नमस्कार मायबोलीकरांनो.
आज मी माझी पहिली कथा ईथे प्रकाशित करीत आहे.
''तु जे सांगतो आहेस ते अतिशय बरोबर आहे पण.....''
''पण काय''
''शेवटी जात आडवी येते.''
राकेशला हे ऐकुन धक्काच बसला.
आपला बाप जो समाज सुधारायच्या गप्पा मारतो त्याच्या तोंडून ही भाषा!
मग बाकिच्यांना बोलुन काय उपयोग
राकेश तावातावात नलिनीकडे गेला.
''नलिनी तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?''
''आता जीव दिला तर तुला कळणार आहे का कि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते!''
''तर मग नलू जर आपल्या प्रेमात जातीचा एकच अडथळा असेल तर मि आजपासुन माझी जात सोडली.''
''मग मीपण आजपासुन माझी जात सोडली, कारण तुझ्या प्रेमासमोर माझी जात काही नाही.''
पंधरा वर्ष उलटली.
राकेश तावातावाने जातीवादावर भाषण देत होता.
नलिनी अभिमानाने त्याच्याकडे बघत होती.
भाषण संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
घरी आल्यावर त्याने थोडा आराम केला.
आणि म्हणाला.
''नलू येतो मी, सोनीच्या शाळेत फी सवलतीसाटी जातीचा दाखला मागितलाय!''
चूकभूल माफ असवी
करणी आणि कथनीतला फरक दाखवला
करणी आणि कथनीतला फरक दाखवला आहे त्यांनी. नास्तिक म्हणवून घेणाऱ्या लोकांनी आरतीचा मान घ्यायला धावणे अश्या अर्थाची साधी सोपी कथा आहे ही. यात जातीय वाद कुठून आला?
जातिभेद आणि जात्याधारित
जात्याधारित आरक्षण (एस सी , एस टी) या त भिकारडेपणा नाही, तो हक्क आहे. घटनेने दिलेला.
अवांतर, घटने नुसारच लागू
अवांतर, घटने नुसारच लागू झाल्याच्या १० वर्षांनंतर आरक्षण बंद व्हायला हवे होते. हो ना? महाश्वेता, वकील असल्यामुळे तुम्हाला यातलं जास्त माहिती असेल म्हणून विचारते आहे. त्यावर आपण प्रकाश टाकावात. पण इथे बोलणे टाळूयात.
आणि आरक्षण विषयावर यावर आपण वेगळा धागा काढू. या कथेच्या धाग्यावर धुडगूस नको. कारण इथे कथेचा मुद्दाच वेगळा आहे.
.....तो हक्क आहे. घटनेने
.....तो हक्क आहे. घटनेने दिलेला.+१११
भरत मुळात जातिआधारित आरक्षण
भरत being a lawyer राज्यघटना हा माझ्यासाठी जगातला सगळ्यात important ग्रंथ आहे. पण जातिआधारित आरक्षण हा माझा विषयच नव्हता. आणि यावरही छान चर्चा करता येईल, दोन्ही बाजू जाणून घेता येतील. पण आता खरंच मला सुट्टी त्यावर घालवत बसायची इच्छा नाही.
मात्र इथल्या एका सो कॉल्ड आधुनिक विचारसरणी असलेल्या, प्रत्येक धाग्यावर arrogant मत मांडल्याशिवाय आज जेवण जाईल का नाही, याची भीती असलेल्या विदुषीनी दोन वाक्यांची सरमिसळ करून चुकीचा अर्थ काढून मला भिकारी ठरवणं, हे मला तरी काही पटलं नाही.
चलो, कल्टीस्ट या शब्दाचा नवा अर्थ उमजला.
< घटने नुसारच लागू झाल्याच्या
< घटने नुसारच लागू झाल्याच्या १० वर्षांनंतर आरक्षण बंद व्हायला हवे होते. > हे फक्त राजकीय आरक्षणाबद्दल आहे. आणि तिथे दर दहा वर्षांनी पुनर्विचार व्हावा म्हणून आहे.
मधुरा, या धाग्यावर आरक्षणाचा मुद्दा सगळ्यांत आधी तुम्हीच आणलाय.
जातिभेद म्हणजे काय ते समजून घ्यायला हा व्हिडियो बघा.
महाश्वेता, भिकारी हा शब्द
महाश्वेता, भिकारी हा शब्द प्रथम तुम्ही वापरलाय.
अॅमी यांच्या प्रतिसादात मला काही चुकीचं वाटत नाही.
दोन वेळच्या जेवणासाठी दुसर्या कोणावर अवलंबून राहावं असं सांगण्यात चूक न वाटणार्याने दुसर्याला भिकारी हा शब्द वापरायला हवा का?
जात्याधारित आरक्षण (एस सी ,
जात्याधारित आरक्षण (एस सी , एस टी) या त भिकारडेपणा नाही, तो हक्क आहे. घटनेने दिलेला.
Submitted by भरत. on 22 September, 2019 - 03:03
अवांतर, घटने नुसारच लागू झाल्याच्या १० वर्षांनंतर आरक्षण बंद व्हायला हवे होते. हो ना? महाश्वेता, वकील असल्यामुळे तुम्हाला यातलं जास्त माहिती असेल म्हणून विचारते आहे. त्यावर आपण प्रकाश टाकावात. पण इथे बोलणे टाळूयात.
