कम्बर दूखने अर्थात् low back pain

Submitted by कटप्पा on 14 September, 2019 - 21:13

एक दहा दिवस आधी मी गाडित बसत असताना अचानक शिंका आल्या . पाठीला झटका बसला आणी कम्बरे मधे दुखायला लागले .दुसर्या दिवशी सकाळी उठलो तर मी वाकडा झालो होतो कम्बरेत .Tilted torso .
डॉक्टर कडे गेलो , त्यानी निदान केले low back muscle spasm. मग काही औषधे दिली आणी आयिस प्याक लावायाला सांगीतला .
आज दहा दिवस झाले दुखने पन्च्यान्नव टक्के निट झाले आहे. पण अजुनहि धड थोडेसे वाकड़े आहे.
तुमच्यापैकी कोणाला असा त्रास झाला असेल तर अनुभव सांगाल का.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लचक भरणे म्हणतात. तिळाचे तेल लावले की आठदहा दिवसाने कमी होते. आपण जे उपचार करत राहतो त्यातल्या शेवटल्या उपचारानेच बरे झाले असे वाटते. पण तोपर्यंत पंधरा दिवस गेलेले असतात.

Diclofaneac ची इंजेक्शन चार पाच दिवस घेतले तर आखडलेले स्नायू मोकळे होतात. रेफर आर्थोपेडीक तज्ञ.

मला लोअर बॅक पेन आणि मानेचे दुखणे होते. विशेषतः कंबर खूपच दुखत असे. मान पण वळवता येत नसे. याचे मुख्य कारण म्हणजे posture चुकीचे आहे. मी बरेचदा chiropractor कडे जाऊन आलो, पण काही फार फायदा झाला नाही. त्याने मसल रिलॅक्संट दिले की तात्पुरते बरे वाटत असे, पण नंतर कंबर दुखत असे. शिवाय ती औषधे अ‍ॅडिक्टिव्ह आहेत. त्या दुखण्याने मी खूप वैतागलो होतो.

मग मी पोहायला सुरुवात केली, त्याने १००% फायदा झाला. मला पोहता येत नसे, म्हणून इंस्ट्रक्टरकडून क्लास लाऊन शिकलो. आता मी अधून मधून कमरेला पट्टा पण लावतो आणि त्याने posture बदलले आहे. उशी वापरणे बंद केले होते, आता मेमरी फोमची उशी वापरतो. शक्यतो ताठ बसतो (पोक न काढता किंवा पुढे न वाकता) एकदा याची सवय झाली की तुम्हाला बरे पडेल. गेल्या अनेक वर्षात आता फारसा त्रास नाही (कधी तरी किरकोळ त्रास वगळता).

उपाशी बोका - छान माहीती. तुम्ही दुखण्यावर आराम मिळावा म्हणुन पोहणे शिकलात हे कौतुकास्पद आहे.

तुम्ही पुण्यात असाल तर पंताच्या गोटात ( न्यु इंग्लिश स्कूल टिळक रोड समोरील लेन) एक हॉस्पिटल आहे ( नाव आठवत नाही) तिथे डॉ हिमांशू वझे असतात संध्याकाळी. ते पोस्चर बद्दल नीट माहिती देतील. तसेच काही सहज करायच्या पोजेस / व्यायाम सांगतील. ३-४ दिवसात कंबरदुखी विसरून जाल. अशा गोष्टींसाठी कोणतेही ओषध घेण्याच्या ते विरुद्ध आहेत.

आधी आखडलेले शरीर नीट होवू दे. मग व्यायाम करायला सुरुवात करा. खंड पडू देवू नका.
लवकर बरे वाटूदे ह्या शुभेच्छा!

कॅट पोझ आनि कॅमल पोझ ही आसने कंबरदुखी टाळतात. पण कंबर दुखताना करु नका. बरे झाल्यावरती ही २ आसने सुरु करा.

कम्बरदुखी फार भयानक, मी त्याची तुलना दातदुखी बरोबर करतो
देवाच्या कृपेने आजपर्यन्त फक्त एकदा त्रास सहन केलाय.
फर्निचर सरकावत होतो तर कम्बर लचकली. चांगले तिन आठवडे लागले परत नॉर्मल होण्यासाठी.

>>>>कम्बरदुखी फार भयानक, मी त्याची तुलना दातदुखी बरोबर करतो
बाप रे अनुभव नाही. दातदुखीचा आहे पण कंबर दुखीचा इतका तीव्र नाही. सौम्य त्रास झालेला आहे क्वचित. उंष्ट्रासन आणि मार्जारासन बेस्ट. पण ते केव्हा कंबर दुखत असताना नाही तर तर दुखू नये म्हणुन प्रिव्हेन्टिव्ह मेजर्स.