सोळा आण्याच्या गोष्टी - ‘कंपनी’ जयश्री देशकुलकर्णी

Submitted by jayshree deshku... on 9 September, 2019 - 13:13

कंपनी
ठरल्याप्रमाणे ऑफिसच्या बायका एक दिवसाच्या ट्रीपसाठी निघाल्या होत्या. १०-१२ बायका नुसत्या गाडीमध्ये धुमाकूळ घालत होत्या. गप्पाना आणि गाण्याच्या भेंड्याना उधाण आल होत. मध्येच सुधा म्हणाली, “अग त्या पुढच्या वळणावर रेवाला पिक अप करायचे आहेना? ती कालच इथल्या घाटातल्या हॉटेलमध्ये पिकनिकला आली आहे. पण आपली कंपनी तिला मिस करायची नाही, म्हणून ती आपल्याला इथ जॉईन होणार आहे.” सगळ्याजणी म्हणाल्या. “ हो रेवा आल्यावर अजून मजा येईल,.”
वातावरणात अचानक मळभ दाटून आलं लगतच्या दरीतून घाटाकडे धुक्याचा पडदा सरकला. त्यात वळणावर वाट पहात असलेल्या रेवाची आकृतीही अस्पष्ट दिसत होती. तिच्यासाठी गाडी थांबवली. गूढ हसत गाडीत चढत, रेवा म्हणाली, “देणार ना मला कंपनी? काल रात्रीच माझा इथे अपघात झाला.” काही कळायच्या आत गाडी दरीत कोसळली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

पण पत्ता आणि फोन नंबर का दिलाय शेवटी? असं कोणी देत नाही जालावर.

मस्त!

छान.. Happy

पण जास्त भयकथा वाचण्याचा परिणाम की काय माहीत नाही, मला सुरुवातीलाच अंदाज आला होता शेवटाचा Happy

बिपीन, Ami, VB, उर्मिलास, सस्मित ,आज्ञातावासी , सुनिधी, किल्ली ,अमर सर्वाना मनापासून धन्यवाद

अरे काय खतरनाक आहे रेखा... धाडकन १२ संसार उध्वस्त केले उगाचच.>> रेखा नाही रेवा. या बायका जाम छळत असतील तिला. शेवटी बदला घेतलाच तिने Happy
चांगली कथा आहे पण शेवट रेवाने स्वतः अपघात झालाय असे सांगण्यापेक्षा अजुन धक्कादायक करायला हवा होता.

आवडली
>>>>>>>>> शेवट रेवाने स्वतः अपघात झालाय असे सांगण्यापेक्षा अजुन धक्कादायक करायला हवा होता.>>>>>>>>>>> +१