आणि आरक्षण विषयावर यावर आपण वेगळा धागा काढू. या कथेच्या धाग्यावर धुडगूस नको. कारण इथे कथेचा मुद्दाच वेगळा आहे.
Submitted by मी_मधुरा on 22 September, 2019 - 03:15
>>>>>>>>>>>>>>>
भरत, मला वाटतयं तुमची गल्लत होते आहे. आरक्षण मुद्दा तुम्ही आणलात मी नाही. आणि तो प्रश्न मी महाश्वेता यांना विचारला त्या वकिल आहेत म्हणून. तुम्हाला उद्देशून मी काहीच लिहिलेलं नव्हत त्या प्रतिसादात.
जातीभेद म्हणजे काय हे व्हिडिओ पाहून शिकायची गरज काय?
आणि जर मला ते माहिती नसेल असे तुम्हाला वाटतं असेल तर चांगलेच आहे ना. माहितीच नसाव्यात या विकृती.
कुठे वापरला? दाखवून द्याल?
कुठे वापरला? दाखवून द्याल?
जाऊ देत, नसलेले शब्द तोंडी घुसवण, त्यात नको ते अर्थ लावणं, याची तुम्हीही सुरुवात केली, त्यामुळे कधीतरी चर्चा करायची इच्छा होती, तीही राहिली नाही.
भरत, यु टू?
आणि मधुरा, तू पुढचा भाग लिहायला घे बरं आता! मी वाट बघतेय.
हो श्वेता. लिहिणार आहे.
हो श्वेता. लिहिणार आहे.
मधुरा, तुमच्या २१ सप्टेंबर १२
मधुरा, तुमच्या २१ सप्टेंबर १२:५३ च्या प्रतिसादात आरक्षण हा शब्द आहे.
कथेतही फी सवलत म्हटलंय . ती जातिआधारित असते.
तो प्रश्न तुम्ही मला विचारला नसला, तरी सार्वजनिक धाग्यावर आहे. कोणीही वाचू शकतं. इथे केलेल्या चुकीच्या दाव्यांचं खंडन त्यासाठी गरजेचं आहे.
भीक या शब्दाच्या प्रथम वापराबद्दल I stand corrected . क्षमस्व. तो शब्द आधी अॅमी यांनी वापरला. पण मला त्या प्रतिसादात काहीही वावगं वाटत नाही.
मधुरा, तुमच्या २१ सप्टेंबर १२
मधुरा, तुमच्या २१ सप्टेंबर १२:५३ च्या प्रतिसादात आरक्षण हा शब्द आहे.
कथेतही फी सवलत म्हटलंय . ती जातिआधारित असते.>>>>> मी तो मुद्दा म्हणून नव्हता आणला. आपबिती/आंखों देखी कहानी प्रकार लिहिला होता मी. आणि पुन्हा तेच सांगते आहे. करणी आणि कथनीतला फरक होता त्यात.
एकदा माझा प्रतिसाद नीट वाचा. समजून जालं.
नास्तिक म्हणवून घेणाऱ्या लोकांनी आरतीचा मान घ्यायला धावणे अश्या अर्थाची साधी सोपी कथा आहे ही.
हा या सगळ्याचा सारांश. अगदी माझ्या त्या प्रतिसादाचाही जो नीट न वाचताच त्यातले दोन शब्द घेऊन तुम्ही त्यावर वेगळेच काहीतरी लिहिलेत.
असो.
आणि हो, प्रश्नाच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी कुठलाच दावा केला नाही. प्रश्न होता तो हे तुम्हीच मान्य करत आहात.
बरं. तुम्ही दिलेलं उदाहरण
बरं. तुम्ही दिलेलं उदाहरण हिपोक्रसी म्हणायला हवं. पण पुढे काही मुद्दे त्या अंगाने आलेले आहेत. त्यामुळे माझे प्रतिसाद मी कायम ठेवतोय.
नाही, भरत. हिप्पोक्रसी वगैरे
नाही, भरत. हिपॉक्रसी वगैरे काही नाही यात. आरक्षणाचा मुद्दाच नाहीये इथे, हे म्हणणं आहे माझं. आरक्षणाविषयीची माझी मतं मी तसा धागा आला की मांडेन. आणि तुम्हालाही तशी संधी मिळेल तसा धागा आला तर.
शस्वी आणि अयशस्वी ट्रोल
शस्वी आणि अयशस्वी ट्रोल लोकांची व्याख्या काय आहे? कृपया समजावून सांगाल काय?
>>>>>
नाही हु आर यु?
बाळ डुआयडी आहेस बाळा, थोडा मोठा हो, आपोआप समजेल!
नवीन Submitted by महाश्वेता on 22 September, 2019 - 02
आजीबाई आपण खऱ्याखुऱ्या आयडी आहात ह्यावर विश्वास कसा ठेवायचा? आप भी तो डुआयडी हो सकती हो ना.
>>>>>>>>>प्रत्येक मुलीला एक
>>>>>>>>>प्रत्येक मुलीला एक सेन्स असतो, समोरच्याच नेचर अथवा हेतू ओळखण्याचा. (बऱ्याचदा मुली तो वापरत नाही, ही गोष्ट वेगळी.) त्यामुळे दुसरी शक्यता नव्हतीच.
प्रचंड आवडली ही कथा. पुन्हा वाचली. तितकीच आवडली.
Pages