सोळा आण्याच्या गोष्टी - धडक - आनंद.

Submitted by आनंद. on 3 September, 2019 - 06:12

"तुला बोलावलंय ढोल्यानं, ऑफिसात."
दिग्याच्या बोलण्यानं मी वहीतनं वर बघितलं तसं पलिकडच्या रांगेतल्या प्राचीकडे लक्ष गेलं. नजर भिडताच तिनं फणकाऱ्यानं मान फिरवली.

ढोल्या !
शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचीचे वडील. पोटात भितीनं गोळा आला. काल संध्याकाळी तिला 'आय लव यू' लिहीलेलं. आता चांगलीच खरडपट्टी निघणार आणि उद्या आप्पांनाही बोलावून घेणार.

आप्पा ! डोळ्यांसमोर काजवे चमकल्यागत माझा सुजलेला गाल मला दिसला.
प्राचीचा राग आला.
..पण धडक तर घ्यावीच लागणार...

"आत येऊ, सर ?"
ढोल्यानं चष्मा सावरत 'ये' म्हटलं.

"आनंदा, परवा अमृतवाहीनीतल्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी प्राचीसोबत तुला निवडलंय."

हुश्श !

"जो मेरी मंजिलोंको जाती हैं
तेरे नाम़की कोई सड़क हैं ना"

'दोघांच्या धडकनीनं' स्पर्धा जिंकली होती !

―आनंद ०३/०९/२०१९

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्झरा, जिद्दुजी, सिद्धी, मेघा, vt220, मन्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. Happy

>>>शतशब्दकथा छान आहे पण रहस्यकथा हवीय ना ? बहुतेक मी नीट नाही वाचले नियम. >>>
हो जिद्दु ! रहस्यकथाच हवीये नियमानुसार. Happy
माझ्या कथेत रहस्य ( Proud ) दडलंय आणि त्याची उकलही झालीये. Lol
मला वाटतं, मी कमी पडलोय ती व्यवस्थित वाचकांपर्यंत पोहोचवायला. Happy

>>>रहस्यकथा भयकथाच असायला हवी असा काही नियम नाही ना? >>>
vt220, हम्म ! असा काही नियम नसल्यानेच वेगळा प्रयत्न करून बघितला. Happy

मस्तये...
आणि हो रहस्य आहे यातही!

छान

मधुरा कुलकर्णी, पद्म, akku320, सूर्यगंगा, सिद्धी, जाई, ऍमी, किल्लीताई प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. Happy

सुंदर...