त्रिवेणी/हायकू उपक्रम- विषय ५

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 02:41

Poem banner 1a.jpg

हा त्रिवेणी/हायकू उपक्रम. यामध्ये आपणास इथे दिलेल्या विषयावर १ त्रिवेणी किवा १ हायकू दोन्ही, किवा दिन्ही पैकी एक सादर करायचे आहे.

त्रिवेणी-
त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो. पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिकेसारखी स्पर्श करते आणि त्याचा संपूर्ण विषय बदलून टाकते.
१. विषयाचा उल्लेख कोठेही करु शकता. उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा असे काही नाही.
२. यासाठी मा.बो.आयडी प्रतिक सोमवंशी यांचा हा धागा पहा.
https://www.maayboli.com/node/70374

हायकू-
हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी. काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे.
१. विशिष्ट विषयावर १ हायकू रचायचा आहे, हायकू ३ ओळींचा असावा.
२. हायकू मुक्तछंद असतो, पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकू आढळतात, तसेही चालेल.
३. पारंपारिक जपानी हायकू सतरा मात्रांचा (सतरा जपानी सिलॅबी) असतो. अर्वाचीन काळात हे बंधन पाळले जातेच असे नाही.
४. विषयाचा उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या विषयाशी असायला हवा. जो तिसर्या ओळीत दिसला पाहिजे
५. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.
http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem

उदा.

त्रिवेणी आणि हायकूसाठी विषय - धरती

त्रिवेणी-
गडगडाट झाला चिंब धरती.
भरुन आले मेघ
मला दिसे गालावरी, तुझ्या आसवांची रांग.

हायकू-
हिरवी पाने अन रंगीबेरंगी फुले
सरीता गाते गोड गाणे
सजली धरती चैतन्याने.

ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हा उपक्रम गणेशोत्सवाचे दहा दिवस (दिनांक ०२ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०१९) चालेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार ०२ सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ) नव्या विषयाचा नवा धागा काढला जाईल. आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या विषयावर हायकू आणि त्रिवेणी या उपक्रमात भाग घेणाऱ्यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल.
२. हायकू आणि त्रिवेणीसाठी दोन दिवसांनी नवा विषय नव्या धाग्यात दिला जाईल.
३. एक आयडी एकाहून अधिक हायकू आणि त्रिवेणी रचू शकेल.
४. एका प्रतिसादा वेळी एकच हायकू किवा एकच त्रिवेणी द्यायची आहे.
५. भाग घेणाऱ्यांनी एका प्रतिसादा वेळी हायकू आणि त्रिवेणी दोन्ही किवा दोन्ही पैकी एक सादर करायचे आहे.
फक्त हायकू किवा फक्त त्रिवेणी देखील ग्राह्य धरली जाईल..
६. दोन्ही प्रकारांमध्ये स्व-रचीत रचना असावी.
७. वरील नियमांनुसार तयार न होणारी रचना, 'हायकू आणि त्रिवेणी' यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाही.

उपक्रमाचा आजचा विषय पुढील प्रमाणे.
५. हिंदोळा

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरुर विचारा.
! गणपती बाप्पा मोरया!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निळे, हिरवे, भगवे, आले काही श्वेतही त्यात
सभ्यतेची लक्तरे पांघरून सावज न्याहाळले एकांतात
माणुसकीला हिंदोळ्यावर झुलवणे भिनले साऱ्यांच्या रक्तात !!

गोड आठवांचे थवे
मन स्वच्छंदी तुझ्या सवे
तृप्त मी हिंदोळ्यावर झुलावे

धुंद प्रेमाच्या हिंदोळ्यावर
रोज मज भास नवा
साद देतो चांदवा