताचे आपले स्वप्न जगासमोर मांडले होते, तेही आठवा.
आज काॅंग्रेस हा एक पराभूत पक्ष आहे,आणि कदाचित त्यामुळेच राहुल गांधी हे नाव बदनाम झाले आहे. म्हणूनच, आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेनेचा राहुल गांधी’ असा केला गेलेला अनेकांना रुचलेला दिसत नाही. ज्यांनी त्याबद्दल जाहीरपणे नापसंती, संताप व्यक्त केला आहे, त्यांनी राहुल गांधींचा अपमान केला आहे असे मला वाटते.
आदित्य ठाकरेंचा ‘भावी राहुल गांधी’ म्हणून आदित्य ठाकरेंचा सन्मान करण्याचाही त्या महिलेचा उद्देश असू शकतो. कारण, आदित्य आणि राहुल हे दोघेही, राजकारणातील ‘लंबी रेस का घोडा’ आहेत.
‘आपली भविष्यवाणी लिहून ठेवा’ असेही ती अॅंकर महिला म्हणाली आहे. ते खरे होते का ते भावी काळ ठरवेलच, पण या वाक्यतून तिने आदित्य ठाकरेंचा अपमान केला असा समज करून घेणे योग्य नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लंबी रेस का घोडा हे वाचून मला वाटले ऋषभ पंतवर धागा आहे Happy
पण हे राजकारण निघाले.. असो. माझा पास.. तो धागा मी काढतो Happy

उगाच लेख लिहिलात. त्या अँकर बाई आदित्य ठाकरेंची माफी मागून मोकळ्या झाल्यात.
https://twitter.com/anjanaomkashyap/status/1175428783299616768
My remark on Aditya Thackeray which is being spread with malice was out of lapse of judgement. I regret it. This, by no means, reflects the views of the channel or the network.

त्यांनी अजाणता ऑन एअर "लिखके लेलो" म्हटलं असलं तरी तिथे आपलं तारतम्य सुटलं असं त्या म्हणतात. याचं कारण त्यांना आपण जे म्हटलं ते खरंच चूक होतं असं वाटतंय की खळ्ळ ख ट्याकचा आवाज त्यांना आवडत नाही, हे त्याच जाणोत.

खरीखुरी अश्वपरिक्षा असलेलाच धांवताना बघितलेल्या अगणित तरूण घोड्यांतून नेमका ' लंबे दौडका घोडा' हेरूं शकतो. कारण, अशा घोड्याची खास लक्षणं त्याच्या तयार नजरेत भरतात. अशीं कोणतीं खास लक्षणं कोणाच्या बाबतींत नजरेत भरतात, याच्या उललेखाशिवाय कोणालाही ' लंबे दौड का घोडा' म्हणता येईल का ?
लोकप्रिय जननेता होण्याचे गुण आदित्य ठाकरेंत निश्चितच आहेत. पण राजकारणात खरया अर्थाने यशस्वी होण्यासाठी लागणारे इतर अनेक गुण त्यांच्यात असले तरी अजून दिसून यायचे आहेत, हेही खरं. त्याना शुभेच्छा.

<<आज काॅंग्रेस हा एक पराभूत पक्ष आहे,आणि कदाचित त्यामुळेच राहुल गांधी हे नाव बदनाम झाले आहे.>>

------ काँग्रेस पक्षाला २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूकांत अत्यल्प जागा मिळाल्या. पण म्हणून एक पराभूत पक्ष असे म्हणता येत नाही. पक्ष म्हणजे एक विचारधारा आहे, विचार पराभूत होत नाहीत. काही काळ (तो १० किंवा ३० वर्षांचाही असेल) विश्रांती घेणे जरुरीचे आहे, लोकांना वेगळा अनुभव येतो.

राहुल गांधी यांची बदनामी २०१४ च्या आधीपासून पद्धतशीरपणे होत आहे. २०१४ च्या निवडणूकां होण्या अगोदरही त्यांचा कोट्यावधी वेळा पप्पू असा नामोल्लेख झालेला झाला आहे. राफेलचा मुद्दा धसास लावला होता म्हणून त्यांना राफुल असे संबोधणे ( २०१९ च्या निवडणूकीच्या आधीच) सुरु झाले. मायबोलीवर पण त्यांना बहुतेक वेळा अनादरानेच संबोधले जाते.

त्यामुळे पक्षाचा पराभच झाला म्हणून राहुल गांधी हे नाव बदनाम झाले आहे असे म्हणता येत नाहे. त्यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न २०१४ च्या आधी पासून अगदी पद्धतशीर पणे झालेला आहे , सातत्याने होत रहातो आणि रहाणार आहे. पराभव होणे अथवा न होणे याचा बदनामीशी संबंध नाही. समजा काँग्रेसचा विजय झाला असता तरी त्यांच्या नावाची बदनामी झालीच असती.