ऐकले नाहीस तू हुंकार माझे

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 September, 2019 - 03:07

फार झाले फार पाहुणचार ह्याचे !
संभ्रमाला बंद केले दार माझे

पाळणाघर सांगते वृध्दाश्रमांना
होय, प्रत्येकावरी ही वेळ येते !

तो मुलाकडचा, मुलीकडचा असावा ?
मांडवातच रंग दाखवतात फेटे

जागच्याजागी मिळे प्रत्येक वस्तू
वावडे माझ्या घराला शांततेचे

जाणते की देव अस्तित्वात नाही
संकटांमध्ये तुझे मी नाव घेते

हात होता सोडला गर्दीत माझा
घालतो आहेस का दारात खेटे ?

ऐकला होतास जयजयकार माझा
ऐकले नाहीस तू हुंकार माझे

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!

<<< जागच्याजागी मिळे प्रत्येक वस्तू
वावडे माझ्या घराला शांततेचे >>>

अर्थ समजला नाही.

शेवट च्या तीन द्विपदी उत्तम! Happy

घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे मिळते आहे, शांतता मात्र मिळत नाही

>>>> मलाही नव्हता समजला, उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

आवडली गझल. Happy